मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मी अनुवादीत वाचलय....जर्मन सैन्यातून एक सैनिक पळून जातो त्याच्या अनुभवावर आहे...फारच छान आहे...

डेझर्टर ले. गुंथर बान्हमान (अनुवादीत - भागमभाग) वाचलय कोणी ?
>> बागुलबुवा लेखक कोण आहेत?

नंदन, खरचं ऐक ना मेधाचे.. लिहि ना परिक्षण! कित्येक महिने उलटले तुझ्या लेखणीतून काही उतरलेचं नाही.

हो मी अनुवादीत वाचलय....जर्मन सैन्यातून एक सैनिक पळून जातो त्याच्या अनुभवावर आहे...फारच छान आहे...>> आशू, अजून लिहि ना माहिती.. शक्य असल्यास.

गुंथर बान्हमान हेच बहुदा लेखकाचे आणि त्या सैनिकाचे नाव आहे...त्याचा युद्धाला विरोध असतो पण सैन्यात असा विरोध म्हणजे देशद्रोहच...त्यामुळे अफ्रिकेत रवानगी झालेली असताना हा सैनिक आणि त्याचा एक मित्र असे दोघेजण संधी साधून पळ काढतात...त्यांचा प्रयत्न असतो की मित्र राष्ट्रांच्या सैन्यात जाऊन त्यांना शरण जायचे...
वाटताना यात काही विशेष वाटत नाही पण युद्धकाळात जर्मन सैन्यातून पळून जाणार्या सैनिकांना दिसताक्षणी गोळ्या मारण्याचे आदेश असतात. अशा वेळी आपल्याच सैन्यापासून लपत छपत, शक्य त्या मार्गाने शत्रुच्या शिबिरात दाखल होणे हे म्हणजे मृत्यूशी लपंडाव खेळल्यासारखेच होते. आणि हा सगळा थरार छान शब्दबद्ध केला आहे....
युद्धखोर नेत्यांसाठी सर्वसामान्य सैनिकाने आपले प्राण का म्हणून गमवायचे हा सनातन प्रश्न पुन्हा एकदा या पुस्तकाच्या रुपाने समोर ठाकतो...
नक्कीच वाचनीय

नुकतेच ब्रॅम स्टोकरचे 'ड्रॅक्युला' वाचले. पत्रलेखन, डायरी आणि जरनल स्वरुपात लिहलेले हे बुक आहे. ब्लडडिंकर्स वर लिहलेल्या पहिल्यावहील्या पुस्तकांपैकी एक.
आतापर्यंत व्ह्याम्पायर्स बद्दल वाचलेल्या जवळपास सर्वच पुस्तकांमधे याचा उल्लेख आलेला आहे त्यामुळे वाचण्यास उत्सुकता होती. ईतर व्हाम्पायर पुस्तकांईतके रनींग आणि थ्रिल नाही वाटले पण ठिकठाकच आहे. पुस्तकवाचन चालू असताना रात्री न जाणो का पण लक्ष सतत खिडकीकडे जात होते Uhoh

ब्रॅम स्टोकरचे 'ड्रॅक्युला' >>तुम्ही जर ते ह्या विषयावरच्या पहिल्या काहि पुस्तकांमधले आहे हे लक्षात ठेवून वाचलेत तर लक्षात येईल कि ते किती सरसपणे उतरले आहे. त्याने एका समांतर जगातल्या पुस्तकांना जन्म दिला ज्याचे आकर्षण अजूनही लोकांना वाटते. It was trendsetter.

काईट रनर जवळपास वाचून संपत आलेय. शेवटी शेवटी त्या लहान मुलाला दत्तक घेण्याच्या प्रेसेस चे इतके रटाळवाणे, कंटाळवाणे दळण का दळलेय? सोराया समोर आपल्या मनातला गिल्ट इतक्या वर्षांनी बोलून मनावरचे दडपण उतरणे व हसनच्या मुलाला दत्तक घेण्याचा दोघा नवरा-बायकोंनी निर्णय घेणे हाच माझ्या मते क्लायमॅक्स असायला हवा होता. अजून पुढे वाचण्यात हशील आहे का? खरंच काही वळणे आहेत का कथेत? बोर होतंय पुढे पुढे अजून रेटायला म्हणून विचारतेय.

