'मिसेस' ... वेदा अशोकन

Submitted by बेफ़िकीर on 30 December, 2011 - 04:55

आपल्या स्वरात कोणताही बदल जाणवणार नाही याची काळजी घेत मद्रासस्थित आपल्या आई वडिलांशी व अविवाहीत लहान बहिणीशी बोलून वेदाने फोन ठेवला. हनीमूनचा हा दुसरा दिवस होता आणि सकाळी सकाळी सात वाजताच तिने ऊटीहून घरी फोन केला होता. आईने केलेली चौकशी, लहान बहिणीने केलेली थट्टा हे सर्व आता बोचरे वाटू लागलेले होते. कनू अजून झोपलेलाच होता. तो किती वाजता उठेल याची वेदाला काहीही कल्पना नव्हती. खिडकीतून बाहेर दिसत असलेल्या खोल दरीशी स्वतःच्या मनाची तुलना करत आणि टीमेकरचा बेचव चहा पीत वेदा काही मिनिटे निश्चल बसून राहिली.

आयुष्याला मिळालेले हे वळण अतर्क्य होते.

कनू म्हणजे अशोकन हा बंगळूरूस्थित आय टी क्षेत्रातील खोर्‍याने पैसा ओढणारा अधिकारी! हा बंगळूरूला असला तरी मुळात तमीळ होता आणि त्याचे स्थळ वेदाला चालून आल्यानंतर तिच्या घरच्यांना नकार देण्याचे काही कारणच मिळालेले नव्हते. फेसबूकवर त्याचा फोटो पाहून आणि त्याचे एकंदर राहणीमान पाहून अगदी तात्काळ नसले तरी जरा घाईघाईतच हो म्हंटले गेले होते. एंगेजमेन्ट आणि लग्न या दोन्हीसाठी व नंतरच्या उटीमधील वास्तव्यासाठी मिळून कनूला एकंदर पंधराच दिवस रजा मिळत असल्याने सर्व धार्मिक विधी आणि पार्ट्याही घाईघाईतच झाल्या. कनूच्या घरचे अतिशय सुसंस्कृत व उच्चभ्रू होते. वेदाही तशी श्रीमंतच घरातली म्हणता येईल. पण कनूपेक्षा जरा कमीच! लग्न ठरल्यापासून केवळ दोन ते तीन भेटी होतायत तोवर उटीला येऊन पोचलेही दोघे! अत्यंत चलबिचल होत असलेल्या मनाने वेदाने बॅग घेऊन खोलीत प्रवेश केला. मैत्रिणींनी जे काही सांगितलेले होते आणि जे काही विविध माध्यमांमधून कळत राहिलेले होते त्या सर्वांचा परिणाम म्हणजे वेदा अपेक्षा करत होती की रूम उघडून देणारा मुलगा निघून जाताच कनू आपल्यावर तुटून पडणार!

त्या क्षणापासून या क्षणापर्यंत कनूने तिला एकदाही स्पर्श केलेला नव्हता. वेदानेही पुढाकाही घेऊन पाहिला पण कनू देत असलेली कारणे न पटण्यासारखीच वाटत होती. प्रवासाने दमलो आहे, जरा टेम्परेचर वाटतंय वगैरे काहीही! बंगळूरू ते उटी प्रवासाने दमण्यासारखे काय होते?

मनातून भयानक भडकलेल्या वेदाला डोक्यात आता घणाचे घाव घातल्यासारखी जाणीव होऊ लागली होती.

संताप, फसवणूक केल्याची भावना आणि आयुष्यातून कायमचा निघून गेलेला अर्थ व त्याचा अतिरिक्त ताण या सर्व संवेदनांचे मिश्रण तिला असह्य होत होते. मागे वळून तिने एकदा पाहिले तर अशोकनची थोडीशी हालचाल झाली इतकेच! तिरस्काराने आणि घृणेने तिने पुन्हा दरी पाहायला सुरुवात केली. उटीतील या हॉटेलचे बूकिंग तरी सात दिवस कशाला हवे आहे असे तिला वाटू लागले. अशोकनची एखादी प्रेयसी असणार हे तिला आता कळून चुकलेले होते. पण असे असले तरी ताव मारणार्‍या लांडग्यांच्या स्वभावाचे पुरुष असतात म्हंटल्यावर अशोकनकडून तिला निदान खोटे प्रेम तरी अपेक्षित होतेच! पण तेही त्याने केलेले नव्हते.

शेवटी तिडीक येऊन ती उठली आणि तिने सरळ अशोकनला गदागदा हालवले. कनू दचकून उठलाच. वेदाला पर्याय राहिलेला नव्हता. पहिल्याच रात्रीनंतरच्या सकाळी इतकी तिडीक येणे, असे काही करणे याची इतकी गरज नव्हती. काही वेळ गेल्यानंतर काही प्रश्न, काही कोडी आपोआप उलगडली असतीही! पण वेदाने असे अचानक आक्रमक होण्यामागे 'फसवले गेल्याची' भावना होती.

कनू मात्र वेदाचा चेहरा आणि आक्रमकता पाहून काहीसा घाबरला. त्याला बहुधा असे काहीतरी अपेक्षितच असावे.

त्यामुळे त्याच्या चेहर्‍यावर आधीच डिफेन्सिव्ह व गिल्टी भाव आले.

पण ते भाव पाहून मात्र वेदाला अचानक खूप वाईट वाटू लागले. पुरुषाला पौरुषत्वाचा असलेला अभिमान हा अनेकदा दुराभिमान या पातळीला पोचलेला असल्याने आपण असे वागून एकदम अशोकनच्या मनावर आघात करायला नको होता हे वेदाला जाणवले. तिच्या डोळ्यात पाणी वगैरे येणार असे तिलाच वाटू लागले. अजून सहा सात दिवस येथे काढायचे असताना आपण एकदम अशा काय बावळटासारख्या वागलो असे वाटून तिने अचानक अभिनय करायला आणि स्वतःचे वागणे हे गंमतीने केलेले वागणे होते असे दाखवायला सुरुवात केली व जोरजोरात हासत ती अशोकनला बिलगली.

"किती झोपता... उठा...."

कनूला कळेना की ही थट्टा होती की गंभीर प्रकार होता. पण वेदाचे हासणे वाढू लागले तसा तोही काहीसा हसून तिच्यापासून दूर व्हायचा प्रयत्न करू लागला. ती अधिक जवळ येऊ लागली तसा त्याला थोडा राग आला पण त्याला भीतीही वाटल्यामुळे तो काहीच न बोलता नुसता पडून राहिला.

इतक्या कालावधीत वेदाला एक जाणवलेले होते ते म्हणजे अशोकनला अपराधी मात्र वाटत आहे. मग तिला कीवच वाटू लागली. आपण उगीच रागावलो असेही वाटू लागले. अशोकनशी भरपूर बोलून आणि त्याच्या मनातील गिल्ट नष्ट करून कदाचित आपण त्याला नॉर्मल बनवू शकू असेही तिला वाटले. त्यामुळे काहीच क्षणात बराच विचार करून ती अशा निर्णयाप्रत आली की जे काही तिच्या मनात आहे ते तिच्या मनात नाहीच आहे असे दाखवत त्याच्याशी अतिशय नॉर्मल वागायचे. त्याला काहीही जाणवू द्यायचे नाही. हा प्रॉब्लेम बहुतांशी आपणच सोडवायला हवा आहे आणि कितीही समूपदेशन किंवा वैद्यकीय उपचार केले तरी आपली भूमिका सर्वात प्रभावशाली ठरणार हे तिला जाणवले. आयुष्याला लागलेल्या या वळणावर असे चालावे लागणार होते की पुन्हा पहिल्या नॉर्मल रस्त्यावर आपण पोहोचू आणि बहुतेक अशोकन आपल्या मागून चालत राहणार हेही तिला जाणवले.

"चहा घेणार?? मी थोडा घेतला..."

"नको नको... मी दात घासतो आधी..."

"ओक्के??"

त्याच्यापासून बाजूला होत वेदाने त्याचा बाथरूमकडे जायचा रस्ता मोकळा केला. तिच्याकडे काहीश्या चमत्कारीक नजरेने पाहात अशोकन दात घासायला गेला.

