समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

चला.

लोकहो, हा धागा मी वर काढला, अन इतकी सुंदर चर्चा गेले २ दिवस सर्वांनी मिळून केली.

इतका वेळ चांगली चर्चा सुरु होती. पण आता इथे टिनपॉट डुप्लिकेट आयड्या काढून बिनडोक बडबड करणारे येऊ लागले आहेत.

त्यामुळे, यापुढील उत्तरे इब्लिसपणे देईन Happy

इब्लिस, इब्लिसपणे उत्तरं देऊन टिनपाट आयड्यांच्या हातात कोलित देण्यापेक्षा दुर्लक्ष करणं योग्य नाही का? तसंही दोन्ही बाजूंनी बरेच पॉईंट्स कव्हर झाले आहेत, बाजू माडून झालेली आहे.

प्रतिसादक, तुम्ही माझं नाव लिहीलय म्हणून हा प्रपंच.
नॉर्मल म्हणजे निगेटीव्ह हा अर्थ 'बहुमान्य' या शब्दामुळे येतोय. दहा माणसांनी 'हो' म्हटल्यावर अकरावा 'नाही' म्हणाला तर मग तो नेगेटीव्ह मानला जातो. भले त्याचं मत अचूक का असेना.
समलैंगिकाना जगण्याचा हक्क मान करताना कोणत्याही आधारावर मान्यता देणारे आपण कोण ? तुम्ही तुमचं आयुष्य कस जगता किंवा कसं जगावं हे तुम्हाला शिकवण्याचा जसा कुणालाच अधिकार नाही तसच त्यांचही. जोवर तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडून इतरांच्या सीमा लांघत नाही, तोवर कुणी तुमच्या आयुष्याच्या अधिकारात ढवळाढवळ करण्याचा प्रश्न येत नाही. हाच नियम त्यांनाही लागू होतो.

जी गोष्ट नैसर्गिक आहे ती योग्यच आहे असा दावा निश्चितच चुकीचा. कारण भावना नैसर्गिक असल्या तरी त्यांना आवर घालणं माणसाच्या हाती आहे. मग ती कोणतीही भावना असेना. त्यातही ती भावना दुसर्‍याच्या व्यक्तीस्वांतत्र्यावर गदा आणत असेल तर ती नैसर्गिक असली तरी अयोग्यच. पण याचा अर्थ असाही होत नाही की एखाद्याला समलैंगिक संबंध ठेवायचे असतील तर ते अयोग्य आणि भिन्नलिंगी योग्य. परस्परांचा आदर राखून निर्माण झालेलं कोणतही नातं हे योग्यच. या नात्यात सगळ्या गोष्टी लैंगिकतेच्या पातळीवर पोहोचल्या तर मग प्रश्न निर्माण होतो तो नैसर्गिक अनैसर्गिकतेचा. पण तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि चार भिंतीच्या आड तो ते कसा सोडवतात तोही त्यांचा प्रश्न. जसा आपला असतो तसाच.

आपण समाज या विषयावर न बोललेलं बरं. कारण समाज म्हणजे शेवटी कोण ? आपले नातेवाईक ? मित्र मंडळी ? ओळखीची माणसं की अवतीभवतीचे सगळेच ? समाज्यमान्य अस आपण म्हणतो तेव्हा तिथे आपल्याला अभिप्रेत असतो तो कळप ज्यांना आपलं मत पटत असते. ते फक्त त्या कळपाचं मत. संपुर्ण समाजाचं नाही. मग समाज असा उल्लेख करण्यातही काय अर्थ ? शेवटी समलैंगिक लोकांचा समाज तर याला मान्यता देतो आहेच ना. मग समाज या शब्दाचं पाठबळ न घेता, वैयक्तीक मत मांडलेलं जास्त योग्य. ते मांडण्याचं धाडस असलेले स्वतःच्या नावानिशी आले तर खरच स्वागतार्ह. ड्यु आय घेऊन फक्त उपहास करणार्‍याना माझ्या लेखी शुन्य किंमत आहे. चर्चा करणार्‍यांच स्वागत आहेच. कारण त्यामुळे आपली मत देखील तावून सुलाखून निघतात.

अजून काही गोष्टी नोंदवायच्या आहेत. त्या थोड्याच वेळात नोंदवतो.

