समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

बहुमान्य गोष्टीच नॉर्मल मानल्या जातात बाबू. तो आपल्या समाजातला दंडक आहे. त्याला समाजाताला कुठलाच कळप अपवाद नाही. न्युडीस्ट कॉलनीत कपडे घालून फिरणे हा एबनॉर्मल प्रकार ठरतो. नाही का ? आणि वाईस वर्सा. Happy
चर्चेला फाटे फुटत चालले आहेत. मूळ लेखकाला जाणवणारा धोका त्या लेखकासकट हरवला आहे. Happy

नॉर्मल या शब्दाचा आणखी काही अर्थ होत असल्यास जाणून घ्यायला आवडेल. माझ्याकडून अभिप्रेत असलेल्या अर्थाचा खुलासा केलेला आहे. मानसिक विकृती ही नैसर्गिक आहे कि ती एक डिसऑर्डर आहे ? मतिमंद असणे, जन्मतः विकलांग असणे हे नैसर्गिक कि नॉर्मल ? याचदृष्टीने भिन्नलिंगी आकर्षण उत्पन्न न होणे याकडे पाहता येणं चुकीचं आहे का ?

नॉर्मल नसलेल्यांना स्विकारू नका असा या पोस्टसमधून अर्थ ध्वनित होत असल्यास कृपया निदर्शनास आणून द्यावे. आभार राहीन. धन्यवाद.

दुसरा विचार,

प्रतिसादक ज्याला 'नॉर्मल' म्हणत आहेत, त्या अर्थाने अमुक गोष्ट त्या प्रकारच्या सर्व गोष्टी तपासल्या असता 'मेजॉरिटी' वेळा आढळते, असे म्हणायचे असावे. बेल कर्व्ह मधे स्टँडर्ड डेव्हिएशन १ म्हटले तर नॉर्मल गोष्टींचे प्रमाण एकूण ६८% इतके आढळते.

याच दृष्टीने मानवांत बहुतांश वेळा, 'नॉर्मली' नर व मादी आपसांत संभोग करतात. That is a (social) "Norm". जे स्टँडर्ड डेव्हिएशन २ इतके जास्त आहे.

याच 'सोशल नॉर्म'च्या पलिकडे / अलिकडे असलेल्या लोकांना, (जोपर्यंत 'स्वातंत्र्याच्या' व्याख्येत बसून आपला लैंगिक प्राधान्यक्रम जोपासतात, त्यांना) लग्न नावाची रिच्युअल पाळू द्यायला, त्याला कायदेशीर मान्यता द्यायला माझी स्वतःची काहीच हरकत नाही.

त्याच वेळी, डेव्हियंट बिहेवियर, जरी 'नॅचरल' पक्षी निसर्गात आढळणारी, जेनेटिकली डिफाईण्ड व्हेरिएशन इ. असली, तरी ती 'नॉर्मल' होत नाही, असे ही मला म्हणायचे आहे.

या संबंधांना कायदेशीर/समाज मान्यता दिल्याने अधिकाधिक लोक याच प्रकारच्या बिहेवियरकडे वळू लागतील असा धोका लोकांना वाटतो असे दिसते.

चर्चेत सुरुवातीला मी ज्या लैंगिकतेच्या विकासाच्या पायर्‍या लिहिल्या होत्या, त्यात पौगंडावस्थेत सुरुवातीला एकदा सगळेच समलैंगिकतेकडे आकर्षित होतात असा निष्कर्ष आहे. यानंतर पुन्हा भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होते.

भिन्न लिंगी आकर्षण येण्या आधीच जर समलिंगी संबंध प्रस्थापित झाले, तर आज जसे काही समलिंगी मारून मुटकुन भिन्नलिंगी संबंध प्रस्थापित करतात, त्याच प्रकारे मोठ्या प्रमाणावर समलैंगिक संबंध मारून मुटकुन सुरू राहतील अशी भिती यापाठी असू शकते.

