Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रोशनजी, धन्यवाद. धोनीने हें
रोशनजी, धन्यवाद.

धोनीने हें वाचलं तर त्याला आतां अधिकच चेंव चढेल !!!
<<नशीब पोर्तुगिझ क्रिकेट खेळत नाहीत..>> झाल्या त्यांच्याही इथं कांहीं मॅचेस इंग्रजांबरोबर; पण इंग्रजानी आधीच खेळपट्ट्या स्वतःला सोईच्या अशाच करून ठेवल्या होत्या !!!
चला, वळूंया आतां नागपूरच्या वर्तमानात, खास आकर्षक नसला तरीही !!!
अजून सामना संपायचा आहे (?)
अजून सामना संपायचा आहे (?) तरिही..
post match presentation:
Ravi to MS:
Ravi: any positives from this series ?

Yes.. finally Retirement is now certain for x1, x2, x3, x4... which means Rahane will get to debut in next series
Ravi: Thats good! so where do you think Indian lost it..?
Its all in the Head (s)......
Ravi: Looking fwd to Pakistan series at home..?
Yes.. there is always hope..
Awards:
MOM: Anderson
MOS: Cook
ऊत्तेजनार्थ (नविन बक्षिस विभाग): अजिंक्य रहाणे
जीवनगौरव पुरस्कार/\Lifetime Achivement Award (हा हवाच!): SRT
इंग्लंड पुरेपुर फलंदाजीचा
इंग्लंड पुरेपुर फलंदाजीचा अभ्यास करुन घेत आहे.......आणि संपुर्ण मॅच मधे भारताने गोलंदाजी खराब केली म्हणुन ......भारतीय गोलंदाजांकडुन गोलंदाजीचा अभ्यास करुन घेत आहे.........
आज कुठेतरी वाचलं कि सचिन
आज कुठेतरी वाचलं कि सचिन निवृति जाहिर करणार ,खरे आहे का ते ?
सचिन बहुदा आज निवृत्तीची
सचिन बहुदा आज निवृत्तीची घोषणा करणार
मला अजूनही एका प्रश्नाचं
मला अजूनही एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीय - आमच्यासारख्या 'बघ्या'नाही आपली गोलंदाजी [ आपल्या फलंदाजीला 'संशयाचा फायदा' देवून ] कोणत्याही देशाला सहज हरवूं शकणारी नाहीं हें स्पष्ट दिसत असताना, कपिल देव, वाडेकरसारखे रथी महारथी ही मालिका सुरूं होण्यापूर्वीच आपण इंग्लंडची साफ धुलाई करणार असं छातीठोकपणें कशाच्या आधारें म्हणत होते ?
कपिल देव, वाडेकरसारखे रथी
कपिल देव, वाडेकरसारखे रथी महारथी ही मालिका सुरूं होण्यापूर्वीच आपण इंग्लंडची साफ धुलाई करणार असं छातीठोकपणें कशाच्या आधारें म्हणत होते ? >> ते त्यांनाच विचारायला हवे नाही का ?
ह्याच लोकांमधल्या काही जणांनी कोणाला कोणाला बाहे काढावे ह्याबद्दल पण वक्तव्य दिलेली आहेत. मग आता काय करावे ? 
पाकिस्तानविरुद्ध जडेजा असणार का ?
राहाणेचे काय होणार ?
चावलाला लागलेली लॉटरी किती टेस्टची आहे ?
पुढची फास्ट बॉलर पेअर कोणती असेल ?
<< ते त्यांनाच विचारायला हवे
<< ते त्यांनाच विचारायला हवे नाही का ? >> असामीजी, मीं बापडा पेपर किंवा टीव्ही वर यांचं वाचतो/ऐकतो; हीं दोन्ही माध्यमं 'इंटरअॅक्टीव्ह' नाहीत ना त्याना हें विचारण्यासाठीं !! म्हणून मनाच्या समाधानासाठी कोणाला तरी उगीचच विचारत बसतों झालं !!


<< मग आता काय करावे ? >> II जें जें होईल तें तें पहावें, चित्तीं असूं द्यावें समाधान II
" गणपति दूध पितोय " या पेक्षांही जोरदार वदंता आज मुंबईत पसरली होती, ' सचिन निवृत्ति जाहीर करतोय' म्हणून !
सचिन ने "वन-डे" मधुन निवृत्ती
सचिन ने "वन-डे" मधुन निवृत्ती घेतली..:(
चांगली बातमी... आता पुर्ण
चांगली बातमी... आता पुर्ण लक्ष्य कसोटीवर केंद्रित कर म्हणावे..
सचिन :- १८४२६ रन्स जॅक कॅलिस
सचिन :- १८४२६ रन्स
म्हणजे वयाच्या ४४ वर्षापर्यंत 

जॅक कॅलिस :- ११४९८ रन्स
फरक जवळजवळ ७ हजार रन्स चा.. वर्षाला १००० रन्स तरी काढले तरी ७ वर्ष खेळावे लागतील ३७ वर्षीय कॅलिस ला
.
