समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

क्या बात है, समलिंगी संबंधांना हिंदू वगैरे धार्मिक अँगलही आहे..

Even singapore government does not recognise gay marriages or sex. Their PM never disuss this issue also. His standard answer to this is we agree to disagree. So india is not alone. Looking to the general elections in 2014 no political party will touch this issue. India has lot more to handle than this. I welcome supreme court decision.

महेश,
ऑस्ट्रेलियात समलिंगी संबंध ठेवणे हा गुन्हा नाही. हा निकाल समलिंगी विवाहांबद्दल आहे. जगातल्या निम्म्यांहून अधिक देशांमध्ये समलिंगी संबंध ठेवणे गुन्हा नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगानं सर्व सभासद राष्ट्रांना समलिंगी व्यक्तींच्या अधिकारांच्या संरक्षणाचे आदेश दिले आहेत.

समलिंगी विवाह हा मुद्दा वेगळा आहे.

कृपया ही क्लिप पूर्ण बघा- http://www.youtube.com/watch?v=M0FWDmV8MKw&feature=youtu.be

इंदिरा जयसिंग यांच्याबद्दलचा आदर वाढला.

यंदाच्या 'माहेर'च्या दिवाळी अंकात एका एकट्या जिवानं त्याची 'तगमग' मांडली. हा लेख वाचून 'माहेर'च्या कार्यालयात आलेले फोन, ६५-७० वर्षांच्या कोकणस्थ ब्राह्मण आज्यांचे आलेले इमेल बरंच काही सांगून जातात. आतातरी जरा डोळे उघडे ठेवावेत, ही अपेक्षा आहे.

चिनूक्स दुरूस्तीबद्दल धन्यवाद !
मी याआधी पण लिहिले होते, असे संबंध असण्याला विरोध नाही,
पण अशा गोष्टींचे ग्लोरिफिकेशन तसेच विवाह, इ. बाबी पटत नाहीत.
असो, जास्त लिहित नाही परत.

भारतात सध्या तरी समलैंगिकांना गुन्हेगार समजले जाऊ नय इतकाच मुद्दा आहे. सिंगापुरातही. लग्न बिग्न दूर आहे.
यालाही ग्लोरिफिकेशन म्हणायचे का?
<मी याआधी पण लिहिले होते, असे संबंध असण्याला विरोध नाही, पण अशा गोष्टींचे ग्लोरिफिकेशन तसेच विवाह, इ. बाबी पटत नाहीत> म्हणजे जे काय करायचे ते लपून छपून करा. चारचौघात या गोष्टींची वाच्यता नको. असेच का?

महेश,
पटत नसणार्‍या अनेक गोष्टी असतात. आपल्याला पटत नाहीत म्हणून त्या अयोग्य किंवा अनैसर्गिक नसतात.

विवाह म्हणजे ग्लोरिफिकेशन कसं? भारतीय कायद्याप्रमाणे विवाह केल्यानंतर काही अधिकार प्राप्त होतात. उदाहरणार्थ, संपत्तीत वाटा. समलिंगी व्यक्तींनाही हे अधिकार हवे असतील तर?

सिंगापुरात स्त्रियांच्या समलिंगी संबंधांना मान्यता आहे. सिंगापुरातही आर्टिकल ३७७च आहे.

>>विवाह म्हणजे ग्लोरिफिकेशन कसं? भारतीय कायद्याप्रमाणे विवाह केल्यानंतर काही अधिकार प्राप्त होतात. उदाहरणार्थ, संपत्तीत वाटा. समलिंगी व्यक्तींनाही हे अधिकार हवे असतील तर?

चिनूक्स अरे आधी पण यावर झाले आहे की बोलणे,
उदाहरणार्थ, संपत्तीत वाटा. इ. साठी विवाहच करावा लागतो असे नाही. इतर मार्ग नाहीयेत की काय कायद्यात ? उदा. बक्षिस, दान, इ. अजुनही असतील मी उदा. देत आहे इतकेच.

उदाहरणार्थ, संपत्तीत वाटा. इ. साठी विवाहच करावा लागतो असे नाही. इतर मार्ग नाहीयेत की काय कायद्यात ? < मग विवाह या गोष्टीला काय प्रॉब्लेम आहे?

>>म्हणजे जे काय करायचे ते लपून छपून करा. चारचौघात या गोष्टींची वाच्यता नको. असेच का?
मयेकर, बरोब्बर बोललात.