प्रतिसादक, हे फक्त तुमच्या पोस्टसंबंधात - मानसिक विकृती किंवा डिसऑर्डर हा एकाचवेळी नैसर्गिक आणि मानवनिर्मित असू शकतो. डिसऑर्डर आणि नैसर्गिक ही तुलना होऊ शकत नाही. साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर बेसुमार खाण्याची आवड ही मानवनिर्मित असू शकत, त्याच वेळी ती नैसर्गिक पण असू शकते.
मतिमंद असणं हेही नैसर्गिक असू शकते किंवा मानवनिर्मित देखील. १०० बदकातला एक राजहंस हा एबनॉर्मल ठरतो.... अस म्हणा किंवा १०० राजहंसातला एक बदक म्हणा. इथे दोघांचा दृष्टीकोन आपापल्या जागी बरोबर.
भिन्नलिंगी आकर्षणालाही काही वेगळी मापं नाहीत. एक पुरुष दुसर्‍या पुरुषाकडे आकर्षित होतो तशी स्त्री स्त्रीकडे. फक्त त्यांचे संबंध शारीरिक पातळीवर आले की आपण त्यांना नॉर्मल/एबनॉर्मलच्या कुंपणात टाकण्याचा प्रयत्न सुरु करतो.

पण हे म्हणजे समाजमान्य नाही म्हणून नॉर्मल नाही आणि नॉर्मल नाही म्हणून समाजमान्य नाही असं सुरु आहे. Happy

मतिमंद असणं हेही नैसर्गिक असू शकते किंवा मानवनिर्मित देखील. <<<
मतिमंद असणे ही जेनेटिकल डिसॉर्डर आहे. निसर्गाचे काम केवळ.

मतिमंद असणं हेही नैसर्गिक असू शकते किंवा मानवनिर्मित देखील. <<<
मतिमंद असणे ही जेनेटिकल डिसॉर्डर आहे. निसर्गाचे काम केवळ.
<<
नाही हो. कित्येक लोक मंदपणे वागतात. तो मंदपणा मानवनिर्मित असतो बहुतेक Lol

मतिमंदत्व = डाऊन्स सिंड्रोम ना? मतिमंद याचा शब्दशः अर्थ न घेता ती एक स्पेसिफिक कंडिशन म्हणून उल्लेखली जाते ना? डाऊन्स सिंड्रोम पूर्णतया जेनेटिकलच आहे ना?
आता हे तुम्हाला सांगायला लागावं?

माझा गे लोकांबद्दल काहीही आक्षेप नाही आणि कायदेशीर मान्यता मिळण्यावर पण नाही.
पण जर माझ्या मुलांची व्रुत्ती गे असेल तर मला नकीच खुप दु:ख होइल.

मी लिहिलेली पोस्ट न वाचता, प्रतिसादक यांनी आपलंच घोडं पुढे दामटणं सुरू ठेवलंय.
झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं कसं करावं? Uhoh

नी, मानवनिर्मित यासाठी म्हणालो कारण गर्भधारणेच्या काळातील काही चुकीच्या गोष्टींमुळे गर्भावर परिणाम होतो आणि मुलं मतिमंद होऊ शकते अस नुकतच वर्तमानपत्रात वाचल होतं. त्यात काही लेटेस्ट स्टडीजचे रेफरन्स होते. मद्यपान, धुम्रपान, मादक पदार्थांच सेवन वगैरे वगैरे... फार खोलात जाण्यासाठी शोधाशोध करावी लागेल. Happy

पण जर माझ्या मुलांची व्रुत्ती गे असेल तर मला नकीच खुप दु:ख होइल.>> अहो जी लोक सरळ असतात ती सगळीच काही दुकटी होत नाहीत. काही स्वेच्छेने एकटीच राहतात. फक्त लग्न ही एकच गोष्ट अशा न-सरळ लोकांना करता येत नाही अजून. तेवढे एक सोडले तर सगळे जग मोकळे आहे काहीही चांगले करता यायला.

मध्यंतरी कुठेतरी वाचले होते:
१) जे पुरुष बायो असतात त्यांचा मुख्य कल स्त्रियांकडे जास्त असतो.
२) ज्या स्त्रिया बायो असतात त्यांचा मुख्य कल पुरुष्यांकडे जास्त असतो
३) जे पुरुष गे असतात त्यांना इतर गे पुरुष आवडत नाहीत.
४) ज्या स्त्रिया लेसबो असतात त्यांना इतर लेसबो स्त्रिया आवडत नाही.

प्रतिसादक, खुप खुप आभार खिंड लढवत आहात त्याबद्दल. आज येऊन पाहिले तर कालच्या प्रतिसादा नंतर आज पाहिले तर १०० पेक्षा जास्त प्रतिसाद होते, ते वाचण्यातच बराच वेळ गेला.

@दक्षिणा :
>>झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं कसं करावं?
हेच आम्ही देखील म्हणू शकतो.

