युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कोणि विकतच्या शेवयांचि खिर कशि बनवायचि सांगेल का?
मला येते पण अजुन स्वादिष्ट कशि बनवायची ते सांगा.

४-५ दिवस का पाणी भरून ठेवतेस?
>>
फ्रीजमध्ये पाणी ठेवलं तर रहातंच की ४-५ दिवस. दोघांना कितीसं लागणार..

ते झालंच पण मग थर जमतोय याचा अर्थ काहीतरी आहे पाण्यात.
जमलं तर रोजचं जेवढं लागतं तेवढंच भरायचं बघ.

हो, पण बाटल्या साफ कशा करायच्या हा मुख्य प्रश्न आहे. तळाशी नीट साफ करता येत नाहीत ब्रशनेही.

मला कोणि विकतच्या शेवयांचि खिर कशि बनवायचि सांगेल का?
मला येते पण अजुन स्वादिष्ट कशि बनवायची ते सांगा.

अमृता विकतच्या शेवयांत वेगळं काही नसतं. सेम तुपावर परतून दुधात शिजवायच्या. अधिक स्वादासाठी वेलदोड्याची पुड, थोडा खवा किंवा थेट पेढे चुरडून घालायचे. चारोळ्या, काजू, बेदाणे पण चालतील.

बाटली कशी धुतेस योडे?
>>
गरम पाणी आणि डिटर्जन्ट पावडर घालुन ठेवते थोडा वेळ आणी नंतर बाटल्या साफ करायच्या ब्रशने घासते पण त्याने नीट घासल्या जात नाही.

कंटेनर्स नीट साफ करता येतील असेच वापर.
>>
म्हणजे कसे नेमके?? हात घालुन घासता येतील अशा बाटल्या??

गरम पाणी + साबण असे भरून ठेवणे १-२ तास आणि मग अर्धे पाणी टाकून बंद बाटली जोरजोरात हलवणे जेणेकरून त्या पाण्याच्या फोर्सने तो थर निघून जाईल.
ट्राय करून बघ.
कदाचित जमेल कदाचित नाही.

योडे मला एक सांग हे पाणी तु फ्रिजात ठेवतेस की बाहेर? बाहेर साठवायचं असेल तर छोटं पिंप आण की ते नीट साफ करता येईल शिवाय त्यात तुरटी फिरवलीस तर पाणी ही थोडं अजून पिण्यायोग्य मिळेल.

दक्षे, छोटं पिंप फ्रिजमध्ये ठेवु का?? Proud

फ्रिजमध्ये बाटल्या ठेवायला स्टीलच्या आणु?? पण मग असं वाटतं की ह्या बाटल्यांमध्ये खराब झाल्या तर दिसतं तरी. स्टीलच्या बाटल्यांमध्ये ते ही दिसणार नाही.

मोठ्या तोंडाच्या बाटल्या बर्‍या पडतात. सध्या टपरवेअरचं नवं डिझाईन आहे ते चांगलं आहे, माझा अख्खा हात बाटलीच्या तळापर्यंत जातो. आणि बाटली धुतल्यावर साबण पूर्ण निघून जाऊ दे, धुतल्यानंतर पूर्ण कोरडी होऊ दे बाटली, मगच पाणी भर. सहा बाटल्या असतील तर तीन आज आणि तीन उद्या अश्या धुवायच्या.

योडी येडी.. Proud
स्टिलचे जग मिळतात फ्रिजात बसणारे ते आण.

>>पण मग असं वाटतं की ह्या बाटल्यांमध्ये खराब झाल्या तर दिसतं तरी. स्टीलच्या बाटल्यांमध्ये ते ही दिसणार नाही. >> खराब दिसेपर्यंत साफ करायची वाट पहातेस? Angry २ दिवसातून आपणहून साफ करायचं.

मला मध्यंतरी एक फॉरवर्ड मेल आली होती त्यात ठराविक परिमाणाची (म्हणजे प्लास्टीक पिशवीसाठी जसं मायक्रॉन हे परीमाण वापरतात तसं बाटल्यांचंही असतं) प्लास्टिकची बाटली ठराविक दिवसच वापरावी, दीर्घ कालावधीसाठी वापरू नये असं लिहिलं होतं.
म्हणजे बाटली चांगली असली तरी काही दिवसांनी ती रिसायकलला द्यावी.