डेझर्टर मी वाचलेय.. मस्त आहे. परवा चिकन सूप फॉर द पेरेंट्स सोल' आणलंय.. कर्नल श्याम चव्हाणांचं वॉलाँग वाचलंय कां कुणी?? नसेल तर जरूर वाचा.

हेम आपली आवडी बरीच मिळती जुळती दिसतीये...मला देखील जाम आवडलेलं वॉलॉंग एक युद्धकैद्याची बखर.....
फार सही पुस्तक आहे...
तु वाचलेल्या पुस्तकांची एकदा यादी दे पाहू...मी माझ्या यादीशी टॅली करतो...:)

सध्या मी शिवा ट्रायोलॉजीमधली दोन्ही इमॉर्टल्स ऑफ मेलुहा आणि सिक्रेट्स ऑफ नागा वाचून संपवली....वेगळी आहे पुस्तके..मध्ये मध्ये थोडी बोर मारतात..पण एकदा वाचायला नक्कीच छान...
फक्त त्यात पौराणिक गोष्टीची इतकी मोडतोड का केलीये हे कळले नाही...
सती ही दक्षाची मुलगी इतपर्यंत ठिक आहे..पण कार्तिकेय आणि गणेश ही दोन्ही तिचीच मुले दाखवलीयेत आणि गणेश चक्क कार्तिकेयपेक्षा मोठा...ये बात कुछ हजम नही हुई..

इथली चर्चा वाचून डॅन ब्राऊनचे डेमॉन्स अँड एन्जल्स वाचायला घेतले आहे...पहिली ५० ६० पाने वाचून झालीयेत...दा विंची आणि लास्ट सिबॉँलशी खूपच साधर्म्य वाटत आहे...

वॉलोन्ग छनच आहे. एक शिपाइगडी त्याला शैली नसेल पन अनुभव अस्सल आहेत. कर्नल चव्हन १९६२ च्या युद्धात युद्धकैदि होते त्यान्चे अनुभव आहेत. शेवटी स्टेशब्नवरचा आपला हमालही स्वतन्त्र आहे असे दिसते चीनच्या नागरिकावर असलेल्या नजरकैदेपेक्शा. आपल्या स्वतन्त्र्याचा अर्थ तेव्हा कलतो आपन आपल्या व्यवस्य्थेला कितीहि शिव्य देत अस्लो तरि.

इथली चर्चा वाचून डॅन ब्राऊनचे डेमॉन्स अँड एन्जल्स वाचायला घेतले आहे...पहिली ५० ६० पाने वाचून झालीयेत...दा विंची आणि लास्ट सिबॉँलशी खूपच साधर्म्य वाटत आहे... >> digital fortress वगळता सगळीच सारखीच वाटतात ब्राऊनची पुस्तके कारण थीम सारखीच आहे. तशी आवडत असतील तर Raymond Khoury ची पुस्तके पण वाचा. The Last Templar पासून सुरू करु शकता.

@ निंबुडा....

~ इथे उल्लेख झाल्याप्रमाणे मी आणि अन्य साहित्यप्रेमींनी "ऐसी अक्षरे" या संस्थळावर "....नॉट विदाऊट माय डॉटर....दुसरी बाजू" या धागाशीर्षकाने चर्चा केली होती.

त्या धाग्याची लिंक :

http://www.aisiakshare.com/node/1213

हा तुम्ही तसेच त्या पुस्तकामध्ये खास रुची असणार्‍यांनी वाचला तर या संदर्भात बर्‍यापैकी चर्चा झाल्याचे तुम्हाला आढळून येईल.

