समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

आपला लेख तुफान विनोदी असला तरी प्रचंड अस्वस्थ करणारा आहे.

१. समलैंगिकता ही विकृती नाही.
२. <समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त.<>

या रोगांचा प्रसार भिन्नलिंगी संबंधांमुळेही होतोच.

३. <<तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक<<>>

कृपया हा दुवा बघा - en.wikipedia.org/wiki/Homosexual_behavior_in_animals

४. रेव्ह पार्ट्या आणि समलैंगिकता यांचा संबंध अजिबातच कळला नाही.

५. <<समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय?<<>>

कारण समाजाची चौकट स्वतःच ठरवून ताशेरे ओढणारे, माणसाला माणूस म्हणून जगू न देणारेच जास्त असतात. हा लेखही त्याचंच द्योतक आहे.

चिनूक्साने वर लिहिलेव्ल्या मुद्द्यांव्यतिरिक्त-

प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल >>>
समलिंगी संबंध सुरू झाले, म्हणून बटण बंद केल्यासारखी प्रजनन बंद होईल, असे समजणे म्हणजे झापडे लावून फिरल्यासारखे आहे. हे संबंध न्यायालयाने कायदेशीर ठरविण्याच्या आधी अस्तित्वात नव्हते, असे आपणांस म्हणायचे आहे का? ते उघड उघड किंवा चार-भिंतींआड चालूच होते, शेकडो वर्षांपासून. त्यामुळे प्रजोत्पादनाला कुठे काय धोका उत्पन्न झाला? बायकांच्या गर्भपातांत, मुलींचे गर्भ असल्याचे बघून काढून टाकण्यात नाही अनैसर्गिकता / निसर्गाच्या विरुद्ध जाणे? भिन्नलिंगी संबंधातही नसतात का विकृती, गुन्हेगारी? की भिन्नलिंगी संबंधांत काहीही घडले, तरी समाजाला मान्यच असते?

या मुद्द्याला स्लार्टीने अतिशय मुद्देसूद उत्तर दिलेले आहे.. कुठे, ते आठवत नाही.

---
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला..!

स्लार्ट्याने माझ्या विपुत लिहिलेला हा संदेश. 'सकाळ'मध्ये एक लेख आला होता. वर जो लेख आहे, साधारण त्याच आशयाचा. त्यावर त्याने हे लिहिले होते -

मुळात 'अनैसर्गिक, अनैसर्गिक' हे जे टुमणे लावले आहे ते ठरवायचे कसे ? आपण उत्क्रांत होताना 'सेक्स = प्रजोत्पादन' हे समीकरण जेव्हा खोटे झाले, तेव्हाच 'नैसर्गिक सेक्स' ची व्याख्या उलटीपालटी झाली. जर प्रत्येक संभोगक्रियेतून प्रजोत्पादन होतच नाही, तर ती क्रिया कोणात होत आहे याने काय फरक पडतो ?!! म्हणजे 'अनैसर्गिक' हा मुद्दा मूलतःच तकलादू आहे.

आता समलिंगी संबंध अनैसर्गिक हे अनैसर्गिक ठरू शकतात, तेव्हाच जेव्हा संपूर्ण मानव प्रजातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. म्हणजे प्रजोत्पादनच जर पुरेसे झाले नाही तर. पण गंमत अशी की हजारो वर्षांपासून सर्व समाजांमध्ये हे संबंध अस्तित्वात आहेत, तरीही अपुर्‍या प्रजोत्पादनामुळे मानवजातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला नाही... अन् सर्वात खोचक बाब ही की आता बहुतांशी लोक समलिंगीसंबंध असणारी झाली, तरीसुद्धा काहीच फरक पडत नाही, कारण गर्भधारणेचे प्रगत तंत्रज्ञान ! या तंत्रज्ञानामुळे 'भिन्नलिंगी संभोगक्रिया' ही एका अर्थी 'अनावश्यक' झाली आहे. एका अर्थी म्हणजे प्रजोत्पादन या संदर्भात. मग अनैसर्गिक काय ? असे संबंध ? की असे संबंध ठेवावे असे वाटत असताना ती समजून न घेता ती मारून, दाबून टाकणे हे ? आणि असे दाबल्याने त्या व्यक्तीच्या मानसिक व शारिरीक स्वास्थ्यावर काय परिणाम होणार आहे त्याचे काय ?

