Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हणजे सॅ मे मधे पण ब्रेड
म्हणजे सॅ मे मधे पण ब्रेड टोस्ट होऊ शकतो ना?>> होऊ शकतो पण टोस्टरइतका कडक आणि एकसारखा होत नाही. सँडविच मेकरला बर्याचदा ग्रिलसारख्या खुणा असतात. तसेच दक्षीने फोटो दिलाय तसा मेकर असेल तर डायरेक्ट पीसेस होऊनच बाहेर येतात. माझ्या सँडविचमेकरमधे असे पीसेस येत नाहीत.
माझ्याक्डे फिलिप्सचा अऑटो पॉप अप टोस्टर आणि प्रेस्टिजचा सँडविच मेकर दोन्ही होते. टोस्टरचा जास्त काही वापर होत नसल्याने ठेवून ठेवून खराब व्हायला लागला म्हणून एक्चेंजमधे घालून टाकला. सँडविच मेकरमात्र आठवड्यातून एकदातरी वापरला जातो. रच्याकने, माझ्याकडे गॅसवर धरून सँडविच करायचं पण एक आहे. एखाददुसरे सॅंडविच असेल तर त्यामधे करायला बरं पडतं.
स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे
स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे
अॅक्चुली खुप सारे पे-बॅक
अॅक्चुली खुप सारे पे-बॅक पॉइन्टस जमले आहेत. त्यामधुन घेणार होते टोस्टर.
तिथे सॅ मे अव्हेलेबल नाहिये. आता काय घेऊ मग? युक्ती सांगा.
अरे हो की मंजूडी! पुढ्च्या
अरे हो की मंजूडी!
पुढ्च्या वेळी लक्षात ठेवेन.
अमृता तुम्ही जास्त फिलिन्ग
अमृता तुम्ही जास्त फिलिन्ग भरत असाल. कमी भरा. अगदी एक मोठा चमचा. शिवाय वरील ब्रेडला
थोडेसे पाणी लावून चिकटवता येइल. ब्रेडच्या कडा कापून सँडविच बनवला तर सुबक दिसतो.
टोस्टर मध्ये खरा टोस्ट होतो. माझ्याकडे आहे त्यात अगदी हलका सोनेरी ते ब्राउन काळपट परेन्त सेटिन्ग आहे. मध्ये कॅन्सल पण करता येते. पूर्वी गोल्ड सीलच्या जाहिरातीत व्हायचे तसे ब्रेड सोनेरी भाजून वर रूम टेंपरेचरचे बटर सोडायचे. हातानेच दोन तुकडे करायचे व मधील भाग खायचा.
सॅडविच मेकर मधून बाहेर काढताना स्विच बंद करा नाहीतर शॉक बसू शकतो.
रच्याकने, माझ्याकडे गॅसवर
रच्याकने, माझ्याकडे गॅसवर धरून सँडविच करायचं पण एक आहे. एखाददुसरे सॅंडविच असेल तर त्यामधे करायला बरं पडतं.>>> माझ्याकडेपण आहे. ते वापरून जास्त पटापट होता सँडविचेस.
टोस्टरसाठी फिलिप्सचा टोस्टर जास्त चांगला आहे. कडक टोस्टही होतो त्यात.
मंजूडी तेल जास्त न वापरताही
मंजूडी
तेल जास्त न वापरताही इतक्या सुंदर चवीचे फो.पो. होऊ शकतात याबद्दलच लै लै खुश आहे मी सध्या! याच प्रकारे एकदा साबुदाणा खिचडी करून बघावी असे वाटते आहे.
होणार, चांगली(च) होणार(च).
होणार, चांगली(च) होणार(च). गुजराथी लोकं तशीच करतात सा. खिचडी वाफवून. पण आपल्याला असे वाटते की तुपावर परतली की खमंग होते. सोशल कंडिशनिंग यू नो
आणि मग जेव्हा मावेमधे झटपट होते तेव्हा आपसूक 'अय्या!' असं होतं.
(No subject)
अमृता गायकवाड ब्रेडात फिलिंग
अमृता गायकवाड
ब्रेडात फिलिंग भसाभसा नका भरू
ए पण खिचडी परतायला पाहिजे ना?
ए पण खिचडी परतायला पाहिजे ना? नैतर पुण्यात तरी फेल समजतात.
