समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

इब्लीस, हि त्यांची पाठराखण आहे की एका निकोप, सर्वांना समजवून घेणार्‍या आणि वैयक्तिक स्वतंत्र्याचा आदर करणार्‍या समाजवृत्तीकडे वाटचाल ते काळच ठरवेल.

>>>माघ महिन्यात एका कुत्री पाठीमागे पाच कुत्रे पाहिले जातात, आणि ती कुत्री मग हव्या त्या कुत्र्या सोबत संग करू शकते. <<<

हे भाद्रपदात होतं बहुतेक.

भरत इंडियन पीनल कोड ४९७ कलम

''Whoever has sexual intercourse with a person who is and whom he knows or has reason to believe to be the wife of another man, without the consent or connivance of that man, such sexual intercourse not amounting to the offence of rape, is guilty of the offence of adultery, and shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to five years, or with fine, or with both. In such case the wife shall not be punishable as an abettor.''

दक्षिणा(जी), तसा अर्थ निघतोय म्हणजे तसाच अर्थ आहे. तुम्हाला हवे तसे सेक्स करायची परवानगी दिलीय ना? मग कशाला (ओ)रडताय? हाच सूर आहे. समलैंगिक २४ X ७ सेक्सचाच विचार करत असतात. त्यामुळेच त्यांना असंख्य पार्टनर्सही असतात.

आधीच्या पानावर कुठेतरी नॅचरल सेक्स कॅन अकर ओनली बिटवीन व्हॅजायना अँड पिनस असंही वाचल्याचं आठवतंय. म्हणजे शरीराच्या अन्य कुठल्याही भागाला स्पर्श केल्याने होणारे लैंगिक उद्दीपन अनाठायी आणि अनैसर्गिक म्हणायला हवे.

कौतुकजी आणि महेशजी

कौतुकजी नॉर्मल या शब्दातून काय अभिप्रेत आहे यावर बराच खल झालेला आहे. नॉर्मल मधे नसणे म्हणजे काहीतरी निगेटिव्ह असा अर्थ घेतला जात असेल तर माझा नाईलाज आहे. जगा आणि जगू द्या याच तत्वाने समलैंगिकांचा जगण्याचा हक्क मान्य करताना त्यांना मान्यता कुठल्या आधारावर द्यायची इतकेच मुद्दे (खरंतर शंका) मांडल्या आहेत.

नैसर्गिकपणातला फोलपणा जाणवल्याने नॉर्मल >>> या प्रकारच्या प्रतिवादांना हसावं कि रडावं समजत नाही. नैसर्गिक आणि प्राण्यांचे दाखले दिले जाऊ नयेत हे उदाहरणांद्वारे स्पष्ट केलं आहे. त्या मुद्यांना बगल देण्याचं कारण काय ? मुळात लग्न हेच नैसर्गिक नाही. नर मादी संबंध इतकंच नैसर्गिक आहे हे सिद्ध झालं तर ? या आधारावर समाजातल्या अनेक रूढ नैतिक कल्पना बाद कराव्या लागतील ते स्विकारणार का या प्रश्नाला कुणीच उत्तर देत नाही. म्हणून नैसर्गिक आहे या आधारावर मान्यता नको असं वाटतं.

आपला समाज लैंगिक आचरणाच्या मान्यतेवर उभा आहे >> याला इथेच तर घोडं पेंड खातंय असं उत्तर दिलं जात असेल तर उत्तर द्यायलाच हवं का ? आज समाजात नैतिकतेच्या पायाशी स्त्री-पुरूष विवाह आहे. याचा अर्थ याचं समर्थन करतोय असा ज्यांनी काढला त्यांना सा. नमस्कार. म्हणजेच संपूर्ण पोस्ट विचारात न घेताच प्रतिवादाची घाई झाल्याचे दिसून येतंय. अशा पोस्टींना उत्तर नाही देता येणार.