समलिंगीसंबंधाविषयी हा भयगंड का ? हेच कळत नाहीये. माणसे एकमेकांना 'प्रजोत्पादना'ची सक्ती करत नाहीत. ते चालते. ते अनैसर्गिक नाही. पण 'हे' मात्र अनैसर्गिक ठरते. यातील अत्यंत उद्वेगजनक विसंगती कोणाच्याच कशी लक्षात येत नाही ?

बाकी संस्कृतीला धोका वगैरे मुद्दे तर... मी म्हणतो, जी संस्कृती माणसांच्या केवळ लैंगिक आवडीनिवडींनी ठरते/पक्की होते/कच्ची होते/ढासळते, तिने स्वतःचे पुनर्मूल्यमापन करायलाच पाहिजे.

...

वरील प्रतिक्रियांना अनुमोदन.
मनोज, तुम्हाला खरच असं वाटतं का 'किल्ली' मारलीत?
काही का असेना, लेखामुळे नाहीतरी प्रतिक्रिया वाचुन तरी लोकांचे गैरसमज दूर होतील. धन्यवाद! Light 1

सर्व मनुष्यजातीच्या प्रजोत्पादनाला धोका तसेच समलिंगी संबंधामुळे एड्स सारखे रोग पसरतील यासारख्या बिनबुडाच्या गोष्टी म्हणजे समलिंगी संबंधांबद्दल असणार्‍या अज्ञानीपणाचा कळसच म्हणले पाहीजे !

ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. >> हे वाक्य मात्र काही अंशी पटले.

सेक्शन ३७७ बद्दल याहू अ‍ॅन्सरमधले हे ओपिनीयन अवश्य वाचावे. खासकरून शेवटचा परिच्छेद !

I personally believe that homosexuals have been the victims of social discrimination for too long. Human beings they are, not animals to be hunted down. I also know that homosexuality can contribute its own share of problems to the society but it certainly doesnt mean that they shouldnt be treated like human beings. Look, they should be allowed to lead a respectful life until they keep their actions private. There is no need to make such discriminatory laws.

Its a pretty simple equation, A drunkard has an option of not drinking before driving but does a homosexual really have options? If he/she does go for surgical proceddures then dont you think they'll compromise their being? As a responsible citizen of any country, dont you think we need to help the weak?

Decriminalizing homosexuality certainly shouldnt mean that they start converting people. Government needs to spread awareness amongst their community to keep their actions private.

It has been proven that people who take extreme stance against homsexuality are actually victims of secret homosexuality. They are afraid to come out in open. Its time to visit the doc

______________________________________________
- प्रकाश

मुळात एखाद्याने आपल्या शय्यागृहात काय करावं, हा अतिशय खाजगी मुद्दा असतो. <> हे वाक्य मला अतिशय विनोदी वाटलं. पुण्यात, मुंबईत, भारतात रस्त्यावर काही प्रकार होतात, असं काहीसं म्हणणं आहे का?

आपला समाज अतिशय xenophobic आहे. आणि त्यामुळे धर्म, लैंगिकता या गोष्टींचं अवडंबर माजवलं जातं.

>

हेही नाही कळलं. समलिंगी संबंध ठेवणारे weak असतात, असं काही मला कधी आढळलेलं नाही. माझे काही मित्र समलैंगिक आहेत. अतिशय बुद्धिमान आणि creative आहेत.

<ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. >> हे वाक्य मात्र काही अंशी पटले.
<>>
कशावरून? हे सिद्ध करायला काही आकडेवारी आहे का?

