शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली वर पाकृ विभागात नवीन पाकृ लिहिताना "प्रादेशिक" ह्या ड्रॉप डाऊन मध्ये पहिला ऑप्शन "पारंपारीक मराठी" असा आहे. एकुणातच हा शब्द मला खटकतोय.
माझ्या मते ते पारंपरिक हवंय. इक प्रत्यय लावल्यावर रि हा र्‍हस्व असायला हवाय. इथे तो ही दीर्घ आहे. बरोबर म्हणतेय ना मी?

हो!

गभस्ती हे सुर्याचं नाव आहे का?
दासबोधाच्या सद्गुरुस्तवनाच्या ३र्या समासात पुढीलप्रमाणे श्लोक आहेत:

आदित्यें अंधकार निवारे| परंतु मागुतें ब्रह्मांड भरे |
नीसी जालियां नंतरें| पुन्हां काळोखें ||१०
तैसा नव्हे स्वामीराव| करी जन्ममृत्य वाव |
समूळ अज्ञानाचा ठाव| पुसून टाकी ||११||

इथेच २१व्या श्लोकातः
आतां उपमावा गभस्ती| तरी गभस्तीचा प्रकाश किती |
शास्त्रें मर्यादा बोलती| सद्गुरु अमर्याद ||२१||

गभस्ती हे सुर्याचं नाव आहे का?
>>
होय. हा शब्द मालुसुत महिपतीबुवांच्या नवनाथ भक्तिसार या ग्रंथात वारंवार येतो....

आर्या....

"गभस्ती = सूर्य"....हे वर श्री.जोशी यानी सांगितले आहेच. त्या श्लोकाच्या संदर्भात लोकप्रभेतील खालील दुवा जरूर अभ्यासावा असाच आहे. 'गभस्ती' बद्दल तिथे व्यवस्थित उल्लेख आले आहेत :

http://www.lokprabha.com/lokprabha/20120217/shree-ramdas04.htm

पेहलू - पैलू, side, aspect, phase, face ....
>>>
मला तर वाटलेलं की पेहलू आणि मराठी पैलू वेगवेगळं असेल! Uhoh

"आपके पेहलू मे आकर रो दिये.." ह्या ओळीचा अर्थ काय लावायचा मग?

'बाहोंमे' असा काहीसा अर्थ असेल त्याला.
गुमनाममधलं एक गाणं पण आहे. "जान ए चमन, शोला बदन, पहलु मे आ जाओ"!

@निंबुडा
तुमचं माझी खडाजंगी झाली,
तर तुम्ही डाव्या हाताने माझं गिरेबान पकडाल आणि उजव्या हाताने माझ्या थोबाडात द्याल.
मी रडं आवरण्याची शिकस्त करीत माझ्या घरी जाईल. गुपचूप आरशात माझं अक्स बघेन.
आरक्त कपोल बघून मात्र मला रडं आवरणार नाही.
(३५/३७ वर्षांपूर्वीची घटना असेल तर) हळूच आईच्या पहेलूत जाऊन गदगदत बसेन.
घटना आज घडवायची म्हटली तर रडणार्‍या नवर्‍याला आमची वामांगी कुशीत घेणे सोडाच,ती वामहस्ताने अजून एक भडकावेल. Proud

आज जानेकी जिद ना करो
युंही पहलूमें बैठे रहो

फरीदा खानूम यांच्या वरील गजलेच्या संदर्भात 'पहलूमें' हा शब्द मला पण गोंधळात टाकतो. एकतर मला तो 'पहलूमें' च्या ऐवजी 'बहलूमें' असं ऐकू येतं, त्यामुळे आणखीच.

"आपके पेहलू मे आकर रो दिये.." ह्या ओळीचा अर्थ काय लावायचा मग?>>> इथे आणि वरील गजलमधे अर्थ तोच असावा असं वाट्तं.
शब्दाची उत्पत्ती हीरा म्हणतात, पहलू म्हणजे पल्लू (पालव,पदर) तर नव्हे? >>> अशी असावी बहुतेक.

मला तर वाटलेलं की पेहलू आणि मराठी पैलू वेगवेगळं असेल! अ ओ, आता काय करायचं
"आपके पेहलू मे आकर रो दिये.." ह्या ओळीचा अर्थ काय लावायचा मग?

अरे बाबानो,
बाजू, साईड, कूस, कुशी, प ह लू.
सिंपल.
उग्गा कीस पाडींग लोक्स.

<< कागा कागा सब तन खाईयो, के चून चून खांईयो मांस
दो नैना मत खाईंयो, इन्हे पिया मिलनकी आस...
>>

हे ऐकावे. बडे फतेह अली आणि अमानत अली ( पतियाळा) यांची नितांत सुंदर भैरवी. त्याची सुरुवात बाबा फरीद यांच्या दोह्यातून झाली आहे.( नीट पाहिले असता तुमच्या लक्षात येईल की श्रोत्यांमधे कोणी लल्लू-पंजू बसलेले नसून त्या काळातले 'तमाम' गवय्ये ( नुसती वानगी दाखल नावे म्हणजे - गुलाम अली, मलिका पुखराज, कातील शैफी -दर्दी ना नावे पुरेशी!)

असो विषयांतर झाले. पण ऐकावी अशी भैरवी-गझल.

http://www.youtube.com/watch?v=vGy4_poTAV8

'वैश्वानर' करणे म्हणजे काय? गुरुचरित्रात किंवा वासुदेवानंद सरस्वती (श्री.टेंबे स्वामी)यांच्या चरित्रात पुष्कळ ठीकाणी हा शब्द आलेला आहे.

अग्नी हा मला नक्की ठाऊक आहे. (न जाळे वैश्वानर केंव्हाही खर्‍या संताला - श्री गजाननविजय)

प्राणतत्व असा काहीसा दुसरा अर्थ पण वाचला होता पण नक्की आठवत नाहीये.

वैश्वानर म्हणजे 'अग्नी' च.
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः
हा गीतेतला श्लोकही आहेच. 'प्राणिनां देहमाश्रितः वैश्वानरः' असे असल्याने इथे त्याचा अर्थ 'जठराग्नी' आहे.

Pages