मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२-३ दिवसांपुर्वी 'कुमाऊंचे नरभक्षक वाचले . मस्त आहे. त्यानंतर अजुनपर्यंत मी जीम कॉर्बेट तरी आहे किंवा वाघ तरी...
खुप मजा आली

मार्जोरी किनन रॉलिन्ग्ज यांच्या "द इयरलिंग" या कादंबरीचा "पाडस" हा राम पटवर्धनांनी केलेला अनुवाद वाचला..
अप्रतिम आहे..

सुमारे दिडशे वर्षापुर्वींचा काळ. जंगलात झाडं तोडुन तयार केलेली बॅक्स्टर कुटुंबीयांची शेती-वाडी, बॅक्स्टर बेट. जवळपास शेजार नाही. मा, पा आणि १२ वर्षाचा ज्योडी. साधारण एका वर्षातल्या घडामोडी. शेतीत कष्ट करुन, शिकार करुन, वेगवेगळ्या प्राण्यांचं मांस साठवुन, कधी कधी जिवंत अस्वलांची पिल्लं विकुन, बर्‍याचदा कातडं, मांस विकुन इतर सामान विकत घेणे इ. प्रकारे कुटंबीयांची गुजराण चालु असते. शिकारींची आणि अगदी साध्या साध्या प्रसंगांची वर्णनंसुद्धा अगदी खिळवुन ठेवणारी आहेत. ज्योडीला हरणाचे पाडस मिळते अन त्याच्या रुपाने त्याला एक जिवलग सखा मिळतो. कादंबरीचा शेवट हा ज्योडीचा बालपणातुन प्रौढपणात पदार्पणाने होतो.

चिमुरी, मी पण हा अनुवाद वाचला आहे. फार छान कादंबरी आहे. तो काळ, ते जंगलातलं वातावरण, तिथली वर्णनं वेगळंच आहे. आवडलं होतं वाचायला.

नारायण धारप यांचे 'प्राध्यापक वाईकरांची कथा' वाचले, सुरवात ठिक आहे, पण नंतर कथा प्रेडिक्टेबल होत जाते. कुणाला मराठीतील दिर्घकथा किंवा मराठीत अनुवाद केलेली हॉरर बुक्स माहीत आहेत का?

मराठीत अनुवाद केलेली हॉरर बुक्स >> Stephen king चे अनुवाद आहेत बरेच, मी मराठीमधे वाचलेले नाहियेत पण.

विजयाबाईंचे "झिम्मा" वाचले.त्यांची काही नाटके पाहिली होती पण त्या नाटकांच्या जडण-घडणी बद्दल झिम्मा तुन कळले.नाटक जगणारी,प्रचंड नाटकवेडी बाई !!!
"मेलुहा" वाचले.सोपी वाक्यरचना .त्यामुळे आवडले.

आशुचँप - मी आहे गुड रीड्स ची सभासद. मी नेहेमी पुढे कुठल पुस्तक वाचायच हे गुड रीड्स वरचे रीव्हीव वाचूनच ठरवते.

मी ही परवा 'झिम्मा' विकत घेतलं आहे. त्याबद्दल वर्तमानपत्रांतून आलेलं वाचलं होतं तेव्हाच पुस्तक विकत घ्यायचं ठरवलं होतं. आता चवीचवीने वाचणार आहे. (ते वाचण्यासाठी म्हणून नित्यकामांमधून आठ दिवसांची सुट्टी मिळावी आणि ते एकसलग वाचता यावं असं फार वाटून गेलं. पण ते काही शक्य होणार नाहीये.)
मी घेतली ती त्याची दुसरी आवृत्ती होती. पहिली एका आठवड्यात संपली म्हणे!

मी 'Enslaved' वाचतेय. (हे मराठीत लिहिताना फारच पंचाईत झाली Happy )
राहिला गुप्ता यांचे.
युकेमधील 'इल्लिगल इमिग्रेशन आणि स्लेव्हरी' या संदर्भात पुस्तकात ५ गोष्टी आहेत.
मी आत्ताशी पहिलीच गोष्ट वाचतेय. 'फर्हिया नुर'ची. जी सोमालियातुन युकेमधे इल्लिगली मायग्रेट झाली आहे. तिची गोष्ट वाचुनच अंगावर काटा आला आणि आपण किती सिव्हीलाईज्ड सोसायटीमधे राहतो हे जाणवले.
राहिला गुप्ता ह्या 'Provoked' च्या सहलेखिका आहेत.