अमृता गायकवाड ब्रेडात फिलिंग
अमृता गायकवाड
ब्रेडात फिलिंग भसाभसा नका भरू फिदीफिदी>>>>
मी भसाभसा भरत नाहि टोमेटो,कांदा,बटाटा,काकडी,बिट, शिमला मिर्चि असेल तर प्रत्येकि एक किंवा दोन स्लाईज
घरात जमा होत असलेल्या सायीचे
घरात जमा होत असलेल्या सायीचे काय करायचे ?
तुप आधीच आहे केलेले. ते संपल्याशिवाय पुन्हा करणार नाही.
कामवालीला पण देऊन झालेय नुकतेच.
नुसती साय किंवा तुप करुन कोणाला देता येते का? तसे असेल ते ही सुचवा .
सावली, तुप एखाद्या देवळात
सावली, तुप एखाद्या देवळात निरांजनासाठी देता येईल.
कमी स्निग्धांश असलेले दूध मिळू शकते.
सावली, साय उरतेच कशी?
सावली, साय उरतेच कशी?
रुचिरामधे सायीच्या वड्या नावाचं काहीतरी वाचलं होतं. खुप वर्षं झाली. आता आठवत नाही. रुचिरा असेल तर त्यात शोधुन बघ.
नुसती साय किंवा तुप करुन कोणाला देता येते का? तसे असेल ते ही सुचवा .>>>
अनाथाश्रमात देवु शकतेस, पण मुलांना मिळण्याची खात्री असेल तरच. नाहीतर तुप कढवुन शिरा किंवा काही स्वीट्स बनवुन नेवुन वाटु शकतेस.
स्वार्थ आणि परमार्थ वाला ऑप्शन म्हणजे - तुप कढवुन मेडला देवुन टाक.
तुझ्या नातेवाइक/फ्रेंड्समधे कोणी प्रेग. किंवा नुकतीच बाळ झालेलं असेल तर त्यांना भेटायला गेल्यावर देवु शकतेस.
सावली, माझा नंबर आहे की ग
सावली, माझा नंबर आहे की ग तुझ्याकडे
मंजुडे, मावेत साखी कशी करतेस? इमेललस तरी चालेल
ते संपल्याशिवाय पुन्हा करणार
ते संपल्याशिवाय पुन्हा करणार नाही.

)
>>>
हा रूल का पण?
दोन - तीन वेळची साय जमली की करायचे तूप. तूप चांगले कणीदार रवाळ होत असेल तर कितीही जुने असले तरी शिळे होत नाही. मी तर तूप करत राहते आणि बरणीत साठवत जाते. आधीची बरणी संपली की ही बरणी वापरायची आणि मग जुनी धुवायला टाकायची. ती धुवून आली की पुढचे तूप तीत साठवत जायचे. असा क्रम आळीपाळीने चालतो माझा!
अगदीच खूप तूप झाले की ऑफिस टीम मध्ये किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये ज्यांच्या घरी तूप बनत नाही पण जेवणात घरचे तूप आवडते त्यांना देणे + देवळात नैवेद्यासाठी देणे + मेड ला देणे इ प्रकार अधून मधून करतेच. तसेही घरात तूपाचा वापर रोज असतोच त्यामुळे जास्त कधीच होत नाही.
(ऑफिस मध्ये मी "तूपवाली" म्हणून फेमस होणारे लवकरच!
सावली, साय माझ्याकडे दे
सावली, साय माझ्याकडे दे पाठवून
मी चहा पीत नसल्याने, बऱ्याच
मी चहा पीत नसल्याने, बऱ्याच वेळा थर्मासमध्ये कॉफी नेण्याची वेळ येते. पण थर्मासमधल्या कॉफीला एक विचित्र वास येतो, तसेच खूप धुतल्या नंतरसुद्धा थर्मासचाही वास जात नाही. कृपया युक्ती सांगा!
कमी स्निग्धांश असलेले दूध >>
कमी स्निग्धांश असलेले दूध >> चव आवडत नाहीये.
आमच्या घरात मनीमाऊ नसल्याने साय उरते
निंबुडा, जुन्या तुपाला वास येतो तो आवडत नाही. आणि पुन्हा इतके तुप संपवायचा प्रश्न उरतोच ना.
कविन, मंजूडी अरे नक्कीच.
दोघींपैकी कोण भेटतय यावेळची साय घ्यायला? खरच. उद्या परवा केव्हाही चालेल. फोनवर बोलुन वेळ ठरवता येईल.