त्याच्या गेलेल्या दिशेकडे आणी बाथरूमच्या बंद दाराकडे वेदा हताशपणे बघत राहिली.

एक वेगळा, अतिशय वेगळा उपाय हा उपचार म्हणून करावा लागणार हे वेदाला जाणवले. सततच करावा लागणार आणि त्यात मोठा त्याग असूनही तो त्याग नाहीच आहे असा चेहरा ठेवावा लागणार हेही!

एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस!

सलग तीन दिवस वेदा त्याला बोलता करायचा प्रयत्न करत होती. उटी बघायलासुद्धा गेले नाहीत दोघे रूमच्या बाहेर!

या तीन दिवसात मात्र प्रगती झाली. अगदी थोडीशीच, पण झाली.

अशोकनच्या चेहर्‍यावर तिसर्‍या दिवशीच्या संध्याकाळी वेदा काहीतरी बोलत असताना हसू फुटले आणि दोघे खूप वेळ हासले.

पण.... हासता हासता बिचार्‍या वेदाच्या डोळ्यात थोडेसे पाणी आले.... पत्नी व्हायच्या आधीच आई व्हावे लागत होते.

टीव्हीवरील कार्यक्रम, हॉटेलच्या रेस्टौरंटला दिलेल्या ऑर्डर्स, मैत्रिणींचे येत असणारे एसेमेसवरील जोक्स आणि जेवण किंवा न्याहारी घेऊन येणारा एक पोरगेलासा नेपाळी पिचपिच्या मुलगा हे बहुतांशी गप्पांचे आणि विनोदांचे विषय होते. पण तिसर्‍या दिवशी संध्याकाळी अशोकनला वेदाबद्दल थोडासा तरी विश्वास वाटू लागला आणि त्याच्या चेहर्‍यावर कॉमेडी एक्स्प्रेस बघताना पहिले हसू फुटलेले तिने पाहिले.

अपार प्रयत्नांना आलेले थोडेसे यशही बरेच होते तिच्यामते!

"अशोकन... तुम्हाला ऑफीसच्या कोणत्याच कलीगचा फोन किंवा एसेमेस कसा आला नाही??"

तिच्याकडे पाहताना अशोकनला जाणवले. तिच्या चेहर्‍यावरील आश्चर्य नैसर्गीक होते. प्रश्न खरोखर भाबडा होता.

अशोकन विचार करू लागला. आपल्या ऑफीसमध्ये आपण इतके वरिष्ठ आहोत की सध्या आपल्याला कोणीही फोन करणार नाही. आणि आपले वरिष्ठ तर इतके वरिष्ठ आहेत की त्यांना वेळही नसेल! पण ही बाई वेदा, आपल्याशी अतिशय व्यवस्थित वागत आहे. आपला प्रॉब्लेम... हिला कसा काय सांगायचा ?? की सांगायचाच नाही? आपल्याला पूर्ण माहीत आहे की प्रॉब्लेम काय आहे! पण ते हिला सांगितले तर त्याचा काय परिणाम होईल? ऑफीसमधील नरेनलाही माहीत आहे आपला प्रॉब्लेम! पण तो का कुणास ठाऊक, कधीही हासला नाही त्यावर! चांगला असावा मनाने! आपण वेस्टर्न कंट्रीमध्ये असायला हवे होते. आपल्याच समाजात आपल्याला काहीही स्थान नाही मिळणार! ही वेदा आपल्याला सोडून देईल. जग हासणार आपल्यावर! आपण असेच राहणार!

मग आपण लग्नाला तयारच का झालो? एक प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून? मीही पुरूष असून माझेही लग्न झालेले आहे हे जगाला दाखवायला??? होय, तेच कारण आहे. आपण फसवले या बाईला! यातून कोणताही डॉक्टर आपल्याला बाहेर काढू शकत नाही. मानसशास्त्रज्ञाकडे आपण गेलो होतो. पण दोन्ही वेळा आपल्याला उपचार सांगताना त्याच्याच तोंडावर फुटलेले हसू पाहून आपला आत्मविश्वास लोप पावला. मग आपण ते नांवच सोडले. ऑफीसमध्ये सर्वांना ऑर्डर्स सोडणारा आणि आपल्या वक्तृत्वाने जगभरचे बिझिनेसेस मिळवणारा एस एस अशोकन या रूममध्ये इतका गलितगात्र होण्यामागे कारण हेच आहे, की.... आपण..... असो!

आता कोणता उपाय?

आपोआपच अशोकनची नजर वेदाकडे वळली. ती त्याच्याचकडे पाहात होती. तिच्या चेहर्‍यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते.

व्यावसायिक मीटिंग्जमध्ये असणारा आत्मविश्वास आत्ता अशोकन चेहर्‍यावर आणू शकत नव्हता याचे त्याला स्वतःलाच इतके आश्चर्य वाटत होते की तो थंड झालेला होता.

त्याला विचार करायला वेळ देऊन वेदाने चॅनेल बदलला.

=======================

त्रस्त चेहर्‍याने टीव्हीकडे बघणार्‍या कनूच्या मनात तुफान चाललेले होते. सर्व्हिस अपार्टमेन्टवरील अकबर या आचार्‍याला कनूचे रहस्य पूर्ण माहीत होते. त्या अपार्टमेन्टवर कनू एकटाच राहात होता. पूर्वी एक काळे म्हणून महाराष्ट्रीयनही तेथे होता पण तो आता नोकरी सोडून मुंबईला गेलेला होता. त्या काळेलाही कनूचे रहस्य माहीत होते आणि तो कनूला हसायचा हे कनूला माहीत होते.

मधेच कनूने वेदाकडे पाहिले. टीव्हीकडे तल्लिनतेने पाहणार्‍या वेदाच्या चेहर्‍याचा कनूने खूप कमी क्षणात खूप जास्त विचार केला. चेहर्‍यावरील भाव आणि देहबोली यावरून माणसे ओळखण्याची हातोटी त्याच्याकडे खूप आधीपासून होती. त्याच्या व्यवसायामुळेच तो गुण त्याच्यात वाढलेला होता. करिअरमध्ये आपण एक नंबर आहोत आणि आपल्या निर्णयावर कोट्यावधींचे निर्णय होतात आणि अनेक कुटुंबप्रमुख आपल्यामुळे नोकरी करतात ही भावना हळूहळू आत्मविश्वास देऊ लागली. वेदाच्या मनात आपल्याला नॉर्मल करण्याचा हेतू असावा हे त्याला जाणवू लागले. तिला इतकी नवीन असताना हे सगळे कसे काय सांगायचे हा विचार लोप पावून एक वेगळा विचार मनात येऊ लागला. तो म्हणजे आपण कसे आहोत हे सांगितल्यावर तिला एकदाच धक्का बसेल हे सोडले तर मनाने ती खूप चांगली असल्याने ती आपल्याला यातून बाहेर काढण्याचा मनापासून प्रयत्न तरी करेल हा विचार!

हळूहळू या विचाराने वर्षानुवर्षे मनातच राहण्याच्या अवस्थेचा निषेध नोंदवून आपल्या बंडाचे स्वरूप तीव्र केले व तो अशोकनला 'मला व्यक्त कर' अशी आज्ञा देऊ लागला.

आणि एका स्फोटक व असह्य क्षणी अत्यंत खूप खूप मानसिक तयारी करून कनूने वेदाला हाक मारली.

"वेदा...."

पहिली हाक होती ही लग्न झाल्यानंतरची!

वेदाच्या मनावर त्या हाकेने रोमांच आले. खूप खूप काहीतरी मिळाल्यासारख्या आनंदात तिने मान वळवून कनूकडे पाहिले आणि त्याचा अतीगंभीर चेहरा पाहून ती मनातच हादरलेली असली तरी तिला जाणवले.

'ही इज गोईन्ग टू स्पीक नाऊ' 'याचवेळेस त्याला आपला आधार हवा असणार'!

"काय ??? बोला ना??"

अशोकनने मान खाली घातली आणि ते अतिशय स्फोटक विधान अतिशय घुसमटत्या आवाजात केले.

"आय अ‍ॅम अ 'गे'...."

भक्क नजरेने काही क्षण फक्त पाहात राहू शकली वेदा त्याच्याकडे!