माझ्या आजीने एक डायरीवजा लिखाण केले होते. अंदाजे १०० पानी वही आहे. ती १२ वर्षापूर्वी गेली.

सध्या ती डायरी वाचत आहे.

नताशा, मग त्या डायरीबद्दल इथेही लिही वाचून झाले की. तुझ्या आज्जींनी नक्कीच त्यावेळचे संदर्भ नोंदवले असतील ना डायरीत?

माझ्याही हातात काल आलं "झिम्मा" ! Happy

आता चवीचवीने वाचणार आहे. (ते वाचण्यासाठी म्हणून नित्यकामांमधून आठ दिवसांची सुट्टी मिळावी आणि ते एकसलग वाचता यावं असं फार वाटून गेलं. पण ते काही शक्य होणार नाहीये.) >> ++१०० Sad

Italo Calvino यांच Invisible Cities सध्या वाचून झाल. मार्को पोलो आणि कुबलाई खान यांच्या मधील हा एक काल्पनीक संवाद आहे. मार्को हा खानला त्यानी आजवर बघितलेल्या शहरांच वर्णन सांगतो आहे. ईटालो यांच्या काल्पनकी गावांमधे फेर फटका मारताना खूप मजा येते. तसच 'स्थलांतर', 'आधुनिकरण' ह्या विषयांवर त्यांनी त्यांचे मत एका वेगळ्या प्रकारे मांडले आहेत. ह्या पुस्तका बद्द्ल लिहीलेल हे वाक्य मला अगदी पटल "Of all tasks, describing the contents of a book is the most difficult and in the case of a marvelous invention like Invisible Cities, perfectly irrelevant." -- Gore Vidal, The New York Review of Books
पुस्तक लहान आणि अगदी वाचनीय आहे.

बाबा कदम यांचे 'शाळा सुटली, पाटी फुटली' पुस्तक वाचले. कथानक स्वातंत्रपुर्वी आश्रमात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याबद्दल आहे. ज्या वाचकानां मिलींद बोकील यांची 'शाळा' आवडलेय त्यानीं जरूर वाचावे. Happy

झिम्मा वाचून झालं. मला पुस्तक फार तुकड्यातुकड्यात असल्यासारखं वाटलं. लहानपणाविषयी त्यांनी जसं लिहिलं होतं ते वाचून पुस्तकाविषयी अपेक्षा वाढल्या होत्या. पण नंतर नंतर "हे केलं मग ते केलं मग त्याआधी हे केलं" अशा टाईपचं होत गेलय. अभिनेत्रीच्या रूपात घेतलेली मेहनत जशी येते तशी दिग्दर्शक या रूपामधे येत नाही. त्यांच्या बहुतेक नाटकांच्या कथावस्तूबद्दल त्यांनी सांगितलं आहे पण तालमीसाठी अथवा प्रयोगादरम्यान दिग्दर्शक म्हणून त्यांची मते फारशी मांडलेली नाहीत.

तरी हे पुस्तक वाचण्यासाठी तरी उत्तम आहेच यात वाद नाही. भाषेचा बाज आणि तोल अगदी सुंदर आणि सहज आहे. काहीकाही आठवणी सांगण्याची पद्धत देखील भन्नाट आहे. नाटकाची आवड असणार्‍या बहुतेक लोकांना हे पुस्तक आवडेल.

भारताबाहेर रहाणारे लोक मराठि पुस्तके कशी मिळवून वाचतात? मराठि मंडळाच्या लायब्ररीमधे नवीन पुस्तके फारशी नसतात. इतर काहि पर्याय आहे का?

मी पण ह्या सुट्टी मधे शिवा ट्रायोलॉजीमधली दोन्ही इमॉर्टल्स ऑफ मेलुहा आणि सिक्रेट्स ऑफ नागा वाचून संपवली - माला खूप अवडली - ग्रिप्पिन्ग आहेत दोन्ही पुस्तकं. .... ध्न्यवाद आशुचँप ह्या पुस्तकची माहीती दिल्या बद्दल.

मी आत्ताशी पहिलीच गोष्ट वाचतेय. 'फर्हिया नुर'ची. जी सोमालियातुन युकेमधे इल्लिगली मायग्रेट झाली आहे. >>
माधवी मी या पुस्तकातली ही पहिली गोष्ट अर्धीच वाचली अन पुस्तक ठेवून दिलं. हृदय जोरात धडघडायला लागलं होतं. ते योनी शिवण्याचा प्रकार वाचताना तर माझं अंग थरथरायला लागल.... काय म्हणतात त्याला? female genital mutilation. हा किवर्ड गुगलून पाहिला अन थक्क झालो.

