शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैश्वानर म्हणजे अग्नी.

बर्‍याचदा जेव्हा "आमच्या घराण्यात वैश्वानर आहे" "वैश्वानर करायचे आहे" असे वाक्य असते तिथे वैश्वानर करणे म्हणजे अग्नीला नैवेद्य दाखवणे. यासाठी पूर्वी काय करायचे ते माहित नाही पण सध्या तरी एक मध्यम इदली घेऊन तो चांगला फुलवतात व त्यावर भात, वरण पक्वान्न असा जो काय नैवेद्य असेल तो ठेवतात. हानैवेद्य झाला की मग इतर देवांचा नैवेद्य व त्यानंतर आचार्य पंगत असते. काही घरांमधे हा नैवेद्य रोजच्यारोज करायचा असतो तर काही घरांमधे सणासुदीला-लग्नमुंजवास्तुशांतीला करायचा असतो.

धन्यवाद नंदिनी आणि सर्वांना! वैश्वानरचा अर्थ थोडा थोडा लागत होता पण तो 'करणे' म्हणजे काय हे माहित नव्हतं. Happy

'वैश्वानर करणे' असे नसून 'वैश्वदेव करणे' असे असावे. चू. भू. दे. घे.
मराठीत 'सगळ्या भाताचा वैश्वदेव एकदम करणे' अशी म्हण देखील आहे. म्हणजे, आहे ते सगळे संपवणे/खर्च करणे असा अर्थ.

अजूनही विझल्या नकगणी
तारकांच्या दिपमाळा...

अशी एक ओळ आहे तरुण आहे रात्र अजूनी ह्या सुरेश भटांच्या कवितेत. ह्यात नकगणीचा अर्थ काय होतो?

'share' (समभाग ) या शब्दाच्या व्युत्पत्ती बद्दल मजेशीर महिती 'हिन्दू' ( नेमाडेन्चे ) च्या पान १०३ वर मिळाली. ती वाक्ये अशी: ...रेल्वे कंपन्यांनी england मध्य भांडवलासा ठी शेर विक्रीला काढून जंगलं तोडत आपला पसारा व वाघांचा उछेद वाढवत नेला. यावरून त्या कंपन्यांच्या समभागांना 'शेर' नाव पडले. ...
मी' share' शब्द etymology dict त पाहिला. त्यात 'to cut' एव्ढाच अर्थ मिलतो. जंगल वा वाघ कापणे असा मिळत नाही. कोणी अधिक प्रकाश टाकेल ?

रेल्वे कंपन्यांनी england मध्य भांडवलासा ठी शेर विक्रीला काढून जंगलं तोडत आपला पसारा व वाघांचा उछेद वाढवत नेला. यावरून त्या कंपन्यांच्या समभागांना 'शेर' नाव पडले. ...>>> इंग्लिशमध्ये वाघाला शेर म्हणतात? Uhoh

पुलंनी 'जावे त्याच्या देशा' मध्ये लिहिले आहे की 'बालमखिर्‍याच्या मौसमात ज्याने मंडईतली काकड्यांची रास बघितली नाही तो .... '

बालमखिर्‍याचा म्हणजे कोणता मौसम? हा शब्द कोठून आला?

.

नंदिनी, म्हणजे अग्निहोत्रातला अग्नी का?
<< नाही, माधव.

चैतन्य, मी आज घरी फोन करून नक्की खात्री करेन.

जोखमार या शब्दाचा नक्की अर्थ काय?

नंदिनी....

