समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

मायबाप,

आत्ता कुठे संस्कृती/ समाज आणि कुटुंबियांच्या दबावातुन समलिंगी बाहेर येत आहेत. ( भारतात अजुन वेळ आहे ) धोका आहे किंवा नाही हे काळच ठरवेल. कोणत्याही बदलाचे इस्टीमेटेड परीणाम आणि प्रत्यक्ष यात बरेच वेळा अंतर असते.

एक गोष्ट मात्र समजाऊन घ्यायची आहे ती अशी की समलिंगी आयुष्यभर एकाच जोडीदाराशी प्रामाणिक राहुन ( स्थानिक कायद्यानुसार जिथे कुठे लग्नाला परवानगी मिळाली आहे किंवा सहजीवनाला परवानगी मिळाली आहे ) आनंदाने आयुष्य व्यतीत करतात की कायमच फ्री सेक्स च्या विचारसणीत जोडीदार बदलत रहातात ? याचे प्रमाण काय आहे ?

जे स्त्री -पुरुष अनेक विवाह करतात किंवा विवाहबाह्य संबंध ठेवतात त्यांचे व्यावसायि़क आयुष्य सुध्दा डिस्टर्ब असते असे दिसते. समलिंगी विवाहच जर टिकाऊ नसतील तर त्याचे स्वातंत्र्य हा एक सामाजिक जुगारच ठरावा.

नितिनचंद्र,
विवाहबाह्य संबंध ठेवणारे हेटरो असू शकतात तसेच होमो ही असू शकतात. ज्यांना एकनिष्ठ रहायचे आहे ते रहातात, अगदी लग्नास मान्यता नसूनही एकनिष्ठ रहातात. हेटरो व्यक्तीचा विवाह टिकेल याची खात्री देता येते का? नाही. मग होमोच्या बाबतीत अशा खात्रीची अपेक्षा का करावी. कुठलाही विवाह तुटण्याचे कारण दर वेळी चिटिंगच असते असे नाही आणि विवाह टिकलाय म्हणजे सगळे आलबेल आहे असेही नाही.

समलिंगी व्यक्तींना कायद्याने विवाहाची परवानगी मिळाली की हेटरो व्यक्तीच्या पती/पत्नीला जे संरक्षण, सुविधा, हक्क आहेत त्यांचा लाभ समलिंगी व्यक्तीच्या लग्नाच्या जोडीदारालाही मिळेल/ मिळण्यासाठी प्रयत्न करता येतील.
अमेरीकेत सुप्रिम कोर्टाने समलिंगी विवाह कायदेशीर केल्याने सोशल सिक्युरिटीचे महत्वाचे सेफ्टी नेट समलिंगी जोडीदारांना उपलब्ध झाले.

एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे.

अशा प्रकारचे एकधागीय, एकप्रतिसादीय आयडीज इतर कुठल्याही बाफवर लिहीत का नाहीत ? त्यांचे अण्णा अण्णी माबोवरच असतात काय ? (संदर्भ - राखेचा )

उप्स.. एक धोका च्या जागी एक शंका वाचले आणि दूर करायला म्हणून आलेलो.. पण धोका म्हणाल तर येस्स, सर्व पुरुषांनी एक होत आता आपल्या पुरुषार्थाचे रक्षण करायची वेळ आली आहे Happy

ज्याला उपरोध वळला त्यालाच प्रतिसाद कळला Happy

स्वाती २ खुप खुप अनुमोदन. समलिंगी लोकांना अगदी तलवारीच्या टोकावर उभं केलं जातं हे पाहून आश्चर्य वाटतं मला.

चांगला निर्णय. जर लोकशाहीत लोकांना मनासारखे जगण्याचे स्वातंत्र्य आहे तर मनासारखा जोडीदार निवडायचे स्वातंत्र्य अध्याहृत आहे.

मा. सुप्रीम कोर्टाचा आज महत्त्वपूर्ण निर्णय.. समलिंगी संबंध हा गुन्हा नाही.>> चांगला निर्णय.