महेश, याला हिपोक्रसी म्हणतात. तुम्ही निदान ते कबूल केले याबद्दल अभिनंदन.

एका सध्याच्या विचारवंताने निसर्गतः समलैंगिक असलेल्यांवर दया दाखवलीय. पण परिस्थितिजन्य समलैंगिकता टाळण्यासाठी समाजाने, कुटुंबाने प्रयत्न, प्रबोधन करावेत.असेही म्हटलेय. भारतातील समलैंगिकांची संख्या काळजी वाटावी अशी आहे असे म्हटलंय. नक्की कोणाबद्दल काळजी?

नका रे परत सर्व चर्चा चालू करू. आधीच खुप झाले आहे.

दांभिकता म्हणा काही म्हणा, माझे तरी मत असे आहे.
त्याचे कारण एखाद्या गोष्टीला प्रखर विरोध होणे आवश्यकच असते समाजात,
पण त्याच वेळी ती गोष्ट समाजातून पुर्णपणे नष्ट पण होणार नसते,
अशावेळी अशा दांभिकतेने नाही रहायचे तर काय करायचे ?

असो, जो जे वांच्छील तो ते लाहो, प्राणीजात ! Sad

स्वल्पविराम !

>>म्हणजे जे काय करायचे ते लपून छपून करा. चारचौघात या गोष्टींची वाच्यता नको. असेच का?
मयेकर, बरोब्बर बोललात. << अरेरे, हे तर फार घातक विचारसरणीचे ग्लोरिफिकेशन आहे !

>>एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यातलं शारिरीक, भावनिक समाधान कुणात शोधते ही त्या व्यक्तीची अत्यंत खाजगी बाब आहे. जोपर्यंत ती पिडोफाईल नाही, बलात्कारी नाही, शारिरीक छेडछाड-शोषण करणारी नाही तोपर्यंत या गोष्टीत बाकीच्यांचा संबंध येत नाही असं मला वाटतं.>> नेमके शब्द वरदा.

आज आयबीएन लोकमत वर एका घायाळ पालकाच्या भूमिकेतून चित्रा पालेकरांना बोलताना ऐकलं. कोणतेही सुसंस्कृत सदय पालक त्यांना जन्मजात अपंगत्व असलेलं मूल झालं तर त्याच्यासाठी जिवाचं रान करतात.जन्मजात भिन्न लैंगिक कल असलेल्या अपत्याला मात्र समजून घेण्यात तेही कित्येकदा कमीच पडतात..

महेश,
>>
दांभिकता म्हणा काही म्हणा, माझे तरी मत असे आहे.
त्याचे कारण एखाद्या गोष्टीला प्रखर विरोध होणे आवश्यकच असते समाजात,
पण त्याच वेळी ती गोष्ट समाजातून पुर्णपणे नष्ट पण होणार नसते,
अशावेळी अशा दांभिकतेने नाही रहायचे तर काय करायचे ?
<<
नेमक्या शब्दांत तुमची गोची मांडलीत, त्याबद्दल अभिनंदन. फक्त, कोणत्या गोष्टीला प्रखर विरोध व्हायला हवा, याचे निकष वेगवेगळे असतात, हे देखिल अ‍ॅड केलेत तर जास्त बरोबर होईल.

भारताची तथाकथित संस्कृती ढवळून निघेल, तिला धोका पोचेल म्हणून असा प्रतिगामी निर्णय कोर्टाने दिलाय यावरूनच ही संस्कृती किती असुरक्षित आहे ते कळते.

खरेतर पुन्हा लिहायचे नाही असे ठरवले होते, पण राहवत नाही लिहिल्यावाचून.
या प्रकाराला सपोर्ट करणार्‍या लोकांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो.

उद्या जर माझ्या उमलत्या वयाच्या मुलाला किंवा मुलीला नॉर्मल असुनही जर कोणी अशा संबंधांसाठी उद्युक्त केले आणि जर त्याचा मुलाच्या मनावर विपरीत परिणाम झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आणि या प्रकारात जर न्याय मागायला गेलो आणि तिथे या असल्या मान्यता असणार्‍या कायद्याच्या आधारे जर सिद्ध केले गेले की माझे मूल मुळातच नॉर्मल नाही, इ. तर ??