जवळपास सगळेच संपले की काय असे तिला वाटू लागलेले होते. अशोकन स्थिर चेहर्‍याने तिच्याकडे पाहात होता.

काही क्षणांनी वेदाने मान खाली घातली. अशोकनने टीव्ही बंद केला तिच्या हातातील रिमोट घेऊन! तोच पहिला त्याने स्वतःहून तिच्या हाताला केलेला स्पर्श!

थंडीने लपेटलेल्या आणि हीटरने गरम झालेल्या त्या स्तब्ध खोलीत एकमेकांचे श्वासही ऐकू येत होते. विदीर्ण नजरेने डोळ्यात पाणी आणून एकदाच वेदाने अशोकनकडे पाहिले. तिला खूप खूप प्रश्न होते. मुळात लग्नच का केले येथपासूनच! पण पहिले वाक्य, जे अतिशय तिखट आशयाचे आणि जहरी स्वरांचे होते ते तिच्या तोंडातून बाहेर पडण्याआधीच अशोकनच्या तोंडातून ती विनंती बाहेर पडली.

"आय... आय रिक्वेस्ट यू टू टेक मी आऊट ऑफ धिस... समहाऊ... एनीहाऊ... "

त्याच्या चेहर्‍यावरची अगतिकता आणि अपेक्षा इतकी डबडबवणारी होती की तिचा विश्वासच बसेना की तो तिला महत्वाची तरी समजतोय यावर! तिला वाटत होते की बहुतेक तो आता म्हणणार असेल की आपल्या लग्नाला अर्थ नाही आणि माझे हे असे असे वागणे असेच राहणार वगैरे! पण तो आपल्यावर विश्वास ठेवतोय, आपल्याकडून नॉर्मल होण्याची आशा बाळगतोय आणि आपल्याला विनंती करतोय या तीन गोष्टींनी तिच्यातील सहृदयता जागृत झाली. डोळ्यातील पाणी आटले. त्याजागी भाव आले सहकार्याचे! विश्वासाचे! मैत्रीचे! या नात्यात आपण अत्यंत महत्वाच्या आहोत आणि आपल्यासमोर एक जादू करण्याचे आव्हान उभे ठाकलेले आहे या विचारांनी तिच्यातील प्रखर ठामपणा जागा झाला.

आणि मग सुरू झाली एक चर्चा! जी खूप वेळ चालली. पण अत्यंत उपयुक्त चर्चा! ज्यातून प्रेम बळावले. अनोळखीपणा कमीकमी होऊ लागला, होत राहिला.

=========================

"मी तुम्हाला... तुला... तुलाच म्हणते... मित्र आहोत आपण... मी तुला दोष नाही देणार... की लग्नाआधी हे का सांगितलं नाहीस... यासाठीही दोष नाही देणार की लग्न केलसच कशाला.. आणि यासाठीही नाही की... माझ्या आयुष्यात हे दु:ख का आणलंस... कारण अशोकन.. मुळात मला हे दु:ख वाटतच नाही.... ही फक्त एक डिसऑर्डर वाटते...जी विचाररणालीत आहे... ती बदलता येतेच येते.. दुरुस्त होतेच... त्यात लाजण्यासारखे.. घाबरण्यासारखे काहीही नाही... असे विचार असणार्‍या स्त्रियाही असतातच... त्याही नॉर्मल जीवन जगू शकतातच.. पुरूषही जगू शकतात... मात्र आपल्यात खूप जास्त संवाद व्हायला हवा आहे... खूप खूप बोलायला हवं आहे आपण.. अस म्हणतात अशोकन... की पन्नास पन्नास वर्षे संसार केलेले नवरा बायको एकमेकांशी कधीच बोललेलेही नसतात हे शक्य आहे... ते जे करतात ते केवळ कम्युनिकेशन असते... त्यात प्रामाणिकपणा, अपेक्षा, इच्छा यांचे व्यक्तीकरण नसतेच.. लोढणे असल्याप्रमाणे ते एकमेकांना वागवत राहतात आणि खूप सुखी असल्याचा दावाही करत राहतात.. इतका की शेवटी ते स्वतःला खरच सुखीच समजू लागतात... पण काहीतरी जाणवतही असते की.... आपण नेमके सुखी आहोतच असेही काही नाहीच.. पण ते मान्य करताना खजिल झाल्यासारखे वाटते... इगो आड येतो.. अशोकन... आपला दोघांत तसे काहीही होणार नाही.. मी तुझी आणि केवळ तुझी आहे... मी मुळात आहेच तुझ्यासाठी... मला तू सगळे सांग...ते माझ्याबाहेर जाणार नाही.... या आयुष्यात....बोल तू..."

"वेदा... लग्न करण्याची गरज काय????"

"वेल.. काहीही नाही...कारण लग्न केल्यावर जे केलं जातं ते लग्न न करताही केलं जाऊ शकतं....प्रेम, शरीरसुख, मुलांचा जन्म, संगोपन, संस्कार, घर बांधणे, एकत्र राहणे, जगाशी व्यवस्थित संबंध राहणे...हे सर्व खरे तर लग्नाशिवायही होऊ शकतेच..."

"मग लग्न का करतात???"

"कारण आपल्याकडच्या ढोंगी समाजात एखाद्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नसला तर त्याला पळवतात... त्याला छळू शकतात... त्याला अस्वीकारार्ह मानतात... तसेच एखाद्या नात्याला नांव नसले तर त्याला अर्थही नाही असे मानतात... लग्नाचे लेबल लावणे हे प्रेमासाठी आवश्यक नसतेच अशोकन... ते आवश्यक असते समाजाला आम्ही विवाहीत जोडपे आहोत हे दाखवण्यासाठी..."

"म्हणजे लग्न न करताही एकत्र राहता येईल???"

"अवश्य! का नाही??"

"मग लग्नाचे केवळ लेबलच असते ह मान्य करू शकणारे तुझ्यासारखे कदाचित अनेक लोक असू शकणार्‍या या समाजात पिढ्यानुपिढ्या वैचारीक बदल का झाले नाहीत??"

"कारण त्या बदलांनी स्वीकारणरी मानसिकता ग्रॅज्युअली येत आहे.. ती एकदम येणे एखाद्या माणसाच्या जीवनकालापुरते शक्य नाही... शेकडो पिढ्या त्या लेबलाच्या बंधनात राहिल्यानंतर आज कुठे असे मानणारी पिढी उगवत आहे की लिव्ह इन रिलेशनशिपही महत्वाची असू शकते.."

"म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप ज्या वेळेस सर्वांनाच मान्य होईल तेव्हा लग्न ही संस्था राहणार नाही?"

"खरं सांगू अशोकन ??? लग्न या लेबलाचा, संस्थेचा एक आणखीन मोठा फायदा असतो समाजाला! जो कोणी जाणत नाही. "

"विच वन??"

"लग्नामुळे माणसाच्या मनावर बंधने येतात. ही बंधने समाजाच्या स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक असतात. अनाचार माजू नये म्हणून ती पाळणे आवश्यक असते. प्रतारणा, बेजबाबदार वर्तन, व्यसनाधीनता, संस्कारहीनता, राहणीमानातील व संस्कृतीतील सुधारणाया अनेक गोष्टी ती बंधने पाळल्यामुळे टाळली जाऊ शकतात व जातातही!"

"म्हणजे फायदे आणि तोटे... दोन्ही...."

"तसं नाही... खरे तर लग्नाचे फायदेच जास्त आहेत किंवा फायदेच आहेत... तोटे म्हणजे केवळ आपण म्हणतो म्हणून... चांगला संवाद असला तर वैवाहिक आयुष्य खूप बहारदार होऊ शकते.. नवरा बायकोत फारसा सुसंवाद किंवा मुळातच संवादच बहुतेकदा नसतो... त्यांना जो संवाद वाटतो तो केवळ वृत्त असते... बातम्या देणे असते.. आज मी इथे आहे.... तू अशीच आहेस... हा असाच आहे... ती सारखी हेच करते.. तू सारखा असाच वागतोस... या सर्व बातम्या आहेत फक्त.. बोलणे, संवाद हे घडतच नाही... पण मला सांग अशोकन.... तुझा प्रॉब्लेम आणि लग्न याचा संबंध कसा??"

