शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिरेबानमे झाँककर देखिए - या एकाच ओळीवरून त्या शब्दाचा अर्थ आत्मा मानणे हे किंचित गैर ठरू शकेल. Happy

उर्दू गझलेमध्ये गिरेबान हा शब्द एका मोठ्या संकेताच्या पातळीला पोचला आहे. Happy

(नेहमीप्रमाणेच, प्रेयसीच्या प्राप्तीसाठी वाट्टेल ते दिव्य करणार्‍या प्रियकराला मारहाण करून अगदी त्याचे कपडे फाडून त्याला 'पासबाँ' - द्वाररक्षक किंवा इतर प्रतिस्पर्धी हाकलून देतात. या संकेतानुसार रचल्या गेलेल्या अनेक शेरांमध्ये 'चाक गिरेबाँ' म्हणजे फाटलेला अंगरखा किंवा अंगरख्याचा छाती व मानेजवळील भाग हा अर्थ अभिप्रेत असतो)

हे सहज आपले माहितीसाठी: Happy

tab chaak-e-girebaa.N kaa mazaa hai dil-e-naadaa.N
jab ik nafas ulajhaa huaa har taar me.n aave

तब चाक-ए-गिरेबाँ का मझा है दिल-ए-नादाँ
जब इक नफस उलझा हुवा हर तारमें आवे

[chaak=torn; girebaaN=collar; nafas=breath]

(चाक - फाटलेला, गिरेबाँ - कॉलर, नफस - श्वास)

Happy

(वरील शेर मिर्झा गालिबचा आहे)

तूम्ही म्हणत असलेल्या अर्थावरुन त्या वाक्प्रचाराचा अन्वय लागत नाही.

शोधाशोध केल्यास गरेबान = मान सापडतं

तूम्ही म्हणत असलेल्या अर्थावरुन त्या वाक्प्रचाराचा अन्वय लागत नाही.<<<

हे मला समजलं नाही.

गरेबान = मान - असे काही ठिकाणी सापडत असल्यास तुमचे म्हणणे रास्त असणार.

निरंजन म्हणजे छोटा दिवा>>

मग 'निरांजन' आणि 'निरंजन' हे केवळ पाठभेद म्हणायचे का?
निरंजन= निर् + अंजन (अंजन निघून गेलेला/ली) असे वाटते.

भूषण,

"अपने गिरहबानमे झाँकना" हा वाक्प्रचार आहे. गिरेबान = कॉलर असा अर्थ घेतल्यास ह्या वाक्प्रचाराचा अर्थ लागत नाही.

http://www.learningurdu.com/quicksearch.asp?search=collar&imageField2.x=...

हे एक मिळाले. येथे कॉलर, कॉलर बोन व मान असे तीनही अर्थ दिलेले दिसतात. (अवांतर - डोळ्यातले कुसळ वा मुसळ बघणे यात ते दोन्ही ऑब्जेक्ट्स प्रत्यक्षात डोळ्यांत नसणे हे असेच काहीसे वाटले).

"कालकूट" ~

"समुद्रमंथन' संदर्भातील वाचनात 'हलाहल' शी सामना झाला होताच. मला वाटते याचेच 'कालकूट' हे संस्कृतमधील हे नाम असून त्याचा अर्थ संपूर्ण विश्वात सर्वाधिक संहारक क्षमता असलेले विष असा होतो....जे फक्त महादेवाने प्राशन केले आणि पचविले अशीही कथा आहे.

पुढे लोकप्रवादात 'एखादी अतिशय अप्रिय घटना तसेच दु:ख सहन करणे, म्हणजेच हलाहल पचविले' असा समज पसरला. 'कालकूट' चा थेट उल्लेख अशा स्वरुपाच्या कहाण्यामध्ये येत नसावा.

म्हणायला काय? गिरेबानला आंबा १ ही म्हणता येईल. पण नाही आहे त्याचा तसा अर्थ. >>
Biggrin
जाऊ दे आपण सर्वमान्य व प्रचलित असा शब्द वापरू - मानगूट ! ओके?? Wink

कालकूट हा संस्कृत शब्द नसावा.
संस्कृत शब्दही 'हालाहल' असा आहे. हलाहल हे अपभ्रष्ट रूप आहे.

अद्यापि नोज्झति हरः किल कालकूटं
कूर्मो बिभर्ति धरणी खलु पृष्ठभागे ......

असे सुभाषित आहे. त्यामुळे कालकूट नक्कीच संस्कृत शब्द आहे. हालाहलबद्दल चैतन्यला अनुमोदन.

"अयाचित" या शब्दाचा शब्दशः काय अर्थ होतो? श्री गजाननविजय या पोथीत वाचनात आलेला हा शब्द्,कोणी सांगेल का?

