समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

सिमन्तीनी,
<<एकदा का opposite sex ची गरज संपली तर opposite sex संपवायलाही मनुष्य मागे-पुढे पहाणार नाही. >> गे पुरुषाची फक्त स्त्री पत्नीची गरज संपलेली असते. त्याला आई बहिण हवी असते की. मला गे मित्र आहेत आणि त्यांना माझी मैत्रीण म्हणून गरज वाटते. एकमेकांना आम्ही संपवू हा विचार सध्या तरी अशक्य वाटतो..
>>

गे पुरुषाने स्त्री पत्नी संपवल्यावर पुढल्या पीढीला आई-बहीण-मैत्रीण मिळेल हे अशक्य वाटते.

गे पुरुषाने स्त्री पत्नी संपवल्यावर पुढल्या पीढीला आई मिळेल हे अशक्य वाटते. >> मला नाही वाटले. जर मी माझ्या गे मित्रांसाठी एग डोनर/सरोगेट झाले तर त्यांनी मला मुलांची आई असे मानले तर ठीकच (मुलांचे फक्त जेनेटिक नाते असेल म्हणून आत्या म्हणाले तरी ठीकच).
शिवाय स्त्रिया ही समलैंगिक असतात तिथे एका घरात मम्मी आणि आई दोघी असतील. हे ही ठीकच..

ठिपका Happy आपण रजनीकांत चा 'रोबोट' ही नेऊ शकता...

नाही मुद्दा भरकटलेला नाही. विवाहासाठी 'संमती' देऊ शकता येते का हा एक निकष आणि समलैंगिक म्हणजे भिन्नलिंग द्वेष्टे नव्हे हे दोन मुद्दे मी स्पष्ट करीत होते.

सिमन्तीनी,
<<गे पुरुषाने स्त्री पत्नी संपवल्यावर पुढल्या पीढीला आई मिळेल हे अशक्य वाटते. >> मला नाही वाटले. जर मी माझ्या गे मित्रांसाठी एग डोनर/सरोगेट झाले तर त्यांनी मला मुलांची आई असे मानले तर ठीकच (मुलांचे फक्त जेनेटिक नाते असेल म्हणून आत्या म्हणाले तरी ठीकच).
शिवाय स्त्रिया ही समलैंगिक असतात तिथे एका घरात मम्मी आणि आई दोघी असतील. हे ही ठीकच<<>>

कदाचित, माझा शेवटचा मुद्दा ( धोका) नीट स्पष्ट झाला नाही. मी अख्खी स्त्री किंवा पुरुष जातच नष्ट केली जाईल असे म्हणतोय. दुसर्या गे-कपल्स ना पण यातून सुटका नाही.
थोडेसे स्पष्ट करतो - समजा समलैंगिक विवाह मान्य झाले तर पुरुषाला पुरुष लागेल शारिरिक आणि भावनिक गरजा भागविण्यासाठी. मग हळू हळू समाज ( त्यावेळचा) म्हणेल, गरजच काय स्त्री ची? संपवून टाका सरळ!

sulu,

तुम्ही जे म्हणताय ते होणं शक्य नाही. व्हिपटेल लिझर्डचं उदाहरण आहे की Happy आणि समलैंगिकता कायदेशीर झाली म्हणजे १०० % पुरुष समलैंगिक झाले, हे जरा अति नाही का?

सुलु, हे अतिरंजित वाटतय. गरज उरली नाही संपवून टाका असं आधी कुठल्याबाबतीत झालय का ? जर खरच गरज उरली नसेल तर नामशेष होत असेल तर वाईट काय ? आनी मुळात तुम्ही नामशेष होणार्‍यात स्त्रीच का धरलीये ? पुरुष का नाही ?

उलट जीवशास्त्रीयदृष्ट्या पुनरुत्पादनात स्त्री एकटीच पुरेशी आहे.

समजा समलैंगिक विवाह मान्य झाले तर पुरुषाला पुरुष लागेल शारिरिक आणि भावनिक गरजा भागविण्यासाठी. मग हळू हळू समाज ( त्यावेळचा) म्हणेल, गरजच काय स्त्री ची? संपवून टाका सरळ! >> नाही, गे पालक म्हणजे त्यांना भिन्न लिंगाचे मुल नको असते असे नाही. लेस्बिअन मुलांचे आणि गे मुलींचे संगोपन करतात. तसेच त्यांना आई, आत्या, मावशी, आजी ही नाती असतात. त्या नात्यांमधील माया त्यांना कळते. स्त्री चे गरज अपत्य संगोपानार्थ नसेल वाटली गे लोकांना (आणि पुरुषांची लेस्बिअन न). त्यामुळे अस काही होण्याची शक्यता मला तरी वाटत नाही एवढेच...

