मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी ने 'नॉट विदाऊट' वाचलंय आईने लिहिलेलं. >> सायो माझी आई कधीच शाळेत गेली नाही. <<<

तुझ्या आईचा इथे काय संबंध?

ती दोन पुस्तके आहेत. एक आईने(नॉट विदाउट... ) आणि एक बापाने लिहिलेलं (विदाउट... ).

>>बी ने 'नॉट विदाऊट' वाचलंय आईने लिहिलेलं. >> सायो माझी आई कधीच शाळेत गेली नाही. <<<
Uhoh तुझ्या आईने असं कुठे म्हटलंय??

सायो आणि मै ला अनुमोदन.
खर्‍या घडलेल्या गोष्टीच्या आधारे पुस्तक लिहिलं असेल, तर लेखिका खरच सगळ्यातून गेली असणार.. म्हणजे नवर्‍याने फसवणे, परतायला नकार देणे, मुलीला घेऊन जाऊ द्यायला नकार देणे इत्यादी इत्यादी.. ह्याबद्दल पुस्तक लिहिताना ती सहाजीकच स्वतःच्या बाजूने / एकांगीच लिहिणार .. दुसरी बाजू विचारात घ्यायला हवी होती वगैरे अपेक्षा फार जास्त आहेत असं मला वाटतं.. !

सद्ध्या हे वाचतेय -The spell of the flying foxes - by Sylvia Dyer

पुस्तकातील वर्णने, भाषा फार चित्रदर्शी आहेत. मला अजून तरी आवडत आहे हे पुस्तक वाचायला.

खर्‍या घडलेल्या गोष्टीच्या आधारे पुस्तक लिहिलं असेल, तर लेखिका खरच सगळ्यातून गेली असणार.. म्हणजे नवर्‍याने फसवणे, परतायला नकार देणे, मुलीला घेऊन जाऊ द्यायला नकार देणे इत्यादी इत्यादी.. ह्याबद्दल पुस्तक लिहिताना ती सहाजीकच स्वतःच्या बाजूने / एकांगीच लिहिणार .. दुसरी बाजू विचारात घ्यायला हवी होती वगैरे अपेक्षा फार जास्त आहेत असं मला वाटतं.. !>>> अगदी अगदी मलाही हेच वाटले पुस्तक वाचताना.

ती दोन पुस्तके आहेत. एक आईने(नॉट विदाउट... ) आणि एक बापाने लिहिलेलं (विदाउट... ).>>>धन्स नीरजा. मला हे माहिती नव्हतं. लक्षातही आल नाही साति ह्याबद्दल बोलते आहे म्हणून. माझ्याशी खूप जण बोलायला लागले मी माझा असा गोंधळ होतो.

हो बी.
एक आईने लिहिलंय 'नॉट विदाऊट माय डॉटर' आणि एक बाबाने लिहिलंय ' विदाऊट माय डॉटर'

या बी च्या निरागसतेची कधी कशी मला कमाल वाटते. Happy

>बी ने 'नॉट विदाऊट' वाचलंय आईने लिहिलेलं. >> सायो माझी आई कधीच शाळेत गेली नाही. <<<
अ ओ, आता काय करायचं तुझ्या आईने असं कुठे म्हटलंय??>> टण्याची आणि त्याने लिहिलेल्या त्या प्रतिसादाची आठवण आली. Proud

मला पण माहिती नव्हतं वरच्या त्याच पोस्टस वाचून मला कळलंय.>> तुझी आकलन शक्ती चांगली आहे माझी अगदी सुमार आहे.

बरं . ह मो मराठेंचे "दि बीग बॉस" काल वाचायला काढले , प्रस्तावनेत विनोदी कथा असा उल्लेख आहे. मी त्यातले विनोद शोधतोय , एखादा सापडलाच तर ईथे लिहिन म्हणतो.

पाटील Happy

असेच एक विनोदी असल्याचा संशय असलेले पुस्तक माबोवरील एका अतिमहान लेखकाचेही आहे असे एकीवात आहे!

मी एरिक सिगल चे 'लव्ह स्टोरी' वाचायला घेतलयं. खुप ऐकलं आहे पुस्तकाबद्दल. माझ्या इंग्लिश पुस्तक वाचनाची सुरुवात एरिक सिगलच्या 'प्रायझेस' ने झाली होती. फार आवडले होते मला ते पुस्तक.
'लव्ह स्टोरी' हे त्याचे सगळ्यात फेमस पुस्तक आहे म्हणे. एरिक सिगल गेला तेव्हाही 'लव्ह स्टोरी' चा लेखक गेला अशा अर्थी पेपरमध्ये छापून आले होते. त्यावर निघालेला सिनेमाही खुप गाजला. मी पाहिला नाही आहे.
कोणी हे पुस्तक वाचले आहे किंवा सिनेमा पाहिला आहे का?

इथे बर्‍याचदा कादंबरी वरुन चित्रपट यावर लिहले गेलेय. प्रभाकर पेंढारकरांची रारंगढांग, चक्रिवादळ, आणि चिनार लाल झाला वाचताना यंच्यावर चांगले चित्रप्ट होतील असे वाटत राहाते. कदाचीत त्यांचा फिल्म्स डिव्हीजनशी संबंध असल्याने लिखाणही त्यानुसार झाले असावे. खासकरुन रारंगढांगवर चित्रपट बनायला हवा.

सायो | 6 November, 2012 - 23:08 >>> सायो, तुझ्या या पोस्टला अनोमोदन. मला काल हेच वाटलं होतं, पण शब्दात मांडता आलं नव्हतं. Happy

माधवी, पुस्तक छान आहे. खुप वर्षं झाली वाचुन. एरिक सेगलच्या 'लव स्टोरी'वर हिंदी सिनेमा पण आला होता. 'ख्वाईश' - मल्लिका शेरावतचा. Happy कॉलेज डेजमधे मला तरी आवडलेला Wink इंग्लीश पाहिला नाही.