अयाचित म्हणजे याचना न करता (मिळालेले). पोथीत तो शब्द भिक्षा न मागता लोकांनी आपणहून दिलेले शिधा, भोजन याकरता योजला आहे. (चुकत नसेल तर ते साधू मळ्यात येतात तो अध्याय. 'शिरापुरीचे अयाचित' असं म्हटलं आहे.)

धन्यवाद श्रध्दा... मला हाच अर्थ योग्य वाटत होता पण शंका होती थोडी त्यामुळे,

तसचं "जयन्द्रथ" हा शब्द योग्य की "जयद्रथ" हा शब्द योग्य...........

चैतन्य,

मग 'निरांजन' आणि 'निरंजन' हे केवळ पाठभेद म्हणायचे का?
निरंजन= निर् + अंजन (अंजन निघून गेलेला/ली) असे वाटते.
>>>

निरंजन शंकराला उद्देशुन्ही म्हणतात ना?
'निरंजन धन तुम्हारो दरबार' अशी कबीरची एक रचना आहे. तिथे कुठल्या अर्थी वापरला आहे बघायला पाहिजे.

@Maithilipingle
तसचं "जयन्द्रथ" हा शब्द योग्य की "जयद्रथ" हा शब्द योग्य...........>>>
जयद्रथ हा शब्द योग्य.

@ माधवी_नयनीश,
धन्यवाद. निरंजन हा शब्द बहुतेक वेळा योगी/बैरागी यांच्यासाठी वापरतात.
तो 'अंजन (म्हणजेच लेप) नसलेला= ह्या व्यावहारिक जगाच्या मोहपाशातून मुक्त' ह्या अर्थी वापरत असावेत.
शंकरही बैरागीच म्हणून त्यालाही 'निरंजन' म्हणत असावेत.

पण निरंजन आणि निरांजन ह्यातला नक्की फरक कोणता असावा?
मराठीतल्या 'निरांजना'साठी संस्कृतात (बहुतेक) नीराजन ('रा' वर अनुस्वार नाही) हा शब्द वापरतात.
पूजेत 'आर्तिक्यनीराजनदीपं दर्शयामि' असे म्हणतात. पुन्हा एकदा तपासून पक्के समजले की इथे लिहीनच. पण असे असेल तर मराठी 'निरांजन' हा शब्द संस्कृत शब्दाचे अपभ्रष्ट रूप असे मानायला वाव आहे.

काय माहीत! हिंदी गाण्यांमध्ये तर जुलुमपेक्षाही तीव्र रूप असल्याचे उल्लेख असतात.

डोळे हे जुल्मी गडे ऐवजी डोळे हे सितमी गडे कसे वाटेल नाही ऐकायला? Happy

भाषा अशीच मोठी होते वगैरे!

माझ्या माहितीप्रमाणे बसफुगडी (की साधी फुगडी) खेळताना म्हणण्याच्या एका गाण्यात 'जा पोरी जा' असे शब्द आहेत, जे फुगडीच्या वेगात तल्लीन होत तितक्याच वेगात सतत म्हणत राहिले असता त्यातून 'झपूर्झा' असा नाद ऐकू येतो.
म्हणून जगाचं भान विसरून एखाद्या गोष्टीत अगदी रंगून गेलं, तल्लीन झालं, स्वतःचा, जगाचा विसर पडला की त्याला मनाची झपूर्झा अवस्था असं म्हणतात.
Correct me if I'm wrong.

हल्लीच्या काही नवीन पुस्तकांत आणि दिवाळी अंकांत 'खूष', 'खात्री', 'भित्री' हे शब्द 'खूश', 'खातरी', 'भितरी' असे वाचनात आले. आणि हे बर्‍याच ठिकाणी दिसलं.
शुध्दलेखनाचे काही नियम बदलले आहेत का?

ललिता प्रीति,
इंटरेस्टिंग व्युत्पत्ती ऑफ झपूर्झा Happy
पण आरती प्रभूंची एक कविता आहे, तिच्या ओळीत 'का झपूर्झा घालता' असा प्रश्न आहे.
तिथे तरी झपूर्झा चा अर्थ 'येरझार्‍या' असा होतो.

बाकी, खातरी, भितरी इ. शुद्धलेखनाचे नियम बदलले नाहियेत असा अंदाज / आशा आहे.

मागच्या पानावरचा जोकमार, हा कोकणातला एक देव होता. त्याचेच पुढे देवकुमार म्हणून नाव पडले होते.
त्यामागचा इतिहास रंजक आहे पण इथे लिहिण्यासारखा नाही.

Pages