समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

बागुलबुवा,
<< तुम्हाला मान्य नाही याव्यतिरीक्त दुसरं कुठलं कारण आहे सुलु समलैंगिक विवाह समाजमान्य न करण्यास ?>>

असं मी ही तुम्हाला विचारू का? त्यापेक्षा मुद्दे लिहिलेत ते खोडणार का?

भारतात, पुण्यात लग्न केलेली कही समलैंगिक जोडपी मला माहीत आहेत. आमच्याच कॉलेजातल्या दोघांनी केलं. पण या लग्नांना कायदेशीर मान्यता नाही. तशी ती मिळायला हवी, ही त्यांची इच्छा आहे.

sulu,
तुमचे बहुतेक सर्व मुद्दे इथल्या चर्चेत लोकांनी खोडले आहेत. 'मला पटत नाही', 'मला मान्य नाही' अशीच तुमची उत्तरं आहेत. तुम्हांला पटत नसेल, मान्य नसेल, तर त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण उत्तरं दिली नाहीत, असं कृपया म्हणू नका. Happy

जरुर. जरा मुद्दे तर दाखवा. मी हा बाफ वाचला त्यात तर दुसरी बाजूच व्यवस्थित मांडलेली आहे की. कुठचा मुद्दा अनुत्तरीत आहे तुमचा ? तेच तर विचारतोय मी.

नंदिनी,
तुम्ही जे लिहिले आहे ते आता paste करत बसत नाही. फक्त इतकेच सांगतो की माझ्या मित्राची सक्खी बहिण आणि माझे २ जवळचे मित्र समलैंगिक आहेत. माझे कित्येक colleagues समलैंगिक आहेत. माझ्या मते इतका ref. पुरावा.

दुसरे असे, की आपल्याला माहीत नसेल तर असे घडलेच नसेल किंवा घडतच नाहीत हा आग्रह मी धरत नाही. तुम्ही ही कृपया धरू नका. - आपल्या आधी च्या पीढीने जे केलेय त्याचे उदाहरण म्हणजे आज तुम्ही-मी या विषयावर इतके उघडपणे बोलू शकतोय. थोडा विचार करा!