चांगला निर्णय. जर लोकशाहीत लोकांना मनासारखे जगण्याचे स्वातंत्र्य आहे तर मनासारखा जोडीदार निवडायचे स्वातंत्र्य अध्याहृत आहे. >> +११११

जर मायबोलित like button उपलब्ध असते तर या post ला खुप likes दिले असते

चांगला निर्णय. जर लोकशाहीत लोकांना मनासारखे जगण्याचे स्वातंत्र्य आहे तर मनासारखा जोडीदार निवडायचे स्वातंत्र्य अध्याहृत आहे. >> +११११

जर मायबोलित like button उपलब्ध असते तर या post ला खुप likes दिले असते
+100000000000000000000000000000000

सुब्रमण्यम स्वामी हे काही वेडीवाकडी विधाने करतात असें माझे मत आहे ते त्यान्च्या खालील विधानाने सिद्ध झाले आहे. ते विधान असे: ''परस्परसंमतीने ठेवलेल्या लैंगिक संबंधांमुळे समाजात वाईट गोष्टींच्या प्रमाणात वाढ होईल. समलैंगिक संबंधामुळे एड्सच्या प्रमाणात वाढ होईल'', असे सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले.

न्यायालयाने नक्कीच काही तरी विचार केला असेल, समलैंगिक संबंध हे नियमित कारण्यामागचे एक तर लोकांना नवीन पर्याय देणे असेल किंव्हा आता तसे पण बऱ्याच अनधिकृत गोष्टी नियमित करण्याच जे चालू आहे त्याचेच पुढे एक्स्टेंशन असेल.. तसे पण आज कालच्या मुलांना सगळे माहित आहे, उद्या ते पालकांना म्हणतील तुम्हाला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे आम्ही काहीही करू..कोर्टाने आम्हाला मान्यता दीली आहे , असा म्हंटल म्हणजे प्रश्न सुटले , सध्या आपल्या समाजात बरेच प्रॉब्लेम चालू आहेत, मुलांचे लग्न ठरत नाहीत कारण मुलींना मुलगा हा वेल सेटल्ड हवा असतो आणि त्यात काही वावगं नाही , त्यामुळे होता काय कि दोन्ही वर्गाचे वय वाढत मग पुढे येणार प्रॉब्लेम्स , अनिश्चितता आणि भांडणे अव्हॉइड करण्यापेक्षा हा पर्याय काय वाईट आहे आणि लोकसंख्याचा भार जर ह्यामुळे थोडा फार कमी झाला तर तेवढाच देशाला हातभार , वेल सेटल्ड होण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर हप्ते भरण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे असे न्यायालयाला पण वाटले असेल , आता हेच बघाना शेतकऱ्याला कोणी मुली देत नाही अशी तर सार्वत्रिक ओरड आहे मग करायचा काय., दुसरी कडे काही लिंगपिसाट प्राण्यांना पण सोडत नाही , हे काही न्यायालयाला बघाविले नसणार ... फक्त एवढाच अपेक्षा आहे कि जे काय करायचे ते बेडरूम मध्ये करा कारण दुसऱ्यांच्या लहान मुलांनी बघितले आणि आम्हाला पण असच करायचा असा हट्ट धरतील. आता हा हट्ट काय पुरवणं एवढा सोपा नाही.. अजून एक कि जसा कावळ्याच्या शापाने गाई मारत नाही तसे १०-२० टक्के समलैंगिक लोकांमुळे हिंदू संस्कृती वगैरे नष्ट होईल असे वाटत नाही. जसा लोकांना आत्ता योगाचा महत्व कळलं तसच नंतरच्या पिढीला अश्या संबांधांचे परिणाम दिसले कि आपोआप जुनी उदहारण देऊन नेहमीची परिस्थिती तयार होईल.

Nmate ,
पहिली गोष्ट, होमोसेक्शुअलिटी ही गोष्ट केवळ शारीरिक संबंध या एकाच कोनातून बघू नका.
शारीरिक संबंधा पलीकडे, GF- BF चे इमोशनल बॉंडिंग असते तसेच बॉंडिंग समलैंगिक जोडीदारांमध्ये दिसून येते.
त्यामुळे लैंगिक भावना शमवण्यासाठी विरुद्धलिंगी व्यक्ती मिळत नाही म्हणून न्यायालयाने ही " सोय" केली वगैरे विचार डोक्यातून काढून टाका.

समलैगिंगता हा "पर्याय" नसतो.
काही अपवादात्मक परिस्थिती मध्ये सेम सेक्स संभोग घडतो, (तुरुंग वगैरे) पण त्याचे स्टँडिंग कायद्याच्या दृष्टीने , काँसेंशुअल असला तर सेक्स सेक्स इंटरकोर्स, आणि बळजबरी केली असली तर बलात्कार हेच असते,
त्याला समलैंगिक जीवन पद्धतीच्या कक्षेत आणू नका

आणि" आत्ता हा निर्णय देऊ, लोकांना भोगायला लागले की समजेल त्यांचे त्यांना " अशा विचारसरणीने आपली न्यायालये काम करत नाहीत हे डोक्यात घट्ट बसवून घ्या.