बापरे... काय काय प्रकार होते त्या सोमालियात. अन वरुन हे सुद्धा लिहलय की योनी शिवणे हा धर्माचा भाग नसून तिथल्या सामाजिक चालिरितीचा भाग आहे. वयाच्या ७-८ वर्षी पोरीची योनी शिवली जाते. अन लग्न होईस्तोवर योनीची कातडी पार चिकटून गेलेली असते. लग्ना नंतर ती शिवलेली योनी नव-याना चाकूने कापून उघडने वगैरे वाचल्यावर तर पुढे वाचायची माझी हिंमतच झाली नाही. पुढे काय आहे जरा लिहाल का? म्हणजे परत एकदा वाचायला घ्यावं की काय विचार करता येईल.

झिम्मा वाचून संपवले, अणि मला खूप आवडलेही. अतिशय आत्मीयतेने लिहिलेलं पुस्तक. स्वतःच्या लहानपणीच्या आठवणी, आपल्या आई वडिलांच्या, भावंडांच्या आणि इतर नातेवाईकांच्या आठवणी अगदी मायेने लिहिलेल्या आहेत. खोटे आणि मेहता कुटुंबियांबाबतही, तसेच स्वतःच्या गुरुंविषयी अतिशय ग्रेसफुली आणि आत्मीयतेने लिहिलेले आहे. दुर्गा खोटेंबरोबरचे नातेही किती सुरेख रीत्या उलगडून दाखवले आहे, त्यातील राग-लोभ सारेच फार लोभस.

रंगायन चळवळ, भारत- जर्मनी ह्यांच्यातले नाट्यप्रयोग, दूरदर्शन आणि सिनेमा, इतर नाट्यभूमी आणि बाईंनी ज्या कलाकारांबरोबर - सगळेच - फक्त नाट्यकलाकार नव्हेत- कामं केलेली आहेत, त्यांचे मांडलेले प्लस आणि मायनस पाँइंट्स अणि तेही वस्तुनिष्ठपणे. रंगायनच्या सर्व प्रवासाची अतिशय संयत मांडणी वाचून आणि कोणाविषयीही जराही नाराजीचा सूर न लावता हे लिखाण वाचताना तर मला सतत विजयाबाईंचे प्रसन्न हास्य आठवत राहिले.

पुस्तकात कुठेही मला नाराजीचा आत्ममग्न सूर वा आत्मप्रौढी जाणवली नाही. सगळ्या प्रवासात बाईंनाही खूप सहन करावं लागलेलं आहे, त्यावेळची आपली घालमेलही त्यांनी मांडली आहे, पण एकंदरच माणसांविषयी वा प्रसंगांबद्दल कटू न लिहिता.

बाईंच प्रसन्न, निखळ व्यक्तिमत्व पुस्तकातून जाणवतं. संग्रही ठेवण्यासारखं पुस्तक.

एम. ,

मलाही अगदी वाचवत नव्हतं! Sad
अगदी एकेक पॅरा ब्रेक घेऊन वाचला मी. 'फर्हिया नुर' वरचे प्रसंग खरच जीवघेणे आहेत अगदी.

नंतरची गोष्ट एका 'नताशा' ची. रशियातून युरोपीयन देशांमधे 'वेट्रेस' म्हणुन काम मिळवून देतो अशा बतावणीला भुलून एका शरीरविक्रय करण्यार्‍या लोकांच्या जाळ्यात अडकलेली. बर्‍याच युरोपीयन देशांमध्ये
शरीरविक्रय करणे कायदेशीर आही हे मला नविनच कळले. पण 'नताशा' १७ वर्षांची आणि कशा कशा प्रसंगातून गेली हे बघुन अंगावर काटा येतो.

अशीच एक गोष्ट नाओमी ची आहे.

मग चीनमधल्या 'लिऊ' ची गोष्ट आहे. तो पुरुष असल्याने आणि त्याच्याकडे पैसा असल्याने त्याला अवैधरित्या देशांच्या सीमा पार करताना असा काही त्रास झालेला दिसत नाही पण त्याचा त्रास वेगळाच. चीनी सरकारकडून त्याच्या कुटुंबियांना होणारा त्रास पाहून तिथल्या कम्युनिस्ट राजवटीबद्दल वेगळीच गोष्ट कळली.