मला हेच कळत नाहीये की एवढे स्पष्टपणे अनेक वेळा लिहून देखील तुम्हा लोकांना कळत कसे नाहीये.
वर प्रतिसादक यांनी म्हणल्याप्रमाणे इतर अनेक गोष्टींप्रमाणे ही एक अ‍ॅबनॉर्म्यालिटी आहे हे मान्य करून त्याला एका मर्यादेपर्यंतच ठेवले पाहिजे, उगाच त्याला समाजात मान्यता आणि त्याचा उदोउदो केला जाऊ नये असे म्हणणे आहे. यामधे मला नाही वाटत आणखी काही मुद्दे किंवा शास्त्रीय आधार असलेले लिहिले पाहिजे.

वर स्मगलिंगचा पण उल्लेख आला आहे. अशा अनेक गोष्टी समाजात आहेत पण त्याला कोणी सर्वमान्यता देत नाही.

सुलू यांच्याप्रमाणे कदाचित आम्हाला नसेल मुद्देसूद वाद घालता येत, पण म्हणुन विरोधी सूर ऐकायचाच नाही आणि टोकाचे बोलायचे (साष्टांग नमस्कार, इ.) असे करू नका.

एकदा का या गोष्टीला समाजमान्यता मिळायला लागली तर फार झपाट्याने इतर अनेक अयोग्य गोष्टी घुसून चांगल्या समाजव्यवस्थेची वाट लागायला वेळ लागणार नाही. Sad

<< मला हेच कळत नाहीये की एवढे स्पष्टपणे अनेक वेळा लिहून देखील तुम्हा लोकांना कळत कसे नाहीये.>> समजवा की मग. बाकिचे समजवत आहे ना तुम्हाला ?

<<वर प्रतिसादक यांनी म्हणल्याप्रमाणे इतर अनेक गोष्टींप्रमाणे ही एक अ‍ॅबनॉर्म्यालिटी आहे हे मान्य करून >> प्रतिसादक हा परमेश्वराचा आयडी आहे का की त्यांनी म्हंटल की ती अ‍ॅबनॉर्मॅलिटी झाली ? विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर नाही त्यांच्याकडे

<<त्याला एका मर्यादेपर्यंतच ठेवले पाहिजे, उगाच त्याला समाजात मान्यता आणि त्याचा उदोउदो केला जाऊ नये असे म्हणणे आहे. यामधे मला नाही वाटत आणखी काही मुद्दे किंवा शास्त्रीय आधार असलेले लिहिले पाहिजे. >> का ? मुळात आणखी मुद्दे म्हणायला एक मुद्दा तरी येऊद्या. आणि मुद्दे किंवा शास्त्रीय आधार नसताना का म्हणून तुमचे म्हणणे मान्य करावे ईतरांनी ?

<< एकदा का या गोष्टीला समाजमान्यता मिळायला लागली तर फार झपाट्याने इतर अनेक अयोग्य गोष्टी घुसून चांगल्या समाजव्यवस्थेची वाट लागायला वेळ लागणार नाही. >>
तुम्हाला असं म्हणायचय का की समाजव्यवस्था सेट झालीये. कुठलीही व्यवस्था ही परीपूर्ण होत नसून ती सतत डेव्हलप होतच असते. ईटस् ऑनगोईंग प्रोसेस.

>>आणि मुद्दे किंवा शास्त्रीय आधार नसताना का म्हणून तुमचे म्हणणे मान्य करावे ईतरांनी ?
कारण हे समाज स्वास्थ्यासाठी चांगले नाही म्हणुन.

खालील विधान मी फार नाईलाजाने लिहित आहे आणि कदाचित हेमाशेपो.
येथे जी काही शास्त्रीय (?) झुंडशाही चालू आहे ती चालू द्या. शुभेच्छा !

<< कारण हे समाज स्वास्थ्यासाठी चांगले नाही म्हणुन. >>
हे तुम्ही ठरवताय.

आधी समलिंगी संबंध नैसर्गिक नाहीत म्हणून मान्यता नाही असा युक्तिवाद होता. आता या अनैसर्गिकपणातला फोलपणा लक्षात आला म्हणून नॉर्मल हा शब्द आला का?

नॉर्मल म्हणजे सामान्य usual, ordinary. वादाकरता मानू की समलिंगी संबंध नॉर्मल नाहीत. मग त्यांचं काय करायचं? आत्ताआत्तपर्यत त्यांना गुन्हेगार मानलं जायचं. अजूनही शिक्का पुरता पुसायचाय. या नॉर्मल नसलेल्या लोकांचं काय करायचं? त्यांना नॉर्मल करता येईल का?