माझ्यामते,
मूळ मुद्दा असा आहे की, अमुकतमुक व्यक्ती समलिन्गी सम्बन्ध ठेवते आहे असे धरुन चालून तिस अटक करण्याचे अधिकार पोलिसान्ना असावेत की नसावेत
जर त्या दोन नाबालिग व्यक्ति स्वेच्छेने, खाजगी जागेत, तसे सम्बन्ध ठेवत असतील तर त्यास कायदा अटकाव करत नाही, ३७७ कलम हेच सान्गते.
मात्र, अर्थातच, फसवुन वा जबरदस्तिने ठेवलेले सम्बन्ध, अवयस्क व्यक्तिन्चे सम्बन्ध अग्राह्य धरले गेले आहेत
कायदा वा घटनेची चौकट, सामाजिक दृष्ट्या काय योग्य वा अयोग्य हे ठरविण्याची नसावी, तर जे प्रत्यक्षात घडते, तसे ते घडल्यास त्यावर काय कृती व्हायला पाहिजे याबाबत मार्गदर्शन करण्याचि भुमिका कायद्याची असावी. अन्यथा, कायद्याच्या प्रत्येक पुस्तकास धर्मग्रन्थान्चे स्वरुप येऊ शकते. यामुळेच, समलिन्गी सम्बन्ध हे देखिल एक "नैसर्गिक" भावनाविष्कारातील कृत्य समजुन, पण ते प्रचलित समाजव्यवस्थेत "ऑड" असल्याने, तसेच दीर्घकालात प्रचलित व्यवस्थेतील कुटुम्बव्यवस्था उद्धस्त करू शकणारे असल्याने, असे कृत्य घडल्याचे आढळून आल्यास काय नि कसे वागावे याचे कायद्यात विवेचन आहे, असे मला वाटते.
मात्र, एकदा का कायद्याच्या मर्यादा नि चौकट जर सुनिश्चित असेल, तर समाजधुरीण्/समाजसुधारक व विशिष्ट कुटुम्बव्यवस्थेवर विश्वास असणार्‍या या भरतभू वरील मान्यवर जनान्नी हे असे "होऊच नये" म्हणून कायद्याची मागणी करत बसण्यापेक्षा, असे झाले तर त्याचे दु:ष्परीणाम बाकी लोकान्पुढे माण्डणे अधिक गरजेचे आहे. होते काय की, जे "बिघडले" आहेत असे वाटते ते "सुधारण्यावर", त्यान्ना नेस्तनाबुत करण्यावर सारा भर रहातो, पण जे याव्यतिरिक्त शिल्लक आहेत, ते त्या वाटेला जाऊच नयेत म्हणून काही एक सन्घटीत, व दुसर्‍यान्च्या व्यक्तिस्वातन्त्र्याचा भन्ग न करणारी कृति करण्यात आम्ही सर्वचजण कमी पडतो असे मला वाटते.
विरुद्ध लिन्गीव्यक्तीबद्दल आकर्षण ही बाब नैसर्गिक मानली जाते, साहजिकच आहे.
मात्र, लिन्ग एक, पण त्यातिल वृत्ती जन्मजात भिन्नलिन्गियाप्रमाणे असतील, तर साहजिकच जे आकर्षण निर्माण होईल ते अन्य लोकास समलिन्गी वाटेल यात शन्का नको. पण ही हार्मोन्सद्वारा नियन्त्रित, ज्यावर व्यक्तिचा स्वतःचा य:श्किन्चितही सहभाग नसतो, हे विसरले जाणे म्हणजे अडाणी पणाचेच लक्षण होय!
किम्बहूना, प्रत्येक व्यक्तित नर व मादी यान्चे गुण अस्तित्वात अस्तातच हा सिद्धान्त आहे! शन्कराचे रुप हे त्याचेच द्योतक मानलेले आहे, तर रामास "पूर्ण पुरुष" म्हणताना, मादीदेहाची वैशिष्ट्यान्पैकी स्तनाग्रे नसल्याचे दाखले पुराणात आहेत.
शिखण्डी, सहा महिने पुरुष व सहा महिने स्त्री असायची, जिच्या/ज्याच्या मागे लपुन अर्जुनाने भीष्माचार्यान्चा (द्रोणाचार्यान्चा नव्हे - हे सुधारले) वध केला, यातिल शिखण्डीचे (कसल्याका शापामुळे असेना, काय घेण हे? तथ्याच बघा! Proud ) ठराविक कालखन्डात लिन्गबदलाचे उदाहरण देखिल या गोष्टिन्चे अस्तित्व वा याची कल्पना/जाण पुराणकाली देखिल असल्याचेच दाखविते.
तेव्हा "समलिन्गी सम्बन्ध" असले म्हणजे काही एक जगावेगळा गुन्हा घडला असे मानणे चूकीचे आहे.
सध्याचा कायदा हे समजण्यायेवढा सक्षम आहे, म्हणूनच तो असे सम्बन्ध नाकारत नाही

