क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपले नवीन बॅटसमन आणि बोलर्स हे दिवाळीतल्या तडतड्या फुलबाज्यांसारखे आहेत, अल्पावधीत लोकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधून घेणारे आणि अल्पावधीतच विझणारे. मुरली विजय, रोहित शर्मा हे कॅपॅबिलिटी असणारे प्लेअर्स त्याचे प्रमुख उदाहरण. > अनुमोदन. हीच T20 ची खरी संस्कृती आहे.

सिद्धू आणि इतर अश्विनच्या शेवटाच्या इनिंगवरुन त्याला युवराजची जागा देण्या बाबत बोलत आहेत. त्याने केलेल्या धावा नाकारता येत नाही पण तो लक्ष्मणची रिप्लेसपण नक्कीच नाही. तो अष्टपैलू असेल/बनेल... पण वनडे किंवा T20 मधे... कसोटीत त्याच काय काम?

अश्विननी वन डे किंवा टी-२० मध्ये कधीच धावा काढलेल्य नाहीत.. जी काही बॅटींग केली आहे ती टेस्ट मधेच केली आहे...

सेहवाग नाहीये तर ओपनिंग कोण ??

<<भाऊ मी टी-२० साठी म्हणत होतो... >> सॉरी, हिम्सकूलजी ! संदर्भ लक्षात नाही आला पटकन माझ्या !!

आयपील ला सरसकट दोष देणे मलाही अर्धवट काढलेले अनुमान वाटते. आपल्यासाठी आयपील मूळे खेळाडूने आपले तंत्र बदलले हे म्हणणे बरोबर आहे पण त्या खेळाडूच्या बाजूने विचार करा. त्याला दिसतेय कि आयपील च्या एक दोन सीजन मधे तो जन्मभराचे कमावू शकतो. ह्याचवेळी टेस्ट साठी निवड कधी होईल ह्याची खात्री देणे निव्वळ अशक्य आहे. (more competition due to lesser openings, completely random selection policy, more preference to flash and bang players) अशा वेळी त्याने आयपीलला प्राधान्य दिले तर त्याचे फार चुकतय असे मला नाही वाटत. आयपीलच्या आधी (किंवा ODI च्या आधी) जेंव्हा खेळात पैसा नव्हता तेंव्हा बहुतेक जण एखाद्या कंपनीमधे honorary नोकर्‍या करून खेळत असत. निव्रुत्तीनंतर किती जणांनी हलाखीची परिस्थिती पाहिलेली आहे हे सांगावे न लगे. आजच्या जमान्यात अशा वेळी एखादा सहज पैसे मिळवून देण्याचा मर्ग असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा असे सांगणे सयुक्तिक ठरेल का ? मधे BCCI ने सर्व माजी खेळाडूंना त्यांच्या कामगिरीबद्दल बरेचसे पैसे दिले होते. हे सगळे आयपील मूळेच शक्य झाले होते. नुसत्या खेळाच्या प्रेमावर सगळे चालले असते तर ? अगदी ICC ला सुद्धा T-20 मधे मिळू शकणार्‍या पैशाचा मोह सुटला नाही (दर दोन वर्षांनी होणारा t-20 world cup, abandoned champions league)

माझ्या मते खरा दोष administrative आहे जिथे टेस्ट मॅचेस ह्या मर्यादित षट्कांच्या (आधी ODI नि आत्ता T-20) सामन्याइतक्याच मनोरंजक नि financially beneficial करता येणे जमले नाही. If you force one to choose then he (at least majority) is always going to explore an option which are beneficial to him. It's high time to abandon ODI and focus on only 2 formats, with equal weight to both formats. If necessary money can be diverted from one to another to make both equally lucrative. अर्थात हे झाले तरी भारतामधे टेस्ट क्रिकेट साठी हवे असलेली सिस्टीम मोडकळीस आलेली आहे हा वारंवार बोलून झालेला मुद्दा राहतोच.

मग प्रश्न येतो, आयपीएलमधेच पैसा कां आहे व कसोटी क्रिकेटमधे कां नाही व त्याचं उत्तर येतं << भारतातील सर्वसाधारण प्रेक्षकांची मानसिकताही आतां कसोटी क्रिकेटबाबत उदासिन होत चालली आहे ! >>, असं नाही वाटत ? मला वाटतं, कसोटी क्रिकेटचा 'फॉरमॅट' कांहीसा बदलून तें आकर्षक कसं करतां येईल यावर आतां लक्ष केंद्रीत करणं हें सर्वच देशांच्या हिताचं ठरणार आहे. कारण, नवीन पिढीला मर्यादित षटकांच्या सामन्यांचं बाळकडूच पाजल्यावर त्या पिढीतून अस्सल 'कसोटी वृत्तीचे' खेळाडू व प्रेक्षक तयार होणं मला तरी कठीणच वाटतं. विचार आगाऊपणाचा वाटला तरी तो माझा पिच्छा सोडत नाही, हेंही खरं.