"जोखमार" हे विशेषनाम कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील कन्नडमिश्रीत मराठी बोलीत खूप प्रचलित असे आहे. एकप्रकारची शिवीच आहे म्हटले तरी चालेल, विशेषतः बेळगांव धारवाड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्त्रियांच्या तोंडातून पुरुषाशी भांडताना ही शिवी टपदिशी पडते. 'रक्तपिपासू' म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर जे चित्र येते त्याच अर्थाचा हा बोल आहे. एखादा पुरुष घरी काहीच कामकाज न करता बायकोच्या जीवावरच खात बसला असेल तर त्याला एरव्ही 'ऐदी', 'ऐतखाऊ' असे संबोधिले जाते; पण कोणत्या तरी कारणाने शेजार्‍यांशी भांडण सुरू झाले तर त्या शेजार्‍याच्या घरातील बाईमाणूस मग अशा ऐदीला 'तू काय लायकीचा हाईस ते मला हाय म्हाईत रे जोखमारा !" असे कर्कशपणे म्हणते.

जोख = हे नाम पिसू वा जळू या अर्थानेही वापरण्यात येतो.

अशोक पाटील

वासुदेव , गारुडी यासारखा जोखमार एक पुरुष असतो... तो गणपतीच्या आधीकणकेची की कसली तरी बाहुली करतो.. ती घरात ठेवतो, की झोळीत ठेऊन फिरतो, असे काहीअसे करतो.. मग त्याला लोक दान देतात.. गणपती बसला की ती बाहुली तो पुरुन टाकतो. हा मनुष्य कडकलक्ष्मीवाल्या माणसासारखा ओंगळ आणि हिडिस असतो.. म्हणून पुरुषाला उद्देशून ए जोखमारा, अशी शिवी बायका देतात.

इथे दोन ओळी मिळाल्या.

लिंकेबद्दल धन्यवाद आंबाभाऊ.
अनेक अनवट शब्द अन संकल्पना इथे येऊन समजतात.

@ आंबा१ ~ "वासुदेव , गारुडी यासारखा जोखमार एक पुरुष असतो......"

~ कर्नाटकातील डोंगराळ म्हटल्या जाणार्‍या भागात कामानिमित्याने फिरत असताना मला अशा काही जमाती भेटल्या होत्या ज्याना शासकीय दप्तरी 'अनुसूचित' तसेच 'भटक्या' जमातीचा दर्जा मिळाला आहे. त्यांच्यात 'देवचार... जारणमारण....लिंबू मारणे....निरडीच्या पानांचा चिक काढून तो मंत्रून देणे...."अल्लख" म्हणत करणी करणे....असले प्रकार तुम्ही वर म्हटल्यानुसार अशाच एका मुखवट्यासमोर केले जातात. त्यालाही ही भटकी जमात 'जोखमार करणी' असेच म्हणते. काहीसे भयावहच वाटत होते ते सारे प्रकार पाहताना. मंत्राचे उच्चारही अगदी वेताळी थाटाचे होते. भाषा ना धड कन्नड ना धड मराठी....फक्त हावभाव पाहून लक्षात येत होते की तो प्रकार शक्तीपूजेचाच होता.

यांच्यातील देवीचे नावही "जखणाई" असेच. तिचाही चेहरा अगदी उग्र आणि लालभडक, गळ्यात मळकट झालेली कवड्याची माळ. कायम जागृत असल्याची भूमिका घेतलेली, शिवाय तिच्या चेहर्‍यावर पूजेच्या समयी सतत घोरपडीचे तेल ओतणे प्रकार चालू होता....शेंदूर आणि ते दाट तेल यांचा असा काही लेप बसला होता जखणाईच्या चेहर्‍यावर की तिच्या तुलनेत जोखमार फार मवाळ वाटत होता.

असो. {लिंकबद्दल धन्यवाद....माझ्याही माहितीत भर पडली.}

अशोकमामा, तुम्ही केलेलं वर्णनही भयावह आहे. तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं ते अजून भयावह असणार. पण "अल्लख" म्हणत करणी करणे? मी पॉझिटिव्ह दृष्टीनेच "अल्लख निरंजन" असे ऐकले आहे.

अल्लख या शब्दाचा अर्थ काय?

अश्विनी के.....