मित्रहो,
गेले काही दिवस मी मला जे मनापासून वाटत होते ते शक्य तितके logical arguments करीत मांडले. चिनुक्स चे मुख्यतः आभार की त्याने इतके material वाचायला दिले. मला वाट्टं की आता मला जे काही म्हणायचं होतं ते मी म्हटलं आहे आणि बाकिच्यांचे योग्य मुद्दे ही लक्षात घेतले आहेत. या विषयावर माझ्याकडून जितकी चर्चा व्हायला हवी होती तितकी झाली. आता यापुढे शक्यतो या धाग्यावर एक वाचक म्हणूनच येईन. एखादा मुद्दा खूप आवडला किंवा परत धक्का बसला की परत लिहिनच.

मी धाग्यावर येथेच मान्य करतो की शास्त्रीय आधारावर सद्द्यस्थितीत समलैंगिकता नैसर्गिक आहे आणि माणूसकीच्या आणि समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने समलैंगिकाना समाजात सामावून घेतले पाहिजे आणि बाकीना जे-जे हक्क आहेत ते सर्व ( लग्न, कायदेशीर हक्क, मुले) मिळायला हवेत.

काही गोष्टी पटत नाहीत. पण मान्य कराव्या लागतात कारण बहुदा त्या बरोबर असतात. इथल्यांचे arguments तितकेसे convincing नव्हते पण त्याना काय म्हणायचे होते ते मला समजले.

-धन्यवाद! माझ्याकडून या विषयावर संभाषण संपले. कृपया वैयक्तिक हल्ले शेरेबाजी नको. मी केली नाही मला अपेक्षित नाही.

सुलूभाऊ, हॅट्स ऑफ! Happy
तुमची चर्चा करायची पद्धत, पूर्वग्रह बाजूला सारत अभ्यास करून मत निश्चित करायची आणि ते बदलल्यावर तसं प्रकटपणे व्यक्त करायची तयारी - हे शिकण्यासारखं आहे. Happy

सुलुशेठ, तुम्ही स्वतःची "प्यांट" सांभाळुन चर्चेत भाग घेतल्याबद्धल आभारी. सगळ्यांच्या मतांचा आदर, पण हिच मतं प्रत्यक्षात उतरावीत, आचरणात यावीत यासाठी शुभेच्छा - व्हेन रबर मीट्स द रोड...

सुलुभाऊंच्या संदर्भात स्वातीला +१०००

आय होप तुम्ही >>>मी धाग्यावर येथेच मान्य करतो की<<< हे त्राग्याने म्हणत नाही आहात. खरंतर मान्य करायलाच हवं असंही नाही.
नवीन माहिती समजून घेण्याबद्दल जो मोकळेपणा तुम्ही दाखवलात तो शिकण्यासारखा आहे.

- व्हेन रबर मीट्स द रोड..
<<
राज,
तुम्ही भारतातले रस्ते पाहिलेले दिसत नाहियेत. रबरावर ओव्हरलोड करून ट्रका चालवल्या की रोड ची कशी वाट लागते ते पहाच जरा एकदा. बठ्ठ्या म्हनी इसरी जाशात तुम्ही Wink

स्वाती +१

सुलु Happy

सुलुशेठ, तुम्ही स्वतःची "प्यांट" सांभाळुन चर्चेत भाग घेतल्याबद्धल आभारी. सगळ्यांच्या मतांचा आदर, पण हिच मतं प्रत्यक्षात उतरावीत, आचरणात यावीत यासाठी शुभेच्छा - व्हेन रबर मीट्स द रोड...>>>>>>> Lol
Well said राज! But Sulu, please don't forget its someone else's rubber we're talking about here. Wink
Good Bye and Good Luck! Happy

प्रतिसादक,
समलैंगिक संबंध आणि अनैतिक संबंध या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत हे लक्षात घ्यायला हवं. त्यावर युक्तीवाद करणारे योग्य युक्तीवाद करतीलच. न्यायालयात कोणत्याही गोष्टीचा स्वार्थासाठी दुरुपयोग होऊ शकतोच. तो कुणालाही तोवर थांबवता येणार नाही जोवर अशा व्यक्ती स्वतःला आवर घालत नाही.
हे बिहेवियर डिसऑर्डर स्वरुपात मान्य करावं हे जरा झेपत नाही. सरसकट डिसऑर्डरच्या व्याखेत हा विषय बसवता येणार नाही अस माझ मत आहे.
मी धाग्यावर येथेच मान्य करतो की शास्त्रीय आधारावर सद्द्यस्थितीत समलैंगिकता नैसर्गिक आहे आणि माणूसकीच्या आणि समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने समलैंगिकाना समाजात सामावून घेतले पाहिजे आणि बाकीना जे-जे हक्क आहेत ते सर्व ( लग्न, कायदेशीर हक्क, मुले) मिळायला हवेत.
'सुलू' यांच्या या विधानानंतर या विषयावर अजून काही बोलायला हवं असं मला वाटत नाही. Happy