स्टिलचे जग मिळतात फ्रिजात बसणारे ते आण
>>
आता मलाही असंच वाटतंय की मोठ्या तोंडाचा जग/बाटली घ्यावी जेणेकरुन साफ करता येईल नीट.

मंजूडी बरोबर आहे तुझं. प्लॅस्टिकच्या बाटलीच्या तळाशी त्रिकोणात एक आकडा लिहिलेला असतो. तो जितका कमी तितकी ती बाटली निकामी.
बिसलरीच्या वगैरे बाटल्या नीट पाहिल्या तर त्रिकोणात १ आकडा असतो, त्या एकदाच वापरून क्रश करायच्या असतात.
पण जास्ती आकडेवालं प्लॅस्टीक जास्ती चांगल्या प्रतीचं अशा बाटल्या महाग असतात. माझी ऑफिसच्या पाण्याची बाटली मी २०० ला घेतली, त्यात ७ आकडा आहे. पण मी ६-८ महिन्यांनी तशीही बाटली बदलतेच.

प्लॅस्टिकच्या बाटलीच्या तळाशी त्रिकोणात एक आकडा लिहिलेला असतो.>> येस्स... करेक्ट!! अशीच माहिती त्यात लिहिली होती. आता इच्छुकांनी त्याप्रमाणे सर्च करून बाकी माहिती मिळवा.

मिल्कमेडचे पदार्थ सुचवा. >>>> सायोची फेमस मलई बर्फी.

फ्रीजमध्ये ठेवायला काचेच्या बाटल्या पण छान वाटतात, पण त्यातही साफ करायचा प्रॉब्लेम येईल ना.

मला मध्यंतरी एक फॉरवर्ड मेल आली होती त्यात ठराविक परिमाणाची (म्हणजे प्लास्टीक पिशवीसाठी जसं मायक्रॉन हे परीमाण वापरतात तसं बाटल्यांचंही असतं) प्लास्टिकची बाटली ठराविक दिवसच वापरावी, दीर्घ कालावधीसाठी वापरू नये असं लिहिलं होतं.
म्हणजे बाटली चांगली असली तरी काही दिवसांनी ती रिसायकलला द्यावी.
>>> +१
कुठल्याही प्लास्टिक च्या वस्तुंवर फूड ग्रेडेड प्लास्टीक ची खूण असेल तरच ते कंटेनर्स पाणी किंवा कोणतेही अन्न पदार्थ साठविण्यासाठी वापरावेत.

खरे म्हणजे अन्न साठविण्यासाठी केला जाणारा प्लास्टीक चा वापर ह्या विषयावर एक सेपरेट धागा काढायला हवा. मी बर्‍याचदा पाहिले आहे की बिसलेरी च्या बाटल्या ज्या एकदा वापरून फेकून द्यायच्या असतात त्यात बरेच लोक पाणी साठविणे, फ्रीज मध्ये त्या बाटल्यांत पाणी भरून ठेवणे इत्यादी प्रकार करतात. त्या बाटल्यांवर लिहिलेल्या instructions काळजीपूर्वक वाचल्या तर लक्षात येईल की त्यांवर लिहिलेले असते की वापरून झाल्यावर फेकून देणे. हे कळल्यापासून मी तसल्या बाटल्यांचा मोह ठेवतच नाही. वापरून झालेल्या तसल्या बाटल्या सरळ क्रंच करून केराच्या डब्यात जायला हव्यात. चायना प्लास्टीक तर सगळ्यात बेक्कार!

बादवे, सेपरेट धागा काढतेय. तिथे चर्चा करूया!

काचेच्या बाटल्या पण छान वाटतात,
>>
माझे हात फाटके आहेत त्यामुळे काचेच्या बाटल्यांवर फुल्ली..

योडे तु धांदरट आहेस तु काचेच्या वाट्याला जाऊ नकोस. अगदी गेलीसच तर ते डिपार्टमेंट महेशकडे सोपव. Wink

अमृता,

शेवयाच्या खीरीत एव्हरेस्ट्चा केशरी दूध मसाला घालायाचा. शिरा पण छान होतो तो मसाला घालून.

Pages