बागुलबुवा हे फक्त तुमच्यासाठी परत -

१. मी वाद घालतोय ते फक्त आणि फक्त समलैंगिक विवाह् या संकल्पनेला समाजाने मान्यता द्यावी किंवा नाही याबद्दल. समलैंगिकता, नैसर्गिक्/अनैसर्गिक असते किंवा नसते, बाकी गोष्टी नैसर्गिक असतात किंवा नसतात यावर माझी मतं मी मांडली आहेत आणि अजून तरी ती बदललेली नाहीत.
२. लग्न ही संकल्पना माझ्या मते मालकी हक्क ( हा फक्त माझा नवरा/ ही फक्त माझी बायको) दाखविण्यासाठी समाजात बनली आहे. जिथे पुरुष खूप मरत, लढाया किंवा ईतर कारणांमुळे तिथे एका पुरुषाला जास्ती बायका करायची मुभा त्या त्या धर्माने दिली. त्यात मालकी हक्काबरोबरच स्त्रियांना सुरक्षितता आली. प्रेम, आपल्या साथीदाराची वाटणारी आपुलकी हे अजून दृढ करायला लग्न बनलं नाही. मात्र एक चांगला side effect म्हणून असं झालं असावं. आणि मग त्या वेळच्या समाजाने ही पद्धत स्विकारली असावी.
३. सरत्या काळाबरोबर, कायदे बनले आणि लग्नं ही केवळ स्त्री-पुरुषांची होतात म्हणून तसे 'नैसर्गिक' मानून कायद्यांचे पालन सुरु झाले.
४. सध्या फक्त आणि फक्त स्त्री-पुरुष या संबंधातूनच 'नैसर्गिक' मुलं होतात.
५. समलैंगिक लोकाना समाजात सारखे 'विकृत', वाईट म्हणून झिडकारले जाते. तृतीयपंथीयाना जसे केले जाते तसेच. थोडे त्याहूनही वाईट कारण भारतीय समाजाने over time तृतीय्पंथीयांना समाजाचा घटक मान्य केले आहे. त्याना स्विकारले आहे ( काही अंशीच, पण तरीही!)
६. तृतीयपंथी आणि समलैंगिक यात फरक आहे.
७. भारतात तृतीय्पंथी लग्न करतात. पुरुष आणि स्त्रिया दोघांशी. ते लग्न समाज मान्य करतो की नाही हे मला माहित नाही.
८. तृतीय्पंथी तृतीय्पंथीयांशी लग्न करतात की नाही हे ही मला माहीत नाही. मी ऐकले तरी नाही.
९. तृतीयपंथी couples पाहिली आहेत. एकमेकांवर खूप प्रेम असलेली. मुले वाढवणारी.
१०. समलैंगिकाना समाजाचा acceptance हवाय. सरळ मिळत नसेल तर कायद्याची मदत घेऊन. वर म्हटल्याप्रमाणे कायदा आणि समाज फक्त आणि फक्त स्त्री-पुरुष यालाच 'नैसर्गिक' couple मानतात.
११. केवळ Sexual Orientation वर माणसाना भेद्-भाव करू नये म्हणूनच समलैंगिकता भारतात बेकायदेशीर नाही.
१२. समाजासाठी कायदा बनलाय, कायद्यासाठी समाज नाही.
१३. वरचे सारे मुद्दे नीट वाचलेत आणि माझी आधिची पोस्ट्स वाचली असतील तर माझे अजूनही असे मत आहे की समलैंगिक लोकाना त्याना हवे तसे आयुष्य जगायची मुभा समाजाने आणि कायद्यानेही दिली आहे.
१४. समलैंगिक विवाहाची त्यामुळे गरज नाही. समलैंगिकाना मुलं आता तरी शक्य नाहीत. जे विज्ञानाच्या सहाय्याने मुलं पैदा करतात ती मुलं पूर्ण-पणे त्यांची नसतातच. ( काही भिन्न्-लैंगिकही यात सामिल आहेत म्हणा!)
१५. समलैंगिक विवाह मान्य केले तर incest विवाह मान्य करायला लागतील. ( संतती च्या विकृतींवर counter argument - भिन्न-लैंगिक विवाहामध्ये पण विकृत मुलं जन्मतात). नंतर आंतर्-प्राणी विवाह मान्य करायला लागतील ( सज्ञान या term ला counter argument - विवाह प्रेमासाठी अधिक असतो. प्रेम करायला सज्ञान असायची गरज नाही. आणि प्राणीशात्राप्रमाणे वयं विचारात घेतली तर सगळे प्राणी, एक हत्ती किंवा कासव सोडलं तर सज्ञान सापडतील)
१६. पुढे नको-नको ते problems समाजात यायची शक्यता नाकारता येत नाही. - एकदा का opposite sex ची गरज संपली तर opposite sex संपवायलाही मनुष्य मागे-पुढे पहाणार नाही.

सध्या इथेच थांबतो. हे मुद्दे योग्य रिती ने खोडले जातील अशी अपेक्षा आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे, मत बदलायला तयार आहे जर पटले तर! पण ही अपेक्षा सर्वांकडून.

समलैंगकतेस कायदेशीर / सामाजिक मान्यता . स्विकारार्हता का द्यायची हे समजून घेण्याचा प्रयत्न करताना अनेक संज्ञा समानार्थी वापरल्या गेल्याने गोंधळ उडतोय.

१. नॉर्मल - मेडिकल रिपोर्टमधे नॉर्मल (सामान्य) ही संज्ञा चारचौघांसारखं या अर्थी. शंभर लोकांमधे साधारण ९० टक्केंच्यावर जो ट्रेंड असतो त्याला नॉर्मल म्हणत असावेत. इथले तज्ञ सांगतीलच त्याबाबत. या अर्थाने समलैंगिक लोक नॉर्मल ठरत नाहीत. म्हणूनच त्यांचे सामाजिक जीवन नॉर्मल कसे असू शकेल अशी शंका उपस्थित होते.

२. नैसर्गिक- नैसर्गिक आहे म्हणून मान्यता द्यावी / प्राण्यांचे दाखलेही देणे हे मान्य केले तर नैसर्गिक उर्मी सरळच कायदेशीर कराव्या लागती. विवाहसंस्थेआधी मनुष्य ज्याप्रमाणे जगत होता त्या सर्वच प्रकारच्या नर - मादी संबंधांना कायदेशीर करावे लागेल का ? अशा संस्थेत नात्यांना काय अर्थ राहील. हरियाणा मधे एका काका-पुतणीने केलेल्या लग्नाला विरोध होऊन त्याची परिणती त्यांचा दगडाने ठेचून खून करण्यात झाला हे आठवत असेल. अशा सर्व विवाहांना संमती द्यावी लागेल.