मात्र, याच कायद्यान्द्वारे, जसे देवदासीची प्रथा इन्ग्रजान्नी मोडून काढायला लावली तसेच, मध्यप्रदेश व अन्य भागात सुरू असणारे "हिजडे" बनवायचे कारखाने कठोर पावले उचलुन बन्द पाडले पाहिजेत हे देखिल तितकेच खरे! कारण नैसर्गिकदृष्या खरेच हिजडा असणे, व केवळ उपजिविकेसाठी जसे लहान मुलान्ना अपन्ग करुन भिकेला लावतात तसे हिजडे बनविणे हा अघोरी प्रकार आहे, व तो थाम्बलाच पाहिजे. वरील समलिन्गी सम्बन्धाबाबतही विरोध करायचा तर अशा प्रकारच्या जबरदस्ती/फसवणूकीला व्हायला हवा.
अर्थात हे व्हायला हवे ते व्हायला हवे हे झाले माझे मत!
प्रत्यक्षात आम्ही कोणत्याही शहरातल्या बावनखण्या (वेश्यावस्ती) बन्द करु शकलो नाहीतच, पण किमान त्यात फसवुन आणल्या गेलेल्या तरुणीन्ची भरही रोखू शकलो नाहीहोत! वर अशा वस्त्या असणे म्हणजे "कुलिन" स्त्रियान्च्या अब्रुरक्षणाची खात्री अशी शेखी मिरवणारेही याच समाजात थोडे थोडके नाहीत. किम्बहूना, आधुनिकतेचा फायदा उचलत "कॉलगर्ल्स्ची" फौज उभारणारे नरपुन्गवही कमी नाहीत.

तेव्हा, जर जे जे गैर वाटत असेल, त्यावर दरवेळेसच कायद्याबाबत शन्का घेऊन, वा केवळ त्यासच विरोध करत रहाण्यापेक्षा, आपल्या सन्स्क्रुतीचे जे मूळ कुटुम्बव्यवस्था, तिवर, म्हणजेच स्वतःच्या कुटुम्बावर अधिक लक्ष केन्द्रीत करुन योग्य ते सन्स्कार, सावधगिरीच्या सुचना, प्रबोधन वगैरे आपल्या अपत्यान्वर योग्य वयात केले असता, असल्या बाह्य आक्रमणान्ची फिकीर करण्याची गरज रहात नाही!. मग ही आक्रमणे टीव्ही वरुन सच का सामना वगैरे मार्फत असतील वा प्रत्यक्ष रस्त्यावर दिसत असतील.
आजवरच्या हिन्दुस्थानच्या जनजीवनाने हेच अन्गिकारले आहे, व हेच अन्गिकारत रहाणे शहाणपणाचे ठरणार आहे. ते तसे आहे म्हणूनच परवा परवा भारतात आलेल्या क्लिन्टन म्याडमला देखिल बोलुन दाखवावे लागले की भारतात अजुनही कुटुम्बव्यवस्था आहे ही जमेची बाजू आहे!
अन माझ्या मते ती येवढी तकलादू नाही!
३७७ कलम व न्यायालयाचा निकाल वगैरे बाबी मिडीयाने विनाकारण तापवत ठेवल्या आहेत असे माझे मत आहे.

