शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तितिक्षा : (शारिरिक) सहनशक्ती. निसर्गाचे चढ उतार सहन करण्याची शक्ती. मराठीत आपान रेझिस्टन्स पॉवर म्हणतो ना? ते..

इब्लिस -
त्या टिंबक टू आणि गाण्याचा काही संबंध आहे का ??
गूगल सगळ काही नाही सांगत म्हणून तर माबो आहे.

गाणं मी ऐकलेलं नाहिये. timbuktu असं स्पेलिंगवालं गाव आहे ते. गाणं ऐकल्यावर कदाचित कळेल. किंवा तुम्हालाही अर्थ लागू शकेल.
टिंबक्टू च्या डिसँबिग्युएशन लिंकवर क्लिक केल्यास त्या नावाचा एक रॅप सिंगर आहे असे देखिल दिसते. कदाचित त्याचा संबंध गाण्यात असू शकेलही. पण आजकालच्या गाण्यांतल्या शब्दांना अर्थ वा गाण्याशी संबंध असलाच पाहिजे असं काही राहिलेलं नाहिये, त्यामुळे त्याबद्दल मत देण्यास मी असमर्थ Sad

धन्स इब्लिस,
जाऊदे मी कशाला डोक खाजवत बसलोय
मला वाटतय कटू बोलणारे टिंब ( पॉईंट)- म्हणून टिंबकटू असावे

शम(वणे) आणि दम (दाबणे / मारणे) हे इच्छेवर विजय मिळवायचे मार्ग आहेत.
उपरम ऐकला नाही कधी शब्द.

स्वाती, उपरम हा शब्द दासबोधावरील विवेचनाच्या एका पुस्तकात आला आहे. श्रीसमर्थांनी दासबोधात नवविधाभक्तिंचे वर्णन केलं आहे. त्यातील एक "पादसेवनभक्ति". त्या संदर्भातलं वाक्य असं की " श्रवण कीर्तनाच्या योगाने ( श्रवणभक्ति, कीर्तनभक्ति) दम साध्य होतो. विष्णुस्मरणाने (नामस्मरणभक्ति) शम साध्य होतो. पादसेवनाने (पादसेवनभक्ति) उपरम-प्राप्ती होते.
यातील शम, दम चे अर्थ शब्दशः चपखल बसतात, उपरम चा थोडा आडवळणाने.

तुझ्या तत्पर उत्तराबद्दल धन्यवाद. खरं सांगते, याचं उत्तर तुझ्याच कडून येईल असं वाटलं होतं.

मोल्सवर्थ ची वेब साईट काय? मी गुगलून पाहिलं. योग्य साईट सापडली नाही. प्लीज देशील का?

बर्वा हे आडनाव आहे. पुलंची फेमस कथा. अंतू बरवा.
इथे माबो वर विठ्ठल बरवा व माधव बरवा अशी कथा वाचली होती मी.
ऋतू बरवा म्हणजे बर्व्यांच्या ऋतु वर याचे प्रेम जमले आहे असे गीत आहे.
चुभुद्याघ्या

गमभन, काय आश्चर्य आहे..मी काल स्वामी चिन्मयानंदांचा एक लेख योगायोगाने वाचला ज्यात "तितिक्षा" म्हणजे काय याविषयी डिटेल विवेचन होतं. अन आज योगायोगाने हा धागा उघडला तर या पानावर पहिलाच प्रश्न "तितिक्षा" म्हणजे काय? Happy
तर.. त्यात लिहिल्याप्रमाणे (अन मला जे समजलं त्याप्रमाणे) तितिक्षा (forbearance) is the quality of a seeker to tolerate and show patience towards the suffereings. Such seeker does not show any resistance to ill fate, future uncertainties, present trauma or even suffereing that one is going through. This is considered as an important quality of a seeker because unless one possesses this, s/he can not focus the mind on the pursuit of higher knowledge.
इंग्लिशमध्येच वाचल्यामुळे तसंच लिहितेय.

'आमुख' चा अर्थ काय आहे? हिन्दीत आरंभ असे गुगल सांगतो आहे.
मराठी वाङमय कोशाच्या पहिल्या प्रकरणाचे नाव त्यांनी 'आमुख ' असे दिले आहे. अंदाजे 'आरंभ' बरोबर असणार असे वाटते आहे, तरीही जास्त माहिती असेल तर सांगा कृपया.

सोमाजी गोमाजी कापसे हे महाराष्ट्राच्या सर्व कोपर्‍यात माहीत असलेले नाव कसे निर्माण झाले याबद्दल कोणी सांगू शकेल का?

Pages