समजा समलैंगिक विवाह मान्य झाले तर पुरुषाला पुरुष लागेल शारिरिक आणि भावनिक गरजा भागविण्यासाठी. मग हळू हळू समाज ( त्यावेळचा) म्हणेल, गरजच काय स्त्री ची? संपवून टाका सरळ! >> असं कसं होईल अहो? Uhoh
त्या वेळेला समलैंगिक असतील तसे हेट्रोजही असतील. ते इतरांच्या म्हणण्याप्रमाणे पारंपारिक प्रजोत्पादन करतच राहतील ना? आणि समलैंगिक म्हणजे फक्त पुरूष पुरूष नव्हे, बायका बायका पण. आणि बाया नसतील तर पुरूष कुठून येतील? Uhoh त्यांची शेती वगैरे करता येते असं तरी मी ऐकलेलं नाही.

अवांतर - सध्याचं स्त्रीभ्रुणहत्येचं प्रमाण पाहिलं तर बहुतेक काही वर्षांनी शास्त्रज्ञ बायकांची शेती कशी करावी याचाच हिरिरीने शोध लावतील बहुतेक.

मुळात समलैंगिकता नैसर्गिक आहे, हे विज्ञानानं सिद्ध केलंय. त्यामुळे तो प्रश्न मिटला.

प्रश्न उरतो, तो समलैंगिकता चव्हाट्यावर आणण्याचा, कायदेशीर करण्याचा आणि विवाहास परवानगी देण्याचा. आपल्याला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणलेला चालतो. अंधश्रद्धा, बेशिस्त आपण खपवून घेतो. पण माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार काढून घेतो. असं का? हजारो लोकांना मारणार्‍या नेत्यांचे तुम्ही जयजयकार करता, शास्त्रीय सत्य नाकारणार्‍या भोंदूबाबांच्या नादी लागता, गल्लीतल्या गुंडाला, पक्षाच्या कार्यकर्त्याला पैसे चारून कामं करवून घेता, प्रसिद्ध डॉक्टरांकडे जाऊन गर्भलिंगचाचणी करवून घेऊन मुलींना मारता, रस्त्यावरून जाणार्‍या रुग्णवाहिकेला रस्ता मो़कळा करून देत नाही, रस्त्यावर पडलेल्या जखमी माणसाला दवाखान्यात नेण्याची माणुसकी दाखवत नाही, बायकांच्या अंगावर रॉकेल ओतता, आणि शांतपणे एकत्र राहून आयुष्य आनंदात घालवण्याची इच्छा असलेल्यांना तो हक्क नाकारता? हा कुठला न्याय?

सज्ञान असलेल्या दोन व्यक्ती जर एकत्र राहू इच्छितात, तर त्यास इतरांनी आडकाठी करू नये. समलैंगिक व्यक्ती कर भरत नाहीत, खून करतात, लाच देतातघेतात, रुग्णवाहिकेचा रस्ता अडवतात, रस्त्यावर थुंकतातहागतातमुतता, दिसल्या बायका की त्यांना जाळतात, गर्भातल्या मुलींना मारतात, असं कोणी म्हटल्याचं अजून आढळलेलं नाही. जर उपरोल्लेखित गोष्टी ते करत नसतील, तर त्यांच्या विवाहांना होणारा विरोध अनाठायी आहे. उद्या एखाद्याला शेपू आवडत नाही, म्हणून तुम्ही वाळीत टाकाल.

खरं आहे, पुरुषही नष्ट होवू शकतात. मुद्दा कायम रहातो.
बागुलबुवा, एकेकाळी अतिरंजित वाटणार्या गोष्टी आज सत्य आहेत. जेव्हा एक समाज म्हणून एखाद्या संकल्पनेचा स्विकार्-धिक्कार करायचा असतो तेव्हा केवळ आपल्या पीढी वरच नाही तर येणार्या कित्येक पीढ्यांवर आपल्या निर्णयाचा काय परिणाम होणार आहे याचा विचार व्हायला हवा म्हणून हे extrapolation!