आणि मग 'अंबर्'ची गोष्ट आहे. भारतातून ब्रिटनमधे लग्न करून गेलेली. आई-वडीलांनी परदेशी स्थळ बघून, भुलून थाटात लग्न लाऊन दिलं असतं भरपूर हुंडा देऊन आणि इकडे येऊन तिला एक मोलकरीण म्हणुन राबवलं जातं. मानसिक शारिरीक छळ केला जातो. आणि शेवटी घराबाहेर काढलं जातं.
आई-वडील म्हणतात सांभाळून घे आणि परत येऊ नकोस :(.

पण सगळ्य गोष्टींचा शेवट चांगला आहे. ह्या सगळ्या व्यक्तिंचा संघर्ष अजूनही चालूच आहे पण नक्कीच भविष्यात काहीतरी चांगले होईल असा त्यांना विश्वास आहे.

खुपचं अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे, अवैध इमिग्रेशन आणि त्या अनुषंगाने येणारी गुलामगिरी अशा विषयावरचे.

(शुद्धलेखनाच्या चुका असल्यास सॉरी. जरा गडबडीतच प्रतिसाद लिहित आहे)

सध्या मी अलेक्स रुदरफोर्डच्या एम्पायर ऑफ दी मुघल या सिरीजमधले पहिले पुस्तक रेडर्स फ्रॉम दी नॉर्थ वाचतोय...
अतिशय मस्त पुस्तक आहे...भाषा एकदम ओघवती आणि सोपी आहे...पुस्तकाची सुरुवात बाबरच्या लहानपणापासून होते...वडील अकाली गेल्यामुळे १२ वर्षाच्या बाबरवर त्याच्या छोटेखानी राज्याची जबाबदारी पडते. आणि मग तो चुकत माकत, आपल्या ताकतीचा अंदाज घेत, तावून सुलाखून कसा बाहेर पडतो हे फार परिणामकारक रित्या मांडले आहे...युद्धादी प्रसंगही चांगले तपशीलवार खुलवले आहेत...
आणि बाबर जरी नायक असला तरी त्याच्या चुका आणि त्याचे क्रौर्य सुद्धा दाखवण्यात लेखकाने हात आखडता घेतलेला नाही ही मला आवडलेली गोष्ट...
सुरुवातीच्या काही पानांनेंतर आपण बाबरबरोबरच वाटचाल करू लागतो...आता लवकरच पुढचा भाग ब्रदर्स अॅट वॉर वाचायचा आहे....

आशुचँप
मला पण ही पुस्तके माहित आहेत पण मला वाटले इंग्लिशमधुन वाचताना एवढे काही इंटरेस्टिंग वाटणार नाही. आता वाचते. ३ भाग आहेत ना?

'८४ चेरिंग क्रॉस रोड'

रूढ अर्थाने हे पुस्तक नाही. न्यू यॉर्क शहरात राहणारी, व्यावसायिक/टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात अजिबात जम न बसलेली एक लेखिका आणि लंडनमधल्या एक सेकंडहँड आणि नवीन पुस्तकांच्या दुकानातले (त्याचा पत्ता हेच पुस्तकाचे शीर्षक) काही कर्मचारी यांच्यातल्या वीस वर्षांतल्या रोचक पत्रव्यवहाराचे हे संकलन आहे.

सुरुवात होते ती १९४९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात हेलन हँफ या लेखिकेने लंडनमधल्या 'मार्क्स अँड कं'ला काही पुस्तकांसाठी पाठवलेल्या पत्राने. जी अगदी जुनी पुस्तकं तिला हवी आहेत, त्यांच्या सुस्थितीतल्या प्रती न्यूयॉर्कमध्ये एक तर फार महाग तरी आहेत किंवा ज्या स्वस्त आहेत, त्या अगदीच टाकाऊ आहेत (Barnes and Noble's grimy, marked-up schoolboy copies) असा तिचा आजच्या आघाडीच्या पुस्तक-दुकान-साखळीबद्दल शेरा पहिल्याच पत्रात आहे :).

