Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>अश्विनला हे लोकं का घेतात?
>>अश्विनला हे लोकं का घेतात? त्याला बसवावे. कोणीच नाही म्हणून भज्जी पण चालेल त्या ऐवजी.
विराटला बसवून रहाणेला पुढच्या मॅच मध्ये संधी द्यावी. तो नक्कीच १० पेक्षा जास्त धावा काढेल. हे आवश्यक झाले कारण तो त्याची जागा ग्रांटेड मध्ये पकडत आहे.
युवी ऐवजी बद्रीनाथला एखादी संधी द्यावी असे मला वाटायला लागले आहे. पुढच्या इनिंग मध्ये युवीत फायर दिसली नाही तर हे तीन बदल आवश्यक. आणि धोणीला ह्या सिरिज नंतर कॅप्टन पदावरून काढावे. ही इज नो बेटर देन प्रग्यान ओझा फॉर टेस्ट ! अगदी ही सिरीज ३ -१ ने जिंकली तरी !
फिर बचा कौन...?
just accept that this is the "best" team india has at the moment and njoy the game.... 

पुन्हा तेच तेच आणि तेच तेच नाही का...?
फिर बचा कौन... >> wonder boy
फिर बचा कौन... >> wonder boy रविंद्र जाडेजा
डोमेस्टीक मध्ये ३ वेळा ३००+
डोमेस्टीक मध्ये ३ वेळा ३००+ धावा केलेला जडेजा एकटाच आहे ना ... तरी त्याला घेत नाहीत बघा टेस्ट टीम मध्ये..
.. तरी त्याला घेत नाहीत बघा
.. तरी त्याला घेत नाहीत बघा टेस्ट टीम मध्ये.. >>>> उरली सुरलेली इज्जत वाचवण्यासाठी घेत नसतील
झहीर सोडला तर आज एकही आपला
झहीर सोडला तर आज एकही आपला गोलंदाज प्रत्येक फलंदाजासाठी अभ्यासपूर्वक कांही डांवपेच रचून गोलंदाजी करतो आहे असं वाटलं नाही [ विकेट मिळणं, न मिळणं दुय्यम]; खूपच निर्जीव व यांत्रिक गोलंदाजी चालली होती, अशी माझी तरी धारणा झाली. या उलट, अँडरसनने सचिनला कसं पद्धतशीर द्विधा मनःस्थितीत टाकून बाद केलं, तें टिव्ही.वर व्यवस्थित व पुन्हा पुन्हा दाखवण्यात आलं.
काल कपिलला अरुणलालने [बहुधा] विचारलं कीं आपल्या खेळपट्ट्यांवर फास्ट गोलंदाजी करताना त्याची मानसिकता काय असायची. ' विकेटचा अंदाज घेऊन आपल्या गोलंदाजीत त्यासाठी काय वैविध्य आणतां येईल याचा सतत विचार करायला हवा; विकेटमधे दम नाही असं म्हणत राहिलं तर रडतच बसावं लागणार !', या अर्थाचं कपिलचं उत्तर आजच्या गोलंदाजीसाठी समर्पक वाटलं.
उद्याच्या पहिल्या सत्रात तेज गोलंदाजानी कांही करामत दाखवली तरच इंग्लंडला मोठी आघाडी घेण्यापासून रोखतां येईल. न पेक्षां ...... !!!
' विकेटचा अंदाज घेऊन आपल्या
' विकेटचा अंदाज घेऊन आपल्या गोलंदाजीत त्यासाठी काय वैविध्य आणतां येईल याचा सतत विचार करायला हवा; विकेटमधे दम नाही असं म्हणत राहिलं तर रडतच बसावं लागणार !', >> भाऊ कपिल ला असे काही करता येणे शक्य होते, मूळात लिमिटेड कॅपॅबिलीटीच्या आपल्या सध्याच्या बॉलर्संना ते शक्य नाही. जर समोरच्या टीमने आपले suicidal instincts काबूत ठेवले तर ही नेहमीचीच रडकथा होणार आहे.
डोमेस्टीक मध्ये ३ वेळा ३००+ धावा केलेला जडेजा एकटाच आहे ना ... तरी त्याला घेत नाहीत बघा टेस्ट टीम मध्ये.. >> विनोदाचा भाग सोड पण युवराज च्या जागी त्याला आणला तरी आहे त्यापेक्षा काही नुकसान होण्याची शक्यता वाटत नाही सध्या तरी. काहीच नाही तर sharp fielding कामाला येईल. युवराजने सध्या तेही होत नाहीये.
