मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जियो शुम्पी. धन्यवाद.
ललिता, मला त्यातला काही भाग पटतो आणि काही नाही. तुझे वाचून झाले का? मग चर्चा करुया.
ज्यांना वाचता येईल त्यांनी सगळ्यांनी वाचा.

चालेल, रैना, मी वाचायला सुरूवात केली आहे. पण स्क्रीनवर वाचायला मजा येत नाही विशेष Sad तस्मात, मला बहुतेक २ वेळा वाचावं लागणार ...

@ टण्या/आगाऊ - 'क्रॉनिकल्स ऑफ अ डेथ फोरटोल्ड' बद्दल सहमत आहे.

बाकी अजून एक ईषत् विनोदी शीर्षक म्हणजे 'माझं चीज कोणी हलवलं?' Happy

हो नंदन, मी मागे एकदा पुपुवर हे लिहिलं होतं की ऑफिसातल्या बूकस्टॉलवर 'किसने हिलाया मेरा चीज' बघून मी नखशिखांत 'हिलले' होते Wink

हो, शिवाय 'हू कट द चीज?' हे विडंबनही :).
स्टाईनबेक असता तर त्याने वैतागून 'ऑफ माईस अँड मेन (हू कीप मूव्हिंग द चीज)' असं काहीसं लिहिलं असतं, अशी धास्ती वाटते Wink

नंदन आणि आगाऊ Lol मस्तच!!
मला असल्या सेल्फटीचिंग पेप फिलॉसॉफी पुस्तकांची जबरदस्त अ‍ॅलर्जी आहे.

जो पर्यंत तशा अनेक पुस्तकांचा सुळसुळाट नव्ह्ता तो पर्यंत ते तेवढं वाईट नव्हतं. हु मुव्ड माय चीज..
मराठी, हिंदी अनुवाद जबराट Lol

स्टाईनबेक कशाला वाचायला गेला असता ते.. शेकोटी पेटवली असती त्याने..:-)
रच्याकने
परवा इकडे एच.बी.ओ वर 'Hemingway & Gellegher' लागला होता. चित्रपट काही खास नव्हता. निकोल किडमन ने Gellegher ची भूमिका केली आहे. त्या निमित्ताने हेमिंग्वेची माहिती वाचली. कमाल वाटली.
इकडे हाती लागले म्हणुन 'True at first light' नावाचे हेमिंग्वेच्या निधनानंतर प्रकाशित झालेले पुस्तक वाचले. बरेच काही वाटुन गेले..
http://en.wikipedia.org/wiki/True_at_First_Light

आउट ऑफ आफ्रिका वाचले. सिनेमा अनेकदा बघितलेला होता पण पुस्तक खरोखरच भन्नाट आहे. गद्य वाचताना पद्याचा अनुभव येणे क्वचितच होते. पण बाईची भाषा इतकी कोवळी, लयदार आहे की छान वाटते. तिचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, युरोपिअन कॉलनीजच्या मागची नैतिकता वगैरे सगळे मुळचे आहे, बेगडी नाही.
चिकनहॉक नावाचे विएतनाम युद्धात अमेरिकेच्या लष्करात एक वर्षे हेलिकॉप्टर पायलट म्हणुन काम केलेल्याचे 'युद्धवर्णन' आहे. मला आवडले.

एक वाचनीय पुस्तक- "युद्ध जीवांचे" लेखक- गिरीष कुबेर
"रसायनांचा मानव संहारासाठी झालेला सढळ हस्ते वापर" ह्यावर प्रकाश टाकणारं अप्रतिम पुस्तक!!

विवाह आंबट झाला? Rofl अशी भाषांतरं करणार्‍यांना कुठले प्रकाशक भेटतात बुवा?

नताशा मी वाचायला सुरुवात केलेली. पण घरातून तु. क. मिळाले. शिवाय जेवढे वाचले त्यात तो हिरो
काहीतरी इकोफ्रेंडली शेती करत असतो ती नक्की कशी याचेच जास्त कुतुहल वाटले मंजे नक्की वय झाले असे वाटून बिट खिन्न वाटलेले. शिवाय तिथे जे सिनॅरिओ आहेत ते अगदी स्टेज्ड आहेत असे
आधी अ‍ॅग्रिमेंट करून काँट्रॅक्ट करून कधी काही पॅशन वाट्ते काय? ति हिरॉइन अगदीच गलिबल आणि मिल्स अ‍ॅन्ड बून टायप आहे असे वाटोन मग पुस्तक घालवले घरातून. पटले नाही ते ग्रे.

