मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हमोंचं बालकाण्ड वाचलं नुकतचं. लेखनशैली खुप छान आहे. त्यांची निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ही अशीच खिळवून ठेवते. खुप डिप्रेसिंग आहे कथानक. पण वास्तव आहे ते..

गोनिदांचं 'कहाणीमागची कहाणी' वाचत आहे सध्या. मला आवडलं. ज्यांना गोनिदांचं लिखाण आवडतं त्या सर्वांना आवडेल. जे कुणी कथालेखन करतात त्यांनी सर्वांनी जरुर वाचा.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

मला गोनिदांचं 'कुणा एकाची भ्रमणगाथा' खुप आवडतं आनि माचीवरला बुधा ही. कहाणीमागची कहाणी वाचलं नाहीये. आता वाचेन..

झुंपा लाहिरी च्या unaccoustomed earth मधल्या पहिल्या ३ गोष्टी वाचल्या...
नेमसेक ने वाढवलेल्या अपेक्षा पारच धुळीला मिळाल्या.... खूपच सामान्य वाटलं मला तरी... Sad

सरी , मागच्याच महिण्यात वाचल मी "कुणा एकाची भ्रमणगाथा" .. बरचस डोक्यावरुन गेलं . आता परत वाचणार आहे . सध्या वंशवेल , आहार्-विहार, डायट हे वेड लागलय Happy , वंशवेल खरच खुप माहीती देणारं आहे .

~Do u know who is the best couple in the universe? SMILE and TEARS.
Rarely they meet, but if they meet that will be the most gorgeous moment ever! ~

नेमसेक मधे असे विशेष आहे तरी काय.. मला तर ते पुस्तक, खास करून त्याचा शेवटं एकदम रटाळ वाटला.

दीपु, डाएट वगैरे विषयांबद्दल बोलुन (म्हणजे नुसतच बोलुन) आ बैल मुझे मार करणं सोडलयं रे मी सध्या.. भ्रमणगाथा मात्र हळूहळू कळत आणि चढत जातं. परत एकदा वाच निवांत.

कुणी sedany sheldon नही का वाचत?

सध्या अनील अवचट यांच "कार्यरत" वाचतेय... खुप छान पुस्तक आहे

इथल्या पोस्टांनी प्रभावित होऊन मी पण गौरी देशपांडेंची आहे हे असं आहे.. आणि गोफ वाचली. आवडली. पारायणं करावीत अशीच!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ
बिजली की तलवार नही बूँदों के बाण चलाओ

आता मुक्काम, उत्खनन ही वाच. तुला नक्की आवडतील.

मुक्काम<<<<<<<
च्या आधी 'थांग' वाचायला हवी. 'थांग' चा पुढचा भाग म्हणजे 'मुक्काम.'
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.

गौरीच्या पुस्तकांची यादी देत आहे:

१) आहे हे असे आहे
२) एकेक पान गळावया
३) दुस्तर हा घाट
४) विंचुर्णीचे धडे
५) उत्खनन
६) थांग
७) मुक्काम
८) तेरुओ आणि काही दुरपर्यंत
९) चंद्रीके गं सारीके गं
१०) निरगाठी
११) And pine for what is not.. (हे पुस्तक 'आहे मनोहर तरी.. ' या सुनिताबाईंच्या पुस्तकाचा अनुवाद आहे.)
१२) The Lackadaisical Sweeper (ह्यातील बर्‍याचशा कथा 'आहे हे असे आहे' मधे आहेत.)
१३) Diary Of A Decade Of Agony (हे पुस्तक अविनाश धर्माधिकारी ह्यांच्या 'अस्वस्था दशकाची डायरी' या पुस्तकाचा अनुवाद आहे.
१४) Transalation of Richard Burton's "Arabian nights"
१५) Between the Births (हा त्यांचा काव्यासंग्रह आहे)

अन्य वाचलेले लेख (तुम्ही जर त्यांचे लेख इतर कुठे वाचले असतील तर लेखांची नावे लिहावीत):

१) हीशेब (बापलेकी मधे आहे)
२) भिजत भिजत कोळी
३) नव्या दंतकथा
४) दार
५) धरलं तर चावतं
६) निर्झर (शशी देशपांडे ह्यांच्या एका कथेचा अनुवाद)

अरे हो की. मी थांग कशी विसरले.. धन्स श्रध्दा.. बी तुलाही, लिस्ट साठी..

दुस्तर हा घाट आणि थांग ह्या दोन्ही एकाच पुस्तकात आहेत.
.
गौरी मनातली हे गौरीच्या पंख्याना आवडेल असे आहे. गौरी गेल्यावर त्यांच्या गोतावळ्यातील कुणी-कुणी त्यांच्याविषयी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. बहुतेक अशा पुस्तकासाठी म्हणुन ते लेख विषेश लिहुन घेतले आहेत.
.
कुठल्या तरी दिवाळी अंकात तिचे शेवटचे काही लिखाण प्रसिद्ध झाले होते. त्यात चोरी वर एक गोष्ट होती.

'कथा गौरीची'सुद्धा खूप छान आहे.

हे काय आहे ? तिने लिहिलेले की तिच्याविषयी लिहिलेले ?

एकाच पुस्तकात दोन भाग आहेत. पहिल्या भागात त्यांच्याविषयी लेख आहेत. दुसर्‍या भागात त्यांच्या पुस्तकांचं समीक्षण. सगळंच कौतुक नाही. आणि शिवाय त्यांच्या दोन मुलाखती.
संपादन विद्या बाळ आणि वंदना भागवत यांनी केलं आहे.

आणि गिताली विं. म. ह्या देखील आहेत संपादन करण्यामधे.