अनया, कॉफी + मिल्क पावडर +
अनया, कॉफी + मिल्क पावडर + साखर अशी पूड बरोबर नेल्यास त्यात गरम पाणी घालून इन्स्टन्ट कॉफी तयार करता येते. बाजारात बहुतेक तसे प्रिमिक्स सॅशे / स्टिक्सही मिळतात.
अशाच प्रकारे कोको + मिल्क पावडर + साखर नेऊन त्याचे हॉट चॉकलेट बनवून पिऊ शकता.
कॉफीत वेलची/वेलदोडा भरपूर घातलात तर कदाचित कॉफीचा विचित्र वास जाणवणार नाही.
थर्मासचा वास घालवण्याच्या युक्तीबद्दल मी अडाणी! मागे कुठेतरी थर्मास ज्या गरम पाण्याने धुतो त्यात लिंबाची चकती घाला असे वाचले होते. परंतु इथे कॉफी + लिंबू यांचा काहीतरी संमिश्र वास तयार होईल की काय अशी शंका वाटते!
अनया, थर्मॉस दोन दिवस
अनया, थर्मॉस दोन दिवस झाकणाशिवाय ठेवला तर वास जाईल. त्यात थोडा खायचा सोडा घालून धुवायचा आणि मग वाळवायचा. उलटा ठेवला तर थोडा कलता ठेवायचा.
तसेच वर अकु ने लिहिल्याप्रमाणे, त्यात गरम पाणी न्यायचे व कॉफिचे मिश्रण कोरडे वेगळे न्यायचे. ( मुंबईत आहात का ? मुंबईत नील या कंपनीचे चहा / कॉफी प्रिमिक्स चांगले मिळतात. चहामधे साधा / आले / वेलची / मसाला / गवती असे वेगवेगळे स्वाद आहेत. )
तर, इथे विचारून आणि इष्टेप
तर, इथे विचारून आणि इष्टेप बाय इष्टेप क्रुती मिळूनही मी वड्यांचा आकार सक्सेसफुली बिघडवला!
पण चवीला फर्मास, खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत झाले होते असं इकडून प्रशस्तिपत्र मिळालं!
डाळ आणायची राहिली होती, म्हणून मूग-मसूरडाळ मिक्स आणि मसाला संपलाय हे बाकीचं सामान कढईत खळखळून उकळत असताना दिसलं, म्हणून छोले मसाला, गरम म. , गोडा म. हे तीन मसाले अंदाजाने ढकलून केलेलं सांबार! अगदीच वाईट नाही, "नेहमीसारखं नाहिये: पण वडे छान झालेत आणि चटणीपण" म्हणून सगळे वडे खलास.
त्या दिवशी एकूणच बेत त्रांगडा होता. म्हणजे मधे छानछान भोक नसलेले मेदूवडे, आणि तूरडाळ आणि सांबारमसाला विरहीत सांबार!
चटणी नीधपने दिलेली.
अरारा !!! सांबारात ह्या डाळी
अरारा !!! सांबारात ह्या डाळी नी मसाले
चटणी नीधपने दिलेली. <<< कॉलर
चटणी नीधपने दिलेली. <<<
कॉलर ताठ... फी पाठवून देणे
नीधप चटण्या कधीपासून करून
नीधप चटण्या कधीपासून करून द्यायला लागली? ऑ?
शूम्पे कित्ती दिवसांनी? परवा
शूम्पे कित्ती दिवसांनी?
परवा मला चटणीची रेसिपी हवी होती तर नी नेच दिली होती. मागे तू दिलेलीस आठवतेय का?
ते सांबार कृपया माका चू मध्ये
ते सांबार कृपया माका चू मध्ये लिहून ठेवा.
नी चटणी रेश्पी द्या.
तूरडाळ आणि सांबारमसाला विरहीत
तूरडाळ आणि सांबारमसाला विरहीत सांबार!<< मग याला सांबार का म्हणावे?

झटपट सांबार मसाला करायचा झाला तर थोड्याशा तेलावर धणे, कढीपत्ता, लाल मिरची, उडीद डाळ, थोडीशी मेथी, हिंगाचा खडा इ. चांगली खमंग परतून घेऊन मिक्सरला फिरवणे. अगदीच सांबाराची चव आली नाही तर किमान "दाक्षिणात्य" चव तरी येतेच.
नी चटणी रेश्पी द्या. <<
नी चटणी रेश्पी द्या. << दिलीये की
Pages