Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माफ कर दक्षे पण तू किती
माफ कर दक्षे पण तू किती दिवसांच्या पिशव्या आणून ठेवतेस?
फ्रीझरमधे म्हणजे एक दिवसापेक्षा जास्त वेळ अडीनडीपुरते, अपवादात्मक वेळांना ठेवणे ठिके.
शक्यतो आज आणलेले दूध उशीरात उशीरा उद्यापर्यंत तापवून ठेवावेच.
रेग्युलर आणायला शक्य नसेल तर मग ते कार्टनवाले दूध का नाही ट्राय करत? ते तापवाबिपवायचे काही नसते.
सायो आणि नी + १ दक्षिणा,
सायो आणि नी + १
दक्षिणा, दुधाची पिशवी कापून दुधाचा बर्फ काचेच्या भांड्यात घेऊन मावेत ठेवून डिफ्रॉस्ट करता येईल.
कधीमधी जर वेळ आली (प्रवासाहून
कधीमधी जर वेळ आली (प्रवासाहून येणार आहोत आणि आल्या आल्या दूध आणायला जमणार नाहीये तर आधी फ्रीझरमधे आणून ठेवले) तर मी तो दगड, पिशवी सोलून काढून दुधाच्या पातेल्यात ठेवते. १०-१५ मिनिटांनी अगदी बारिक गॅसवर ठेवते. नेहमीपेक्षा जास्त वेळ लागेल उकळायला अर्थातच पण शक्यतो दूध फाटत नाही.
नी मी दूध साठवून ठेवत नाही.
नी मी दूध साठवून ठेवत नाही. आणल्या आणल्याच तापवते. अगदी कधी मधी जर आणलं आणि तापवण्याच्या कंटाळ्यामुळे फ्रिजर मध्ये राहिलं तर ..... साठवून ठेवत नाही. फक्त मागच्या आठवड्यात दूध संपलं आणि इमर्जन्सी पिशवी फ्रिजर मध्ये होती तिला नॉर्मल ला आणायला वेळ लागला म्हणून विचारून ठेवलं.
हा मग ठिके.
हा मग ठिके.
आत द्रवपदार्थ असलेली कुठलीही
आत द्रवपदार्थ असलेली कुठलीही प्लॅस्टीकची पिशवी मावेत तशीच ठेवू नये. ( स्फोट होईल ). ती बाहेर काढून आपोआप डिफ्रॉस्ट होऊ द्यावी नाहीतर पिशवी फाडून आतला बर्फ, मावेसेफ बोलमधे ठेऊन मावेत डीफ्रॉस्ट करावी.
दिनेश, थोडक्यात वाचले.. मी
दिनेश, थोडक्यात वाचले.. मी मावेत ठेवायचा विचार करत होते.
कारण मावे बरोबर मिळालेल्या पुस्तकात पुसटसं वाचल्याचं आठवत होतं.
कोणतीच सील्ड गोष्ट नाही ठेवू
कोणतीच सील्ड गोष्ट नाही ठेवू मावेत जास्त वेळ. ३० से पेक्षा जास्त. जर गरम हवा/ वाफ जायला जागा नसेल तर ती चीज स्फोट होणारच. शास्त्र आहे. कॉर्न तसे पॉप होते. अंडी फुटतात इत्यादी.
मैत्रीणीचे डोहाळेजेवण करायचे
मैत्रीणीचे डोहाळेजेवण करायचे आहे ऑफिसमधे. (म्हणजे डोहाळेस्नॅक्स खरं तर!
)
सोमवारी ४-५ वाजता संध्याकाळी.
काय करता येईल? पदार्थ अर्थातच रविवारी करावा लागेल.
तिखट, गोड काहीही चालेल. ७-८ जणांसाठी. काही आयडीया आहे का?
जरा काहीतरी इनोव्हेटीव्ह
जरा काहीतरी इनोव्हेटीव्ह आयडीया आहे का?
टिपीकल पदार्थ मला सुचले पण काही परभाषिक लोकही असल्याने त्यांना डोहाळेजेवण ही कन्सेप्ट नवीन आहे. म्हणून विचारतेय...
माधवी कॉर्नचे वडे कर.. आणि
माधवी कॉर्नचे वडे कर.. आणि इमली सॉस बरोबर दे खायला..
आणि गोडात केळ्याच्या पुर्या करून पाकात टाकून ठेवू शकतेस.
तिखटामिठाच्या पुर्या - चटणी/
तिखटामिठाच्या पुर्या - चटणी/ लोणचे, मटार करंजी / कोथिंबीर वडी, मुगाचा / सत्यनारायणाचा शिरा किंवा नारळाच्या वड्या / बर्फी / गाजर हलवा, मिरगुंडं.
हे सर्व एखादी थीम घेऊन त्याप्रमाणे सजावट करून, अरेंज करून द्यायचे.
दक्षिणा, कॉर्नच्या वड्यांची
दक्षिणा,
कॉर्नच्या वड्यांची कृती आहे का इथे?
म्हणजे फक्त आहे की नाही ते सांग मी शोधून घेईन.
