युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनघा दातार, छान आहे पाककृती. करून बघेन. ४ डबे आणले आहेत. १ डब्याच काहीतरी वेगळा पदार्थ करायचा आहे. केक, लाडू, खिर, आईस्क्रिम नेहमी बनवल जात अजून काही हटके पदार्थ हवा आहे. Happy

आरती., कोकोच्या वड्या? मिल्कमेड, मारी बिस्किट चुरा व कोको पावडर...

इथेही बघा : http://www.nestle-family.com/recipes/english/by-product-sweetened-conden...

मिल्कमेड वापरून चहा केलात का कधी? Wink मिल्कमेडचे काही थेंब बास होतात. माझ्या एका कोचिंग क्लास टीचरने त्यांच्या घरी मांजरीने दुधाचा फडशा पाडलाय हे लक्षात आल्यावर मिल्कमेड वापरून आमच्यासाठी चहा बनवला होता!

आरती एक सही सवाल गलत इन्सान से पुछ लिया तुमने Proud मी आणि पाकृ. दुरून देखिल संबंध नाही.
पण नेहमीच्या ओल्या नारळाच्या करंज्यांचं सारण मिल्कमेड घालून केलंस तर नक्की जमेल. दिनेशना विचार नाहीतर.

दक्षिणा, Happy
हो आता दिनेशदांना विपू करते.
प्राची काल रात्री म्.ब.चा विचार होता सर्व सामान गोळा करून किचनमध्ये दोन मि. उभी राहीली आणि विचार केला बिघडली तर Uhoh आणि परत सामान होत तिथे ठेवून दिल. Happy

माझ्याकडे, मिल्कमेड अगदी नुकतं बाजारात आलं असताना, जुन्या मासिकांत आलेल्या, मिल्कमेड वापरून केलेल्या श्री़खंड, केशरकुल्फी, शेवयांची खीर, कलाकंद, व्हॅनिला आइस्क्रीम (+ चॉकलेट सॉस) आणि मलई पेढे यांच्या पाककृती आहेत. यातली कुठली हवी असल्यास कळवा.

यांपैकी श्रीखंड केलंय. चव अगदी श्रीखंडासारखी लागली नाही, पण जे काय होतं ते फारच मस्तं लागलं.

घरी सत्यनारायणाची पुजा केलेली
संध्याकाळी मिच बाहेर असल्याने प्रसाद वाटप झाला नाही
आर्धे भांडे भरुन पंचाम्रुत आणी प्रसाद राहीलाय
गरम करुन नाष्टा म्हणुन मिच क्खाला २ ३ जणांना डब्यात दिला तरी राहिलाय आज उपवास आहे काय करु

पंचाम्रुत ज्युस मधे घातले तरी राहिले काय करता यील

प्रसाद आहे तो सगळ्यांना वाटून टाकला पाहिजे. पंचामृतही कुणाच्या मुखी लागो. तसेही ते फार टिकणार नाही.

पंचामृतही कुणाच्या मुखी लागो>> कुणाला देउ आता २ दिवस होत आले
मी आज सकाळी वाटी भर पिला आता घशात कसे तरी होतय

सिल्कच्या साडीच्या जरीच्या ब्लाऊजला घामाचे, परफ्युमचे डाग पडलेत. कसे जातील? कुठे विचारु हे नीट न कळल्याने ईथे विचारले. Sad

मी काल पहिल्यांदाच लाल मूळा घेतला. तो फक्त सॅलड मधेच वापरतात कि त्याची भाजी पण करतात?
>> काहीपण कर पण त्याची सालं काढू नकोस. नाहीतर तो पांढरा मुळा होईल. (स्वानुभव!!)

पाने जरा पातळ असातात त्यामूळे खुडा करण्यासाठी चांगली, मूळे आंबट वरणात चांगले लागतात.
मी असे मूळे, राजेळी केळी आणि उकडलेले ओले शेंगदाणे यांशी एकत्र भाजी करत असे. दोन्हीच्या चकत्या करून घ्यायच्या, आणि जिरे व मिरची यांच्या फोडणीवर आधी दाणे आणि मग या चकत्या परतायच्या. केळी जर जास्त पिकलेली असतील तर आधी मूळ्याच्या चकत्या शिजू द्यायच्या. ओले खोबरे घालायचे. ही भाजी दिसतेही छान.

आभारी आहे नंदिनी, दिनेशदा .
दिनेशदा वेगळी रेसीपी. करून बघीन.
दिनेशदा माझ्या साबा आमटीत सफेद मुळ्याची पाने आणि चकत्या टाकतात. छान लागते . या मुळ्याची पाने जरा वेगळी वाटली. म्हणून प्रश्न पडला की घ्यायचि की नाही?

खुडा हा प्रकार नक्कीच आवडेल, पाने बारीक चिरून घ्यायची. त्यात हवा तर कांदा / दाण्याचे कूट घालायचे. मीठ आणि लिंबूरस टाकायचा. वरून फोडणी द्यायची. अगदी आयत्यावेळी जराचे चुरडायचे.

१ किलो चणे आहेत. त्यात काहींना होल्स पडलेले दिसले. फेकून देऊ? की वापरता येतील कशात? (पूर्ण उकडून येता जाता खायला तत्सम काही प्रकारे?) (काय ती नविन वर्षाची सुरूवात. Uhoh )
सगळ्या युक्त्या मागणार्‍या आणि सांगणार्‍यांनाही नविन वर्षाच्या शुभेच्छा बरं का! Happy

फेका.

Pages