शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल एका वाहत्या धाग्यात हा दुवा दिला होता, तो परत इथे देत आहे. खालील पानावर मराठीतले ४-५ प्रमाणित शब्दकोष ऑनलाईन दिसतील (डिजिटाईज्ड केले आहेत). उदा: तुळपुळे, मोल्सवर्थ, दाते, बर्नस्टीन, इ.

http://dsal.uchicago.edu/dictionaries/

ओह....डॉक्टर....नक्कीच मी 'पतित' विसरून गेलो होतो.... खरं सांगायचं म्हणजे त्या ओळीतील तोच शब्द अत्यंत महत्वाचा.

[च्यामारी..."झेंडूची फुले" रॅकवर आहे, पण कन्फर्मेशनसाठी तिकडे हात गेला नाही...! आता धडा शिकलो.]

येथे हाराकिरी या शब्दाबद्दल चर्चा वाचली.
जपानी भाषेत हारा म्हणजे पोट आणि किरू (त्याचे व्याकरणात बदललेले रूप किरी) म्हणजे कापणे.
सामुराई संस्कृती मधे जर कोणी शब्द पाळू शकला नाही, हरण्याची शक्यता असेल तर तलवार पोटात एका बाजूने खुपसून पोट आडवे कापणे (स्वतःच स्वतःचे) म्हणजे हाराकिरी
अधिक माहिती खालील लिन्कवर मिळेल.
http://en.wikipedia.org/wiki/Seppuku

सदर म्हणजे कोणती जागा ? शनिवारवाड्याच्या वर्णनात असतो बरेचदा हा उल्लेख. या शब्दाचं मूळ फार्सी आहे का?
column या अर्थानी पण सदर हा शब्द वापरला जातो. 'सादर' म्हणजे आदराने असा अर्थ आहे की column/ सदर याच्याशी संबंध आहे?

द्रुम : झाड विपिन : जंगल विपिने->सप्तमी
कल्पद्रुपविपिने म्हणजे संत ज्ञानेश्वर म्हणतात त्या कल्पतरूंच्या आरवात

पुरश्चरण म्हणजे बहुतेक अखंड जप. पुरश्चरण इत्यादी म्हणजे पुरश्चरणादि...
रामदासांनी गायत्री पुरश्चरण केलं म्हणजे १२ वर्षं गायत्रीमंत्राचा जप केला.

Delivering value to the customer चे मराठीत चांगले भाषांतर कसे होईल?

माधव. धन्यवाद. माझंही भाषांतरही जवळपास असेच आहे.: ग्राहकाला उत्कृष्ट सेवा पुरवणे

वर्षा,

मला वाटतं की,

Delivering value to the customer = ग्राहकास मूल्य लाभविणे = ग्राहकास मूल्यलाभ करविणे

आ.न.,
-गा.पै.

मंजू, Happy अगदी अगदी.
aschig, होय. हा अर्थही आहेच.
"ग्राहकाला किमतीचा योग्य तो मोबदला देणे" असं भाषांतरही मला सुचवलं गेलंय.
व्हॅल्यू शब्द मूल्य म्हणून वापरण्यासाठी गा. पै. यांचा पर्याय चांगला वाटतोय. (ग्राहकास मूल्यलाभ करवणे_)
धन्यवाद गा पै.

http://www.dhingana.com/pavner-ga-mayela-karu-song-pavna-kathcha-dhondi-...

पवनाकाठचा धोंडी ह्या जुन्या मराठी चित्रपटातील पावनेर ग मायेला करु हे गाणे ऐका.
ह्यातील पावनेर ह्या शब्दाचा काय अर्थ? पावनेर ग मायेला म्हणजे तरी काय?

पावनेर म्हणजे बहुधा पाहुण्यांची बोळवण करताना दिलेली भेट - वस्तू किंवा खाऊ.
मायेला म्हणजे आईला - अंबिका (गौरी) पाहुणी आली होती, ती आता पायरी उतरून माघारी निघाली आहे तेव्हा तिची ओटी मोत्यांनी भरून तिचा आदरसत्कार करूदे - असं आहे ते.

Pages