तुम्ही योग्य भावनेनेच 'अल्लख निरंजन' कडे पाहिले/ऐकले आहे. 'अलख' चा अर्थ 'ब्रह्म' असा असून ".....तू करीत असलेल्या कार्याला ब्रह्म प्रकाश देवो' असा ढोबळ अर्थ 'अलख निरंजन...' या वचनाचा गोसाव्याला अभिप्रेत असतो. नाम या दृष्टीने 'निरंजन' चा अर्थ छोटासा दिवा.....जो देव्हार्‍यात लावला जातो असा होतो. पण विशेषणाच्या अंगाने तो 'अज्ञान दूर करणारा तेज' असाही...म्हणजेच चांगल्या अर्थाने येतो. पण गोसावी जमातीने या आशीर्वादाला भिक्षेची जोड दिली आणि मग पेंढारी आणि पारध्यांनी आपल्या कर्माच्या फलप्राप्तीसाठी या आशीर्वादाचे पाठबळ सोबतील घेतले. लूटमार आणि जबरण या कामाला निघण्यापूर्वी कोणत्यातरी उग्र देवतेचे पूजन करणेही आवश्यक मानले जाते अशा काही जमातीत. त्यावेळी होत असलेल्या मंत्रोच्चरात मग 'अलख निरंजन' ची पुस्तीही साहजिक ध्वनीत होते.

अशोक पाटील

धन्यवाद अशोककाका,

जीएंच्या एका कथेमधे हा शब्द वाचला होता. तुम्ही सांगताय त्याच अर्थाने कथेमधे आलाय शब्द.

नंदिनी....

"तराळ" आणि "परिट" अशी दोन व्यावसायिक छ्टेची नावे आली आहेत, त्या अर्थात. पैकी 'तराळ' म्हणजे दवंडीपिट्या. मांग जातीतील व्हल्लार प्रवर्गातील वस्तीकडे हे काम जाते, म्हणजे गावकामगार पाटील वा ग्रामसेवक याने सभेबाबत नोटीस काढली की मग डफलीच्या साथीने 'तराळ' त्या सभेची नोंद गावातील गल्लीगल्लीत हाकार्‍याने देणार.

एक प्रकारे पोस्टमन पद्धतीचेच हे काम. तराळाला वेतन असे काही नसते. वाड्यावरून तसेच गावातील इनामदारांकडून कुटुंबाला पुरेल इतका शिधा दिला जात असे. बारा बलुतेदारांच्या पंगतीतील सर्वात हलके मानले गेलेले हे काम असल्याने तिथेही तराळ मागासलेलाच राहिला आहे.

आंबा१

~ तसे नाही. 'तराळ' हा काही जातीचा प्रकार नसून तो अनुसूचित जाती [Scheduled Caste] प्रवर्गातील एक उपगट "ढोर" यांच्या रांकेतील समाज आहे, ज्यातील पुरुषांनी गावकामगार पाटील वा सरपंच यांच्या हाताखाली काम करणे अपेक्षित असते. 'धेगू-मुगु' नामक आणखीन् एक उपप्रकारही या गटात येतो, जो स्मशानभूमीकडील आवश्यक ती कामे करीत असतो.

'महार' तसेच 'मांग' या प्रवर्गाला मिळू शकणार्‍या सार्‍या शासकीय सवलती 'तराळ' गटातील सर्वच घटकाला मिळतात, त्यामुळेच ते एनटी/एसटी रीझर्व्हेशनमध्ये न येता [७%] 'एस.सी.' रीझर्व्हेशनला [१३%] पात्र धरले गेले आहेत.

तुम्ही (तसेच नंदिनी यानीही) व्यंकटेश माडगूळकर यांच्या "माणदेशी माणसं" मधील 'देवा सटवा महार' हे व्यक्तिचित्र वाचले असेल तर 'तराळ' विषयी बरीचशी माहिती मिळू शकेल.

अशोक पाटील

Pages