शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंझ्युमर फोरम साठी = ग्राहक मंच हे शासकीय भाषेतील रुप छानच आहे. पण 'मंच' ला प्लॅटफॉर्मचीही छटा प्राप्त असल्याने उद्या 'ग्राहक मंच' ला काय म्हणायचे असा प्रश्न ज्याला 'कंझ्युमर फोरम' ही संज्ञा माहीत नाही, त्याचा गोंधळ होऊ शकतो.

रोखठोक भाषेत फोरम = चव्हाटा म्हणणे ठीक होऊ शकेल.... चावडीला काहीसे व्यापक रुप आहे असे मला वाटते.

अन्यभाषेतील शब्दासाठी मराठी शब्द कोणत्या संदर्भात वापरायचा आहे हे सांगितले गेले तर नेमक्या अर्थछटेचा शब्द सुचवला जाईल.

भ.म. - अगदी बरोबर मला 'Maitri is a forum of volunteers based in Pune' या वाक्याच्या संदर्भात forum ला मराठी प्रतिशब्द हवा आहे.
वर दिलेले सगळे शब्द योग्यच आहेत पण या वाक्यात ज्या अर्थाने फोरम हा शब्द वापरला गेला आहे त्या करता चर्चागट, चव्हाटा, चावडी, मंच, व्यासपीठ पेक्षा अजून समर्पक शब्द कोणता असू शकेल का?

मला स्वतःला 'मंच' च ठीक वाटतोय. Happy

पावनेराबद्दल थोडीशी वेगळी माहिती:

शेतातल्या एखाद्या कामाचा फडशा पाडण्यासाठी जेंव्हा दोन-तीन गावच्या खास नातेवाईकांना हक्काने आमंत्रित केले जाते तेंव्हा कामाच्या शेवटच्या दिवशी यजमान सगळ्या पाहुण्यांना मांसाहारी मेजवानी देतो. त्या मेजवानीला पावनेर म्हणतात.

गुंतवणूक (इन्व्हेस्टमेंट) या विषयावरील एका इंग्रजी पुस्तकाचे मराठीत भाषांतर करायचे आहे.
यासाठी भाषांतराचा उत्तम अनुभव असणे आवश्यक आहे. (वित्त, अर्थ यासंदर्भातील भाषांतरांचा अनुभव असल्यास अजून चांगले).
इच्छुक लोकांनी माझ्याशी varsha0714@yahoo.com येथे संपर्क साधावा.

'तिसरे ' म्हणजे खाण्याचे शिंपले असे शब्दकोड्यात वाचले. कधी ऐकला नव्हता हा श्ब्द. कोणी प्रकाश टाकेल?

एका जन्म प्रमाणपत्राच्या तळात शा.फो.झिं.मु. - पुणे असं लिहिलंय.
शा = शासकीय
मु = मुद्रणालय असलं तर मधले फो. झिं. म्हणजे काय असेल?
sf.jpg

पुण्यात शासकीय फोटो झिंको मुद्रणालय हे बीजे मेडिकल कॉलेजच्या होस्टेल शेजारी आहे. चवीत बदल म्हणून तिथल्या कँटीनला बर्‍याचदा, अन त्यांच्या टीटी हॉलमधे टेबलटेनिस खेळायला भरपूरदा जात असू.
आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

गजानन तुम्ही ज्या इव्हेन्टचे वर्णन केले आहे त्याला इर्जिक म्हणतात. आमच्याकडे तर मांसाहारी जेवण देण्याचीही ऐपत नसे त्या वेळी पुर्‍या आणि गुळवणी आणि वांग्याची भाजी याची मेजवानी असे. ती एक सोशल सपोर्ट सिस्टीम होती. ज्या शेतकर्‍याकडे बैल नाहीत अथवा कमी आहेत त्याची नांगरट कम्युनिटी पद्धतीने केली जायची. हे काम उन्हाळ्यातल्या रात्री चांदण्यात थंडाव्यात केले जाई व शेतातच जेवण दिले जाई....
पावनेर शब्द त्याला लागू आहे की नाही माहीत नाही कदाचित महाराष्ट्रातल्या काही भागात तो प्रचलीत असावा....
पावनेर हा शब्द बहुधा आदरातिथ्य अर्थाने वापरला जात असावा नक्की माहीत नाही....
इथे एक लिन्क मायबोलीचीच सापडली आहे....
http://www.maayboli.com/node/12289

झकासरावच्या प्रतिक्रियेवरून इर्जिक म्हनजेच पावनेर असावे असे मलाही स्पष्ट झालेय..

झकास राव म्हणतो :-
डोळ्यासमोर अख्खी इरजिक घडली.

गावाकडचा थोडाफार अनुभव असल्याने रिलेट करु शकलोय.
अख्खा काळ उभा राहिला डोळ्यासमोर.

आमच्याकडे पावनेर म्हणतात ह्याला. पण पावनेर एवढ्या मोठ्या प्रमाणावर नसतो. अख्ख गाव नसत.
पण १५-२० बाप्पय तरी असतातच. घर शेकारण्यापासुन ते शेतातल कुठलहि काम पुर्ण होत.
तुमचे खुप खुप आभार.
मी पाहिलेले, अनुभवलेले पावनेर परत अनुभवण्याचा आनंद दिल्याबद्दल.

नताशा, तांदळाच्या अक्षता कुंकवाबरोबर चिकटून राहतात्.पण वाटाण्याच्या अक्षता (केल्याच तर :))वाटाण्याच्या आकार व वजनाने चिकटून राहणे शक्य नसते म्हणून 'दिल्यासारखे दाखवून काहीही न देणे' या अर्थाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या असे म्हणतात

नताशा, तांदळाच्या अक्षता कुंकवाबरोबर चिकटून राहतात्.पण वाटाण्याच्या अक्षता (केल्याच तर :))वाटाण्याच्या आकार व वजनाने चिकटून राहणे शक्य नसते म्हणून 'दिल्यासारखे दाखवून काहीही न देणे' या अर्थाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या असे म्हणतात

Pages