न्यायालयाने समलिंगी संबंध मान्य करून एका प्रकारे भावी समाजावर उपकार केले आहेत. सध्या ज्या वेगाने मुलीचा गर्भ पडून टाकला जात आहे किंवा मुला/मुलींचे प्रमाण बदलत आहे, ते पाहता भविष्यात असे जास्त प्रमाणात घडेल. अर्थात, यात कितपत नैसर्गिक भावना आणि किती मनापासून सहभाग असेल माहित नाही. रेव पार्टी मध्ये जे काही घडते त्यात सामान्य मुला/ली चा सहभाग जास्त असतो. त्यामुळे खूप विचार करून या विषयावर मत प्रदर्शन करणे आवश्यक आहे.

मनोज जी, तुम्ही सगळे वाईट परिणाम सांगितले. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.
जर समलिंगी संबंध हे स्वेच्छेने स्विकारलेले असतील तर या निर्णयामुळे होणारे फायदे -
१. एक व्यक्ती म्हणून ताठ मानेन जगता येण
२. समलिंगी असण म्हणजे गुन्हा नाही. तो आपल्या भावनांचा स्वत:ने केलेला आदर आहे
३. जेव्हा आपण या सर्वांना आपल्यातलाच एक माणूस म्हणून ओळखू, तेव्हा ते स्वत: न घाबरता सांगतील ते समलिंगी आहेत. यामुळे घरातल्या आग्रहाखातर लग्न करून दोघांचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचेल.

असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. >> एसटीडी नैसर्गिक संबधा मुळे आटोक्यात आहे? किती लोक माहित असून सुद्धा precautions घेतात? स्वत:चे एसटीडी पासून संरक्षण करणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. त्याचा समलिंगी आणि भिन्नलिंगी असण्याचा काहिही संबंध नाही.

निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. >>> मग आपली लोकसंख्या आटोक्यात येइल. Happy जर समलिंगी जोडप्याला मुल हवे असेल तर ते दत्तक घेण्याचा विचार करतील. (आता हा पुढचा मुद्दा झाला की किती संस्था त्यांना मुल दत्तक देइल.) And they also have a choice of surrogate mother. हा निर्णय न्यायालयाने दिला याचा अर्थ असा नाही सगळेच लोग समलिंगी बनतील आणि प्रजनन खुंटेल.

जरा थोडी वेगळी गोष्ट झाली की पाश्चत्य लोकांच्य संस्कृती वर ढकलून द्यायची आणि आमची संस्कृती कशी बुडत आहे याचा ढोल पिटायचा. आपण हा विचार का नाही करत की या गोष्टी एकदम कश्या सुरु झाल्या? म्हणजे त्या आधीपासून होत्या, फक्त बाहेर यायला वेळ लागला.

ह्या विषयाचा एवढा बाउ करण्याची गरज वाटत नाहीये .
आपण समाजात अशी किती तरी उदाहरणं बघतो की , "लग्नानंतर काही दिवसातच मुलगी आत्महत्या करते, आणि मग कुजबुज सुरु होते की मुलामधे पुरुषत्व नव्हतं".
अशी मुलं समाजाच्या भितीने / नाइलाजाने लग्न करतात आणि ह्या त्यांच्या चुकीने एका मुलीचा जीव जातो , मुलाच जगणं अशक्य होतं, व दोन परिवारांवर दु:खाचा डोंगर कोसळतो .
हे निसर्गाला धरुन नाही .........
पण त्यांनासुध्दा जगण्याचा अधिकार आहे.........

> प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठित होऊन जाईल

लोकांनी सन्यास घेणाने जशी होते तशी?

