शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या मुली
>>>
माझ्या मते 'ह्या' च्या उच्चारामध्ये हळू हळू 'ह' चा लोप होऊन बोली भाषेत त्याचे 'या' झाले व त्यामुळे मराठी लेखनातही तेच रुळले. पण मला वाटते की 'ह्या' योग्य आहे.

'वादिया मेरा दामन, रास्ते मेरी बाहें....' ह्या गाण्यात दामन चा अर्थ काय? एकुणातच दामन चा अर्थ काय आहे? 'दामन मे दाग लग जाना' इ. वाक्प्रचार हिंदीत असतात. पदर, ओढणी ह्या अर्थी का?

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण एखादा शब्द/मजकूर 'हायलाईट' करतो त्याला काही मराठी प्रतिशब्द देता येईल का?
इथे (http://www.khandbahale.com/englishmarathi-q-highlight.htm?q=highlight) त्यांनी "ठळक करणे" असं दिलंय. पण बोल्डफेस लेटर्सना आपण ठळक अक्षरे असं म्हणतो ना. त्यामुळे हायलाईटलाही तोच शब्द नको आहे.

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण एखादा शब्द/मजकूर 'हायलाईट' करतो त्याला काही मराठी प्रतिशब्द देता येईल का?
>>>
'<विशिष्ट> रंगाने उठावदार केलेले' ??

'विशिष्ट' च्या जागी जो रंग असेल तो लिहायचा.

वर्षा, शब्दश: अर्थ नाही, पण प्रकाशित अक्षर/शब्द, , रंगीत अक्षर्/शब्द चालेल का बघ. खरंतर हायलाईट हा शब्द पण चालू शकेल.

धन्यवाद निंबुडा आणि नंदिनी.
रंगाने उठावदार केलेले आणि प्रकाशित ही दोन्ही उत्तरे आवडली.

दामन -
दामन= आंचल, किनारा, गोद, अंक, तलहटी

http://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5...

तलहटी म्हणजे तळहात का? तसं असेल तर वादियाँ मेरा दामन मध्ये तो अर्थ योग्य वाटतो.

हाराकिरी म्हणजे सामुराई (जपानी योद्धे) पोटात धारदार शस्त्र खुपसून घेऊन करतात ती आत्महत्या. आत्मघात करण्याला हाराकिरी करणे हा वाक्प्रचार रूढ झाला असावा. (काल भारतीय क्रिकेट संघाने हाराकिरी केली असे वर्णन वर्तमानपत्रात आले आहे का?)

नाही भरतजी! मी पेपर वाचला नाही. काल 'मुशाफिरी' दिवाळी अंकात वाचलं आणि आठवलं की बहुधा 'पानिपत' मधे बहुधा हा शब्द आला आहे. 'मुशाफिरी'मधे लिहिलय की ताओ तत्वज्ञानाप्रमाणे माणसाच्या शरीरात नाभीच्या २ इंच खाली मृत्यु बिंदु असतो त्याला 'हारा' म्हणतात. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पोटात धारदार शस्त्र खुपसुन करतात त्याला 'हाराकिरी' म्हणत असावेत.
पण हा शब्द मराठीत कसा काय आला हे समजत नाहीये.

हाय फ्रेन्झ. मस्त धागा हा पण. Happy
>> पण हा शब्द मराठीत कसा काय आला हे समजत नाहीये.
मी_आर्या मराठीत जपानीतूनच आलाय तो शब्द. हाराकिरी म्हणजे एखाद्या purpose साठी सहज आत्मसमर्पण करणे किंवा मरण ओढवेल असे काहीतरी मुद्दाम करणे.

मूळ 'हाराकिरी' शत्रूच्या तावडीत जिवंत सापडू नये यासाठी किंवा शिक्षा म्हणून समारंभपूर्वक केली जायची. हा वाक्प्रचार इंग्रजीतही दिसतो.

"हाराकिरी" या मूळच्या जपानी संज्ञेने जवळपास जागतिक मान्यता मिळविली असून 'जीवावर उदार होऊन केलेले साहस = हाराकिरी' असा काहीसा अर्थ त्याला प्राप्त झाला आहे. मूळ जापानी अर्थ 'आत्महत्या' असाच निघतो, तरीही शत्रूवर हल्ला करताना जीवाची पर्वा न करता ते काम करतानाही वापरले जाते, म्हणजे शक्यता अशीही की हल्ला यशस्वी होऊन ते दल सुखरूप आपल्या तळावर येईलसुद्धा.