"कारण मी ज्या सर्व्हीस अपार्टमेन्टवर राहायचो... तिथला केअर टेकर... अकबर ... माझ आणि त्याचे लग्न झालेले आहे... आम्ही लग्न केले होते..."

"काय??????????"

"मला माहीत आहे की तुला धक्का बसणार... पण त्याला पर्याय नाही... एकदा खरे बोलायचे ठरवल्यावर खरेच बोलायला हवे... आमच्या लग्नाला तू कोणते परिमाण देशील वेदा???.. आमच्यात सुसंवाद आहे... आमचे लग्न हे केवळ इगो आड येतो म्हणून ओझी वाहणे नाहीच... "

"तुम्ही लग्न कसे केलेत पण???"

"घरातल्या घरात... शपथ घेतली... हनीमूनही केला..."

"हनीमून?????? हनीमून कसा होईल तुमच्यात?? स्त्री कोण?? पुरुष कोण??"

"दोघेही... भूमिका बदलतात... "

"पण असे... म्हणजे... आय डोन्ट गेट यू.... तू काय बोलतोयस??? "

"ट्रूथ..."

"अशोकन... हे आधी का सांगितले नाहीस???"

"त्या लग्नाला कायदेशीर आधार काही नाही म्हणून आणि घरचे माग लागले म्हणून... ऑफीसमध्येही चर्चा चालू झाली.. नरेनला थोडेसे माहीत होते... तो कोणाला काही बोलून माझे सामाजिक आयुष्य बरबाद होण्यापुर्वी मला लग्न करणे अत्यावश्यक होते... "

"पण... तुला असे सगळे.. म्हणजे.. हे सगळे वाटणे कधी सुरू झाले होते???"

"लहा...लहानपणापासून.. माझ्या मामाने मला शिकवले होते... भरपूर काय काय आणून द्यायचा आणि माझे तोंड बंद करायचा...मला हळूहळू आवड निर्माण झाली.. मग माझे... म्हणजे लक्ष.. असेच... म्हणजे मुलांकडेच जायला लागले... मग माझे मित्र... हळूहळू सगळेच मला टाळायला लागले... शेवटी एकदा घरी समजले... प्रचंड स्फोटक वाद झाले... मला हाकलून देण्यापर्यंट वेळ आली..."

"एक मिनिट.. एक मिनिट...अशोकन... पहिल्यांदा म्हणजे... जे काही तू सांगतोयस ते जर सत्य असेल तर... त्यात तुझा दोष काय??? तुला हाकलून देणे हे सोल्यूशन कसे काय होईल??"

" दोष सुरुवातीला जरी मामाचा असला तरी.. माझ्यात झालेले वैचारीक बदल हे... हे माझीच जबाबदारी ठरणार ना?? मामाला तर हाकलून दिलेच.... त्याचा नंतर संबंधच आला नाही कधी आमच्या घराशी... पण... मी बदललो तो बदललोच ना???"

"तुझ्यात जे बदल झालेले आहेत ते चुकीचे किंवा समाजाला मान्य नसलेले आहेत हे तुला जाणवत होते?"

"होय! मला मार बसणे, मामाला हाकलून देणे हे सर्व घडण्याआधी, म्हणजे अगदी पहिल्या वेळेस मामाने माझ्याशी संबंध पस्थापित केले तेव्हा मी साधारण चौदा वर्षांचा होतो तेव्हाही मला ते चूक आहे हे माहीत होते..."

" चौदा??? मग तू विरोध कसा केला नाहीस??"

"तो रेप नव्हता.. ज्याचा विरोध करावा..."

"म्हणजे???"

"मामा मला नवीन दप्तर आणून दाखवत होता... आई घरातच होती... बाबा कामाला गेलेले होते.... आपल्या भावाने आपल्या मुलासाठी नवे दप्तर आणले याचे आईला कौतुक वाटत होते... मग तो मला घेऊन वरच्या खोलीत गेला... तेथे त्याने त्याच्या पिशवीतून माझ्यासाठी आणलेले आतले कपडे दाखवले... त्याचे ते कृत्य आईला समजले असते तर काय झाले असते हे मला आजही माहीत नाही... पण त्याने ते मला दाखवले आणि घालायला लावले... मला कसेतरीच वाटत होते... मी टॉवेल आणायला निघालो तर त्याने मला अडवले आणि म्हणाला सगळ्यांचे सारखेच असते... त्यात काय लाजायचे आहे??? मला त्यात फारसे गैर असे काही वाटले नाही... नाहीतरी मी आईला हाक मारली असती... पण मी त्याच्यासमोर ते कपडे घातले.. तेव्हा तो मला मदत करण्याच्या मिषाने अनेक ठिकाणी हात लावत असताना.... मला जरा थोडेसे वेगळेपण जाणवले... पण... आय डोन्ट नो... काहीतरी असे झाले की... आय हॅड ... आय मीन... माझ्या जाणिवा जागृत झाल्या... त्यावर त्याने हलकेच हासत त्या... अधिकच जागृत केल्या... मी शरमलो असलो तरी... मला एकीकडे थोडे बरेही वाटू लागले होते... आणि त्याच वेळेस माझ्या लक्षात आले... की ही अशी गोष्ट आहे की जी... घरात आपण कोणालाही आपणहून तरी सांगायची नाही... आपोआप कोणाला लक्षात आले तर असे दाखवता येईल की ते तेव्हाच पहिल्यांदा झाले.. त्या दिवशी मला प्रथमच.. त्या अवयवाचा ... आय मीन... उपयोग नीट कळला.... मी एक दोनदा स्वतःच तसे करून पाहिले.. पण सारखे संडासात जाणे शक्य नव्हते... मग मी बावचळल्यासारखा झालो.. मग मामाने नवीन शक्कल काढली... माझा अभ्यास घेतो म्हणाला.. वरच्या खोलीत दुपारी आम्ही अनेकदा ते तसेच केले.. नंतर.... नंतर... एकदा मी... मी मामाला तसे केले... का कोण जाणे.. पण आईला काहीसा संशय आलेला असावा... कारण एका विशिष्ट दिवसानंतर ती सारखी खालून हाका मारायला लागली.. मग आम्हाला त्यावर नियंत्रण आणावे लागल.. मला लाजही वाटत होती... छंदही करावासा वाटत होता आणि मामा आणत असलेल्या वस्तूंचा मोहही सुटत नव्हता... कोणाशी बोलता येईल अशी ही बाबच नव्हती... हेच सगळे बायका आणि पूरुष करतात हे मामाने केव्हाच शिकवून ठेवलेले होते.. त्याच्या सर्वांगावर कोड असल्याने त्याचे लग्नच होत नव्हते त्यामुळे त्याला हा असला छंद जडला असावा हे नंतर, खूपच नंतर माझ्या लक्षात आले.. पण जेव्हा मी त्यात पुरता गुरफटलेलो होतो तेव्हा मला हेच वाटायचे की रात्री नवरा बायको हेच करतात आणी त्यामुळे मुले होतात... नंतर नंतर ज्ञानात वाढ झाली तेव्हा आपण मामाबरोबर जे करायचो ते पूर्णपणे चुकीचे होते हे लक्षात आले तेव्हा मामाला हाकलून आणी मला झापून दोन वर्षे झालेली असली तरी मला... मला आता तोच छंद लागलेला होता... अतिशय सोपा प्रकार असायचा हा.. सहज खेळता खेळता एखाद्या मित्राच्या मांडीवर हात टाकायचा आणि बोलता बोलता तो वर सरकवायचा... त्याच्या लक्षात येईपर्यंत किंवा त्याला काही वेगळेपण जाणवेपर्यंत मजा करायची आणि नंतर साळसूदपणे बसून राहायचे.. बसमध्ये तर अनंत पुरुषांना स्पर्श केले मी... शाळेत असताना मला इतके वेड नसले तरी कॉलेजमध्ये गेल्यावर मी... मी अनेक मित्रांना... अ‍ॅक्च्युअली म्हणजे.. ऑफरच केले... पण त्यातील सर्वांनीच माझी थट्टाही केली आणि मला बदनामही... मग नोकरी लागल्यावर शहरच सोडून बँगलोरला आलो.. इकडे कोणालाच माझी सवय माहीत नव्हती... आयुष्यात कधी मुलींच्या शरीराबद्दल मला आकर्षणच वाटले नाही.... मात्र प्रत्येक पुरुष.. अगदी कोणत्याही वयाचा... कोठेही असो... मी त्याला अगदी इमॅजिनच करायचो.. खरे तर या सारखी सुखदायक बाबच नाही.. जर हवा तसा पुरुष मिळाला तर जगात कोणाच्या बापाला संशय येत नाही.. माझे लग्न ठरवताना आई वडिलांना अजिबातच माहीत नव्हते की माझे ते वेड अजून तसेच आहे.. मी नाही नाही म्हणता शेवटी तयार व्हावेच लागले.. मला तुझे किंवा कोणाचेच कधीच नुकसान करायचे नव्हते... पण वेदा... तू म्हणतेस तसेच मलाही समाजासमोर एक लेबल हवे होते विवाहाचे... पुळचटपणा म्हण.. पण खरच लेबल हवे होते... बाकी काहीच नको होते... "

"अशोकन... तू हे... हे जे काय सांगतो आहेस... ते... ते धक्कादायक आहे... हे तुला कुठेही नेणार नाही.. उलट खरे तर यामुळे तुझे करीअर धोक्यात येऊ शकते.. समाजात बदनामी होऊ शकते...."