माझे असे म्हणणे नाही कि न्यायालयाने अशी सोय केली म्हणून हा निर्णय दिला , पण सर्व बाबींचा विचार तर नक्कीच केला असेल , पूर्वी संत लोक सांगत होते समाजव्यवस्तेथल्या चुका , आता लोक कोणाचेच ऐकत नाहीत हे कदाजीत कोर्टाला हि उमगले असणार . प्रश्न हा आहे कि जसे तुम्ही म्हणताय कि काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती असते पण म्हणून संपूर्ण समाजाला तशी परवानगी देणे थोडे जास्त वाटते. आणि जसे तुम्ही म्हणता कि फक्त सेक्स च्या दृष्टिकोनातून बघू नका , तर मग लग्न करण्याची, किंव्हा लिव्ह इन रेलशनशिप ची परवानगी हवी कशाला . दोन मित्र , मैत्रिणी आयुष्यभर भावना, विचार शेअर करतात त्यांना कोणी समलिंगिक म्हणत नाहीत. आपल्याकडे मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी नाते व्यवस्था तयार झाली आहे . पण सत्य हे आहे कि परदेशातील समाज अवस्थे प्रमाणे आपल्याकडे हि ह्या व्यवस्थेला सुरुंग लावला जातोय..

>>>परदेशातील समाज अवस्थे प्रमाणे आपल्याकडे हि ह्या व्यवस्थेला सुरुंग लावला जातोय. >> ओ, परदेशात समाज व्यवस्था काहीही वाईट नाहीये. उगा भारतात असा समज पसरवुन दिला आहे, की आपलं ते सगळं बेस्ट! जगात सगळीकडे लोक आनंदाने जगतायत आणि समस्या आल्याच तर त्यावर मार्ग काढत आहेत.

फक्त एवढाच अपेक्षा आहे कि जे काय करायचे ते बेडरूम मध्ये करा कारण दुसऱ्यांच्या लहान मुलांनी बघितले आणि आम्हाला पण असच करायचा असा हट्ट धरतील. आता हा हट्ट काय पुरवणं एवढा सोपा नाही.
>>>>
अहो न्यायालयाने समलैंगिक संबंध फौजदारी गुन्हा नाही असा निर्णय दिला आहे. याचा अर्थ लोकं उघड्यावर समलैंगिक कामक्रिडा करतील असा तुम्ही कुठून काढला? भिन्नलैंगिक संबंध समाजमान्य होते म्हणून रस्त्यावर करायला परवानगी होती का? आणि समजा सावर्जनिक जागेत केलेच कुणी तरी ते बघून मुलांनासुद्धा समलैंगिक कामक्रिडा करण्याची इच्छा होईल हे तर्कट कुठून आले?

>>>
लोकसंख्याचा भार जर ह्यामुळे थोडा फार कमी झाला तर तेवढाच देशाला हातभार , वेल सेटल्ड होण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर हप्ते भरण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे असे न्यायालयाला पण वाटले असेल ,
>>>
ज्या देशात अनेक दशके समलैंगिक संबंध बेकायदेशीर नाहीत तसेच जिथे समलिंगिक विवाहांना मान्यता आहे तिथे घाउक प्रमाणावर लोकं समलैंगिक संबंध ठेवू लागले आहेत, लोकसंख्या वाढीचा दर या कारणामुळे कमी झाला आहे याची काही आकडेवारी तुमच्याकडे आहे का?
नेदरलँड जगातल्या सुरुवातीच्या काही देशांपैकी एक आहे जिथे अश्या लग्नांना, संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली. तुम्ही कधी गेलात तर बहुसंख्य जनता भिन्नलैंगिक विवाह/संबंध ठेवणारीच दिसेल.

काळजी करू नका. समाजाचे काहिही नुकसान होणार नाही. लैंगिक बाबींचा बाऊ करून आपल्या / आपल्या आई-वडिल-आजी-आजोबांच्या पिढ्यांनी जितके समाजाचे नुकसान करून ठेवले आहे त्याची काळजी करा त्यापेक्षा.

Pages