Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या चण्याचे पीठ करून कदाचित
त्या चण्याचे पीठ करून कदाचित आंघोळीला वापरता येऊ शकेल. पण शक्यतो फेकून दिलेले उत्तम. जैविक खतात रूपांतरित करा!
ते चणे वापरायची इच्छा असेल तर
ते चणे वापरायची इच्छा असेल तर भिजवुन वापरता येतील.
किडा लागल्याने पोकळ झालेले चणे(कोणतेही कडधान्ये) पाण्यात भिजवल्यास सुरवातीला तरंगतात, जे बाजुला काढुन टाकता येतील. न किडलेले चणे तळाशी राहतील.
पुजे साठी आणलेली विड्या ची
पुजे साठी आणलेली विड्या ची पाने आहे
रोज जेवण झाल्यावर खातिये
एकदा ज्युस केला [दुध्+विड्याची पाने +गुल्कंद [एका ओळखीच्या काकुंनी सांगितले होते छान होता ज्युस
आजुन १० १५ आहेत शिल्लक काय करु?
हौस असेल तर त्यात ओल्या
हौस असेल तर त्यात ओल्या मटाराचे / तुरीचे सारण भरून वडे करता येतील ( रुचिरा मधे कृती आहे. )
विडे करुन, कुटून फ्रीजमधे वाळवता येतील. हवे तेव्हा खाता येतात.
एकदा ज्युस केला
एकदा ज्युस केला [दुध्+विड्याची पाने +गुल्कंद >>>
ज्युस म्हणायचे आहे की मिल्कशेक?
ताम्बूल करुन फ्रिजात टाकून
ताम्बूल करुन फ्रिजात टाकून ठेवा
रोज खाता येइल
विड्याच्या पानांची भजी झक्कास
विड्याच्या पानांची भजी झक्कास लागतात! नेहमीप्रमाणे भजीचे पीठ भिजवून त्यात विड्याची पाने बुडवायची व भजी तळायची. ताज्या विड्याच्या पानांची भजी तर आणखी मस्त लागतात. फक्त पानांचा तिखट करकरीतपणा घालवण्यासाठी थोडा वेळ त्यांना गार पाण्यात भिजवून ठेवायचे.
१०-१५ च पानं शिल्लक आहेत
१०-१५ च पानं शिल्लक आहेत ना?
http://www.maayboli.com/node/13514 इथल्या रेसिपीने मुखवास करुन संपवता येतील. (हि माझी रिक्षा नाही :फिदी:)
हि माझी रिक्षा नाही >
हि माझी रिक्षा नाही > ट्रॅक्टर, ट्रेलर, जेसीबी असू शकेल...
धन्यवाद सर्वांचे. मी चणे
धन्यवाद सर्वांचे. मी चणे फेकून दिले.
विड्याची पाने कात्रीने बारीक
विड्याची पाने कात्रीने बारीक कातरायची. किसलेले सुके खोबरे,बडीशोपेची पुड,काथाची पुड,अगदी चण्याच्या डाळी इतका खायचा चुना,गुलकंद,लवंग-वेलचीची पुड [जर असेल तर च थंडाई/पानाचा मसाला--पान बहार अर्धा टी स्पून] या पैकी सहज उपलब्ध जिन्नस हाताने छान कालवुन एकत्र करुन ठेवाव्या.गुलकंदामुळे विडा ओलसर होतो.एखाद्या डब्यात भरुन फ्रीज मधे ठेवावे. घरगुती मुखशुद्धीचा विडा तयार होईल
सगळ्यानां धन्स मिल्कशेक म्हणा
सगळ्यानां धन्स
मिल्कशेक म्हणा ज्युस म्हण
स्वयंपाकघर रिनोव्हट करताना
स्वयंपाकघर रिनोव्हट करताना खाली बसूनदेखील स्वयंपाक करता यावा अशी साधारण 3 फूट रुंदीची जागा ठेवण्याचा विचार आहे. त्याठिकाणी बसण्यासाठी 6 इंचाचा छोटा कट्टा करावा. तेथेच पुढे सिंगल शेगडी/ऊर्जा शेगडी/इंडक्शन असे काहीतरी ठेवावे असा डोक्यात विचार आहे. दररोजची पोळी भाकरी करताना किंवा जेव्हा मोठा स्वयंपाक/भाजणीसारखा उपद्व्याप असेल त्यावेळी सोईस्कर होईल असे वाटते. नेटवर अशा स्वरूपाचे डिझाइन कोठेच दिसले नाही. आर्किटेक्टला ही संकल्पना पचनी पडली नाही. सध्याच्या ओट्याला तात्पुरते टेबल जोडून प्रयोग करून बघितला. आराम वाटतो. पण अजून खातरी नाही. एका ठिकाणी गुजराती स्टाईलने खुर्चीच्या उंचीचा ओटा पाहिला होता. मांडी घालून किंवा एक पाय खाली सोडून स्वयंपाक करता येतो. कायम उभे राहून स्वयंपाक केल्यामुळे पाठीचे दुखणे लागू शकते का?
उपरोक्त प्लॅन सोईस्कर होईल का किंवा यामध्ये काय-काय त्रुटी असू शकतील यासंदर्भात आपणाकडून मार्गदर्शन हवे आहे.
हरिहर, किचन कॅबिनेट मधल्या
हरिहर, किचन कॅबिनेट मधल्या सर्वात खालच्या ड्रॉवरमधे ग्यासची शेगडि इ. बसेल अशी सोय करता येईल. काम झाले की गायब करता येईल. खालीच बसून स्वयंपाक करणार असा हट्ट असलेले लोक अजूनही आहेत जगात.
- अनुभवी इब्लिस.