"मला सांग वेदा... असे काय असते जे पुरुषात नसते??? का आवडू नये पूरुषाला पुरुषच? ही इतकी नैसर्गीक बाब आहे की त्यावर हरकत घेणारा समाज कोण???"

"पुरुषात तुला काय आवडते???"

"सगळे..."

"म्हणजे काय?????"

"काय म्हणजे काय?? सगळेच... खरबरीत स्पर्श.... केसाळ शरीर... आकमकता... पुरुषाचा गंध... बोचणारी दाढी... टोचणारी मिशी... ताकद... . उद्दामता.. बेभानता... आवेग.. आपण पुरुष असलो तर त्याच्यात आलेली नम्रता... असहाय्यता... शरणागती..."

"हम्म्म्म.. म्हणजे भूमिका बदलल्यानंतर आधी त्याच्यातल्या आवडणार्‍या बाबींच्या जागा वेगळ्या बाबी घेतात..."

"होय.... आणि हे वविध्य... मला वाटते.. स्त्री कहीच दाखवू शकणार नाही.. ती आयुष्यभर स्त्रीच राहील.. पण पुरुष कधीच होऊ शकणार नाही.. पुरुष मात्र स्त्रीही होऊ शकतो काही वेळ..."

"म्हणजे तू समर्थन करतोयस???"

"वेदा.. आय जस्ट वॉन्ट टू टॉक इट आऊट.. मला भूमिका ठरवता येत असती तर मी लग्नाला उभाच राहिलो नसतो.. अतिशय गोंधळलो आहे... "

"तोच खरबरीत स्पर्श.. ते केसाळ शरीर... दाढी.. मिश्या... हे सगळे तो पुरुष तुझ्याशी एक स्त्री म्हणून रत झाल्यानंतर तुला जाणवतच नाही???"

"जाणवते.. पण.. पण मनात विचार वेगळे असतात..."

"याचा अर्थ काय सांग बर??"

"काय??"

"तुला मिळणारे सुख हे शरीरामुळे नसून तुझ्याच मेंदूत द्रवणार्‍या रसायनांमुळे आहे... जी एखाद्या निर्जीव वस्तूशी केलेल्या संभोगामुळेही द्रवतात.. "

" हो पण म्हणून काय????"

"मग ती स्त्रीशी रत झाल्यावरही द्रवतील..."

"तुझ्या लक्षात आलेले दिसत नाही... ऑल धिस टाईम... मी... मी स्त्रीदेहाचा तिरस्कार करू लागलो आहे... "

"का???"

"मला... मला ते ओंगळवाणे लिबलिबीत आणि अतिरिक्त मांसल स्पर्श तिरस्करणीय वाटतात"

"तूच सगळे बोलत आहेस... तर सांग... की असे का वाटते...?????"

"माहीत नाही... मला ते आधारहीन... घाणेरडे आणि चीप वाटतात..."

"निसर्गाच्या पुनरावृत्तीसाठी स्त्री व पुरुष यांचेच मीलन अभिप्रेत आहे निसर्गाला..."

"मी अनैसर्गीक मनाचा माणूस असेन.. इतकेच... म्हणून मी सर्वांप्रमाणे व्हावे अशी अपेक्षा का?? विवाह केल्यानंतर चार चार मुले होणारेच विवाहाला न्याय देतात असे कोठे?? बाकीचे लोक आपल्या घरी आलेल्या बायकोच्या आयुष्याची वाटच लावतात असे कोठे आहे?? तू सन्मानाने मिसेस वेदा अशोकन म्हणून आरामात राहू शकतेस.. इतकेच काय.... तुझी गरज म्हणून तू... एखाद्या पूरुषाशी..."

"प्लीज स्टॉप इट.. तू आहेस म्हणून मीही अनैतिक मार्गावर जावे असे कसे काय???"

"कारण तुम्ही या गोष्टीला अनैतिक मानता.. "

"मान्य आहे की सगळेच रिलेटिव्ह आहे.. आणि हेही मान्य की तू वेगळा असू शकतोस... अनैसर्गीकरीत्या नैसर्गीक असू शकतोस... पण.. अनुभव न घेता निष्कर्षावर कसा येऊ शकतोस???"

"अनुभव घेण्याचीच मला घृणा वाटते.."

"स्त्रीला निसर्गाने जसे बनवलेले आहे तशीच ती असणार ना??"

"त्यावर मी काही म्हणूच शकत नाही ना पण??? मला स्त्री आवडतच नाही हा माझा एकच प्रॉब्लेम आहे..."

"हे अ‍ॅबनॉर्मल आहे हे तरी मान्य आहे ना??"

"पूर्णपणे..."

"मग सर्वसामान्य होण्याचे प्रयत्न का करू नयेस??"

"प्रयत्नांचाच तिटकारा आहे..."

"ही हारण्याची आणि न खेळताच हार मान्य करण्याची पळपुटी वृत्ती आहे..."

"तेही मान्य आहे मला वेदा..."

"तुला मान्य सगळेच आहे अशोकन.. पण नुसतेच मान्य आहे... सुधारणेची इच्छा नाही आहे.. कारण पुन्हा तू त्याला 'सुधारणा' मानतच नसशील... सगळेच सापेक्ष.. पण तुझ्या वडिलांचे पुरुषाशी संबंध असते तर तू कसा झाला असतास??"

" मी आहे हेच फक्त सत्य आहे वेदा...बाकी काही नाही.. कोणत्याच प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नाही..."

"मोठ्ठेच्या मोठ्ठे कुलूप लावून टाकलेले आहेस मनावर... एकीकडे म्हणतोसा आपण बोलू आणि मी तुला यातून बाहेर काढावे.. दुसरीकडे बदलायला जाऊदेत.. पण पहिला प्रयत्न करायलाही तयार नाही आहेस.."

"तरीही यातून बाहेर काढ.. मला आता हे सगळे असह्य झालेले आहे.. मला पुरुष हवाच आहे.. पण मला.. नॉर्मलही व्हायचे आहे..."

"प्रथम पुरुषाचा तिरस्कार वाटणे फार आवश्यक आहे अशोकन... अकबरच्या कोणकोणत्या गोष्टींचा तुला राग यायचा???"

"स्वच्छ राहायचा नाही तो...घाणेरडा होता.. "

"ओफिसमधील कोणता पुरुष सहकारी तुला आवडतो??"

"तरुण असलेले सगळेच .. पण ऑफीसमधल्यांच्या बाबतीत मी अतिशय सावधान राहतो."

"त्यांचा कधी राग आलाच तर का येतो??"

"कामं करत नाहीट वेळेवर..."

"एकदाही एकही स्त्री आवडली नाही??"

"आवडतात...काही स्रिया सुंदर दिसतात...काहींचा आवाज चांगला असतो.. पण एखाद्या स्त्रीला एखादी स्त्री आवडावी अश्याच मलाही त्या आवडतात.."

"तुला कधी कोणी बायकी वागतोस असे म्हणालेले आहे??"

"नाही... कारण मी बायकी कधीच वागत नाही... माझे वागणे,चालणे, बोलणे, सगळेच पुरुषी आहे..."