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/series-tournament/engl...
इंग्रजांच्या स्वैपाक्या समोर
इंग्रजांच्या स्वैपाक्या समोर धोनीची काही डाळ शिजणार नाही असे दिसतेय!
आताच हाती आलेल्या बातमी
आताच हाती आलेल्या बातमी नुसार........झिंब्बांम्बे आणि केनिया हे संघ सुध्दा उत्सुक्त आहेत भारतात कसोटी खेळण्याकरीता.....सध्याचा भारतीय खेळाडुंचा फॉर्म बघता त्यांना सुध्दा जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे
आपण लेग स्पिनर ट्राय करायला
आपण लेग स्पिनर ट्राय करायला पाहिजे. लोक इतिहास का विसरतात. मिश्रा, चावला किंवा राहूल शर्मा. अश्विन , भज्जी पेक्षा बरे.
<< आपण लेग स्पिनर ट्राय
<< आपण लेग स्पिनर ट्राय करायला पाहिजे. >>मला तर हें नेहमीच वाटत आलंय, आपल्याकडे जागतिक दर्जाचे लेगस्पीनर आतां नसूनही. निदान, सचिनला तरी अधून मधून त्याचे लेगस्पीन टाकायला सांगायला हवं.
R Ashwin bowled at Cook with
R Ashwin bowled at Cook with the air of a man who suspected strongly that he would not be unleashing his new personal wicket celebration any time soon. Since inducing a misjudged cut in the first innings of the series, he has now bowled 58.2 overs at England’s bulwark, and taken his wicket once, for a total of 167 runs. And that once was after Cook had already completed his Mumbai century.
Cook, however, is the nearest thing Ashwin has to a ‘bunny’ in England’s top order. Since the first innings in Ahmedabad, he is the only top-seven batsman the offspinner has dismissed. In 639 balls, 1 for 329 off 106.3 overs are his figures against England’s top seven in the last four innings.
आणि हे काल पर्यंतचे स्टॅट आजचे वेगळे.
रेस्ट अश्विन !
भारताच्या सो कॉल्ड रिव्हेंज
भारताच्या सो कॉल्ड रिव्हेंज सिरीजवर Cricinfo Feedback मधली Comment
"This is the way we Indian take revenge, in 'Mahatma Gandhi' style, with namratha. You slap me on right cheek, I will give you my left cheek."
काहीही म्हणा हल्ली चांगल्या माणसांचे दिवस राहिले नाहीत हेच खरे
पण indian ballers are
पण indian ballers are progressing हे बॉलिंग कोचचे वक्तव्य पाहिले नाहि का कोणी ?
>>http://www.espncricinfo.com
>>http://www.espncricinfo.com/india-v-england-2012/content/current/story/5...
असं खरं तर व्हायला नको, पण
असं खरं तर व्हायला नको, पण उद्वेग तिरकसपणे बाहेर पडतोच; आणि, त्यांत पडलो मीं मालवणी ! नाईलाज आहे !! -
<< In 639 balls, 1 for 329
<< In 639 balls, 1 for 329 off 106.3 overs are his figures against England’s top seven in the last four innings.>> आत्तांच शेवटच्या दोन विकेट घेवून [ त्यातली एक तर ' लाटलेली'] अश्विनने पुन्हा ह्याला दुजारा दिलाय.
२००वर आघाडी व अश्विनच्या चेंडूंवरून तरी विकेट फिरकीला अनुकूल व अजूनही 'बाऊन्स' असावा असं वाटणारी !! जगातली सर्वात भक्कम समजली जाणारी [?] आपली फलंदाजी या अग्निदिव्यातून कशी बाहेर पडते बघायचं ! ऑल द बेस्ट !!
सेहवाग व गंभीर मन लावून,
सेहवाग व गंभीर मन लावून, जबाबदारीने, समयोचित खेळताहेत; हाच मूड सर्व संघाचा राहिला तर अजूनही सामन्यात रंग भरूं शकतो. यू नेव्हर नो, इन क्रिकेट !!!
सेहवाग ४० - ५० धावा टेस्ट
सेहवाग

४० - ५० धावा टेस्ट मधे फारशा उपयोगाच्या नसतात हे कळत नाही का याना
If you get a start , you HAVE TO make it count !!!
एक वेळ १०-२० रन्स च्या आधी जम बसलेला नसताना बाद होणे ठीक आहे . पण ३० धावा झाल्यावर अन ५० चेंडू खेळल्यावर तुम्ही नेहमी बाद होत असाल तर ते अधिक घातक आहे अस माझ मत .