>>>>>विड्याची पाने कात्रीने
>>>>>विड्याची पाने कात्रीने बारीक कातरायची. किसलेले सुके खोबरे,बडीशोपेची पुड,गुलकंद,लवंग-वेलचीची पुड [जर असेल तर च थंडाई/पानाचा मसाला--पान बहार अर्धा टी स्पून] या पैकी सहज उपलब्ध जिन्नस हाताने छान कालवुन एकत्र करुन ठेवाव्या.गुलकंदामुळे विडा ओलसर>>>>><<
सुलेखा ह्यांनी लिहिलेले हे फक्त वरचे मिश्रण घालून आईस्क्रीम करा. पान आईसक्रीम म्हणून छान लागते. मी केलेली नाही पन खाल्लीय.
स्वयंपाकघर रिनोव्हट करताना
स्वयंपाकघर रिनोव्हट करताना खाली बसूनदेखील स्वयंपाक करता यावा अशी साधारण........उपरोक्त प्लॅन सोईस्कर होईल का किंवा यामध्ये काय-काय त्रुटी असू शकतील यासंदर्भात आपणाकडून मार्गदर्शन हवे आहे.
>>>>
हरिहर,
तुमची ही पोस्ट मी खालील ध्याग्यावर पेस्ट केली आहे. (त्यावरील इब्लिस ह्यांच्या प्रतिक्रियेसह). कृपया पुढील चर्चा तिथेच करावीत.
होम इंटिरिअर डेकोरेशन अर्थात घराची अंतर्गत सजावट
तसे केल्यास होम इंटिरिअर डेकोरेशन शी संबंधित सर्व चर्चा त्याच धाग्यावर एकत्र राहील.
काल चाट पार्टी केली. खूप रगडा
काल चाट पार्टी केली. खूप रगडा उरलाय. आज परत रगडा पॅटीस/ पा पु नको वाटतयं. काय करता येईल त्या रगड्याचं ?
तोषवी, रगडा चांगला फ्रीज
तोषवी, रगडा चांगला फ्रीज होतो. ( जशा अनेक उसळी ) झिपलॉक किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात फ्रीज कर आणि पुन्हा खावेसे वाटेल तेव्हा
र. पॅ. च खा !
इन्स्टंट पॅटीस साठी इं. ग्रो. मधून फ्रोजन आलू टिक्की (हलदीरामची छान असते) आणून तळायची किंवा फ्रोझन हॅश ब्राऊन बेक करायचे.
ताजा केलेला पातळ पोह्याचा
ताजा केलेला पातळ पोह्याचा चिवडा जरा सादळल्यासारखा लागतोय
पोहे कमी भाजले गेले किंवा फोडणी नीट झाली नाही बहूतेक. काय करता येईल की परत कुरकुरीत होईल?
सगळं गरम केलं तर मीठ-साखर वितळून अजूनच चिवट होईल का?
थोड्या प्रमाणात १-१ मिनिट
थोड्या प्रमाणात १-१ मिनिट मावे करून पहा...
madhura tujhi fodnitali
madhura tujhi fodnitali mirchi kurkurit nai jhali kadachit. chivda 1 min microwave kar. dehumidifing che setting asel tar best.
मधुरा, जेव्हा चिवडा खायचा
मधुरा,
जेव्हा चिवडा खायचा असेल तेंव्हा जेव्हडा संपणार असेल तेव्हडाच चिवडा गरम करावा
व गार झाल्यावर लगेच खाल्यास पुन्हा कुरकुरीत लागतो.
चेरी टॉमेटो सॅलड शिवाय अजुन
चेरी टॉमेटो सॅलड शिवाय अजुन कशात वापरता येतील?
पिझ्झा मधे अर्धा कापून चांगला
पिझ्झा मधे अर्धा कापून चांगला दिसतो / लागतो. पण त्याचा सुंदर आकार आणि रंग बघता, तो शक्यतो शिजवू नये असे वाटते. परवाच इथल्या फूड चॅनेलवर तो ऑलिव्ह ऑईलमधे जरासाच परतून त्यावर हर्ब्ज आणि मीठ मिरपूड घालून, स्टार्टर म्हणून टोस्ट बरोबर ठेवलेला दाखवला.
थॅन्क्स दिनेशदा...
थॅन्क्स दिनेशदा...
सामी, माबोवरच्या पाकृ चेरी
सामी, माबोवरच्या पाकृ चेरी टोमॅटोज वापरून :
cheese tomato starter,
गोभी टकाटक आणि पुदिनावाले आलू गोभी
चिवड्याच्या टीपा दिलेल्या
चिवड्याच्या टीपा दिलेल्या सर्वांना धन्यवाद :). टोस्टर अवन मध्ये थोड्या प्रमणात गरम करून गार केला, आधीपेक्षा छान लागला.
आज पहिल्यांदाच घरी फालुदा
आज पहिल्यांदाच घरी फालुदा केला. म्हणजे 'लझीझ' की कायसं नाव असलेल्या पाकिस्तानी कंपनीचे फालुदा मिक्स आणुन शिजवुन सेट केले. चांगले लागले. पण त्यात खुप रंग आणि इसेन्स होता..... ते जरा खटकले. मुलींसाठी पुन्हा असा फालुदा करावा की नाही असाही विचार आला. दुसरे एखादे कमी रंगीत असे शक्यतोवर भारतीय कंपनीचे फालुदा मिक्स माहिती आहे का? किंवा घरीच फालुदा कसा करता येइल? त्या नुडल्स कसल्या बनवलेल्या असतात?
वत्सला, 'रॉयल'चे फालुदा मिक्स
वत्सला, 'रॉयल'चे फालुदा मिक्स चांगले आहे.
बघते इं ग्रो मध्ये मिळतय का
बघते इं ग्रो मध्ये मिळतय का ते!
Pages