"तुला खूपच म्हणजे प्रचंडच बदलावे लागेल अशोकन..."

"माहीत आहे... पण... तू काय करू शकशील???? तू शर्ट पॅन्ट घातलेस तरी माझ्या मनातून जाणार नाही की तू एक स्त्री आहेस.."

" मला सांग.. स्त्रीचा इतका आत्यंतिक तिटकारा असताना लग्न करणे, हे इथे उटीला येणे.. हे सगळे तुला कसे काय सहन झाले??"

"मला स्त्रीचा अजिबात तिटकारा नाही आहे.. मला स्त्रीबरोबर शरीरसंबंध ठेवण्याचा तिटकारा आहे..."

"म्हणजेच तू स्त्रीला काहीही समजत नाहीस..."

"का??? आता का?? स्त्रीचा विचार फक्त त्याच कारणासाठी होतो असा गळा काढणार्‍या अनंत बायकांमधील एक तू... आता तुलाच का असे वाटत आहे की मी तसा विचार करावा?? एक माणूस म्हणून तू मला आदरणीय वाटतेस की??"

"नाही... तो गळा काढणार्‍या बायका नवरा बायकोबद्दल बोलत नसतात... एकंदर पुरुषी पवृत्तीबद्दल बोलत असतात.. मी तुझ्याकडून व्यक्त करत असलेली अपेक्षा एका पत्नीची अपेक्षा आहे.. कोणत्याही एका बाईची नव्हे.."

"हो पण स्त्रीबरोबर संबंध ठेवण्याचा मला तिटकारा असणे याचाच अर्थ मी स्त्रीला काहीही समजत नाही असाच काढलास ना??"

"होय... कारण तुझ्यासारखे सर्व पुरुष झाले तर स्त्रीची गरज भासणार नाही... आणि मग सगळे थांबेल.."

"म्हणजे चक्र सुरू ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असायलाच हवी का??"

"आता मुद्दा भरकटत आहे... "

"..........."

"स्त्री हा निसर्गाचा सर्वात महत्वाचा घटक आहे.. त्या घटकाच्या इतर अनंत कर्तव्यांबरोबरच प्रजनन हे एक महत्वाचे कर्तव्य आहे... जे तिला निसर्गाने नेमून दिलेले आहे... हे कर्तव्य एक काम म्हणून विचारात घेतले जाऊ नये म्हणून त्याने स्त्री व पुरुषाच्या मेंदूत अशा प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत की हे कर्तव्य पार पाडताना त्यांना खूप आनंद मिळावा व तो आनंद पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत... तुला तहान लागली की तू पाणी पितोस... पाणी प्यायल्यावर घशातील एका विशिष्ट बिंदूच्या पुढे त्याचा पहिला घोट गेला की मगच तहान भागल्याची जाणीव होते.. या बिंदूला एक नॉन रिटर्न व्हॉल्व्ह असतो... त्याचे काम हे असते की तो घोट पुन्हा उलटा न जाऊ देणे... नाहीतर मग माणसे नुसत्याच गुळण्या करून तहान भागवतील आणि शरीराला प्रत्यक्ष पाणी कधीच मिळणार नाही.. म्हणून ती झडप तेथे इन्स्टॉल केलेली असते... जेणेकरून त्याचवेळेला माणसाला तहान भागल्याची जाणीव व्हावी ज्यावेळेला ते पाणी खरोखरच शरीराला मिळणार आहे व कोणत्याही परिस्थितीत मागे जाणार नाही आहे याची खात्री होते.. असे अनेक व्हॉल्व्ह्स शरीरात सर्वत्र असतात.. म्हणूनच उचकी लागणे, उल्टी होणे हे प्रकार त्या झडपा जबरदस्तीने उलट्या दिशेला उघडून झालेले प्रकार असतात व त्यांचा त्रास होतो... अशोकन... निसर्गाने केलेल्या या सर्व प्रोव्हिजन्स माणसाला आपला हक्क वाटायला लागतात... लक्षात घे की तहान भागवणारी घशातील झडप नसतीच तर माणूस चुळा भरून समाधानी झाला असता आणि खरे तर डिहायड्रेट होऊन मेला असता तरी त्याला समजले नसते की आपण का मरतोय! पण ही झडप असल्याने ती झडप असण्याचा आपल्याला हक्क वाटायला लागतो... हाच आहे वहिवाटीचा हक्क.. मला झडप आहेच म्हंटल्यावर ती असायलाच हवी असे मला वाटू लागणे... याचे कारण झडप नसतीच तर माणूस किती वेळा आठवत बसणार की या या अशा अशा पॉईंटच्या पलीकडे पाणी घालवायचे आहे घशातून... त्यामुळे त्याला तो हक्क वाटू लागतो.. ती सुविधा वाटू लागते.. अशीच सुविधा.. असाच हक्क.. त्याला आपल्या जननेंद्रियांचाही वाटू लागतो.. चार मुली असलेले जोडपे पाचव्या वेळेस पुन्हा ट्राय करते ते याच गर्वाने की तसे करणे हा त्यांना निसर्गाकडून मिळालेला हक्क आहे... वास्तविक पाहता निसर्गालाही तेच हवे असले तरी समाजरचनेला ते नकोही असू शकत असते... लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने नियमही होतात.. पण गंमत अशी आहे... की प्रजनन हा हक्क जितका मोठा वाटतो त्यापेक्षा संबंध येण्याचा आनंद मिळवण्याचा हक्क माणसाला हजारो पटींनी जास्त मोठा वाटू लागतो व संस्कृतीच्या र्‍हासाचे पहिले कारण निर्माण होते. ... हा र्‍हास संस्कृतीचा असतो... सृष्टीचा नाही... सृष्टी कोणत्याही संबंधांमधून निर्माणच होते... पण कोणत्याही दोन सजीवांच्या संबंधामधून जिचा र्‍हास होतो ती संस्कृती असते... मानवनिर्मीत संस्कृती... हा आनंद मिळवण्याचा हक्क माणसाला भ्रष्ट करतो... मात्र तुझ्याबाबतीत हे होण्याचा धोका अतिशय कमी आहे... कारण तुला हा आनंद ज्या घटकापासून मिळतो... तो म्हणजे पुरुष... तो घटक मुळातच स्वतंत्र असतो.. त्याला ते संबंध मान्य झाले तर समाजाला माहीतही होत नाही की असे काही आहे...किंवा या दोघांत असे काही चालू आहे... समाजाच्या मते हे संबंध तिरस्करणीय व हास्यास्पद असले तरी त्या दोघांना ते आनंद देत असू शकतात.. पण येथे पुन्हा निसर्ग आपले अस्तित्व दाखवून देतोच.. दोन्ही पद्धतीने... सकारात्मक व नकारात्मकही.. तो अशा पुरुषाला स्त्रीचा तिरस्कारही शिकवतो आणि रत असलेल्या किंवा होत असलेल्या पुरुषाचा तिरस्कारही.. जसा तुला अकबरचा मनातून तिरस्कार असला तरी तुझ्यासाठी पर्याय उपलब्ध नसल्याने तू ते मान्य करत राहतोस... मात्र या अशा आनंदाचे आयुष्य अल्प असते अशोकन... तो पुरुषही तुझा तिरस्कार करू शकतो... त्याला कदाचित स्त्रीमध्य्ही स्वारस्य असू शकते... त्याचेही लग्न झाल्यावर त्याला अ‍ॅबनॉर्मल सेक्सचा तिटकारा येऊ शकतो..जगात अर्धा टक्का पुरुषही गे नाहीत अशोकन.. तुला साथीदार मिळणार तरी कोण?? आत्ता जरी अकबरला एक फोन केलास तरी त्याला तुझ्याबद्दल किती विश्वास राहिला आहे हे तुला समजेल.. लग्न केले होतेत ना तुम्ही??? आणि तू तर शपथ मोडलीस???? अकबरशी प्रतारणा केलीस.. तो आता तुझ्याशी कसा बोलेल हे तूच फोन करून बघ त्याला.. तुला दुसरा पुरुष मिळवायचे प्रयत्न अहोरात्र करावे लागतील.... पण लग्न केलेस तर हक्काचा आनंद तुझ्यासाठी असेल.. तू नॉन रिटर्न व्हॉल्व्ह नसलेले मन धारण करून हा आनंद लुटत आहेस आयुष्यात... कोठपर्यंत गेल्यावर खरा आनंद मिळओ हे तुला अजून माहीतच नाही आहे... मलाही माहीत नाही आहे पण मला कल्पना आहे.. पण तुला माहीत तर नाहीच आहे.. पण अनुभवही घ्यायचा नाही... मात्र त्याचवेळेस अकबरच्या मनातून तू उतरलेला आहेस... आत्ता अगदी तो तुझ्याशी फोनवर गोड गोड जरी बोलला तरीही त्याला तुझा प्रचंड राग आलेला असेल हे स्टॅम्पपेपरवर लिहून घे माझ्याकडून... तोही दुसरा पुरुष शोधत असेल.. त्यालाही खर्‍या आनंदाची जाण नसेल.. किंवा कदाचित तो एखाद्या स्त्रीशीच लग्न करेल आणि तुझ्यावर सूड घेतल्याचे समजेल.. इकडे तू मात्र ज्या पुरुषाकडे तुझी इच्छा व्यक्त करशील तो तुला हासेल आणि तुझा तिटकारा करेल.. मग तुझी बदनामी करेल.. तुला असह्य होईल.. मग हेही शहर सोडशील... मग जेथे प्रतिष्ठेने राहता येते त्या शहरात नोकरी शोधशील आणि तुझ्यातील नामांकित व्यावसायिक तुझ्यातल्या इगोइस्टिक समलिंगी पुरुषाशी तडजोड करत आयुष्य कंठेल.. अशोकन... तू ज्या रस्त्यावर चालत आहेस त्यातील दु:खे आणि सुखे वेगळी आहेत .. कदाचित दु:खे कमी आणि सुखे जास्त असेही असू शकेलही.. माहीत नाही... पण एक लक्षात ठेव.... तोच मार्ग कंटिन्यू केलास तर परत यायची संधी एकही राहिलेली नसेल.. नॉन रिटर्न व्हॉल्व्हच्या पुढे जाण्यात अर्थ नाही.. आज तुला संवाद साधायचा आहे... आपण अ‍ॅबनॉर्मल आहोत हे मान्य करावेसे वाटत आह.. हीच एक निसर्गाने प्रदान केलेली खूप खूप मोठ्ठी संधी आहे.. याच संधीचा वापर कर... आत्ताच बदल स्वीकार... स्त्री देह लिबलिबीत आणि ओंगळवाणा नसतो... प्रसंगी हीच मऊ स्त्री पाठीचा कणा ताठ ठेवून संसारच्या संसार चालवते... अधिक कर्तृत्ववान ठरते.. ठरू शकते.. दिसायला खंबीर नसली तरी असू शकते प्रत्यक्षात.. तिच्याबरोबर रत होताना सप्तरंगांचे किरण अनुभवता येतात.. तू आत्ता फक्त एकच किरण अनुभवत आहेस... अशोकन... अकबरला फोन कर हवे तर... पण लक्षात ठेव.. तो गोड बोलला तर ते खोटे असेल आणि कडू बोलला तर खरे... आज तू जो मार्ग स्वीकारला आहेस तो मार्ग तुला समाजासमोर ताठ मानेने वावरू देत नाही आहे... उद्या तर तू एकलकोंडा जीवन जगू लागशील.. तोंड लपवू लागशील.. पहिल्यांदा इतरांपासून... नंतर माझ्यापासून.. आणि शेवटी... तुझ्या स्वतःपासून अशोकन... उझ्या स्वतःहीपासून....."