<< सेहवाग >> माझीच दृष्ट
<< सेहवाग
>> माझीच दृष्ट लागली वाटतं !
Gambhir is taking more
Gambhir is taking more wickets than our bowlers . Only problem is he is taking wickets of our batsmen
६/१२२
६/१२२
(No subject)
संदिप पाटील माबोचा गुप्त
संदिप पाटील माबोचा गुप्त वाचक असावा. वर sir जडेजाबद्दल लिहिले काय नि नागपूरसाठी जाडेजा आता
आता पुढची टेस्ट जाडेजाने जिंकून दिली तर मॅच फिक्सिंगबद्दल पण खात्री पटेल 
"He [Fletcher] has got excellent technical knowledge about our batting," Dhoni said.
>> Considering our abject batting failures, in recent series across the board, we really need to UNDO whatever Fletcher had been teaching ;). And I had rather prefer Dhoni, Gambhir keep mum about everything
"I will take the draw now," admitted Cook. >> This is comping from the captain of team who has been completely dominating in last 2 tests. Looking at current listless state of Indian team and their second string backup, if this this is the confidence he is wearing, who are we to blame Dhoni for his defensive mindset ? Indeed modern day captaincy is defensive in nature.
मला क्रिकेटमधील फारसं कळत
मला क्रिकेटमधील फारसं कळत नाही. एक गोष्ट मात्र नक्की की आयप्येल नावाच्या सर्कशीमुळे भारतीय कसोटी क्रिकेटचीही सर्कस होत आहे.
-गा.पै.
कसोटी क्रिकेटला अजिबात
कसोटी क्रिकेटला अजिबात प्राधान्य नाही हे दिसतेच आहे आणि वरकरणी आयपीएल हे त्याला जबाबदार आहे असे वाटू शकते. पण हे पाहा: २००८ साली पहिली आयपीएल झाली. त्यानंतर पुढे तीन वर्षे भारताची कामगिरी टेस्ट व वन डे दोन्हीकडे अत्यंत चांगली होती (आश्चर्य म्हणजे २०-२० मधेच चांगली नव्हती, अजूनही नाही). २०११ च्या एप्रिल मधे भारताने कसोटी क्रिकेट मधे नं. १ रँकिंग मिळवलेले होते व वन डे मधे विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे आणखी खोलात जाऊन तो अॅनेलिसीस करायला हवा.
<< कसोटी क्रिकेटला अजिबात
<< कसोटी क्रिकेटला अजिबात प्राधान्य नाही हे दिसतेच आहे > सहमत. मला तर असंही वाटतं कीं आयपीएलमुळे खेळाडूंइतकीच भारतातील सर्वसाधारण प्रेक्षकांची मानसिकताही आतां कसोटी क्रिकेटबाबत उदासिन होत चालली आहे !
<< २००८ साली पहिली आयपीएल झाली. त्यानंतर पुढे तीन वर्षे भारताची कामगिरी टेस्ट व वन डे दोन्हीकडे अत्यंत चांगली होती >> विष अंगात भिनायला तेवढा वेळ लागतच असावा !
इंडियन एस्प्रेसमधून Cook's
इंडियन एस्प्रेसमधून
Cook's precocious climb to 7,000 runs is a product of rare talent, of course, but also of the frequency with which England play Test matches these days. It has taken Cook just six years and 279 days to play the 86 Tests he needed to get to 7,000. Sachin Tendulkar had taken only 85 Tests, but they had been spread over 11 years and 353 days. It is instructive that the only other cricketer apart from Cook to get to 7,000 in less than eight years is Pietersen.
कुकच्या रूपाने प्रथमच कोण्या इंग्लिश फलंदाजाने २३ कसोटी शतके झळकावली हे वाचून नवल वाटले होते.
परत धोणी पिद्दू जडेजा ह्याची
परत धोणी पिद्दू जडेजा ह्याची वर्णी लागलीच म्हणायची. भारतातील पाटा पिच वर, बदललेल्या स्पिन बोलिंग मुळे कोणीही ३०० काढू शकेल. जडेजा हा मॅच्युअर माणूस नाही ! पिरिएड. त्याने वन डे मध्ये तर ऑलमोस्ट जिंकलेल्या मॅचेस घातल्या आहेत. नो फेथ इन हिम.
