शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश....

'जोकमार' हा कोकणातील अघोरी पंथीयाचा देव मानला जातो....कर्नाटकात यालाच 'जोखमार' असे नाम असून स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत टाकावू [किंवा नाकर्ता] माणसाला या नामाने पुकारतात.

मागील पानावर नंदिनी यानी जी.ए.कुलकर्णी यांच्या एका कथेत "जोखमार" नामाचा उल्लेख वाचला होता असे म्हटले आहे. ती कथा 'चंद्रावळ'. त्यातील उल्लेख असा आहे :

"सण्ण्या, का रे फुकट गुरगुर ? का शेपूट हापटतोस ?" गंजुडा म्हणाला, "मी तुझ्या या म्हशीला बोलवायला आलो होतो व्हय ? जा की घेऊन तिला, ती येणार असेल तर."
त्याच्यामागेच खोलीत गौरी गाठोड्याला रेलून मिजाशीत पसरली होती. तिने कडाकड बोटे मोडली व ती समोर नाचवली.
"याच्याकडे ?" खालचा ओठ तिरस्कारानी फरकावत ती म्हणाली, "खड्ड्यात घाल या जोखमाराला !"
तो शब्द ऐकतच सण्ण्या डोळ्यासमोरच आकसला व वाशाचा तुकडा त्याच्या हातातून गळून पडला. पुरुषाचा यापेक्षा जास्त अपमान काही स्त्रीला करता येत नाही. त्या शब्दाने आपल्यावर कोणी शेणखत ओतीत आहे, आपले सारे अंग नासत आहे, असे त्याला वाटले आणि खाली मान घालून तो बाहेर आला.

.... 'पुरुषाचा अपमान' असे जे सण्ण्या त्या "जोखमार" शब्दाबाबत समजतो त्याचा अर्थ त्याच्या नाकर्तेपणाविषयीच गौरीचा टोला आहे हे उघडच आहे.

[नाकर्तेपणा = नामर्दपणा असाही घेतला जाऊ शकतो.]

अलबत्ता म्हणजे कमीतकमी किंवा किमान गरजेपुरते.

उदा. "मला आज हीरो होंडा बूक करायची आहे, अलबत्ता खात्यावर दहा हजार तरी पाहिजेतच.'

याच अनुषंगाने अलबत्या-गलबत्या असे एक विशेषनामही प्रचलित झाले. त्याचा अर्थ मात्र बिनमहत्वाची पात्रे. म्हणजे अशी माणसे जवळपास असली वा नसली, यजमानाला काही फरक पडत नाही.

शाळेत आमच्या संस्कृत-मराठी शिकवणार्‍या बाईंनी सांगितलं होतं, की लिहिताना फक्त "या"चाच वापर करावा; बोलताना दोन्हीपैकी काहीही वापरलेलं चालतं.

"ह्या" वा "या" वापराला भाषेचे तसेच व्याकरणाचे खास असे मीटर नाही....सबब बंधनही नाही. भाषेतील जडत्व काढून टाकण्यासाठी वेळोवेळी भाषाशास्त्रज्ञ प्रयत्न करत असतात आणि मग लिखाणाद्वारे काही संज्ञा वापरातही आणल्या गेल्याचे दिसते.

शतकापूर्वीचा काळ नजरेसमोर आणला तर पत्नी पतीबाबत 'ह्यानी' किंवा 'यानी' असे संबोधन वापरत नसत तर 'इकडची स्वारी' असा उल्लेख होत असे. ते विशेषनाम मग कालौघात लुप्त झाले आणि त्याची जागा 'ह्यानी' घेतली....हडप, नाथ माधव, माडखोलकर आदींच्या साहित्यात 'ह्यानी' चा वापर दिसून येईल, तर मग आधुनिक काळातील नामवंत म्हटले गेलेले लेखक खांडेकर, फडके, पेंडसे आदीनी "ह्या" शी फारकत घेऊन सुटसुटीत 'या' आणले अन् मग ते रुढही झाले.