पुढे कधीतरी भिन्नलिंगी व्यक्ती अधिक संख्येने समलिंगी होण्याचा धोका आहे असे इब्लिस म्हणतात. त्याच लॉजिकने आता कमी संख्येने असलेल्या या अ‍ॅब्नॉर्मल लोकांना नॉर्मल करणं फार कठीण नसावं नाही का?

नसेल करता येत तर त्यांचं काय करायचं?

नैसर्गिक, अनैसर्गिक, नॉर्मल, अ‍ॅबनॉर्मल

समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देताना त्या अनुषंगाने इतर कायद्यांमध्ये सुधारणा अद्याप झालेल्या नाहीत. उदाहरणार्थ : अ‍ॅडल्टरी (विवाहबाह्य संबंध) : ह्यात विवाहित स्त्रीने विवाहाबाहेर अन्य पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवल्यास त्या स्त्रीचा पती त्या दुसर्‍या पुरुषाविरुद्ध तक्रार करू शकतो व त्यानुसार त्या पुरुषास आरोप सिद्ध झाल्यास इंडियन पीनल कोड अन्वये कारावास व दंडाची शिक्षा अशी तरतूद कायद्यात आहे.

तसेच कुटुंब कायद्यानुसार विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या पत्नीला घटस्फोट देताना तिचा पती तिला पोटगी नाकारू शकतो / पोटगीची रक्कम कमी देऊ शकतो. किंवा पतीने विवाहबाह्य संबंध ठेवल्याच्या आधारावर स्त्री जर घटस्फोट मागत असेल तर ती त्यानुसार पोटगीची रक्कम मागू शकते, तसेच इथे पतीने ज्या स्त्रीशी संबंध ठेवले तिच्यावर काहीच कारवाई होत नाही.
(इंडियन पीनल कोड - या कायद्यात सुधारणा आवश्यक आहे म्हणून अनेक वर्षे कायदेतज्ञ, सामाजिक संघटना सांगत आहेत, कारण त्यात स्त्रीस एक मालमत्ता म्हणून गृहित धरले आहे व विवाहित स्त्री जरी या संबंधात इक्वल पार्टनर असली तरी तिच्याविरुद्ध काही तक्रार करता येत नाही/ कायदेशीर कारवाई करता येत नाही. तसेच स्त्रीला आपल्या पतीविरुद्ध किंवा पतीने संबंध ठेवलेल्या स्त्रीविरुद्ध तक्रार - कारवाई करायची तजवीज नाही. तसेच ज्या स्त्रीशी त्या पतीने संबंध ठेवले ती जर त्याच्या विवाहित असण्याविषयी अनभिज्ञ असेल तर तिलाही त्या विवाहित पुरुषाविरुद्ध काही कारवाई करायची तजवीज या कायद्यात नाही.)

येथे, विवाहबाह्य समलैंगिक संबंध ठेवलेल्या पती / पत्नी विरुद्ध कायदेशीर तक्रार किंवा कारवाई करण्याची तरतूद अद्याप कायद्यात करण्यात आलेली नाही.

पुढे जाऊन समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता प्राप्त झाल्यास तदनुषंगाने या कायद्यांतही सुधारणा करणे अनिवार्य ठरेल, किंबहुना समलैंगिक संबंधांना कोर्टाने मान्यता दिल्यावर एव्हाना तसे व्हायला हवे होते.

तसेच भारतात मुस्लिम धर्मीयांना बहुपत्नीत्वाची कायदेशीर परवानगी आहे. एखाद्या मुस्लिम व्यक्तीने एक किंवा अधिक स्त्रियांशी निकाह केल्यावर तिसरी किंवा चौथी पत्नी म्हणून पुरुषाशी (अर्थातच सिव्हिल पद्धतीने - कारण मुस्लिम धर्मात समलैंगिक विवाहास मान्यता नाही) विवाह केल्यास अगोदरच्या पत्नींना त्याचे पासून तलाक घेण्याचा हक्क किंवा त्याच्या अन्य पत्नी व मुलांचे या चौथ्या विवाहसंदर्भाने हक्क, चौथ्या पत्नी (समलैंगिक संबंधाच्या)चे हक्क इत्यादीबद्दल बरेच बदल सध्याच्या कायद्यांमध्ये करावे लागतील.