अशोक पाटील

तशी आवडत असतील तर Raymond Khoury ची पुस्तके पण वाचा. The Last Templar पासून सुरू करु शकता.>> हे पुस्तक वाचलय. अजून कुणाची असतील तर सुचव ना प्लीज. भारतीय मिथ्स आणि इतिहासावर कुणी असं फिक्शन लिखाण केलय का? (मेलुहा नको!!) त

डॅन ब्राऊनची अँजल्स अँड डेमोन्स जबरदस्त वाटलेली. दा विंची ठिक ठाक (अँजल्सचीच थोडीफार कॉपी) लास्ट वर्ड तर अगदीच प्रेडिक्टेबल वाटत गेली.

डॅन ब्राऊनची अँजल्स अँड डेमोन्स जबरदस्त वाटलेली. दा विंची ठिक ठाक (अँजल्सचीच थोडीफार कॉपी) लास्ट वर्ड तर अगदीच प्रेडिक्टेबल वाटत गेली.>>> मला वाटते दा विंची आणि अँजल्स मध्ये जे आधी वाचेल ते जास्त आवडते आणि दुसरे बोअर होते. पण अँजल्स अ‍ॅन्ड डीमन्स चा शेवट लई बोअर झालेला असं आठवतंय.

अजुन एक , दा विंची वाचुन २ एक वर्षे झालीयेत पण मला एक कळले नाही. एव्हढी फाइट मारुन मेरीच्या ग्रेव्हचा पत्ता लँगडन आणि सोफियाला मिळाला आणि ती त्या सगळ्या लोकांना शेवटी भेटली.फाइन पण मग बाकी लोकांना तर ते आधीच माहीत होतं आणि ते लोक सोफियाला कॉन्टॅक्ट करु शकले असतेच की.

@बागुलबुआ - मी वाचलय डेसर्टर. मस्त च आहे. मराठी अनुवाद विजय देवधरांनी केलाय.
छान cinema निघेल असे पुस्तक आहे, पण का कोण जाणे, अजुन तरी निघाला नाही.

आत्ताच The Sense of an Ending वाचली. चांगले आहे. छोटे आहे, फक्त १५० पाने. जरुर वाचा.

नमस्कार लोक्स,

मला जर मदत हवी होती....मी एक पुस्तक वाचले होते बर्याच वर्स आधी.....लेखकाचे नाव किन्वा पुस्तकाचे नाव
आठावत नाही Sad
It was based on a girl who stays in Mahur and her father is a pandit (character name is 'Urmila Pandit) ..khup hushaar ,sarvagun sampann mulgi ...tee premat padte ani kahi karnamule ghar sodave lagte tila ...mag ticha pravas etc .

कुणी वाचले असेल हे पुस्तक आणी नाव आठवतअसेल तर प्लीज मला कळवा .

धन्यवाद.

अच्युत गोडबोले यांची मुसाफिर, अर्थात, मनात, नादवेध, किमयागार अशी बरीच पुस्तकं चर्चेत आहेत.

कोणी वाचली असतील तर अभिप्राय अपेक्षित.