एक विचार मांडला आहे कि या प्रकारचं बिहेवियर हे निसर्गतः डिसऑर्डर स्वरूपात मान्य केलं गेलं तर त्यांचे हक्कही जपता येतील आणि या कायद्यासाठी जे प्रतिवाद न्यायालयात होतील त्याचा दुरू[अयोग देखील टाळता येतील. आज अनिअतिक संबंधांना कायद्यानेही मान्यता नाही. उद्या समलैंगिक संबंध न्सैर्गिक आहेत म्हणून मान्यता द्या असा युक्तिवाद केला गेला तर नर मादी सर्वच संबंध नैसर्गिक आहेत म्हणून अनैतिक संबंधांबाबत तक्रार करता येणार नाही असे युक्तिवाद होऊ शकतात असं वाटतं. यात चुकीचं काही असेल तर तितकाच भाग मुद्देसूद पणे मांडण्यात यावा.

इथे एक प्रतिसादक हा परमेश्वराचा आयडी नाही हे देखील जाहीर करत आहे. तसंच हा आयडी कुठलीही एक बाजू घेऊन या वादात नाही. अशा कुठल्याही एका बाजूने या विषयावर लिहीण्यात त्याला रस नाही हे ही जाहीर करण्यात येत आहे.

आभार.

अरे काय रे चर्चा!!!! ज्याला जे हवय ते करु दे!!! आपल्याला काही फरक पडतो का? खजुराहो ला पण गे/ लेस्बी पुतळे आहेत, शेकडो वर्षां पुर्वी जे आपले पुर्वज करत होते ते काय मग?

अशा फालतु हल्ल्यांनी संस्कृती वगैरे हलत नसते किंवा धक्का लागत नसतो. जी संस्कृती मुळातच जे खुले पणे स्वीकारत होती, त्या संकृतीचे असे भजे झालेले पाहुन तो बीचारा वात्सायन वर रडत असेल.... आपल्या लैंगीक जाणीवा कीती दबलेल्या आहेत, त्याचं फलित म्हणजे हा बाफ.... त्या पेक्षा बी. पी. सिनेमा लागलाय तो पहा..... खरो खर पोलीयो निर्मुलन मोहिमे सारखी 'लैंगीक शिक्षण " मोहीम काढली पाहिजे.

माहेर दिवाळी अंकातला "चित्रा पालेकरांचा " लेख वाचा. अप्रतिम लेख....

आणि हे म्हणजे अगदी साथीच्या रोगाने मरणार्‍या सारखं झालं. ह्याचा विचार करण्या पेक्षा डेंग्यु, मलेरीयाचा करा!!! त्याने समाजाची जास्त हानी होते आहे.....

प्रतिसादकजी.. तुम्ही जे लिहिलय त्यातून जो अर्थ सरळ सरळ निघतोय तोच काढला जातोय इथे. आणि तुम्ही तसं मला म्हणायचंच नाही असं म्हणताय.
मुद्देसुद एकही पोस्ट नाही... वर आम्हीच कसे कांगावा करतोय ते सांगताय. कशाला इतके फाटे?

http://www.maayboli.com/node/24218
जमलं तर हे वाचा एकदा, यात थोडी शास्त्रोक्त माहिती सुद्धा आहे.

दक्षिणा(जी), तसा अर्थ निघतोय म्हणजे तसाच अर्थ आहे. तुम्हाला हवे तसे सेक्स करायची परवानगी दिलीय ना? मग कशाला (ओ)रडताय? हाच सूर आहे. समलैंगिक २४ X ७ सेक्सचाच विचार करत असतात. त्यामुळेच त्यांना असंख्य पार्टनर्सही असतात.