महेश, तुमचा काहीतरी घोटाळा होतोय. समलैंगिक संबंध असो वा नसो, लहान मुलांशी संबंध ठेवायला कायद्याने मान्यता नाही. तो गुन्हा आहेच. इथे उमलत्या वयाचे म्हनजे टीनेजर्स जरी असले आणि त्यांना त्यांच्या लैंगिकत्ची जाणीव याच वयात होत असली तरीही असे परस्परसंमतीने असलेले संबंधदेखील कायद्याने गुन्हा आहे.

तुमचे मूल नॉर्मल (शब्द चुकीचा आहे तरीही) होमोसक्शआल आहे की नाही हा निर्णय त्याचा स्वतःचा आहे. कायद्याचा नाही. तुमच्या मुलावर होमो अथवा इतर कसलीही जबरदस्ती केली तरी तो गुन्हाच.

बलात्काराअम्धे पुरूष स्त्रीशी जबरदस्तीन संबंध ठेवतो तेव्हा कोर्टामधे ती स्त्री हेटरोसेक्शुअल होती म्हणून मी असे संबंध ठेवले असे स्पष्टीकरण दएले जाते का?

नंदिनी + १ पोस्ट आवडली.

महेश आणि अशा संबंधांना कुणी कुणाला भरिस नाही घालत. ज्याचा त्याचा तो चॉईस असतो. चित्रा आणि अमोल पालेकर हे हेट्रोसेक्शुअल असून त्यांची मुलगी होमोसेक्शुअल झाली तिच्या चॉईसने, इथे चॉईसपेक्षा नैसर्गिक उर्मीमुळे असं म्हणू. मग तुमच्या उमलत्या वयाच्या मुलाला पण असं काहीतरी वाटून गेलं तर तो गे/लेस्बियन आहे हे मान्य करा आणि त्यांना सपोर्ट करा.

घोटाळा वगैरे काही नाही, माझा मुद्दा इतकाच आहे की नॉर्मल असलेल्या (उमलत्या वयाच्या मुद्दाम म्हणत आहे कारण या वयातच ओरिएंटेशन बदलले जाण्याचा धोका जास्त असतो) मुलाला त्याच्या/तिच्या ध्यानीमनी नसताना जर अशा काही प्रसंगाचा (केवळ जबरदस्तीच नव्हे तर गोडीगुलाबीने जाळ्यात ओढणे देखील असू शकते) सामना करावा लागला आणि त्यामधे त्याचे/तिचे ओरिएंटेशन बदलले गेले किंवा इतर काही मानसिक परिणाम झाला तर ?

तुम्ही जे म्हणत आहात की मुलाला/मुलीला ठरवू दे नॉर्मल आहे की नाही. मुळात यालाच माझा विरोध आहे.

एकतर टीनएजर्सना मिळणारे अतोनात वारेमाप स्वातंत्र्य आणि नको त्या वयात नको त्या गोष्टींची भरमसाठ माहिती मिळणे हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे (अर्थात हा वेगळा वादाचा विषय आहे)

>>मग तुमच्या उमलत्या वयाच्या मुलाला पण असं काहीतरी वाटून गेलं तर तो गे/लेस्बियन आहे हे मान्य करा आणि त्यांना सपोर्ट करा.

शक्यच नाही. उलट ही विकृती बरी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक समजेन मी अशा केसमधे.

वि.सू. : प्रत्यक्षात माझ्याकडे अजुनतरी अशी कोणतीही समस्या नाहीये. हे सारे उदाहरणादाखल लिहित आहे. उगाच गैरसमज करून घेउ नये.

जर अशा काही प्रसंगाचा (केवळ जबरदस्तीच नव्हे तर गोडीगुलाबीने जाळ्यात ओढणे देखील असू शकते) सामना करावा लागला आणि त्यामधे त्याचे/तिचे ओरिएंटेशन बदलले गेले किंवा इतर काही मानसिक परिणाम झाला तर ?>>>> ओरीएंटेशन असे बदलत नसते.

तुम्ही जे म्हणत आहात की मुलाला/मुलीला ठरवू दे नॉर्मल आहे की नाही. मुळात यालाच माझा विरोध आहे.<<<< मग कोण ठरवणार? कुणाला काय आवडते हा निर्णय प्रत्येक स्वतंत्र व्यक्तीचाच असला पाहिजे ना?

Pages