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

अस्चिग, अगदी नेमकं बोललात!
बाकी ही चर्चा कायद्याने सर्वांनाच समलिंगी संबंध सक्तीचे केल्यागत का चालली आहे? Happy

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

>> बाकी ही चर्चा कायद्याने सर्वांनाच समलिंगी संबंध सक्तीचे केल्यागत का चालली आहे?
नेमका हाच मुद्दा न समजल्याने! Happy

बाकी ही चर्चा कायद्याने सर्वांनाच समलिंगी संबंध सक्तीचे केल्यागत का चालली आहे?<<
अगं हीच चर्चा नाही. सगळीकडच्या सगळ्याच चर्चा या गृहितकावर दिसतात.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

chinoox , limbutimbu आणि suprabhat ,
मी तुमच्याशी सहमत आहे. 'वेगलं' असणं म्हणजे 'विकृत' असणं मानलं जाऊ नये.
बापू करंदीकर

माझ्या वरील पोस्ट मधे आताच सुचलेली भर अजुन घालावीशी वाटते
मूळात कायद्यास (कायदेपन्डितास) समलिन्गी सम्बन्धान्ची दखलच का घ्यावी लागली, जशी ती घेतली गेली आहे ३७७ मधे याचे कारण बघता असे दिसते की "स्त्रीवर पुरुषाने केलेल्या बलात्काराची व्याख्या" होऊ शकते, व त्याबाबतचे कायदे आहेत, पण समलिन्गी "जबरदस्ती" झाल्यास्/होत असल्यास कायद्यामधे त्याबाबतही अटकावाची सुविधा असावी (व केवळ दुसरी व्यक्ती बिन्नलिन्गी नाही म्हणून बलात्कार झालाच नाही अशा बचावास वाव मिळू नये) म्हणून, प्रौढवय्/परस्परसम्मती नसताना वा बालवयात असताना होऊ शकणार्‍या/झालेल्या समलिन्गी सम्बन्धास अग्राह्य धरुन त्यावर पोलिस कारवाईची तरतुद आहे!

चिनूक्सला पुर्ण अनुमोदन.
आपल्या समाजात असणारी प्रत्येक 'तथाकथित' वाईट गोष्ट ही 'पाश्चात्य देशांचे अनुकरण' असते हे अजब सूत्र वापरून आपण अजून किती दिवस स्वतःचे समाधान करुन घेणार आहोत?
समलैंगिकता हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे,या 'सायन्सच्या भाषेतल्या' भयानक लेखामुळे यावर इथे चर्चा सुरु झाली हे ही नसे थोडके!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

चिनुक्सच्या मुद्द्यांना अनुमोदन.
दुसर्‍याच्या भावनांविषयी टॉलरन्स(नेमका मराठी शब्द आठवत नाही) नसणे हा माझ्या मते खुप महत्वाचा मुद्दा आहे. मला स्वतःला सुद्धा समलिंगी संबंधानबद्दल काही प्रश्न आहेत. पण प्रश्न आहे म्हणुन किंवा बहुतांश लोकं एखादी गोष्ट करत नाहीत म्हणुन ती विकृती आहे असं ठरवणं म्हणजे किती धोकादायक आहे हे आपल्याला लगेच नाही कळत. कोणी दुसरं काय करतं ह्या वर बोट ठेवणे फार सोपं आहे,
उद्या आपल्या मुलांपैकी जर कोणी समलिंगी आहे असं जाहीर केलं तर मग आपण काय करणार याचा विचार काय माहीत किती लोकं करतात. मी स्वतः आधी केला नव्हता.
उद्या आपली पोरं जर समलिंगी निघाली/झाली तर त्यांना आपण विकृत म्हणणार का?

कालबाह्य लेख वाटला. आपली भीती ५० वर्षापूर्वी साधार वाटली असती कारण तेव्हा समलिंगी संबंध आणि त्याचे वैद्यकीय परिणाम, समलिंगी व्यक्तींचे कुटुंब, समलिंगी व्यक्तीवरील बलात्कार, समलिंगी व्यक्तीने अनुभवलेला कौटुंबिक हिंसाचार, समलिंगी व्यक्तींचे डिवोर्स, समलिंगी व्यक्तींना समाजात उपलब्ध संधी, समलिंगी व्यक्तींचे समाजातील योगदान इ इ बद्दल अभ्यास नव्हता. हल्ली अनेक परदेशी विद्यापीठात अशा प्रकारचे अभ्यास झालेले आहेत आणि त्यांचे निष्कर्ष उपलब्ध आहेत.
समलिंगी व्यक्ती परिसरात असतील तर घरांच्या किमती वाढतात हा एकमेव धोका (तोही मी गरीब असल्याने ) मला वाटतो (हलके घ्या...बाकीच्या शास्त्र्दान्यांच्या मते हा फायदा आहे) http://www.theatlanticcities.com/housing/2012/01/do-gay-populations-infl...
आपण लेख अधिक अभ्यासांती लिहिला असता तर वाचकांच्या माहितीत भर टाकणारा झाला असता आणि सर्वांच्या वेळेचा सदुपयोग झाला असता.