सचिन : ४९ शतक
जॅक कॅलिसः- १७
क्रिस गेल : २०
सचिन.... त्यावेळी मी नुकताच ८
सचिन.... त्यावेळी मी नुकताच ८ वर्षाचा झालो होतो. सोसायटीच्या आवारात क्रिकेट खेळून झाले की मोठ्या दादा लोकांच्या क्रिकटवर गप्पा सुरु व्ह्यायच्या. त्यात तुझे नाव नव्याने घेतले जाउ लागले होते. तो नाव माझ्या पक्के डोक्यात बसले होते तेंव्हा...
पुढे १९९२ चा विश्वचषक आला आणि तुला खर्या अर्थाने मी खेळताना पाहिले. नंतर अनेकवर्ष पाहतच राहिलो. १९९६ च विश्वचषक, पुढे तु खर्या अर्थाने ऑस्ट्रेलियाची पिसं काढलेली शारजातली १९९८ ची खेळी, १९९९ चा वर्ल्ड कप सर्व सर्व काही... अगदी २०१२चा आपले स्वप्न खर्य अर्थाने पुर्ण करणारा विश्वचषक देखील...
सहामाही परिक्षा असो नाहीतर वार्षिक. तुला खेळताना बघण्यातला आनंद घरातही कोणी हिरावून घेतला नाही. राहिलेला अभ्यास उशिराने जागून पुर्ण केला की झाले. त्यातही पुन्हा तुझ्याच आठवणी...
तु एका खेळावर निस्सिम प्रेमकरून जगण्याचा निखळ आनंद मला गेली २० वर्ष दिलास... तुझ्या एकदिवसीय सामन्यांच्या निवृत्तीने तुझ्या कसोटीमधूनही जाण्याची चाहूल लागली आहे खरी. पण आता ते दु:ख्ख नाही. तु इतके दिलेस की त्या आठवणी आयुष्यभरासाठी पुरुन उरेल..
.......... तुझा एक चाहता.... एक क्रिकेट प्रेक्षक म्हणून निवृत्त होतोय.....
सचिन ने "वन-डे" मधुन निवृत्ती
सचिन ने "वन-डे" मधुन निवृत्ती घेतली >>
हे तर योग्य केलेय आणि खरय.. पण
आता वनडे मॅच सुरु असेल.. भारताची फलंदाजी चालू आहे.. तेव्हा 'सचिनची सेंचुरी झाली का'... 'तेंडल्या कितीवर खेळतोय..' 'तेंडल्या गेला का..' ह्या प्रश्नांची सवय काही सहजासहजी जाणार नाही..
सचिनने पाकिस्तान सिरीज खेळून
सचिनने पाकिस्तान सिरीज खेळून निवृत्त व्हायला हवे होते.... कारण त्याचे पदार्पणपण पाकिस्तान विरुद्ध झाले होते!
शत्रुराष्ट्राविरुद्ध खेळण्यासाठी त्याची खासदारकी आडवी आली की काय?
सचिन ने "वन-डे" मधुन निवृत्ती
सचिन ने "वन-डे" मधुन निवृत्ती घेतली >>>
'तेंडल्या कितीवर खेळतोय..' 'तेंडल्या गेला का..' ह्या प्रश्नांची सवय काही सहजासहजी जाणार नाही..
>>>>>> अगदी.
शत्रुराष्ट्राविरुद्ध खेळण्यासाठी त्याची खासदारकी आडवी आली की काय? >>>>>> वाह! काय लॉजिक आहे
सचिनने पाकिस्तान सिरीज खेळून
सचिनने पाकिस्तान सिरीज खेळून निवृत्त व्हायला हवे होते.... कारण त्याचे पदार्पणपण पाकिस्तान विरुद्ध झाले होते! >>>>>>>>>>>>> त्याने शेवट चा सामना सुध्दा पाकिस्तान विरुध्दच खेळलेला मार्च मधे आशिया कप मधे तेव्हा त्याने ५२ रन्स काढलेले...... गुगल मधे सगळ मिळत
>>गुगल मधे सगळ मिळत>> हो
>>गुगल मधे सगळ मिळत>>
हो का?..... माझा मोबाईल हरवलाय महीन्याभरापुर्वी.... तो पण मिळेल का?
बघा... शोधल्यावर देव सुध्दा
बघा... शोधल्यावर देव सुध्दा मिळतो.....हा तर तुमचा मोबाईल आहे
(No subject)
तेंडल्याने एकदिवसीय
तेंडल्याने एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती स्वीकारली...देर आये, दुरुस्त आये...असे म्हणता येईल...पण कसोटीतूनही निवृत्ती घ्यायला काय हरकत आहे?
तेंडल्या, आजवर खूप खेळलास, लोक तुला क्रिकेटचा देव मानतात..ते देवत्त्व टिकवायचं तुझ्याच हातात आहे रे ...तेव्हा आताच पूर्ण निवृत्ती घे...तसा बराच उशीर झालाय....पण ह्याच्यापेक्षा जास्त उशीर योग्य नव्हे.
