शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैलजा, याच बाफचे पंचविसावे पान बघ.

वपूर्झा = वपुंना झालेला झपूर्झा Happy शिर्षक म्हणून चांगलय, अर्थ काहीच नाहीये Happy

महाराष्ट्रात आवा साधारणतः असा दिसतो.
images.jpg
यात उसाची चिपाडे, कडबा इ. जळाऊ माल व मडकी रचून तो पेटवला जातो योग्य टेम्परेचर जजमेंटने शोधतात, अन मग वरचा थर पाणी मारून विझवतात. पुढची रात्रभर व दुसर्‍या संध्याकाळपर्यंत आतल्या आत धुमसत भांडी भाजली जातात.
indian pottery kiln असे गूगल केल्यास मातीची भांडी भाजण्याबद्दलची बरीच माहीती व चित्रे दिसतील.

प्रियकरास भेटण्यास जाणारी नायिका... अभिसारिका. त्यावरून अभिसार म्हणजे प्रियकरास (चोरून)भेटीस जाणे.
अष्टनायिकापैकी एक....

वासकसज्जा नायिका,विरहोत्कंठिता नायिका,स्वाधीनभर्तृका नायिका,कलहांतरिता नायिका,खंडिता नायिका,विप्रलब्धा नायिका,प्रोषितभर्तृका नायिका,अभिसारिका नायिका

अभिसारिका म्हणजे (नटून थटून) प्रियकराला भेटायला निघालेली स्त्री.
अभिसार म्हणजे प्रेमीजनांच्या भेटीगाठी.

धन्यवाद रॉबीनभाऊ आणि स्वातीताई.

>> वासकसज्जा नायिका,विरहोत्कंठिता नायिका,स्वाधीनभर्तृका नायिका,कलहांतरिता नायिका,खंडिता नायिका,विप्रलब्धा नायिका,प्रोषितभर्तृका नायिका,अभिसारिका नायिका<< अ-ब-ब-ब!!!
धन्य!!

ना धों महानोरांची 'आई' वरची एक कविता आहे, त्यातल्या दोन ओळी अशा आहेत-

कसे सांगू तुला माये एका रक्ताचाच जर
कशापायी कळेना गऽ असा पेटतो विरवार

'विरवार' शब्दाचा अर्थ काय?

हूडा,
त्या आठही नायिकांचे मर्‍हाटी ट्रान्स्लेशन/डिस्क्रिप्शन लिवून टाका राव. हितं नको, पण कुटं तरी द्याच Wink

ते 'विखार' असेल की काय अशी मला शंका येते आहे. अर्थावरून आणि मीटरवरूनही.
<<< Happy मराठीमधे हे ख आणि रव फार गोंधळ घालतात.

आज एका शब्दाने अति म्हणजे अति डोकं खाल्लं, त्यातून काम ग्लॉसरीचे होते, म्हणजे वाक्यावरून अर्थ काढता येईना, शेवटी क्लायंटलाच फोन करून विचारलं, तर म्हणे हम सब चेक करके दिये है. म्हटलं असा कुठलाही शब्द मराठीत वापरत नाहीत. काय गडबड आहे बघा. क्लायंट पूर्ण अमराठी, मग त्यांनी काय तर तासभर खुसूरफुसूर केलं आणि मला शब्दामधे टायपो आहे असं सांगितलं.

शब्द होता: तंत्रस्नान. (तंत्रज्ञान या शब्दाचा टायपो)

शब्द होता: तंत्रस्नान. (तंत्रज्ञान या शब्दाचा टायपो)>>>> स्मित. भारीच असतात हे लेखक लोकं.

त्या आठही नायिकांचे मर्‍हाटी ट्रान्स्लेशन/डिस्क्रिप्शन लिवून टाका राव. हितं नको, पण कुटं तरी द्याच>> कुठे दिलंय ते पण सांगा.