एन्जल्स अँड डेमॉन्स वाचून संपवले एकदाचे....सुरुवात आणि मध्य फारच मस्त घेतलाय वेगवान....उत्कंठा वाढत राहते पण शेवट लई म्हणजे लईच ताणला आहे च्यायला....
नंतर नंतर तर हे पुस्तक कधी संपणार आहे का नाही अशी शंका यायला लागली...एवढा पसरट शेवट पुस्तकाची मजा घालवतो...तो अधिक क्रिस्प करता आला असता...
पुस्तक वाचून झाल्यावर लगेचच पिक्चर पाहिला...आणि जबरदस्त पश्चाताप झाला...
अरे सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून कथा किती बदलायची...
व्हिटोरियाचे तिच्या वडीलांशी असलेले नाते हे पुर्ण पुस्तकभर आपल्याला सबटल पणे जाणवत राहते...त्यामुळेच ती कॅमार्लिंजीओशी सहमत होऊ शकते...
तसेच पुस्तकात जी वर्णने केली आहेत ती खूप वर्षांपूर्वीची वाटतात..त्यामुळे चित्रपटात दाखवण्यात आलेला काळ हा कुठेच मेळ खात नाही...
तिच गोष्ट बीबीसीच्या वार्ताहराची
सगळ्यात असह्य झाले ते कॅमार्लिंजीओ कार्डीनल्सनाच चर्चची महती सांगतो तेव्हा...अरे तेच चर्चचे मूलाधार आहेत आणि परत त्यांनाच काय चर्च कसे सायन्सला पायबंद घालते आहे हे सांगतो वेडा...
मूळात ते भाषण फारच प्रभावी आहे...मला आख्ख्या पुस्तकात सगळ्यात जास्त काही आवडले असेल तर ते भाषण..अर्थात काही मुद्दे न पटण्यासारखे आहेत..पण त्याची कळकळ भिडते मनाला...
चित्रपट पूर्ण बघूच शकलो नाही...अत्यंत भिकार

नंदिनी,

हे पुस्तक वाचलय. अजून कुणाची असतील तर सुचव ना प्लीज. भारतीय मिथ्स आणि इतिहासावर कुणी असं फिक्शन लिखाण केलय का? (मेलुहा नको!!) त

>> अशा प्रकारची वाचलेली इतर पुस्तके अगदीच copy cat प्रकारची वाटलेली. त्यातल्या त्यात
Steve Berry, James Rollins, Boyd Morrison, Andy McDermott हे बघ. शेवटच्या व्यक्तीची तर assembly line आहे. कुठल्या तरी प्राचीन संस्क्रुतीशी संबंधित काहितरी घ्यायचे नि सुरू व्हायचे. त्याचेच The Sacred Vault हे शिव व कैलास पर्वतावर आहे. संशोधन वगैरे केले आहे असा त्याचा दावा नाही Happy

अचाट नि अतर्क्य पण star to end वाचल्याशिवाय राहवणार नाही असे हवे असेल तर Matthew Reilly चे techno thrillers बघ. Seven Deadly Wonders पासून सुरू कर.

ह्याच प्रकारचे science fiction हवे अस्ले तर patrick lee बघ.

असामी, तू सांगतो आहेस त्यातली स्टीव्ह बेरीचं एक पुस्तक वाचलय. (नाव आठवत नाही!!) बाकीचे विकी करून बघते आता. Andy McDermott याची पुस्तकं चाळली पण कधी वाचली नाहीत.

पण खरंच असं कुणी लिहिलं नसेल तर कादंबरी लिहायला चांगला स्कोप आहे की. ज्याला भारतीय संस्कृतीबद्दल बरीच माहिती आहे अथवा या विषयामधे काम केलेलं आहे त्याने लिहायला हरकत नाही. (वरदा, केदार असे मायबोलीकर तर लगेच आठवले मला) Proud

ज्याला भारतीय संस्कृतीबद्दल बरीच माहिती आहे अथवा या विषयामधे काम केलेलं >> त्यापेक्षा spin the yarn जमावे लागते असे मा.व.म.

असाम्याला अनुमोदन, मोदकांचं ताट वगैरे... मला प्राण गेला तरी कथा-कादंबरी जमणारी नाही, प्रबंध निबंधच काय ते जमतील....

गणेश चक्क कार्तिकेयपेक्षा मोठा...ये बात कुछ हजम नही हुई..>>>> साउथ मधे गणेश कार्तिकेयपेक्षा मोठा मानला जातो. मालाही असाच धक्क बसला होत, पण साउथ मधे हा समज खुप कोमन आहे.

हे पहा....

http://en.wikipedia.org/wiki/Murugan

http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20090422071652AASSe6l

Pages