अवांतर - बी च्या पोस्टवर इतक्या पोस्टस आल्या, पण जेव्हा मी ती पोस्ट वाचली तेव्हा मला वाटलं त्यांनी ते विनोदाने लिहिलं आहे आणि स्मायली न टाकल्यामुळे बाकी लोकांना तो विनोद कळला नाही. Happy

मनिमाऊ
'ख्वाईश' - मल्लिका शेरावतचा.>>>'लव स्टोरी'वर ? हो का? मलाही बघायला आवडेल मग! Wink

मी सुमती देवस्थळे ह्यांचे 'टॉलस्टॉय एक माणूस' हे एक पुस्तक वाचत आहे. जाड आहे पुस्तक. मी 'टॉलस्टॉय' विषयी शाळेत असताना जे काही वाचले ऐकले तेवढेच ज्ञान मला आहे म्हणून हे पुस्तक आणले.

मध्यंतरी मी 'नर्मदे हरहर' वाचले.

माधवी - एरिक सीगल यांच 'लव्ह स्टोरी' मी वाचल आहे. खूप छान आहे पुस्तक. तसच "ओलिवरस स्टोरी" छान आहे. जुना हिंदी सिनेमा 'मासूम' हा त्यांच्या 'मॅन, वुमन अ‍ॅन्ड चाईल्ड' या पुस्तकावर आहे. ही तिन्ही पुस्तक तशी लहान आहे. त्यांच "क्लास" हे नॉवेल थोड मोठ आहे. हे पुस्तक हार्वर्ड च्या काही मित्रांवर आधारीत आहे - फारच सुंदर आहे!

सुलभा ब्रह्मनाळकरांचे 'बंद खिडकीबाहेर' आवडलं. मौज, पद्मगंधामधले संकलित लेखच आहेत, काही वाचले होते पण मजा आली पुन्हा वाचताना. रुढार्थाने प्रवासवर्णनं पण तरी वेगळ्या ढंगाचे लेख. >>

शर्मिला, सुलभा ब्रह्मनाळकर ह्या खूप म्हणजे खूपचं छान लिहितात. पुस्तकाचे नाव सांगितल्याबद्दल धन्यवाद तुला. तू इथे नियमित येत रहा. काहीतरी नवीन सांगतेस नेहमी.

जनहो, जरुर ही लेखिका एकदा तरी वाचा.

adi787
धन्यवाद, मी पण संपूर्ण 'एरिक सीगल' वाचायच्या विचारात आहे Happy प्रायझेस पण बरचं मोठं होतं.

मी पण संपूर्ण 'एरिक सीगल' वाचायच्या विचारात आहे >>>. +१ Happy
'लव्ह स्टोरी' आवडलेच पण त्यापेक्षा 'डॉक्टर' जास्ती आवडले! खूप मोठा कॅनव्हास आहे.. आता कोणते वाचू? प्रायझेस? की आधी 'मॅन, वुमन अ‍ॅन्ड चाईल्ड' ?

एरिक सिगलचं लव्ह स्टोरी , ऑलिव्हर्स स्टोरी आणि मॅन वुमन अ‍ॅन्ड चाइल्ड वाचलयं . तिन्ही पुस्तकं आवडली.
सध्या मंगला गोडबोलेंचं "सुनीताबाइ" वाचतेय. मागे इथे सन्ज्योप राव यांनी त्याबद्दल लिहीलं होत्,तेव्हापासून हे पुस्तक वाचायच ं मनात होतं .

जॉन अपडाईकचं 'रॅबिट, रन' नुकतंच वाचलं. कथानक काही फार निराळं नसलं, तरी पुस्तक वाचनीय आहे. इतर इंग्रजी पुस्तकांपेक्षा सलग वाचनाची लय सापडायला थोडी अधिक पानं खर्ची पडली; पण नंतर वर्तमानकाळातली, लघुकथेची आठवण करून देणारी निवेदनशैली; वाक्यांची आणि उपमांची थोडी निराळी ढब हे आवडू लागलं. त्याच मालिकेतलं 'रॅबिट रिडक्स' तूर्तास वाचायला घेतलं आहे.

जॉन अपडाईकचं 'रॅबिट, रन' नुकतंच वाचलं. कथानक काही फार निराळं नसलं, तरी पुस्तक वाचनीय आहे. इतर इंग्रजी पुस्तकांपेक्षा सलग वाचनाची लय सापडायला थोडी अधिक पानं खर्ची पडली; पण नंतर वर्तमानकाळातली, लघुकथेची आठवण करून देणारी निवेदनशैली; वाक्यांची आणि उपमांची थोडी निराळी ढब हे आवडू लागलं. त्याच मालिकेतलं 'रॅबिट रिडक्स' तूर्तास वाचायला घेतलं आहे.
>> खूप बोलक लिहितोस की लगेच वाचावस वाटत हे सुचवलेल पुस्तक.

नंदन, रॅबिट सिरिज माझी पण आवडती. अमेरिकेत आल्यावर ओळख झालेला पहिला लेखक, शिवाय आमच्या राज्यात घडणार्‍या गोष्टी, त्यामुळे अपडाइकची जी पुस्तके वाचली त्यात रॅबिटवर विशेष प्रेम.
अपडाइक ची व्यक्तीचित्रण करण्याची शैली पण मला खास वाटते. तुमच्याकडून सविस्तर परिक्षण वाचायला आवडेल .

Pages