======================

अनेक दिवस झाले. खूपच फरक पडत आहे. आणि खूपच वेगात फरक पडत आहे. अशोकनला संसाराचा, लग्नाचा आणि खर्‍या प्रेमाचा अर्थ उमगत आहे.. त्यात बदल होत आहेत.. !

======================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

कथा इथे संपवणे आवडले.

अतिशय संयत भाष्य केलेले आहे कथेतून स्त्री पुरूष संबंधावर, लग्न संस्थेवर.

मस्तच!! लगे रहो मुन्नाभाई Happy

interesting subject.....छान हाताळणी...पण शेवट अचानक्.....rather शेवट नाहीच....still...good as usual....befee

बेफी...छान कथा. ती वेदा खरी असेल तर तिच्या हिमतीची दाद.

कठीण आहे अशा लोकांचं मत परिवर्तन होणं. तरीही प्रयत्न चालु आहेत म्हणजे ग्रेट. मी असे एक दोघे बघीतले आहेत. पण त्यांच पुर्ण आयुष्य वेगळच असतं. ते नाही सुधारत. अत्ता ऑफिस मध्ये ही एक प्रकरण झालं. तीन चार वॉर्नींग देवुनही तो कंन्ट्रोल नाही करु शकला. शेवटी त्याला रीझाइन करायला लागले. ऑफिस सोडताना तो अक्षरशः रडत होता. त्याला बायका मुले होती. लहान पणापासुन तो गे होता. चुलत भावामुळे तो असा होता. पण मोठा झाल्या वर मानसोपचार झाले, लग्न झालं, मुलं झाली. नंतर हे सगळ परत उफाळुन आल. ३-४ वेळा नोकर्‍या बदलायला लागल्या. आमच्या इथली पण सुटली. मुळात त्यांच्या नैसर्गीक सवयीच चुकीच्या असतात. त्यांन्नी लग्न केलं, मुलं झाली तरी त्या सवयी उफाळुन येतात.

सैनिक किंवा हॉस्टेल वर जे असे उद्योग चालतात, ते अपोझीट जेन्डर पार्टनर मिळत नाही म्हणुन. नाहीतर त्यांच्या जाणीवा पुर्ण पणे नॉर्मल असतात. त्या प्रांतात मुशाफिरी करुन अनेक जण परत नॉर्मल जीवन जगायला लागतात.

पण ज्यांचं पुर्ण मत परिवर्तन झाले आहे त्यांचं कठीण आहे. मला तरी हा असा अनैसर्गीक पणा येण्याची कारणे लहान पणात झालेल्या अत्याचारामुळे किंवा चुकीच्या एक्स्पोजर मुळे वाटतात. कधी कधी चोरुन स्त्री-पुरुष संबंध बघीतले आणि त्यात स्त्री ला होत असणार्‍या त्रासा (?) मुळेही अशा अनैसर्गीक संबंधांकडे माणुस वळु शकतो.

वेगळा आणि "नॉट मच डिस्कस्ड" विषय मांडल्या बद्दल तुमचे अभीनंदन.

ओह! अशोक खरोखरचा 'गे' नव्हताच का? की बायसेक्शुअल होता? की अडनिड्या वयात झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे तोही सेक्शुअल प्रिडेटर बनला होता? Sad

छान

तmast

कथा म्हणून ठीक आहे, पण काही गृहीतके पटली नाहीत.

* लेखकाचा (आणि काही प्रतिसादांचा) एकंदर सूर असा आहे की 'गे' असणे हे म्हणजे व्याधीसदृष्य काहीतरी आहे, जे 'बरे' करता येऊ शकते. इथे आपण आपल्या 'नैसर्गिक'त्वाच्या फुटपट्ट्या त्यांना लावत असतो. त्यांच्यापुरते तेसुद्धा शंभर टक्के नैसर्गिक असू शकतात, ही फॅक्ट आहे.
कथेत सांगीतलेली 'अर्धा टक्का' टक्केवारीबद्दल मी साशंक आहे, पण जगात सर्व काळात सर्व संस्कृतीत लोकसंख्येचा एक लहानसा का होईना, पण काहीतरी टक्का हा समलिंगी राहिलेला आहे. अगदी प्राणीसृष्टीही यास अपवाद नाही. हीसुद्धा निसर्गाचीच एक योजना आहे, असे विधान करण्यास वाव आहे.
हल्ली माध्यमक्रांतीमुळे या गोष्टी स्पष्ट किंवा कुजबूज स्वरूपात का होईना, पण बोलल्या जात आहेत. या बाबतीत कधी नव्हे इतके प्रबोधन होण्याची आता संधी आहे, आणि गरजसुद्धा !
प्रस्तुत कथा दुर्दैवाने समाजाने शतकानुशतके बाळगलेल्या पूर्वग्रहांनाच खतपाणी घालणारी, काहीशी पलायनवादी आहे असे माझे मत आहे. बेफिकीर, कथा 'पटली' नाही. Happy

* वेदाचे विवाहसंस्थेच्या प्रयोजनासंबंधीचे विचार अपुरे आहेत. केवळ रतिसुख आणि अपत्यप्राप्तीसाठी विवाहसंस्था अस्तित्वात आलेली नाही. विवाहसंस्थेचे मुख्य प्रयोजन हे संपत्तीच्या वारसाहक्काचे वितरण करण्यासाठी आहे. सामाजिक स्थैर्य वगैरे बाबी तदनुषंगिक आहेत.
असो.