हाराकिरी प्रमाणेच "टोरा टोरा टोरा" असा दुसरा पुकारही त्या जपान "पर्ल हार्बर" युद्धादरम्यान लोकप्रिय झाला होता...."टोरा" चा मूळ अर्थ 'वाघ'...अन् युद्धकाळात तो 'अटॅक' साठी कोड वर्ड म्हणून वापरला गेला.

अशोक पाटील

http://www.dhingana.com/natali-chaitrachi-navalai-song-pahili-mangalagou...
लताबाईंनी सिनेमात गायलेले हे पहिले गाणे!
ह्याच्या शेवटच्या कडव्यात "मागिन वर लवलाही" अशी ओळ आहे.
लवलाही म्हणजे काय?
इथे गाण्याचे शब्द आहेत
http://www.aathavanitli-gani.com/Song/Natali_Chaitrachi_Navalai

लवलाही म्हणजे त्वरित/लगेच/लवकर

देवीच्या आरतीत आहे ना -
तें तू भक्तालागी पावसि लवलाही

हाराकिरी : जपानी समुराई आपला राजा/ पालनकर्ता गेल्यावर स्वतंच्या नाभी खालच्या म्रूत्यू बिंदूवर धारधार शस्त्र खुपसून आत्महत्या करत. आपल्या राजा/ पालनकर्यानंतर आपले जीवन व्यर्थ असे समजून, राजा/ पालनकर्त्यावरच्या निस्सिम कर्त्वव्य भावनेतून हे केले जाई. खरे तर अतिशय कर्तव्य भावनेतून जिवावर उदार होणे असा त्याचा भाव आहे.

इथे अनेक शब्द आणि त्यांचे अर्थ ४२ पानात पसरलेले आहेत. ते धाग्यात अपडेट करणे शक्य होईल का?

कोणी यादी बनवून दिली तर अ‍ॅडमीन हेडर संपादीत करू शकतील.

कशाय म्हणजे आयुर्वेदात वनस्पतींचा 'काढा'

पण श्रीपादवल्लभांच्या श्लोकात एक शब्द असा आलाय.

काशायवस्त्रं करदंडधारणम
कमंडलुं पद्मकरेण शंखम
चक्रंगदाभुषितभुषणाढ्यं
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये

( चु.भु.मा.असावी)

डॉक्टर....

तुम्ही ऐकलेले वा वाचलेले 'ते' कशायपेय आचार्य अत्रे यानी त्यांच्या "कशायपेयपात्रमक्षिकेप्रत" या विडंबनकाव्यात 'चहा' या अर्थाने वापरले होते. [आधुनिक कवी त्याच्यासमोर असलेल्या चहाच्या कपात मरून पडलेल्या माशीला उद्देश्यून कविता करीत आहे....त्या अर्थाने]

पण कशाय’ म्हणजे काढा.... जो करण्यासाठी बडिशेप, धणे, जीरे, ओवा, बाळंतशेप, वावडिंग, आणि महत्वाचे म्हणजे सुंठ यांच्या मिश्रणाचा वापर करतात. काही आयुर्वेदाचार्य ज्येष्ठमधही वापरतात पण जर व्यक्ती मधुमेहग्रस्त असल्यास ज्येष्ठ्मधाचा काढ्यात वापर करू नये असाही सल्ला दिला जातो.

अर्थात 'पचनक्रिये' साठी तसेच पोट साफ होण्यासाठीचे हे 'कशायपेय' आहे. [तुम्हाला हे माहीत असेलच यात शंका नाही....]

अशोक पाटील

विदग्ध
धावि .
१ करपलेलें ; जळलेलें . शुष्कें अथवा स्निग्धें । सुपकें का विदग्धें । - ज्ञा १५ . ९ .
२ अर्धकच्चें ; अर्धवट शिजलेलें ( अन्न ).
३ अर्धवट करपलेलें ( अन्न वगैरे ). शुष्कसुपक्व विदग्ध । चतुर्विध अन्नें उत्तम खाद्य । ५ ( ल . ) कुशल ; चतुर ; हुशार ; निष्णात . [ सं . वि + दह् ‍ - दग्ध ] विदग्धाजीर्ण - न . अन्न अर्धवट पचल्यामुलें होणारें अजीर्ण . यांत घशाशीं आंबट येतें . चार प्रकारच्या अजीर्णापैकीं एक प्रकार .

येस्स अशोकजी,
कशायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत Wink तुम्ही पतित विसरलात.

विदग्ध च्या संदर्भात कशायपेय नक्कीच अजीर्णावरचा काढा असणारे.

Pages