अकु,
मिरगुंड ?? म्हणजे पोह्याचे पापड ना...
आदल्या दिवशीची मटार करंजी आणि पुर्या चांगल्या लागतील?
केळ्याच्या पुर्या मी
केळ्याच्या पुर्या मी खाल्ल्या आहे दक्षीकडे.. छान लागतात
केळाच्या पुर्या मी करते पण
केळाच्या पुर्या मी करते पण पाकात टाकायची नवीनच आयडीया कळली!
दक्षिणा, केळ्याच्या
दक्षिणा, केळ्याच्या पुर्यांची रेसिपी द्या.
माधवी., मी सुरुवातीला लिहिणार
माधवी., मी सुरुवातीला लिहिणार होते, पण टाळले... शक्य असल्यास ताजे पदार्थ करून न्या, किंवा बाहेरून ऑर्डर करा. प्रेग्नंट मैत्रिणीला किंवा अन्य सहकार्यांना त्रास व्हायला नको.
ह्म्म्म... अकु.. मलाही तेच
ह्म्म्म... अकु..
मलाही तेच वाटतयं..
त्यातल्या त्यात गूळ-पोळी/
त्यातल्या त्यात गूळ-पोळी/ पुरणपोळी/ साटोर्या यांसारखे पदार्थ टिकाऊ व सध्याच्या सीझनलाही अनुसरून आहेत, म्हणून आदल्या दिवशी केल्यास हरकत नाही.
मैत्रिणीला विचारा तिला काय
मैत्रिणीला विचारा तिला काय खावसं वाटतय? टोकरी चाट, कॉर्न भेळ असे पदार्थ ऑफिसात देखिल बनवता येतिल. लागणारे जिन्नस बरोबर न्यायचे आणि आयत्यावेळेस एकत्र करायचे.
लाजो +१. बास्केट चाट, समोसा
लाजो +१. बास्केट चाट, समोसा चाट, पापु, भेळेचे रेडिमिक्स पॅक्स आणून भेळ इ. इ. बरेच पर्याय आहेत मग.
गुळ आणि तिळ गरम असल्याने
गुळ आणि तिळ गरम असल्याने गुळ-पोळी नका नेवु उष्ण पडेल..
सरप्राईझ नसेल तर तिला विचारा काय खावेसे वाटतेय ते
गोड--
चिरोटे
आ.न्बा लाडु
खोबरा वडी
आ.न्बा शिरा
पायनापेल शिरा
तिखट मधे कुठलीही चाट तयारी करुन नेली तर वेळेवर एकत्र करता येईल..
पुदिन्याची पेस्ट करुन फ्रिज
पुदिन्याची पेस्ट करुन फ्रिज मधे ठेवली तर टिकेल का?
त्यापेक्षा, पुदीना असा टिकवता
त्यापेक्षा, पुदीना असा टिकवता येईल.
पुदीन्याची पाने हाताने वेगळी करून धुवून घ्यायची. एका मोठ्या बोलमधे बर्फाचे पाणी घ्यायचे. पाने एका फडक्यात सैलसर ( चुरगळणार नाहीत अशी) बांधायची. पाणी गरम करत ठेवायचे. त्याला कढ आला कि ३० सेकंद पानाची पुरचुंडी त्यात बुडवायची मग बाहेर काढून लगेच बर्फाच्या पाण्यात बुडवायची. मग निथळून सावलीत किंवा फ्रिजमधे वाळवायची. अशी पाने हिरवीगार राहतात आणि वासही टिकून राहतो. आयत्यावेळी हाताने चुरडून घ्यायची.
दिनेशदा, _____/\_____ ! किती
दिनेशदा, _____/\_____ ! किती माहिती आहे तुमच्याकडे!
एका मोठ्या बोलमधे बर्फाचे
एका मोठ्या बोलमधे बर्फाचे पाणी घ्यायचे. पाने एका फडक्यात सैलसर ( चुरगळणार नाहीत अशी) बांधायची. पाणी गरम करत ठेवायचे. >> इथे दुसर्या भा.न्ड्यात अस लिहा नाहितर कुणि नवख ते बर्फाचे पाणीच गरम करायच..
दिनेशदा, आम्ही पुदिन्याची
दिनेशदा, आम्ही पुदिन्याची पाने धुवुन उन्हात वाळवतो. ३-४ दिवसात मस्त कुरकुरित होतात. घरात पंख्याखाली सुद्धा छान वाळतात. आणि मिक्सरमध्ये पावडर करून ठेवतो.
काल तुर डाळ समजुन चुकुन हरभरा
काल तुर डाळ समजुन चुकुन हरभरा डाळ आणली. त्याचे काय पदार्थ करता येतिल? मला पिठलं करता येते पण या बोस्टनच्या थंडीत ते नको वाटतं खायला.
kulu, बेसनचे लाडू, वाटली
kulu, बेसनचे लाडू, वाटली डाळ,पुपो करता येईल.
आरती वाटली डाळ कशी करतात? आज
आरती वाटली डाळ कशी करतात? आज पुपो करायचा प्लॅन आहे!
Pages