आज Bank शब्द देवनागरीत लिहिताना आपण "बँक" असा लिहितो. पूर्वी हाच शब्द 'ब्यांक' असा लिहिला जात असे....अगदी क्रमिक पुस्तकातूनही. पण मग त्याला 'बँक' असे सौम्य रूप प्राप्त झाले, ते स्वीकारले गेले.

थोडक्यात नियम असा काही नाही. आजही कुणी "ह्यानी" असे लिहिले तरी ते चूक म्हणता येणार नाही.... तथापि "यानी" मात्र वाचताना कुणालाच अडचणीचे वाटत नाही.

अशोक पाटील

"ह्या" वा "या" वापराला भाषेचे तसेच व्याकरणाचे खास असे मीटर नाही...<<
ह्या! काहीतरीच तुम्चं..
या! काहीतरीच तुम्चं...

व्वॉव डॉक्टर.....

अहो, माझा प्रतिसाद खूपच मर्यादित होता..... अप्लिकेबल ओन्ली फॉर 'ह्यानी' अ‍ॅण्ड/ऑर 'यानी'.

बाकी श्री.मयेकर म्हणतात त्यानुसार रादर 'हॅ' फिट्ट बसत्ये तुमच्या पहिल्या वाक्यासाठी.

प्रीती, अशोकः तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! मनातला गोंधळ अजून पूर्णपणे गेलेला नाही पण तुम्ही दिलेल्या माहितीमुळे नक्कीच मदत झालीये.

anudon.....

"....मनातला गोंधळ अजून पूर्णपणे गेलेला नाही....."

...मग हा गोंधळ मनी बिलकुल ठेऊ नका. तुम्हाला 'अलबत्ता' कडे नेमके कोणत्या अर्थाने पाहायचे आहे अथवा कोणत्या उदाहरणावरून तो शब्द तुमच्या वाट्याला आला, ते इथे सविस्तर सांगाल तर नक्की मार्गदर्शन मिळेल इथल्या सदस्यांकडून.

अशोक पाटील

मराठीत 'अलबत्ता; असा शब्द आहे का? 'अलबत' आहे त्याचा अर्थ 'नक्कीच.'
अलबत्ता या हिंदी/उर्दू शब्दाचे अर्थ Nevertheless (तरीसुद्धा), of course(नक्कीच) असे मिळाले.

@ भरत....

"अलबत" = नक्की. योग्यच आहे. उदा. "तू संध्याकाळच्या सभेला येशील ना ?" या प्रश्नाला उत्तर "अलबत, का नाही ?" असे मिळाले म्हणजे इथे 'नक्की' चा भाव उमटतो.

पण 'अलबत्ता' चा अर्थ = At the least असा मिळतो. It is considered in Maráṭhí to bear the meaning of At the least; at the lowest; at the very smallest (sum, amount, quantity). उदाहरणही अशाच छटेचे घेतले जाते....म्हणजे "नोकरीपेक्षा धंदा करण्याचा तुझा विचार चांगलाच आहे, अलबत्ता तुझ्याकडे किमान एक लाखाचे भांडवल असणे गरजेचे आहे."

"अलबत्या-गलबत्या" मात्र Any Tom Dick and Harry या अर्थाने घेतले जाते.

अशोक पाटील

माधव,

>> कालकूट म्हणजे विष की एक ठराविक प्रकारचे विष?

माझ्या अंदाजाप्रमाणे काळ हा सर्वांचा नाश करतो याअर्थी तो विषासम मानला गेला आहे. म्हणून कालकूट म्हणजे साक्षात काळ कुटून तयार केलेले विष.

आ.न.,
-गा.पै.

अश्विनी के,

>> अल्लख या शब्दाचा अर्थ काय?

अशोक. यांनी म्हंटल्याप्रमाणे अलख असा मूळ शब्द आहे. त्यांनी दिलेला ब्रह्मन् असा अर्थही बरोबर आहे. ब्रह्मन् इंद्रियांद्वारे आकळता येत नाही, म्हणून ते अलक्ष्य आहे. त्याचा अपभ्रंश अलख असा झाला.

आ.न्.,
-गा.पै.