मग प्रश्न येतो, आयपीएलमधेच पैसा कां आहे व कसोटी क्रिकेटमधे कां नाही व त्याचं उत्तर येतं << भारतातील सर्वसाधारण प्रेक्षकांची मानसिकताही आतां कसोटी क्रिकेटबाबत उदासिन होत चालली आहे ! >>, असं नाही वाटत ? >> मध्यंतरीच्या काळात जेंव्हा ODIची लोकप्रियता वाढीला लागली होती तेंव्हा
१. subcontinental teams had started winning ODI tournaments, which attracted bigger fan fare and attention.
2. त्याच काळात टेस्ट क्रिकेट प्रचंड रटाळ झालेले होते. पाच पाच दिवस खेळून सामने draw होण्याचे प्रमआण वाढलेले होते.
अशा वेळी ODI कडे अधिक पैसा वळला. चटपट निकाल देणारे ODI अधिक popular झाले. लोकांना चटकन निकालाची सवय लागली. T-20 चे त्याचे offshoot धरा. मध्यंतरी Test चा दर्जा नि निकाल लागण्याचे % वाढले हे खरे पण now its playing catch up. जि विकते तिथेच पैसा असणार हे साहजिक आहे. नुसते आकर्षक करून टेस्टची मानसीकता तयार होईल का ? जर पर्यायी format मधे पैसे असतील तर test format मधे पैसा असणे तेव्हढेच जरुरी असणार आहे. (ह्याचा अर्थ फक्त पैशाने ही समस्या सुटेल असे मी म्हणत नाहिये तर playing fields level होतील)

पाच दिवस खेळून वीस गडी बाद करणे आणि अर्धाएक दिवस खेळून धावा रोखणे या दोघांत (बराच?) फरक आहे. दोन्ही खेळ दिसायला सारखे आहेत पण त्यांची उद्दिष्टे वेगळी आहेत. विसविशीत क्रिकेटला क्रिकेट न म्हणता बॅटबॉल असं संबोधायला पाहिजे.

कसोटी क्रिकेट हे खरं क्रिकेट आहे. कारण त्या प्रकारात खेळाडूचा सर्वांगीण कस लागतो. याउपर प्रेक्षकांना काय हवं आहे ते त्यांच्यावरच सोडलेलं बरं.

-गा.पै.

कसोटी क्रिकेट हे खरं क्रिकेट आहे. कारण त्या प्रकारात खेळाडूचा सर्वांगीण कस लागतो. >> Sorry no offense, पण त्याचा अर्थ असा नाही कि फक्त तेच क्रिकेट आहे. T-20 साठी लागणारे skill sets वेगळे आहेत आणि तेही तेव्हढेच challenging आहेत. टेस्ट क्रिकेट हेच खरे क्रिकेट वगैरे हा फक्त conditioning चा भाग आहे. जेंव्हा अमर्यादित दिवसापासून ५ दिवसाच्या क्रिकेटकडे गाडी वळल तेंव्हाही असेच म्हटले गेले असणार हे लक्षात ठेवा Happy

असाम्याच्या वरच्या पहिल्या पोस्टशी बराचसा सहमत. बीसीसीआय ने काहीच दूरदर्शीपणा दाखवलेला नाही याबाबतीत. २०-२० ची उसाची कांडी लोकांना कंटाळा येइपर्यंत त्या चरकातून काढून सध्याचे आयपीएल मॅनेज करणारे लोक भरपूर उत्पन्न कमावतील - यात फक्त उत्पन्न कमावण्यात काहीच चूक नाही, पण लोकांचा क्रिकेटमधला इंटरेस्ट पिढ्यानपिढ्या भारतात टिकला, १९८३ नंतर प्रचंड वाढला त्यातून अजून मोठे मार्केट कसे तयार होईल आणि २०-२०, वन डे व कसोटी तिन्ही टिकून राहून अजून चांगले क्रिकेट कसे बघायला मिळेल असा एकूण विचार होत आहे असे दिसत नाही.

गेल्या एक दोन वर्षांत आयपीएल चे टीव्ही रेटिंग बरेच घसरले आहे. मैदानावर जाऊन मॅच पाहण्याचा 'बझ' अजून शिल्लक आहे म्हणून गर्दी होते (त्यात विविध कंपन्या तिकीटे देतात हे ही एक कारण आहे). ती अजून किती दिवस टिकेल माहीत नाही. ती कदाचित अनेक वर्षे राहील, पण स्पॉन्सरर्सना त्यातून फारसे उत्पन्न मिळणार नाही - आयपीएल मधे जाहिराती देणे, स्पॉन्सरशिप वगैरे फायदेशीर ठरण्याएवढे.