<जर त्या दोन नाबालिग व्यक्ति स्वेच्छेने, खाजगी जागेत, तसे सम्बन्ध ठेवत असतील तर त्यास कायदा अटकाव करत नाही, ३७७ कलम हेच सान्गते.>

कलम ३७७चा स्वेच्छेने ठेवलेल्या संबंधाना अटकाव नाही असा अर्थ कसा काय बुवा निघतो?

377. Unnatural offences: Whoever voluntarily has carnal intercourse against the order of nature with any man, woman or animal, shall be punished with imprisonment for life, or with imprisonment of either description for term which may extend to ten years, and shall also be liable to fine. Explanation: Penetration is sufficient to constitute the carnal intercourse necessary to the offense described in this section.[1][2]

भारतात समलैंगिकता हा ३७७ खाली गुन्हाच आहे... पोलिस दोघांवरही केस दाखल करु शकतात.

पण दिल्ली की कोणत्यातरी हाय कोर्टाने एका केसमध्ये दोघानाही निर्दोष सोडले आहे. आणि हा नियम कालबाह्य असून त्यात बदल करावेत अशी सरकारला शिफारस केली आहे. ( असे अधिकार हायकोर्टाला व सुप्रिम कोर्टाला असतात. )

पण जोवर कायद्यात बदल होत नाहीत, तोवर तरी हा गुन्हाच मानला जाईल.

समलैंगिकता ही पाश्चात्यांपासून आले, हे पहिले वाक्य वाचून मात्र अगदी ------ धरून ( पोट धरुन ) हसावेसे वाटले....

भारतातील लोक स्त्रीयांबरोबर फिरत असतात. मग गोरे लोक येऊन कानात सांगतात .. अरे बाई कशाला? बुवाच बघ.. मग भारतीय लोक त्य बायकाना सोडून पुरुष शोधत फिरायला लागतात... असे स्वप्नदृष्य तरळून गेले... Proud

I am really not agree to this subject line here, its just not my opinion,
but I have seen such people. Only different thing here is, they is not attracted to opposite sex,
Hi 'Vikruti' nahi.. as per my knowledge, this is harmonic tendency.
We think that opposite sex should get attracted to each other, this also happens due to certain harmonic tendency.
If this tendency is little bit changed in some people, its not their falult.
Var ‘Shri’ yanni mhatalyapramane:
आपण समाजात अशी किती तरी उदाहरणं बघतो की , "लग्नानंतर काही दिवसातच मुलगी आत्महत्या करते, आणि मग कुजबुज सुरु होते की मुलामधे पुरुषत्व नव्हतं".
अशी मुलं समाजाच्या भितीने / नाइलाजाने लग्न करतात आणि ह्या त्यांच्या चुकीने एका मुलीचा जीव जातो , मुलाच जगणं अशक्य होतं, व दोन परिवारांवर दु:खाचा डोंगर कोसळतो .
Its very true, you cant force anybody against their sexuality.
I may be wrong here, but giving statement as ‘यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो.’ is Insane.

<पण दिल्ली की कोणत्यातरी हाय कोर्टाने एका केसमध्ये दोघानाही निर्दोष सोडले आहे. आणि हा नियम कालबाह्य असून त्यात बदल करावेत अशी सरकारला शिफारस केली आहे. >
नाझ फाउंडेशनने कलम ३७७ रद्दबातल करावे यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात पीआयएल दाखल केली होती. त्यावर ते कलम रद्द करण्याचा नकार आला.