अशोकन पुरेसा खरा वाटला नाहीच, पण वेदा जास्त हायपोक्राईट वाटली. दोघांनाही कौन्सेलिंगची गरज आहे असे वाटले.

कहि च्या काही हो. गे असण ही डिस ऑर्दर आहे कुणी सांगितले? लिहिन्यापूर्वी माहिती तर घ्यावी विशयाची. हो आणि एखादा माणुस गे असलाच तरी दिसेल त्या प्रत्येक पुरुषाबद्दल "तसेच" विचार करतो हेही अज्ञान !! हास्यास्पद कथा. अन वर कठिण विषय हातळल्याबद्दल [!!] लोक अरेवा म्हणणे हेही तितकेच हास्यास्पद की!

सर्वांचे आभार! ज्ञानेश, प्रतिसादावर विचार करतो Happy

फक्त हे विधानः

<<<<<त्यांच्यापुरते तेसुद्धा शंभर टक्के नैसर्गिक असू शकतात, ही फॅक्ट आहे.>>>>>

हे 'त्यांच्यापुरते' या शब्दाने गहर्न केलेलेच आहे ना? की (म्हणजे सापेक्षता वगळूनही) (आपण मेडिकल डॉक्टर आहात म्हणून विचारत आहे) अ‍ॅक्च्युअली त्यांचे हे वागणे 'अनैसर्गीक'च मानले जाते?

धन्यवाद!

दर्दी शी सहमत आहे. गे असणे ही "बरे" करता येण्यासारखी वगैरे डिसऑर्डर नाही तर ते नैसर्गीकच आहे. आत्ता कुठे गे असणे "वाईट" नाही असे समाज मानायला सुरुवात होतेय. पण लहान मुलांशी असे संबंध ठेवणार्‍याला कडक शिक्षा केली पाहीजे.

ज्ञानेश आणि दर्दी शी सहमत आहे.
गे असणं चूक किंवा अनैसर्गिक नाही. काका मामा मुळे कुणिही समलिंगी होत नाही. झालं तरीही ते तात्पुरतं असू शकतं. ही डिसऑर्डर नाही, बरी करण्याच्या वगैरे भानगडीत पडू नये हेच बरं. अशोकन हळूहळू सुधारतोय हे वाचून वैषम्य वाटलं. बिचारा मनाला मूरड घालून जगत असेल.. दाखवायला की मी पण सो कॉल्ड नैसर्गिक आहे म्हणून. Sad

'समलिंगी असणे' हे नैसर्गीक असते असे का म्हंटले जात आहे हे मला माहीत नाही. समलिंगी असणे हे निसर्गाला अभिप्रेत का असेल हेही ज्ञात नाही. असो! Sad

अहो बेफी पण स्त्री-पुरूष संबंध पण पुर्ण नैसर्गिक आहेत हे आपण प्रजोत्पादन होते म्हणून धरून चाललोय ना? लेखी असं काही नाहीच आहे त्याबद्दल. पण समलिंगी संबंध निसर्गात अस्तित्वातच नव्हते/नाहीत असं नाहिये ना?

भरत मयेकर | 3 January, 2012 - 12:14 नवीन
समलैंगिकता प्राण्यांमध्येही आढळते. यावर नैसर्गिक असण्याचा आणखी काय दाखला हवा?>>>>>

कॉफी हाऊसवर या क्षणी याच विषयावर चर्चा चालली आहे मयेकर, तेथे या कृपया

=========

असो!

नैसर्गीक म्हणजे जे होए, होऊ शकते तेच असे मानले जात आहे असे वाटते. व्हेअरॅज निसर्गाने जे मानवाला / सजीवाला कराअला प्रवृत्तकेले आहे तितकेच नैसर्गीक असे मानले जात नसावे असे दिसत आहे.

<<<अस्तित्वात असणे हे योग्य असण्याचे लक्षण कसे?
नैसर्गीक गोष्टी योग्य की अयोग्य हे ठरवणारे आपण कोण? (आपण म्हणजे मानव- नैतर लगेच अजुन कोणी "असं आम्हाला म्हणणार्‍या तुम्ही कोण?" असं विचारायचं.)

नैसर्गीक गोष्टी योग्य की अयोग्य हे ठरवणारे आपण कोण? (आपण म्हणजे मानव- नैतर लगेच अजुन कोणी "असं आम्हाला म्हणणार्‍या तुम्ही कोण?" असं विचारायचं.)>>>>>:-)

तसे नव्हे शिल्पा, मुळात समलैंगीकत्व नैसर्गीक आहे की मानवाने निर्माण केलेली सोय आहे हा विषय (मला तरी) चर्चायचा होता / आहे Happy

निसर्गात समलैंगिक प्राणी आहेत...काही तर फक्त समलैंगिकच आहेत. उदा. गांडूळ.
आता कोणी सोयीसाठी(?) समलैंगिक राहत असेल तर माहिती नाही...पण ते फक्त तुरुंगात किंवा जिथे फक्त एकाच gender चे लोक राहतात तिथे होऊ शकते.
जिथे भिन्नलिंगी जोडीदार उपलब्ध असतो तिथेहि समलिंगीच जोडीदार हवा असेल तर ते नैसर्गिक नाही तर काय? हे माझं मत.

जगभरातील जुन्या संस्कृतींमध्ये लोक असे संबंध ठेवत होते का हे एखाद्या अभ्यासू किवा इतिहासातील तज्ञ व्यक्तीकडून माहित करून घ्यायला आवडेल.

गांडूळ हे समलिंगी नव्हे तर उभयलिंगी असतात. म्हणजे एकाच गांडुळात स्त्रीलिंगी व पुलिंगी अशी दोन्ही जननेंद्रिये असतात.
शिखंडीबद्दल ऐकले आहे का?

माणसाचे सेक्शुअल ओरीएंटेशन हेट्रो,होमो,बाय यापैकी काहीही असू शकते. यात अनैसर्गिक काही नाही. लहान पणी झालेल्या लैगिक अत्याचारामुळे माणूस फार तर स्वतःही सेक्शुअल प्रिडेटर होईल, गे होणार नाही. तसेच गे म्हणजे 'सर्वभक्षी' नव्हे! हेट्रो व्यक्तीला जसे सगळ्याच अपोझिट सेक्सच्या व्यक्तींबद्दल आकर्षण वाटत नाही तसेच होमो व्यक्तीच्या बाबतीतही असते. नुसतेच शारिरीक आकर्षण नसते तर जोडीदाराबद्दल प्रेम, जिव्हाळा, सहजिवनाची आस असते. दुसरे असे की सेक्शुअल ओरिएंटेशनचा आणि सेक्शुअल प्रिडेटर असण्याचा काहीही संबंध नाही. मात्र बरेचदा एखादी व्यक्ती गे आहे हे कळल्यावर तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन इतका दुषित असतो की साध्या साध्या गोष्टींमधून चुकीचा अर्थ लावला जातो.

<<<गांडूळ हे समलिंगी नव्हे तर उभयलिंगी असतात.
शाळेत समलिंगी असल्याचं शिकवलं होतं अन काल परवा पीबीएस किड्स वर गांडुळ शेतीचा कार्यक्रम पहातानाही तेच सांगितलं. खरं खोटं माहीत नाही.

तसेच स्वाती२ शी सहमत.

<<<hermaphrodite

म्हणजे काय? त्याचा अर्थ उभयलिंगी असेल तर तसं किंवा समलिंगी असेल तर तसं लिहायचं होतं...आमच्यासारख्या भाषेच्या दगडाला काहीतरी समजलं असतं.

hermaphrodite - उभयलिंगी
homosexual- समलिंगी

Pages