अलबत : नक्की (of course).
अलबत्ता : परंतु

अलख : अलक्ष्य (पंचेंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडले)

स्वाती_आंबोळे | 7 December, 2012 - 20:02 नवीन <<

बिल्कुल सही जव्वाब!
और ये रहा पच्चीस लाख रुप्येका चेक, मेरी साईन वाला Wink अब देखिये अप्ने अप्ने स्क्रीन पर अगला प्रश्न!
कंप्युटरजी!?

अलबत [त्ता] (क्रि.वि.) - अर्थात,खात्रीने नक्की
अलबत्या गलबत्या(पु.) - कोणीतरी, भलता-सलता, येरागबाळा
माझ्याकडे असलेल्या राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोशात हे असे अर्थ दिलेत.

> anudon.....
>"....मनातला गोंधळ अजून पूर्णपणे गेलेला नाही....."
>...मग हा गोंधळ मनी बिलकुल ठेऊ नका. तुम्हाला 'अलबत्ता' कडे नेमके कोणत्या अर्थाने पाहायचे आहे अथवा कोणत्या >उदाहरणावरून तो शब्द तुमच्या वाट्याला आला, ते इथे सविस्तर सांगाल तर नक्की मार्गदर्शन मिळेल इथल्या सदस्यांकडून.
अशोक, माझा गोंधळ "या" आणि "ह्या" चा होता, 'अलबत्ता' चा नाही. Happy

>> शाळेत आमच्या संस्कृत-मराठी शिकवणार्‍या बाईंनी सांगितलं होतं, की लिहिताना फक्त "या"चाच वापर करावा; बोलताना दोन्हीपैकी काहीही वापरलेलं चालतं.

लली +१

इब्लिस, पच्चीस लाख? दिल के खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है... Happy

ओहो..... anudon .... सो सॉरी..... मीच त्या अलबत + अलबत्त्याच्या गलबत्त्यात अडकून पडलो असल्याने तुमच्या मनीच्या गोंधळाला मी त्याच गलबतात घेतले.

इब्लिस, पच्चीस लाख? दिल के खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है...<<

भई हम भी पच्चीस लाख के चेकपर साईण करके किसीको गिफ्ट दे देवें.. दिल के खुश रखने को इस्से अच्छा खयाल कौनसा है? Wink

तुम्हाला 'अलबत्ता' कडे नेमके कोणत्या अर्थाने पाहायचे<<

अलबत्ताच्या खलबतावर पडदा टाकत एक सुचवितो:

'दुक्की पे दुक्की हो
या सत्ते पे सत्ता
गौर से देखा जाये,
तो बस है पत्ते पे पत्ता Wink
कोई फर्क नही अलबत्ता..'

(ऑफकॉर्स, खलबत्ता) इब्लिस

नवरा या शब्दाला सहचारी हा समानार्थी शब्द होतो का?
दुसरा एखादा समानार्थी शब्द सुचवाल का? पण त्यात मित्रत्वाची भावना दिसली पाहीजे ( मालकीची नको )

सावली: जीवनसाथी, सहचर, अर्धांग (हे बर्‍याचदा विनोदी ढंगात वापरलेलं पाहिलय)

anudon | 6 December, 2012 - 09:29
"ह्या" वापरायचे की "या" हे कसे ठरवायचे?
>>>
मी ही सुरुवातीला 'या' असेच वापरत होते. लिहितानाही आणि बोलतानाही. बर्‍याच जणांना लिहिताना 'ह्या' वापरताना पाहिले. मग मी अशी संगती लावली की
जसे हा मुलगा हे मुलगे
तसे हि मुलगी ह्या मुली

मराठी व्याकरणात हा, ही, तो, ते इ. सर्वनामे म्हणून गणली जातात. पण जेव्हा ते नामाच्या आधी येतात (जसे वरील चारही उदाहरणांमध्ये आहे) तेव्हा त्यांना बहुदा सार्वनामिक विशेषणे म्हणतात (हा शब्द बरोबर आहे का? मला अंधुक से आठवतेय.)

Pages