चिनुक्स.
<<
आपल्याला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणलेला चालतो. अंधश्रद्धा, बेशिस्त आपण खपवून घेतो. पण माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार काढून घेतो. असं का? हजारो लोकांना मारणार्‍या नेत्यांचे तुम्ही जयजयकार करता, शास्त्रीय सत्य नाकारणार्‍या भोंदूबाबांच्या नादी लागता, गल्लीतल्या गुंडाला, पक्षाच्या कार्यकर्त्याला पैसे चारून कामं करवून घेता, प्रसिद्ध डॉक्टरांकडे जाऊन गर्भलिंगचाचणी करवून घेऊन मुलींना मारता, रस्त्यावरून जाणार्‍या रुग्णवाहिकेला रस्ता मो़कळा करून देत नाही, रस्त्यावर पडलेल्या जखमी माणसाला दवाखान्यात नेण्याची माणुसकी दाखवत नाही, बायकांच्या अंगावर रॉकेल ओतता, आणि शांतपणे एकत्र राहून आयुष्य आनंदात घालवण्याची इच्छा असलेल्यांना तो हक्क नाकारता? हा कुठला न्याय?
>>
यातली प्रत्येक अन प्रत्येक गोष्ट कायद्याच्या दृष्टी ने अन्याय्य आहे. कारण या समाजाला ती अन्याय्य वाटते म्हणून. प्रत्यक्षात आपण जे करतो ते चूकच आहे.

sulu,
हे 'extrapolation' शास्त्रीय तत्त्वांना धरून असल्यास उत्तम नाही का? Happy

या वरच्या प्रत्येक गोष्टीमुळे प्राणहानी, वित्तहानी होत असते. या गोष्टी अन्याय्य आहेतच, कायद्याच्या दृष्टीनं चुकीच्या आहेत. पण मुख्य म्हणजे समाजविघातक आहेत. दोन माणसांना एकत्र राहू देणं, यात समाजविघातक काय?

चिनुक्स,
<<

sulu,
हे 'extrapolation' शास्त्रीय तत्त्वांना धरून असल्यास उत्तम नाही का?
>>
मी शास्त्रज्ञ नाही. मी फक्त विचार मांडू शकतो. ५०-१०० वर्षानी काय होवू शकते याचा.
कोणी असे केले असेल तर सांगा.

उद्या एखाद्याला शेपू आवडत नाही, म्हणून तुम्ही वाळीत टाकाल. <<<
एवढ्या पोस्टींमधे झालेला विरोध याच क्याटेगरीतला आहे Happy

चिनुक्स,
<<सर्व व्हिपटेल लिझार्डी या मादी असतात. त्यांचं पुनरुत्पादन कसं होतं, यावर मतांतरं आहेत.
>>
व्हिपटेल लिझार्र्ड ची लग्ने ऐकली नाहीत. माझ्या मते समलैंगिक विवाह समाजाने मान्य करावा का हा प्रश्न आहे.

sulu,

हल्ली भिन्नलिंगी व्यक्तीसुद्धा लग्न न करता एकत्र राहत असल्यास कायदेशीर हक्क मिळावेत, यासाठी प्रयत्नात आहेत. भिन्नलिंगी व्यक्तींनाही विवाहाची गरज भासत नाही. फ्रान्सप्रमाणे कायदे भारतात आले तर अनेक भिन्नलिंगी व्यक्तीही लग्न न करता एकत्र राहतील. सध्या भारतात तसे कायदे नाहीत, म्हणून समलैंगिकांना विवाहाची आणि भिन्नलैंगिकांना मिळणार्‍या कायदेशीर हक्कांची परवानगी हवी.

चिनुक्स,
<>

ह्म्म, अमेरिकेत तर एकत्र रहाणार्या couples ना कायदेशीर हक्क आहेत. ते का बरं लग्नाच्या मागे लागावेत मग? तुमचे argument मला समजले पण पटले नाही.

तुम्हाला मान्य नाही याव्यतिरीक्त दुसरं कुठलं कारण आहे सुलु समलैंगिक विवाह समाजमान्य न करण्यास ?

बागल्या विरोध करणारे सर्वच जण कोणतंही शास्त्रीय विधान न करता फक्त विरोध करत सुटलेत.
त्यांना फक्त विरोध, अस्विकार, अमान्य हेच शब्द माहित आहेत.

उत्त॑म चर्चा...

मुळात इथे महेश आणि सुलू यांचा समलैंगिक म्हणजे "सिनेम्यातून दाखवलेले आचरट चाळे करणारे पुरूष" असा काहीतरी समज असावा, असं मला वाटतय. महेश, तुम्ही कधी एखाद्या समलैंगिकांशी बोलला आहात का? त्याच्याशी मैत्री अथवा त्याच्या/तिच्याबद्दल जाणून घेतलं आहे का? तसं नसेल तर अवश्य करा. तुमच्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.