सध्या कोकाकोला च्या सीइओ चे आत्मकथन आहे ते वाचत आहे. मस्त आहे. वेगळा रिव्यू लिहायला वेळ नाही.

इकोफ्रेंडली शेती करत असतो ती नक्की कशी याचेच जास्त कुतुहल वाटले मंजे नक्की वय झाले असे वाटून बिट खिन्न वाटलेले.>> Lol

हिरो काहीतरी इकोफ्रेंडली शेती करत असतो ती नक्की कशी याचेच जास्त कुतुहल वाटले >> अरारा Lol
मी पुर्ण सिरीज नाही वाचली. पहिलंच वाचलंय इतक्यात..
स्टेज्ड सीन्स आहेत ते खरंच पण कंट्रोल फ्रीक ग्रे चा तोच इश्यु आहे ना..असो.
कधीकधी प्रत्येकवेळी नवीन फ्लेवर वाचायचा कंटाळा येतो (खरंच Wink ) पण उत्सुकतेपोटी (म्हणजे कथेची बरं..) पुर्ण पुस्तक वाचलंच. आता पुढच्या भागात सब्-डॉम नात्याला उलटं केलं असावं असा उगाच अंदाज आहे..अस्मिता, बरोबर आहे का? तसं असेल तर लगेच घेऊन वाचायची घाई करायची गरज नाही असं वाटतं.
ग्रे चं वर्णन वाचून कधी मिसो कधी हृतिक आठवत होता..क्या करने का? Wink

@नताशा डार्कर मधे डॉम सब नातं उलटं होत नाही.
पूर्ण सिरीज मि अँ बु सारखीच आहे, भरपुर मालमसाला घालुन, बाकी काही नाहीय त्यात. वेगवेगळ्या पोझिशन्सची थेअरटिकल वर्णन वाचण्यात मजा येत नसेल तर ही पुस्तकं वाचण्यात काही अर्थ नाही. कथा असं काही नाहीचय त्यात. ट्वायलाईट फअॅन साइट वर प्रतिसाद/ब्लॉग म्हणुन सुरु झालेली ही सिरीज अडल्ट ट्वायलाइट किँवा मॉमी पॉर्न म्हणुन खूप प्रसिद्ध झाली. गेल्या वर्षी खूप धुमाकुळ घातला या पुस्तकांनी.

हम्म.. नंतर वाचीन मग. सध्या बास्स झालं.
मॉमी पॉर्न>> हे नाव जरा डेरोगेटरी आहे असं माझं मत झालं.

मॉमी पॉर्न म्हणजे मॉमीच्या वयाच्या स्त्रियांमधे पॉप्युलर पॉर्न पुस्तक. शक्यतो त्या वयाच्या स्त्रियांच सेक्स लाइफ बोअरीँग झालेलं असतं, म्हणुन मग स्पाइस एड करायला हे वाचा अशी मार्केटिँग स्ट्रेटजी...
मी स्पॉयलर टाकु का ग्रे कंट्रोल फ्रिक का असतो?

अस्मिता..हो माहीत आहे पण सेक्सिस्ट शब्द आहे, म्हणून डेरोगेटरी वाटतो. स्पॉयलर नको टाकूस. तेवढंच काय ते ग्रे. बाकी सगळं ब्लॅक अँड व्हाइट आहेच.
हे जे काय मराठी मी छापलंय त्याबद्द्ल आधीच माफी मागते.

ते फिफ्टी शेडस माझ्या यादित आहे. का? उगाच.. नक्की किती वाईट असु शकते याचे कुतुहुल आहे. Proud

इकोफ्रेंडली शेती करत असतो ती नक्की कशी याचेच जास्त कुतुहल वाटले मंजे नक्की वय झाले असे वाटून बिट खिन्न वाटलेले.>> Lol

ओके नाही टाकत स्पॉयलर Happy 'डॉम सब च नात उलट होत का' च उत्तर पण मी मुद्दामच फक्त नाही असं दिल. काय होतं ते नाही सांगितल... कारण मग वाचण्यासारख काही रहात नाही..

इकोफ्रेंडली शेती करत असतो ती नक्की कशी याचेच जास्त कुतुहल वाटले मंजे नक्की वय झाले असे वाटून बिट खिन्न वाटलेले.>> Lol

ग्रे कंट्रोल फ्रीक असण्यापेक्षा हिरवीन जास्त मंद वाटते.

Pages