३. कायदेशीर - कायदेशीर दृष्ट्या मान्य असणे आणि दंडनीय अपराध नसणे / अपराध मानला जाऊ नये असा निकाल देणे हे दोन्ही एकच आहे का ?

सरमिसळ होऊ नये म्हणून मत स्वतंत्र पोस्टमधे लिहावंसं वाटतं.

चिनुक्स,
<<
sulu,
तुमचे बहुतेक सर्व मुद्दे इथल्या चर्चेत लोकांनी खोडले आहेत. 'मला पटत नाही', 'मला मान्य नाही' अशीच तुमची उत्तरं आहेत. तुम्हांला पटत नसेल, मान्य नसेल, तर त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण उत्तरं दिली नाहीत, असं कृपया म्हणू नका.
>>
रास्त. मला बरीच उत्तरं पटलेली नाहीत.
मला वाट्टं बाकीच्यांचेही मुद्दे मी खोडलेत.

अहो प्रतिसादक, पण हे जे काही उरले सुरले १०% (धरून चाला) पॉप्युलेशन आहे (समलैंगिक) त्यांचे फक्त सेक्शुअल ओरिएंटेशन वेगळे आहे... बाकी सर्व नॉर्मलच आहे ना? अगदी खाण्यापिण्यापासून? का त्यांना शिंगं आणि शेपूट आहे? Uhoh

दुसरं काका पुतणीचं उदा. हे अजिबात पटत नाही कारण त्यात जैविक भाग कुठेच नाहीये. त्यात माणसाने निर्माण केलेले नियम मोडले म्हणून त्यांना ठेचून मारलंय. तसं तर मग उत्तरेकडं नॉर्मल नर्-मादीनं (योग्य वयातल्या) लग्न केलं तरी जात पंचायतीचे लोक ऑनर किलिंग करतातच. त्यामुळे हे उदा. इथे योग्य वाटत नाही.

कायदेशिर दृष्ट्या मान्य म्हणजेच दंडनिय अपराध नसलेली गोष्ट ना? तशी असलेली गोष्ट कायदा समाजासाठी का मान्य करेल? Uhoh

समलैंगिक असणे म्हणजे निसर्गतः अशा लोकांमधे भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल लैंगिक आकर्षण निर्माण न होणे हा शास्त्रीय आधार आपण मान्य करूयात. चारचौघांसारखं नॉर्मल लैंगिक आयुष्य जगण्यास असमर्थ असणा-या व्यक्ती असा कायद्याच्या दृष्टीने वेगळा अर्थ करता येईल. शारीरिक / मानसिक विकलांग लोकांना ज्याप्रमाणे आपले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तो त्यांना या अर्थाने असला पाहीजे. त्यांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देताना त्याचे समाजावर किंवा इतरांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत याची खात्री करून घेणे आवश्यक वाटते.

तसेच कायद्याने अशा विवाहाला मान्यता दिल्यानंतर त्याचा नॉर्मल लोकांकडून इतर कारणांसाठी दुरूपयोग होणार नाही हे ही पाहणं आवश्यक ठरेल.

>>त्यांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देताना त्याचे समाजावर किंवा इतरांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत याची खात्री करून घेणे आवश्यक वाटते>> प्रतिसादक आता तुम्ही हा मुद्दा मांडलाय म्हणून विचारतेय. तुमच्या मते अशा विवाहांमुळे समाजावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतील, ते प्लिज मज अल्पमतीस सांगाल का?

दक्षिणा
दोन्ही पोस्टस आता वाचा. इथे जे प्रतिवाद झालेत त्या आधाराने आई-मुलगा, वडील -मुलगी अशा सर्वांच्या सेक्शुअल अ‍ॅक्टिव्हिटीजना कायद्याने आडकाठी करता येणार नाही असा अर्थ निघतो. समाजातल्या चालीरिती कुठल्या वाईट कुठल्या चांगल्या हे सापेक्ष आहे. पण इतक्या वर्षांचा अनुभव, त्यातून होणारे फायदे तोटे पाहता विवेकाने निर्णय घेणं अपेक्षित आहे. समलैंगकतेला मान्यता द्यायची झाल्यास कुठल्या आधाराने देणार इतकाच प्रश्न आहे. समजून घ्या..