माणसाचं मन ही अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट आहे. सर्वासाधारण प्राण्यांमधे लैंगिक क्रिया ही प्रजोत्पादनासाठीच केली जाते. माणसाच्या बाबतीत मात्र, लैंगिक क्रियांमधून प्रजोत्पादन हा सेकंडरी मुद्दा असतो. "आनंद/प्लेझर" हा प्राथमिक मुद्दा असतो. कुठलीही व्यक्ती "मुलं जन्माला घालायची" म्हणून सेक्स करत नाहीत, त्या सेक्समधून आनंद मिळावा म्हणून करत असतात (मुलं नऊ महिन्यांनी जन्मतात). इतर प्राण्यांमधला आणि आपल्यामधला हा महत्त्वाचा फरक. आता सेक्समधून आनंद असं एकदा म्हटलं तरी, प्रत्येक मनुष्याला ठराविक प्रकारच्याच सेक्सने आनंद मिळेल असंही नाही (तसं असतं तर वात्सायनाला कामसूत्र लिहायची गरजच नसती ना!!!!) माणसाच्या या लैंगिक जाणीवा आधी विकसित झाल्या आणि मग उत्क्रांतीमधे कधीतरी त्याने "समाज्-विवाह्-वारसा-जोडीदार्-मोनोगॅमी" असा प्रवास सुरू केला. यातून अनेको नाती तयार झाली. या नात्यांमुळे माणसाला "माणूसपण" मिळत गेलं आणि ते अजूनही बळ्कट होत जातय. या हजारो वर्षाच्या प्रवासामधे अनेक गोष्टी तत्कालीन समाजाला ठेच लागण्यासार्ख्याच होत्या. पण तरी समाज तरून गेला. भारतामधे अगदी १०० वर्षापूर्वीदेखील अनेक पत्नी असणं बेकायदेशीर नव्हतं. आणी आज मात्र ते एकपत्नी असणं आपण समाजमान्य केलेले आहे.

समलैंगिक जोडप्यांचा विचार केला तर सध्यातरी हे प्रमाण तसं फार कमी आहे. जितकं हे प्रमाण आहे ते पाहता, "भिन्नलैंगिकता" संपुष्टात येइल असे वाटत नाही. (समजा) जर तशी वेळ आलीच तर तेव्हा पुरातत्त्वशस्त्राचे लोक आपली हाडं उकरून काढत अस्तील हे नक्की. त्यामुळे तेव्हाचा विचार आत्ताच करून घेऊन डोकेफोड करण्यात अर्थ नाही. आपल्या मागच्या पिढीने "पुढची पिढी सुखी व्हावी" म्हणून काही केलेलं नाही. मागची पिढी ज्या समाजात जगत होती, त्यामधे आपण निश्चितच जगत नाही. मग आपण तरी उद्याच्या पिढीला "आत्ता जसा समाज आहे तस्साच मिळावा" म्हणून अट्टहास धरायचा??? अणि त्या अट्टहासापायी आजच्या आपल्या पिढीतल्या काही लोकांना उपर्‍यासारखी वागणूक द्यावी??? ते समलैंगिक आहेत आणि आपण भिन्नलैंगिक, एवढाच काय तो फरक. बाकी कुठल्याही गोष्तीमधे ते आपल्यापेक्षा वेगळे नसतात. भिन्नलैंगिक दिवसाचे २४ तास फक्त आणि फक्त सेक्सचाच विचार करतात का? भिन्नलैंगिक पुरूष कुठलीही स्त्री दिसली की सेक्सच्याच दृष्टीने विचार करतो का (काही विकृत लोकं असतील, पण सर्वसाधारणपणे तरी असं नसतं) हेच उलट भिन्नलैंगिक स्त्रीच्या बाबतीत पण. मग समलैंगिकाच्या बाबतीत "अपोझिट सेक्सची" गरज संपल्यावर ते त्यांना संपवतील ही भिती कशाला? समलैंगिकाचा भिन्न लिंगाच्या "व्यक्तीच नको" असा आग्रह नसतो. (जसा कितीतरी भिन्नलैंगिकांचा असतो!!!) एकदा समलैंगिकता ही नैसर्गिक आहे हे आपण मान्य केलं की मग त्याला अ‍ॅक्सेप्ट करण्यामधे नक्की काय अडचणी येऊ शकतात?? आणि एकदा अ‍ॅक्सेप्ट केल्यावर समाजाचा एक भाग म्हणून ज्या सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत (लग्न्-वारसा-मुलांचे संगोपन) त्यांचा फायदा त्यानी घेऊ नये असं म्हटलं तर ते दुटप्पी पणा ठरत नाही का??

काहींना लग्न हे रिच्युअल महत्वाचे वाटत असू शकते. म्हणजे त्यात घ्यायच्या शपथा इत्यादी.
जोडीदाराला आयुष्यभराची साथ देण्याच्या शपथा जगाच्या साक्षीने घेणे, रूढ असलेल्या पद्धतीनुसार घेणे हे काहीजणांसाठी महत्वाचे असूच शकते.

Pages