मुळात कलम ३७७ खाली दोन सज्ञान व्यक्तींवर खटला भरल्याचे उदाहरण स्वतंत्र भारतात नाही.
http://infochangeindia.org/human-rights/analysis/big-brother-in-the-bedr...
Despite the widespread fear that the repeal of Section 377 will unleash the floodgates of rampant homosexual activity, out of the 46 cases filed under Section 377 studied by Alok Gupta and Lawyers Collective, only six prosecute male-male adult anal intercourse. And only one of them prosecuted consenting adults. This was decided in 1935, DP Minwalla v Emperor, AIR 1935 Sind 78. Moreover, three of these six cases were spread over ten decades and the other half just in the 1990s. This trend in the last decade indicates the increased enforcement of the law, indicating clearly that Section 377 is anything but a dead law. While in the recent past, the law has almost never been used to prosecute consensual adult homosexual sex, illustrating the redundancy of criminalising consensual homosexual acts, the law has undoubtedly been used to harass, intimidate and extort money and sexual favours from vulnerable sexual minorities like male sex workers, hijras and transgendered people.

हा लेख एकदम वर आला प्रतिसादामुळे. सगळी मतं वाचून थक्क व्हायला झालंय. कशाला नैसर्गिक म्हणायचं, कशाला नाही, acceptance acceptance म्हणजे कुठपर्यंत acceptance दाखवायचा का सब्-कुछ पैलेसे ही हो रहा था आगे भी होगा उसमे कुच प्रोब्लेम नही यार! म्हणत जगायंचं.. कळतच नाहीये.

पुढच्या पीढीची खरोखरी चिंता वाटते आहे. गुरा-ढोरांशी माणसाचा संभोग पूर्वी होत होता आता ही होईल यात अनैसर्गिक काही नाही असं म्हणायचं मग! नाती-गोती, लिंग न मानता वाट्टेल तो/ती वाट्टेल त्याच्याबरोबर संभोग पूर्वी करत होते आताही करतील त्यात अनैसर्गिक काही नाही असेही म्हणा.

आता समलैंगिक विवाह पण होवू लागलेत. उद्या मनुष्य्-डुक्कर, मनुष्य-माकड, मनुष्य-कुत्रा, मनुष्य-गाय्-बैल असे विवाहपण अनैसर्गिक नसतील. आता उगाच मनुष्य्-मनुष्येतर अशा कव्वाल्या कृपा करून ऐकवू नका. कोण जाणे कोणीतरी त्यावरही वैज्ञानिक संशोधन करून ते बरोबर असे दाखवून देईल. मग आई-मुलगा, बाप्-मुलगी, भाऊ-बहिण, काका-पुतण्या, आजी-नातू, मामा-भाची अशी लग्ने देखील कशी बरोबर हेही दाखवून देतील. शेवटी असले संभोग पूर्वी पण होत होते पुढे ही होतील त्यात अनैसर्गिक काहीच नाही असे म्हणा. नाती-गोती म्हणजे मनाचा कोतेपणाच नाही का? द्या झुगारून! काहीही अनैसर्गिक नाही या जगात!

केवळ समलैगिंकाना बहुतांश समाज नीट जगू देत नाही म्हणून समलैंगिकताच नैसर्गिक कशी ?

पशू ->मनुष्य ->बुद्ध्(नुसतं शब्दशः गौतम नव्हे,तर ज्याला ज्ञान झाले आहे असा!) असे evolution व्हायच्या ऐवजी उलटेच होवू लागलेय.

खरोखरीच कमाल आहे. कुठे चुकतोय शिकताना?

कुठे चुकतोय शिकताना? >>> जीवशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राचा अभ्यास कमी पडतोय.

अगो,
<<
कुठे चुकतोय शिकताना? >>> जीवशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राचा अभ्यास कमी पडतोय.
>>
माझे हे वाक्य collectively सगळयाना उद्देशून होते. तुमचा response सगळ्याना उद्देशून असेल अशी अपेक्षा आहे. मला उद्देशून असेल तर आता स्पष्ट सांगा. हरकत नाही आणि वाईट वाटून घेणार नाही. पण नक्की सांगायला तुमची हरकत नसावी.

Pages