भरतजी मला वाटते कि तुम्हि जर गे पोर्नो बघितलेल दिसते म्हनुन तुम्हि असा विचार करता कि गे लोक २४ X ७ सेक्सचाच विचार करत असतात.. जे कि बरोबर नाहि. त्या लोकाना पोटापाण्यासाठि कामधन्दा करावा लागत नाहि का , तुमच्यासारखा आमच्यासारखा??
त्यांना असंख्य पार्टनर्सही असतात.: कारण सामाज्याच्या भितिने बहुतेक लोकान्चे पार्टनर अर्ध्यारस्त्यात साथ सोडुन देतात म्हनुन...
मला माहित नाहि कि तुम्चे लग्न झाले अथवा नाहि, पन स्वतःलाच विचारा कि तुम्हि नाहि तुम्च्या पार्टनर व्यतिरिक्त कोणासोबत फन्टसी रन्गवत...आणि सन्धी मिळलि तर तुम्हाला नाहि आवडणार जगातल्या अनेक स्त्रीयान्सोबत मजा करायला??

भरत, भारतात युनिफॉर्म सिव्हिल कोड आजही अस्तित्त्वात नाही. विवाह कायदे, घटस्फोट, पोटगी इत्यादी बाबतीत त्या त्या धर्माच्या कायद्याचे वर्चस्व आहे. दत्तक, वारसा हक्क इत्यादी बाबत सुधारणा झाल्या असल्या तरी धर्माधिष्ठित कायद्यांत कालानुरूप सुधारणा करणे किंवा सर्वांना (सर्वधर्मीयांना किंवा सर्व भारतीयांना) एकसमान कायदा करणे हे अद्याप झालेले नाही. माझ्या मते पर्सनल लॉ हे अ‍ॅबॉलिश करायला हवेत व त्या ठिकाणी एकसमान नागरी कायदा अस्तित्त्वात येणे फार्फार गरजेचे आहे. मात्र मतांच्या राजकारणामुळे ते भारतात शक्य होईल असे चित्र सध्या तरी दिसत नाही. (पर्सनल लॉ समलैंगिक संबंधांना ओळखत नाहीत.)

समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता दिल्यास त्यानुसार वरील कायद्यांमध्ये तरी सुधारणा कराव्या लागतील व अशा प्रकारे लग्न केलेल्यांचे हक्क - अधिकार इत्यादी सुस्पष्ट करावे लागतील, सुरक्षित ठेवावे लागतील / सर्वांना एकसमान कायदा लागू करावा लागेल, तसेच इंडियन पीनल कोडमधील ४९७ कलमासारख्या कालबाह्य कलमांमध्ये सुधारणा करावी लागेल.

मला माहित नाहि कि तुम्चे लग्न झाले अथवा नाहि, पन स्वतःलाच विचारा कि तुम्हि नाहि तुम्च्या पार्टनर व्यतिरिक्त कोणासोबत फन्टसी रन्गवत...आणि सन्धी मिळलि तर तुम्हाला नाहि आवडणार जगातल्या अनेक स्त्रीयान्सोबत मजा करायला??>>>

हे फारच पर्सनल होतय!!! मला वाटतं बाफ ला टाळं लागणार बहुतेक

अहो ट्रेन्डी प्रविण, कंट्रोल यूवरसेल्फ.. इतर कोणत्याही पोष्टी न वाचता काहीही लिहू नका. आधी नीट वाचा, मग कळेल मयेकरजी काय आणि कसं बोलतायत ते.

भरतजी आणि मीराजी , मला कुणाच्याहि पर्सनल लाइफ बद्दल काहि बोलायचे नव्हते, मी फक्त एक उदाहरण दिले, वाईट वाटले असेल तर माफ करा...
मला फक्त एवढेच म्हणायचे होते कि जगातले बहुतान्श पुरुष २४ X ७ सेक्सचाच विचार करत असतात,. मग ते होमो असो वा हेटरो...

दक्शिणाजी, मी सुरुवाती पासुन सर्व पोस्ट वाचल्या आहेत , अगदि भरतजी च्या पोस्टमधल इन्डियन एक्स्प्रेस्स मधला लेख सुध्दा, त्यातथि असे लिहिलेले आहे कि पतिच्या पालकान्न्ना त्यान्च्या मुलान्चे ओरिन्टेशन माहित होते पण समाज्याच्या भितीने त्यानी मुलाचे लग्न एका मुलिशी लावून दिले....