दोघांतला पत्रव्यवहार सुरुवातीला औपचारिक असला तरी पुढे तो तसा राहत नाही. हेलनच्या टिपिकल अमेरिकन, मोकळ्याढाकळ्या नर्मविनोदी शैलीपुढे फ्रँकचं विलायती शिष्टपणाचं, ऑफिसच्या पत्रांना उत्तरं देताना वापरायच्या prim भाषेचं अस्तरही गळून पडतं. पौंड आणि शिलिंगांचं अमेरिकन डॉलर्समध्ये धर्मांतर करण्यासाठी हेलन जेव्हा तिच्या इमारतीतल्या ब्रिटिश मैत्रिणीची मदत घेते; तेव्हा तिला दुसर्‍या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या रेशनिंगबद्दल समजतं. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी ज्यांच्याशी ओळख झाली, अशा अटलांटिकपारच्या स्नेह्यांसाठी ख्रिसमस मोठ्या प्रमाणावर साजरा न करणारी, न्यू यॉर्कच्या कडाक्याच्या थंडीत राहत्या जागी हीटरसारखी आवश्यक गोष्टही आवाक्याबाहेर असणारी ही ज्यू धर्मीय लेखिका सहा पौंड हॅम आणि ड्राईड एग पावडरची मौल्यवान भेट धाडते.

पुढची वीस वर्षं अव्याहत सुरू राहिलेला हा पत्रव्यवहार निव्वळ पुस्तकांच्या खरेदीविक्रीपुरताच मर्यादित राहत नाही; तर फ्रँकची बायको, मुली आणि शेजारची म्हातारी बाईसुद्धा हेलनशी संवाद साधतात. एखादी दुर्मीळ प्रत सापडल्यानंतर दोघांना झालेला आनंद - पुस्तकाच्या मूळच्या रसिक मालकाने समासात केलेल्या नोंदी - इंग्रजी भाषेची हेळसांड - परिचितांकडून घडणारे पुस्तकं लांबवण्याचे प्रकार - केवळ हेमिंग्वेच्या अर्पणपत्रिकेमुळेच अमेरिकन वाचकांना ठाऊक झालेला जॉन डन हा कवी आणि परिणामी त्याच्या जीवनावर हेलनले लिहिलेल्या भागाचा झालेला स्वीकार - जुन्या पुस्तकांची निगा - पेजकटर यासारख्या वेगवेगळ्या विषयांवर हे संवादु रंगतात ते जेमतेम नव्वद पानांच्या ह्या छोटेखानी पुस्तकात.

ज्या लंडनबद्दल इतक्या पुस्तकांतून वाचलं, ते प्रत्यक्ष पहावं अशी आच लागलेली हेलन ही इच्छा बर्‍याचदा व्यक्त करते.

Please write and tell me about London, I live for the day when I step off the boat-train and feel its dirty sidewalks under my feet. I want to walk up Berkeley Square and down Wimpole Street and stand in St Paul's where John Donne preached and sit on the step Elizabeth sat on when she refused to enter the Tower, and like that. A newspaper man I know, who was stationed in London during the war, says tourists go to England with preconceived notions, so they always find exactly what they go looking for. I told him I'd go looking for the England of English literature, and he said: "It's there."

शिवाय ज्या दुकानाने आपल्याला गेली अनेक वर्षं अनेक दुर्मीळ पुस्तकं पुरवली; त्या जागेला आणि तिथल्या मित्रांनाही परस्परांना भेटायचं असतं. दुर्दैवाने पैशांच्या चणचणीमुळे तिला हा बेत सतत लांबणीवर टाकावा लागतो. १९६९ साली फ्रँकचा अचानक मृत्यू होतो आणि ह्या पत्रमित्रांची प्रत्यक्ष भेट राहूनच जाते. इ-बुक्स आणि आंतरजालाचा प्रादुर्भाव(!) झालेल्या काळात ही खरी गोष्ट कदाचित काही काळाने सुरस कथाही वाटू शकेल; पण फारसं साहित्यिक मूल्य नसणारं हे पुस्तक मात्र ग्रंथोपजीवियांच्या विशेषी लोकींची हृद्य कहाणी सांगून जातं.

नंदन, मस्त लिहिलं आहे. लगेच फ्लिपकार्टवर पाहिलं, पण या पुस्तकाची पृष्ठसंख्या नक्की सांगता येईल का? कारण फ्लिपकार्टवर याच पुस्तकाचे २ प्रकार आहेत - एक ११२ पानी आणि एक २२४ पानी आहे. उगाच चुकीचं हातात पडलं तर काय घ्या?

Pages