सचिन - गुड ट्राय.! पण
सचिन - गुड ट्राय.! पण सुदैवाने दिल्लीतल्या महिलांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की कांगेसचे हे हुकमी कार्ड यावेळीहि वाया गेले - जसे हजारेंच्या आंदोलनात गेले होते.!
सचिन - I am ashamed of you! दोन्हि वेळेस देश जळत असताना स्वतःबद्दल बातम्या निर्माण करुन ज्वलंत मुद्द्यावरुन लोकांना आणी मिडियाला भटकवण्याबद्द्ल तुझा निषेध.
..
:हाहा:..:खोखो:
भारतीय.... भयंकर कॉमेडी
भारतीय....
भयंकर कॉमेडी पोस्ट.... मुंगेरीलाल सुद्धा इतके कॉमेडी लिहु शकणार नाही...
बलात्कार झालेला असताना ,
बलात्कार झालेला असताना , त्याबद्दल दिल्ली जळत असताना, सचिनला स्वतःच्या निव्रुती चार दिवस पुढे धकलता येत नाहि (इतके दिवस सर्व मिडिया ओरडत होते तेव्हा मात्र साहेब म्हणत होते - मी स्वतः ठरवीन कधी निव्रुती घ्यायची ते). आणी हे माहित असताना कि सर्व मिडिया त्याला कव्हरेज देणार. ! सनसनाटी निर्माण करायला हाच मुहुर्त बरा सापडला!
असो ह्या आंधळ्या देशात तुमच्याकडुन दुसरी अपेक्षाच नाहि. ! तरी मिडियाने सकाळचे दोन तास सोडले तर दिल्लित जे चालु आहे ते दाखवले. नाहितर चालु असतेच दिवसभर सचिनपुराण!
- सचिन तुला स्वतःची लाज वाटली पाहिजे.! एका मुलीवर अतिशय वाइट रित्या बलात्कार झालेला असताना, त्यातील आरोपींना फाशी व्हावी आणी अशा केसेसमध्ये कठोर शिक्षा व्हावी म्हणुन देशभर आंदिलने होत असताना, त्या मुलीची स्थिती रोज बिघडत आहे, सर्व देशाला त्याबद्दल काळजी आहे, तेव्हा सनसनाटी निर्माण करण्यासाठी हि वेळ योग्य नाहि हे तुला समजत नाहि ? अरे माणुस आहेस का नाहि ?
अरे खासदार ना तु ? जरा सारासार विचार कर कि ? खासदार म्हणुन तरी काहितरी जिम्मेदारी आहे का नाहि तुझी ?
..
:खोखो:..:हाहा:
रोहन आणी उदयन... देव करो आणी
रोहन आणी उदयन... देव करो आणी अशी वेळ येउ नये कोणावर - पण तुम्च्या आइ बहिणीवर अशी वेळ आली तर ते सर्व स्माइल निघुन जाइल - आपण जनावर नाहि माणसे आहोत ह्याचे जरा भान ठेवा!
पण तुम्च्या आइ बहिणीवर अशी
पण तुम्च्या आइ बहिणीवर अशी वेळ आली तर ते सर्व स्माइल निघुन जाइल - आपण जनावर नाहि माणसे आहोत ह्याचे जरा भान ठेवा! >>>>>>>>> तोंड सांभाळुन बोल ...... कळल..... शेवटच सांगतोय..
लगेच एडीट कर नाहीतर ....
निवड समितीने संघातुन काढुन
निवड समितीने संघातुन काढुन टाकण्यापेक्षा स्वत: निवृत्त झालेले बरे असा सुज्ञ विचार उशिरा का होईना घेतल्या बद्दल सचिनचे अभिनंदन... त्याने कसोटी मधुन पण लवकर निवृत्त व्हावे... मागच्या तब्बल दहा कसोटीत केवळ २३ सरासरी आहे. कोण ठेवणार आहे ह्या कामगिरीवर संघात?
क्रिकेट या खेळांत बजावलेल्या कामगिरी बद्दल अनेक दशके तुझे नांव रेकॉर्ड मधे चकाकत रहाणार.
आता पुढचे टारगेट भारतरत्न.... शुभेच्छा.
सचिन - I am ashamed of you!
सचिन - I am ashamed of you! दोन्हि वेळेस देश जळत असताना स्वतःबद्दल बातम्या निर्माण करुन ज्वलंत मुद्द्यावरुन लोकांना आणी मिडियाला भटकवण्याबद्द्ल तुझा निषेध.
------ अनुमोदन... सतत प्रसिद्धी मधे रहाण्यासाठी धडपड करावी लागते. धावा होत होत्या त्यावेळी रसिकांना कौतुकही होते. पण आता धावाही होत नव्हत्या...
निवड समितीने त्याला निवृत्त हो अथवा तुला संघातुन डच्चू द्यावा लागेल असे निर्वाणीचे सांगितले असणार.
सुख के सब साथी... चालु दे
सुख के सब साथी...
चालु दे तुमचे...
Pages