चार भिंतींच्ञा आतमधे दोन वयस्क व्यक्ती एकमेकांच्या संमतीने लैंगिक संबंध ठेवत असतील तर >>>>

या मुद्याच्या आधारे विवाहबाह्य संबंधापासून सगळेच संबंध कायद्याच्या बाहेर होतील असे नाही का वाटत ? प्राण्यांमधे आई-मुलगा, वडील-मुलगी अशी नाती नसतात. त्यामुळे प्राण्यांमधे आहे म्हणून नैसर्गिक असा दाखला देणे योग्य आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय. चुकत असल्यास दुरूस्त करावे. आभारी राहीन.

याबाबतीत आणखी अभ्यासाची गरज आहे हे मात्र १०० टक्के पटलंय.

<<<<<<<वाळीत टाकणे, हेटाळणी करणे, स्वतःच्याच मुलाला/ मुलीला तोडून टाकणे, एकटे पाडणे>>>>>>>> हे मी म्हणलं नव्हतं. मी फक्त विचारल होतं की त्यांचा निर्णय आई-बाप म्हणुन तुम्ही खुषीने स्वीकारु शकाल का?
त्याचं उत्तर बर्‍याच जणांनी हो असं दिलंय त्याबद्दल आनंदच आहे. तेव्हा वाळीत टाकणे, हेटाळणी करणे, स्वतःच्याच मुलाला/ मुलीला तोडून टाकणे, एकटे पाडणे असे स्वतःचेच शब्द घुसडवुन फाटे फोडु नयेत.

आणि अगो <<<<<<<<हा प्रश्न विचारणार्‍यांना आणि समलैंगिकतेच्या विरोधात असणार्‍यांना विचारावसं वाटतं. जर ( तुमच्या दुर्दैवाने ) तुमची मुलं समलैंगिक असतील तर तुमची प्रतिक्रिया काय असेल ?>>>>>>>>> ह्याच उत्तर मी माझ्याच पोस्टच्या सुरवातीलाच दिलय ते ही वाचा.

नक्की कोणत्या पोस्टचं उत्तर आहे हे?

Uhoh

मलाही हा प्रश्न समजलेला नाही. माझ्या आधीच्या पोस्टमधे या चर्चेतून ज्या शंका उपस्थित होतात त्याबद्दल लिहीलं. दुस-या पोस्टमधे माझं उत्तर लिहीलं. मधे तुमची पोस्ट आलेली लक्षात आली नाही. मग मी कोणत्या पोस्टचं उत्तर देतोय ?

या मुद्याच्या आधारे विवाहबाह्य संबंधापासून सगळेच संबंध कायद्याच्या बाहेर होतील असे नाही का वाटत ? >> हे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार झाला.
बरं एक सांगा, लोक चोरून स्मगलिंग करतात. मग अख्खा समाज पण तेच करतो का? करणारे करतात... बाकिच्यांना माहित असतं पण सगळेच ते करतात ही भिती.. अनाठायी नाही का? Uhoh

त्यांचे फक्त सेक्शुअल ओरिएंटेशन वेगळे आहे... बाकी सर्व नॉर्मलच आहे ना? अगदी खाण्यापिण्यापासून? का त्यांना शिंगं आणि शेपूट आहे? >>

नॉर्मल असणे याचा अर्थ मान्य केलात का ? हार्टबीट नॉर्मल असणे, नसणे... याचा खाण्यापिण्याच्या सवयीशी कसा काय संबंध ? समाजाची नीतीमूल्य लैंगिकतेवर ठरलेली असतील तर सामाजिक दृष्ट्या नॉर्मल नसलेल्यांचं "सामाजिक" जीवन नॉर्मल कसं असेल ही माझी शंका आहे. तुम्हीच समजावून सांगा.

@सुलू: जिथे पुरुष खूप मरत, लढाया किंवा ईतर कारणांमुळे तिथे एका पुरुषाला जास्ती बायका करायची मुभा त्या त्या धर्माने दिली. त्यात मालकी हक्काबरोबरच स्त्रियांना सुरक्षितता आली. >>
ह्या केसमधे एक नवरा लढाईत मेला की अनेक बायकांचा नवरा मेला, पुरुषप्रधान संस्कृती गृहीत धरून त्या बायकांना नंतर किंमत, सुरक्षितता कुठून आली?
ह्याउलट बायकांना जास्त नवरे करता यायला पाहिजेत ना? एक लढाई करताना मेला तर दुसरा असावा म्हणून?