The eight nayikas are:

Vasakasajja Nayika (वासकसज्जा नायिका): "one dressed up for union"
Virahotkanthita Nayika (विरहोत्कंठिता नायिका): "one distressed by separation"
Svadhinabhartruka Nayika (स्वाधीनभर्तृका नायिका): "one having her husband in subjection"
Kalahantarita Nayika (कलहांतरिता नायिका): "one separated by quarrel"
Khandita Nayika (खंडिता नायिका): "one enraged with her lover"
Vipralabdha Nayika (विप्रलब्धा नायिका): "one deceived by her lover"
Proshitabhartruka Nayika (प्रोषितभर्तृका नायिका): "one with a sojourning husband"
Abhisarika Nayika (अभिसारिका नायिका): "one going to meet her lover"

इथे विस्ताराने दिलंय याबद्दल.

शोनू, अन्वित म्हणजे '...च्या अनुषंगाने' ('अन्वय'वरून आला असेल का?) अशा पद्धतीने वापरतात. (उदा. क्रोधान्वित.)
तेव्हा अन्-अन्वित म्हणजे irrational असं असावं.

इथे बघ 'अन्वित'.

स्वाती_आंबोळे,

'अनन्वित'चा अगदी समर्पक अर्थ लावलात. धन्यवाद! Happy

अन्वित = अनु + इत = logically following असा काहीसा अर्थ असावा.

बाकी spokensanskrit.de हे स्थळ शब्दकोश म्हणून भारी आहे.

आ.न.,
-गा.पै.

पण मग अनन्वित छळ असं जेंव्हा म्हणतात तिथे irrational टॉर्चर असा अर्थ अभिप्रेत असतो का ? मला तरी एंडलेस छळ असं काहीसं वाटत होतं

रेसकोर्से वर शर्यतींची माहिती देणारे ' कोल' नावाचे पुस्तक असते. कुतुहल म्हणून 'कोल' शब्दाचा इन्ग्रजी व मराठी या दोन्ही भाषा त खूप शोध घेतला. पण हाती काही लागले नाही. मराठी 'कोल' चे वेगळे अर्थ आहेत. इन्ग्रजीत col, coal, kol, kohl , cole अशी अनेक स्पेलिंग प्रयत्न करून झाली. कोणी या 'कोल' शब्दाबाबत अर्थ, व्युत्पत्ती सांगेल का ?

हो, स्वाती - अनन्वय (अन्वय च्या उलट) वरून अनन्वित आलाय.
मोनियर विल्यम्स इंग्लिशमधे त्याचं स्पष्टीकरण unconnected, inconsecutive, desultory, incoherent, irrelevant, irregular असं करतो

>>इन्ग्रजीत col, coal, kol, kohl , cole अशी अनेक स्पेलिंग प्रयत्न करून झाली. कोणी या 'कोल' शब्दाबाबत अर्थ, व्युत्पत्ती सांगेल का ?

'कोल बुका'तल्या कोलचं स्पेलिंग 'cole' असल्याचं माहिती होतं. अर्थ आत्ता शोधला:

व्युत्त्पत्तीबद्दल काही मिळालं नाही, पण शब्दार्थ शोधायला गेल्यावर हे दिसलं:
http://www.sheknows.com/baby-names/name/cole

Greek Meaning:
The name Cole is a Greek baby name. In Greek the meaning of the name Cole is: Of a triumphant people; young boy.

American Meaning:
The name Cole is an American baby name. In American the meaning of the name Cole is: People's victory.

English Meaning:
The name Cole is an English baby name. In English the meaning of the name Cole is: People's victory.

"टिंबक टू" या शब्दाचा अर्थ कोणी सांगू शकेल काय

हा शब्द ओ मय ओ माय चार्ली गाण्याच्या सुरवातीला आहे. ( तू ही मेरी टिंबक टू है) अस काहीतरी

>>पण मग अनन्वित छळ असं जेंव्हा म्हणतात तिथे irrational टॉर्चर असा अर्थ अभिप्रेत असतो का ? मला तरी एंडलेस छळ असं काहीसं वाटत होतं

हो मलाही असंच वाटत होतं. खांडबहालेवर त्याचा अर्थ एक्सेसीव्ह असा दिलाय.
http://www.khandbahale.com/marathienglish-q-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%A8%...

Pages