हो. ही सगळी मिळुन सार्‍याजणींची टीम. गौरीताई गेल्यावर एक विशेषांक काढला होता मिळुन सार्‍याजणी मासिकाचा. त्या वरुनच ह्या समग्र गौरी ग्रंथाची कल्पना सुचली.

मलाही अजिबात अनक्स्टम्ड आवडले नाही. तुम्ही इंटरप्रिटर ऑफ मलाडीज वाचलं का? ते मला आवडलं होतं. झुम्पाचं पहिलं पुस्तक?

अनंत सामंतांचं 'एक ड्रीम्...मायला....' वाचलं. पुस्तक बरं आहे. एकदा वाचण्याजोगं. भाषा अगदी आजच्या तरूण पिढीला (सर्वच नाही, पण काही) आवडेल अशी आहे, बेदरकार शिव्या,सवंग शब्द आणि वाक्य. पण पुस्तक एकदा हातात घेतलं की पुढे काय होईल ही उत्सुकता, पुस्तक खाली ठेऊ देत नाही.

खालिद हुसैनी चं काईट रनर वाचलं.. जरा उशिरच झाला वाचयला.... अप्रतिम पुस्तक आहे.. !
शवटची साधारण १७५ पानं एका बैठकीत संपवली...
अफगाणिस्ताना बर्फ पडतो हे मला माहितच नव्हतं.. ! आणि जे काही टिव्ही/ पेपर मधे पहिले आहे त्यावरून तरी तिथे हिरवळ, डाळींबाची झाडं वगैरे अस्तिल असं वाटतं नाही.. Happy

नेमसेक मधे असे विशेष आहे तरी काय.. मला तर ते पुस्तक, खास करून त्याचा शेवटं एकदम रटाळ वाटला. >>> मी मुव्ही आणि पुस्तक एकामगोमाग एक वाचल्याने मला आवडलं.. एकूण त्यातले बारकावे आणि प्रसंग उभा करायची शैली आवडली मला...

>> खालिद हुसैनी चं काईट रनर वाचलं.. जरा उशिरच झाला वाचयला.... अप्रतिम पुस्तक आहे.. !
अनुमोदन ! काईट रनर मलाही आवडलं खूप. कॅलिफोर्नियात खूप अफगाण आहेत हे तरी कुठे माहिती होतं ? !!!

अरे बाप रे हे असे बाफ पण शिल्लक आहेत का अजुन आणि लोक त्यावर संदेश पण देताएत् Wink

काईट रनर मी २ वर्षापुर्वी वाचले होते. मला खुप आवडले होते. त्या नंतर त्याच्यावर काढलेला सिनेमा पण बघितला या वर्षी.
सिनेमा इतका नाही आवडला. पुस्तक मात्र नक्कीच वाचायला हवे.
मला वाटते आधी पुस्तक वाचले असेल तर पुस्तकाला सिनेमात न्याय मिळला नाही असेच बरेच वेळा वाटत रहाते.
दाविंची कोड बाबत पण असेच झाले

--------------------------------------------
Mothers are the necessity of invention.
-Calvin and Hobbs

आधी पुस्तक वाचले असेल तर पुस्तकाला सिनेमात न्याय मिळला नाही असेच बरेच वेळा वाटत रहाते.>>>
अनुमोदन रुनि. क्लासिक उदाहरण- हॅरी पॉटर! Happy
पुस्तकाच्या दुनियेत आपण हरवून जातो इतकं डीटेलिंग असतं, सिनेमात नाही म्हणलं तरी विस्तारभयामुळे त्यांना सगळंच दाखवता येत नाही. परत प्रत्येकाला पुस्तक वाचताना त्याची त्याची स्वतःची दुनिया उभारता येते, सिनेमा नाही म्हणलं तरी दुसर्‍या कोणीतरी केलेला असतो! Happy

आदमा, देर आये दुरुस्त आये Proud

आशा बगेंची पारितोषक विजेती 'भूमी' वाचली. अस्वस्थ करून सोडते. काय रंगवली आहे नायिका आणि तिचं आयुष्य!
--------------------------------------
अताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते..

काईट रनर वर अधारित सिनेमाचं नाव काय आहे? Uhoh
मी ही साधारण ६ महिन्यांपूर्वीच वाचलं पुस्तक, मला जाम डिस्टर्बिंग वाटलं. Sad
.
नुकताच मी व्हिकी बामच्या फेमस कादंबरीचा अनुवाद वाचला.... 'मेन नेव्हर नो'
खरं सांगू तर काहीच अर्थबोध झाला नाही. कथा आहे त्यात मोजून २ ते ३ प्रसंग आहेत, ते वेगवेगळ्या पात्रांच्या नजरेतून आपल्या समोर मांडले आहेत. कथा तर मला कळली. पण त्यातून लेखकला काय मेसेज द्यायचा आहे ते काही कळलं नाही. Uhoh
तुमच्यापैकी कोणी वाचलं असेल तर मला जरूर सांगा...

पुन्हा एकदा.. एक उत्कृष्ट पुस्तक सुचविल्याबद्दल तुमचे आभार!
व्यासपर्व वाचलं.. इतके दिवस आपण जी गोष्ट फक्त डोळ्यांनी पाहत होतो तीच गोष्ट जर एखाद्या प्रिझम मधून पाहिली तर मधेच त्यातले सप्तरंग दिसू लागतात!! तस्सं वाटलं हे पुस्तक वाचताना.. ज्यांना महाभारतातल्या व्यक्तिरेखांमधे रस आहे त्यांनी हे जरूर वाचा.. गुणांमधले दोष आणि दोषांमधले गुण सापडतील... त्यांच्या एकलव्य, कर्ण आणि दुर्योधनाला तोड नाही!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

Pages