अवांतर निरिक्षण आणि वैयक्तिक मतः

या गदारोळात एक बाब पुन्हा एकदा अचंबित (रादर खटकली) करून गेली. समलींगींच्या समर्थनार्थ मतं मांडणार्‍या उदारमतवाद्यांनी "लीव देम अलोन" (समलिंगींना) चा नारा लावला होता. तीच भूमिका अलिकडच्याच श्रद्धेसंबंधीत धाग्यावर आढळून आली नाही. झाडून सगळे प्रतिसादलोलुप बाई-बुवा विरोधकांच्या अकलेचे दिवाळे काढण्यात मग्न होते. तेंव्हा "लीव देम अलोन" बासनात गुंडाळलेलं होतं. समलिंगी आणि श्रद्धाळू सारखेच निरुपद्रवी आहेत/असावेत; या अनुषंगाने प्रस्थापितांच्या विचार प्रक्रियेत एकसूत्रीपणा अपेक्षित होता. तो जर आणला तर यापुढील सगळ्या चर्चा प्रगल्भ होण्याची शक्यता वाढेल. Happy

मी धाग्यावर येथेच मान्य करतो की शास्त्रीय आधारावर सद्द्यस्थितीत समलैंगिकता नैसर्गिक आहे आणि माणूसकीच्या आणि समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने समलैंगिकाना समाजात सामावून घेतले पाहिजे आणि बाकीना जे-जे हक्क आहेत ते सर्व ( लग्न, कायदेशीर हक्क, मुले) मिळायला हवेत.
'सुलू' यांच्या या विधानानंतर या विषयावर अजून काही बोलायला हवं असं मला वाटत नाही. >>>>>

का ? सुलु म्हण़जे परमेश्वर आहेत का ?

बाकि या त्रिखंडात पहिले जे कोणी नर आणी मादि जन्माला आले ( जीवस्रुष्टितील जो कोण पहिला प्राणी असेल) ते जर समलिंगी असते तर काय झाले असते याचा विचार समलिंगी संबध नैसर्गिक आहे हे म्हणणार्या लोकांनी करावा! Biggrin

Photosynthesis arose and oxygen began accumulating in the atmosphere about 3 billion years ago. A type of organism known as cyanobacteria evolved some 3 billion years ago. Cyanobacteria are capable of photosynthesis, a process by which energy from the sun is used to convert carbon dioxide into organic compounds—they could make their own food. A byproduct of photosynthesis is oxygen and as cyanobacteria persisted, oxygen accumulated in the atmosphere.

Sexual reproduction evolved about 1.2 billion years ago, initiating a rapid increase in the pace of evolution. Sexual reproduction, or sex, is a method of reproduction that combines and mixes traits from two parent organisms in order to give rise to an offspring organism. Offspring inherit traits from both parents. This means that sex results in the creation of genetic variation and thus offers living things a way to change over time—it provides a means of biological evolution.

राज,
इथे अवांतर आहे. पण श्रद्धे च्या नावाखाली ४-२ हजार वर्षे लुटून झालय. तेव्हा वी कान्ट लीव्ह इट अलोन.

इब्लिस, बुवांबद्धल मी बोलत नाहि; त्यांना विरोध करायलाच हवा. पण जे स्वतःच्या विचाराने, श्रद्धा जपतात, त्यांच्या विषयी मी बोलतो आहे... इफ दे डोंट गेट इट, लीव देम अलोन...

This means that sex results in the creation of genetic variation and thus offers living things a way to change over time—it provides a means of biological evolution.>>>> १००
भारतीय, कशाला यांच्या नादात पडताय? खुद्द डार्विन जरी इथे आला तरी इब्लिस त्याचा ब्रेनवॉश करत बसेल. असो. तुमच्याकडून समलैगिकतेची शपथ घेतल्याशिवाय ही मंडळी तुम्हाला सोडणार नाहीत. Proud

<< फाटा. marawa ase mhantay kaa? >>
देअर यु गो...

तुमचा कॉपीराइट आहे म्हणुन वापरला नाहि तो शब्द

भारतीय +१०१
सुलू यांनी मान्य केले म्हणजे सर्वांनी केले असा अर्थ होत नाही.

माझा या गोष्टीला कायम विरोध राहील. जर दुर्दैवाने माझ्या अगदी जवळच्या कोणाच्या बाबतीत असे घडले तरी देखील.