तेच म्हटलं आता समलिंगी संबंध ठेवा असं कसं म्हणत नाही कुणी ? अरेरे ! काय हे ? कधी कमी कपडे काय, कधी सगळे पुरूष बलात्कारी काय आणि आता समलिंगी संबंध ठेवा काय. खरंच २०१२ साली जगबुडी झाली असती तर बरं झालं असतं.

आमच्या सोसायटीत एक केरळी मुलगी रहायची. रोज तिच्याकडे नवीन पुरूष यायचे. काही दिवसांनी सर्वांच्या लक्षात आला काय प्रकार आहे ते. मग पाळत ठेवून एका गि-हाईकाला दम देऊन खरी माहिती काढली. ती कॉलगर्ल आहे हे सिद्ध झालं. उद्या तुम्ही म्हणाल चार भिंतींच्या आत ती काय करते तुम्हाला काय करायचं ? तुम्ही म्हणाल हो, तुम्हाला मुलांवर काय संस्कार होतात याची कशाला काळजी ? आजूबाजूच्या तरूण मुलांच्या मनात नाही ते विचार आले , त्यातल्या एखाद्याच्या हातून नको ते घडलं तर पुन्हा जबाबदार तोच नाही का ? धन्य धन्य !

अहो महेश
कुठं तुम्ही वेळ घालवताय ? समलैंगिक व्हायचं आश्वासन दिल्याशिवाय तुम्हाला आता हे लोक सोडणार नाहीत. देव तुमचं भलं करो !

भारतात युनिफॉर्म सिव्हिल कोड आजही अस्तित्त्वात नाही. विवाह कायदे, घटस्फोट, पोटगी इत्यादी बाबतीत त्या त्या धर्माच्या कायद्याचे वर्चस्व आहे. दत्तक, वारसा हक्क इत्यादी बाबत सुधारणा झाल्या असल्या तरी धर्माधिष्ठित कायद्यांत कालानुरूप सुधारणा करणे किंवा सर्वांना (सर्वधर्मीयांना किंवा सर्व भारतीयांना) एकसमान कायदा करणे हे अद्याप झालेले नाही. माझ्या मते पर्सनल लॉ हे अ‍ॅबॉलिश करायला हवेत व त्या ठिकाणी एकसमान नागरी कायदा अस्तित्त्वात येणे फार्फार गरजेचे आहे. मात्र मतांच्या राजकारणामुळे ते भारतात शक्य होईल असे चित्र सध्या तरी दिसत नाही.

+ १०००००००००००००

Law Lexicon Dictionary मधल्या काही व्याख्या :

(A) Natural: The term natural means proceeding from physical causes or conditions or based upon moral considerations as distinguished from legal causes or legal considerations.

(1) Taking place in accordance with the ordinary course of nature / (2) Based upon the innate moral feelings of mankind;

(B) Norm: An ideal standard binding upon the members of a group and serving to guide, control or regulate proper and acceptable behaviour.

The word "normally" has an ordinary meaning which would be given to it by ordinary people in everyday use. In using the word "normally" one is referring to something which is in contradistinction to abnormal or exceptional.

(The definition of the term "normal" as given in the dictionary is not relevant in context of the discussion.)

(C) Common : Means usual, accustomed shared among several, owned by several jointly belonging equally to more than one/ to many indefinitely, belonging to the public; general; universal, frequent, customary, habitual.

(have reproduced only relevant portion here.)

(D) Incest : Sexual intercourse between persons who are within the prohibited degrees of affinity/ consanguinity.

बाकिच्या नंतर टाकतो.. कृपया लक्षात घ्या की हे कायदे फार जुने आहेत. ज्या कायद्यांवरून हे घेतले गेले आहेत ते त्या देशात (राणीच्या देशात) बदलले आहेत. भारतातले बरेच कायदे/ त्यातल्या तरतूदी हे अक्षरशः obsolete झाले आहेत (बरेचसे कामगार कायदे, ३७७ सारखी काही कलमे ई. ई.).. तेव्हा भारतातील प्रचलित कायदा ईथले समाजमन दर्शवेलच असे नाही.

Pages