आणि त्याच्यामुळे आता परत एकदा रहाणेवर बसायची पाळी येईल. टोटल वेस्ट.
टि २० मुळे थोडाही फरक पडला नाही असे मलाही वाटायचे. पण काही वेळा फरक पडला असेही वाटते.
काही उदाहरणे,
१. कालच्या मॅच मध्ये मुरली विजय मिड ऑन वर फिल्डिंग करत होता. त्याच्याकडे बॉल गेला, बॉल अडवताना त्याचा थोडा तोल गेला आणि त्यामुळे बॅटसमन एका धावे साठी पळाले. त्याने टि २० स्टाईल मध्ये बॉल घेऊन लगेच तो बॉलर कडे रन् आउट करण्यासाठी पण हाय .. तो पर्यंत एक धाव घेऊन झाली होती आणि बॅट्साम आपल्या क्रिझ मध्ये येऊन १ वर्ष झाले होते. सुनिल गावस्कर म्ह्णाला, in test nobody throws like that after the run has been completed, to hide the fumble he did that, typical T20 player mindset.
२. गंभीरला धाव घ्यायची गरज नव्हती. पण टिपिकल टि २० मध्ये फिल्डरच्या हातापाशी बॉल असतानाही धाव घेतली जाते, गंभीर ने ती घेतली, पुजारा टेस्ट माईंडसेट मधला माणूस, पळायला कमी पडला आणि आउट झाला. आणि लॅण्ड स्लाईड सुरू झाली !
३. रोहित शर्मा हा मुंबई बॅटसमन. मुंबई चे टिपिकल बॅटसमन हे बॉलरला थकवतात. पेशन्स इज द की फॉर देम. आला तेंव्हा रोहितला राहूलची रिप्लेसमेंट म्हणून पाहिले गेले. देन टि २० हॅपन्ड, हा माणसाला १० बॉल मध्ये १५ धावा निघाल्या नाहीत तर त्रास होऊ लागला. टेस्ट वगैरे तर जाऊ देत वनडे मध्येही परफॉरमन्स कमी झाला. हा माणूस द्रविड सारखा ३० बॉल, शून्य धावा असे कधी राहू शकेल असे वाटत नाही.
४ लिजंडरी स्पिनर्सना पुढे येऊन खेळणारे वा त्यांना फटकवणारे लोक आवडत असत. बॅटसमन जेंव्हा असे खेळायचा तेंव्हा तो नक्कीच आउट होणार असे मानले जायचे. पूर्वीचे स्पिनर्स ज्या पद्धतीने बॉलिंग करायचे तसे प्लाईट बॉल आता दिसत नाहीत. आता रविचंद्रन अश्विनचा न चालणारा कॅरम बॉल मात्र दिसून येतो. ही डजन्ट हॅव अ स्टॉ़ बॉल ! हरभजनला रिकी पाँटिंग पण घाबरायचा, पण टि २० मुळे विकेट काढन्यापेक्षा, धावा कश्या कमी व्हाव्यात अशी बॉलिंग स्पिनर्स टाकू लागले आणि त्यामुळे स्पिन च्या जबरदस्त स्पेल, ज्या पूर्वी पाहायला मिळायच्या ती मजाच निघून गेली.
आपला पेशन्स नावाचा व्हर्च्यू (टेस्ट मधील) कमी होत चालला आहे. ह्याला फक्त टि २०च कारणीभूत आहे असे मी म्हणत नाहीये, पण आपले नवीन बॅटसमन आणि बोलर्स हे दिवाळीतल्या तडतड्या फुलबाज्यांसारखे आहेत, अल्पावधीत लोकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधून घेणारे आणि अल्पावधीतच विझणारे. मुरली विजय, रोहित शर्मा हे कॅपॅबिलिटी असणारे प्लेअर्स त्याचे प्रमुख उदाहरण.
<< मुरली विजय, रोहित शर्मा हे
<< मुरली विजय, रोहित शर्मा हे कॅपॅबिलिटी असणारे प्लेअर्स त्याचे प्रमुख उदाहरण. >> १००% सहमत. याचा आणखी एक पैलू असा आहे कीं टी-२० व आयपीएलमधे वर्णी लागावी म्हणूनही कसोटीमधे तसल्या खेळाची झलक दाखवण्याचा मोह आंवरता न येणं; माझ्या मते, अनुभवाने मुरली विजय चांगला , कायमस्वरूपी सलामीचा कसोटी फलंदाज होऊं शकला असता. तो या मोहाचाच बळी ठरला !
Pages