पण तसं नसायचं कारण लग्न ही पुरुषप्रधान संस्कृतीची देणगी आहे.
असो. आता मी विषय जास्त भरकटवत नाही.

माझा आजचा quota संपला मंडळी!
चिनुक्स, पेशवा, बागुलबुवा, सिमन्तीनी, भरत मयेकर, चू.भू.दे.घे.

स्मगलिंग, भ्रष्टाचार हे मुद्दे आणून सरमिसळ होणार नाही असे वाटते का ? समलिंगिक व्यक्ती भ्रष्टाचारी असू शकतील ना ? स्मगलर्स नॉर्मल किंवा समलैंगिक असू शकतील ना ?
मुळात स्मगलिंग किंवा भ्रष्टाचार यांना कायद्याने मान्यता आहे का ? गैरलागू मुद्दे आणले तर ही चर्चा कधीच संपायची नाही. धन्यवाद.

समाजाची नीतीमूल्य लैंगिकतेवर ठरलेली असतील तर सामाजिक दृष्ट्या नॉर्मल नसलेल्यांचं "सामाजिक" जीवन नॉर्मल कसं असेल ही माझी शंका आहे. >> इथेच घोडं पेंड खातंय. समाजाची नितीमूल्य लैंगिकतेवर ठरली आहेत हे कोण म्हणतंय? Uhoh

आणि मी दिलेलं उदा. हे काही गैरलागू नाहिये. जेनेरिक उदा म्हणून पहा त्याच्याकडे नगाला नग लावत बसलात तर कठिण होईल.

हे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार झाला.
बरं एक सांगा, लोक चोरून स्मगलिंग करतात. मग अख्खा समाज पण तेच करतो का? करणारे करतात... बाकिच्यांना माहित असतं पण सगळेच ते करतात ही भिती.. अनाठायी नाही का? >>>

तुम्हाला माझं म्हणणं समजलेलं नाही असं वाटतंय. असो.

<< मला पटले नाही म्हणून सत्याचे असत्य होत नाही आणि तुम्हाला पटले म्हणून असत्याचे सत्य होत नाही! >>

प्रॉब्लेम इकडे आहे. मला पटत नाही म्हणून ते असत्य, हा पॉईन्ट ऑफ व्ह्यूच चूकीचा आहे. मला दुसर्‍यांचे मुद्दे पटताहेत कारण त्या मुद्द्यांना सुसंगत अशी कारणे ते देत आहेत.

नॉर्मल असणे याचा अर्थ मान्य केलात का ? हार्टबीट नॉर्मल असणे, नसणे... याचा खाण्यापिण्याच्या सवयीशी कसा काय संबंध ? समाजाची नीतीमूल्य लैंगिकतेवर ठरलेली असतील तर सामाजिक दृष्ट्या नॉर्मल नसलेल्यांचं "सामाजिक" जीवन नॉर्मल कसं असेल ही माझी शंका आहे. तुम्हीच समजावून सांगा.
>>
पहिली गोष्ट "तुमच्या मते" हे लोक नॉर्मल नाहीत, माझ्या मते हे नॉर्मल आहेत.
'तुमच्या मते' जे कोणी सो कॉल्ड 'नॉर्मल' लोक आहेत, त्यांच्याचसारखे हे लोक खातात पितात... हे उदा दिलंय कारण.. समाज जीवनाचा तो एक आवश्यक भाग आहे. कोण कुणाबरोबर सेक्स करतो आणि का करतो असल्या भोचक चौकश्या लागतात आणि खाण्यापिण्याचं उदा. हे एक परिमाणक म्हणून दिलंय ही साधी गोष्ट कळत नसेल तर धन्य आहे. _/\_

आता एक उदा देते... एखाद्याचा पाय निकामी होतो, तो माणूस तुमच्यासारख्या लोकांच्या मते अ‍ॅबनॉर्मल होतो.. पण आमच्या मते तो नॉर्मलच माणूस आहे, कारण त्याची इनर स्ट्रेन्ग्थ मजबूत आहे. ... सेम अप्लाईज टू होमोज.

Pages