प्राण्यांमध्ये आहे म्हणून माणसांमध्ये पण हा मुद्दा तर्कविरहीत आहे. प्राण्यांप्रमाणे एके काळी कोणीही मादी अन कोणीही पुरूष त्या गणातील सर्वांना उपभोगू शकायचा, आज नाही, हा बदल (की उत्क्रांती) मान्यच नाही का? प्राण्यांचे उदाहरण माझ्यामते गैर आहेत. माघ महिन्यात एका कुत्री पाठीमागे पाच कुत्रे पाहिले जातात, आणि ती कुत्री मग हव्या त्या कुत्र्या सोबत संग करू शकते. हे कुत्र्याबाबतीत नैसर्गिक आहे. पण ते उदाहरण, कुत्रे करतात म्हणून आम्हीही करू ह्यात (इतक्या उत्क्रांती नंतर ) मान्य करायला मला अवघड जाते.>>> ह्यात अतार्किक काय आहे? आजही माणुस प्राण्यात नर प्रजननास योग्य माद्या बघायला जातात. मादिला आवडलेल्या नरा बरोबर ती संभोगास तयार होते. माद्या व नर एकमेकाचा बार मधे, कुठल्या कुठल्या कार्यक्रमात, वधुवर सुचक मंडळात किंवा अगदी मायबोलिवर शोध घेत असतात. काय वेगळॅ आहे? केवळ चार चौघात संभोग करत नाहीत हा 'फरक' ? माकडांची समाज रचना असते, मुंग्यांची असते, हत्तीची, कोल्ह्या कुत्र्यांची असते तशी माणसांची आहे. ह्यात अतार्कीक काय आहे?

सुलु ह्यांच्या पोस्ट मधले ग्रे मुद्दे कुठले समजले नाही.

चार लोक करत नाहीत म्हणुन ते अ‍ॅबनोर्मल नसते. नोर्मॅलिटी म्हणजे वारंवारता. वरंवारता कमी असेल तर काय फरक पडतो? त्याने समलिंगी असणॅ वाईट कसे ठरते? तो रोग कसा होतो? अ‍ॅब्नोर्मल ह्या शब्दाला नेगेटीव्ह कोनोटेशन आहे. ते समलिंगी असण्याला लावण्याचे करण काय ?

अजुन एक मुद्दा समलींगी संबंधाविषयी चर्चेला इन्सेस्ट, आइ-मुलगा लग्न असले फाटे फोडायचे कारण कळाले नाही.

दलितांना वेद शिकायचा अधिकार मिळाला तर सगळा समाज नासेल.
नैसर्गीक रित्या मुल होत नाही म्हणुन इन्वित्रो वै चा वापर करणार्‍या स्त्रीयांची मुले अनौरस ठरावीत

असली विधाने आणि लोक समलींगी आहेत म्हणुन त्यांना लग्नाचा अधिकार नाही हे एकाच भयगंडात्मक मानसिकतेचे लक्षण आहे असे मला वाटते.

येथे, विवाहबाह्य समलैंगिक संबंध ठेवलेल्या पती / पत्नी विरुद्ध कायदेशीर तक्रार किंवा कारवाई करण्याची तरतूद अद्याप कायद्यात करण्यात आलेली नाही.

अरुंधती, इथे
Adultery – The act of indulging in any kind of sexual relationship including intercourse outside marriage is termed as adultery. Adultery is counted as a criminal offence and substantial proofs are required to establish it. An amendment to the law in 1976 states that one single act of adultery is enough for the petitioner to get a divorce.
हे पुरेसे नाही का?

कलम ३७७ वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झालेली आहे. निकाल यायचा आहे.

पेशवा | 10 January, 2013 - 16:16 नवीन,
हेय शब्बास!
***
मयेकरजी, अहो मूळ प्रतिसादात तसेच म्हटले आहे मी. वाक्यरचना सुस्पष्ट झाली नसावी बहुतेक, स्वारी.

महेश, प्रतिसादक हे समलैंगिकता म्हणजे फक्त सेक्सशीच रिलेटेड आहे असं डोळे झाकून धरून चाललेत, इतर गोष्टी ध्यानातच घेत नाहियेत.
एकूण हेट्रोसेक्शूअल्स हे नॉर्मल म्हणजे दिवसातला ठराविक वेळ खाणं, पिणं ऑफिस इ इ साठी देतात तसाच ठराविक वेळ सेक्स करतात. पण समलैंगिक मात्र ऑल द टाईम फक्त सेक्स आणि सेक्सचाच विचार करतात असा अर्थ निघतोय यांच्या पोस्टिंवरून.

Pages