या चर्चेच्या निमित्ताने एक प्रश्न पडला आहे, त्याचा काही वेळा ओझरता उल्लेख देखील झाला होता.
येथे जे लोक या असल्या प्रकारांना सपोर्ट करत आहेत त्यांनी कृपया उत्तर द्यावे (आग्रह नाहीये)
समलैंगिकता मान्य आहे तर बहुपत्नित्व / बहुपतित्व का मान्य नाही ???
समजा एखाद्याला किंवा एखादीला एक पत्नी/पती असताना दुसरा विवाह करावासा वाटला आणि याला त्या तिघांचीही सम्मती असेल तर असे करणे योग्य / नॉर्मल / नैसर्गिक / कायदेशीर आहे की नाही ?
(मुस्लिम धर्माव्यतिरिक्त इतर सर्व धर्मांसाठी कायदा आणि समाजमान्यता काय आहे ? आणि तशी का आहे ?)

सायबोर्ग,
होटात एक अन पोटात एक याला काय म्हणतात?
डु आयडि म्हणून सोडून देऊ की समझऊन सांघत बसू? विपु वाचा बरं माझी अन तुमची?

इब्लीस, खरंच असल्या फालतूगिरीकडे नका लक्ष देवू. आम्ही रोमातले लोक एकएक शब्द नीट वाचतो व त्यावर offline चर्चा पण करतो. लिहीण्यावर technical बंधन हे एकच कारण आहे चर्चेत भाग न घेण्याचे.

चांगली चर्चा. अशी चर्चा आपण करू शकतोय ही पण एक जमेची बाजू आहे. काही ड्युआयडींनी आता धाग्याची वाट लावायला सुरुवात केलीच आहे तेव्हा थांबावे हे उत्तम.

सुलु यांचे शतशः आभार उत्तम पद्धतीने चर्चा केल्याबद्दल. इथे कुणीच कुणाची मते खोडायला आलेलं नसतं. कोणत्याही विषयाला २ बाजू असतात आणि त्या व्यवस्थितपणे मांडणे महत्त्वाचे असते. शेवटी निर्णय स्वतःच घ्यायचा.

समलिंगींना पाठिंबा म्हणजे सारा समाज १००% काही समलिंगी बनत नाही. पूर्वी (खजुराहो लेण्यांच्या काळात)बनला नाही, पुढेही बनणार नाही. पण ती समाजाचा घटक आहे, त्यांना भावना आहेत (माणूस म्हणून) आणि म्हणून काही कायदेशीर हक्क हवे असतील तर ते आपण दिले पाहिजेत. काहीजणांना आदराची भावना ठेवता येणार नाही पण हेटाळणी करु नये.

काही पोस्टींमधे (केदार) काही महत्त्वाचे मुद्दे आले आहेत. मला स्वतःला भारत आणि एकंदरित भारतात सामाजिक बदल स्वीकारण्याची प्रोसेस याविषयी खूप शंका आहेत. कायदा आला की पळवाटा, पळवाटांचा दुरुपयोग इ. इ. होणारच. अमेरिकेत कायदा झाला की त्याची अंमलबजावणी खरंच काटेकोरपणे होते. रस्ते बांधायला मंजूर झालेला पैसा अमेरिकेत रस्त्यावरनं गाडी चालवताना जाणवतो तर भारतात खड्ड्यातून वाट काढताना दिसतो. त्यामुळे समलिंगीच्या बाजूने कायदा जरी झाला तरी त्याचे प्रतिबिंब, त्याची अंमलबजावणी सामाजिक पातळीवर कशी होईल याबद्द्ल मला खूप शंका आहे.

हिडीसपणाचा मुद्दा पण काही अंशी बरोबर आहे - जसे परवाच्या रेप केस नंतर जी आंदोलने झाली त्या गर्दीत मुलींची छेडछाड करणारे असतीलच ना. किंवा आण्णा हजारेंच्या सपोर्ट साठी मोर्चा काढताना त्या मोर्चाच्या परवानगीच्या प्रोसेस मधे चहा-पाणी घेणारे असणारच. तसे समलिंगीच्या मिरवणूकीत थोडाफार हिडीसपणा दिसतो - अमेरिकेत सुद्धा.
पण समलिंगी आहेत म्हणून हिडीस हे बरोबर नाही. हा हिडीसपणा लिंगविरहीत असतो.

या सर्वातून सुवर्णमध्य साधणे खरंच अवघड आहे पण प्रयत्न सुरु झाल्याबद्दल माबो चे आभार. आणि चर्चेत भाग घेणार्‍या सगळ्यांचे आभार.

Pages