२०-२० हा "पर्क" आहे तर कसोटी क्रिकेट हे "काम" - हे केल्यशिवाय ते मिळणार नाही, असे काहीतरी करायला हवे Happy

अमोल तिकीटविक्री हा पैसे कमावण्याचा मार्ग कधीच तळाला गेला आहे. मुख्य share media rights, sponsorship and ad revenue ह्यात आहे असे वाचलेले.

<<मुख्य share media rights, sponsorship and ad revenue ह्यात आहे असे वाचलेले. >> पण ह्या सर्वाचाच पाया शेवटी 'खेळाची लोकप्रियता' हाच आहे; कसोटी क्रिकेटमधे गुणवत्तेचा खरा कस लागतो, हें माझंही ठाम मत आहे व म्हणूनच तें क्रिकेट टिकण्यासाठी तें लोकप्रिय करण्याशिवाय गत्यंतर नसावं असंही मला तीव्रतेने वाटूं लागलं आहे. त्याकरतां क्रिकेटच्या 'फॉरमॅट'मधे बदल करावा हा मला स्वतःला रुचणारा विचार नसला तरी त्याला पर्याय नसावा असंही वाटतं.
आज इंग्लंडच्या हुसेनने भारतीय खेळाडूंच्या बेफिकीर वृत्तीवरही ताशेरे ओढले आहेत. द्रविडने तर खेळाडूंची गुणवत्ता व कौशल्य यापुढेच प्रश्नचिन्ह उभं केलंय. Something is undoubtedly going very wrong with Indian Test Cricket !! Sad

छान... लगे रहो.. Happy
गेल्या वर्षीच्या ई. दौर्‍यानंतरच्या पोस्ट्स वाचतोय असे वाटले..

सिद्धू आणि इतर अश्विनच्या शेवटाच्या इनिंगवरुन त्याला युवराजची जागा देण्या बाबत बोलत आहेत >>

दिली. आपण बहुतेक नागपुर मध्ये ५ बॉलर घेऊन खेळणार आहोत. म्हणजे परत एकदा अश्विन खूप जास्त ओव्हर्स टाकेन आणि दर १५० बॉल आणि १०० धावांनंतर एखादी विकेट घेईन !

टाईम्स मध्ये विराट कोहलीला टेस्ट कप्तान करा असे आले. - आर यू आउट ऑफ युअर माईंड? तो देखील गेले दिड वर्ष टेस्ट मध्ये चाचपडतोय.

आज मोहिंदर अमरनाथनेही धोनीवर तोफ डागली आहे. धोनीला कसोटी संघात स्थान मिळण्याबाबतच त्याने प्रश्नचिन्ह उभं केलंय !! केवळ कांही दबावामुळेच तो कप्तान राहिला आहे, असं मोहिंदर कुणाचंही नांव न घेतां पण स्पष्ट म्हणतोय !!

केवळ कांही दबावामुळेच तो कप्तान राहिला आहे >>> N श्रीनिवासन साहेब BCCI चे अध्यक्ष आणि CSK चे मालक आहेत. दॅट शुड एस्प्लेन Happy म्हणूनच नो परफॉर्मिंग अश्विन पण तिन्ही टीम मध्ये खेळतो. आता तर काय बॅटसमन म्हणूनच घ्या असे म्हणत आहेत. मग रहाणे, तिवारी, शर्मा, कार्तिक अश्या अनेक स्पेशालिस्ट बॅटसमन वर अन्याय झाला तरी काय झाले?

N श्रीनिवासन साहेब BCCI चे अध्यक्ष > जल्ला अध्यक्ष XI चा संघ काय फक्त सरावासाठीच असतो का? तिथे अध्यक्षाच्या घोड्यांची वर्णी नाही लागत का?

btw पवार साहेब अध्यक्ष असताना अजित आगरकर संघात होता का?

खर तर अमरनाथला BCCI ने clean bold केलेले आहे, थोडा होमवर्क करायचा राव Happy

Amarnath was asked to clarify a rumour doing the rounds that he was cited the BCCI constitution that stated he could not sack Dhoni without the higher-ups clearing it. "Neither will I say yes nor will I deny it, okay," he responded. "I know the facts, and I will tell you the facts when I feel the time is right." He did go on to say, though, that he was not aware of the constitution. Clause 13(a)(iv) of the BCCI constitution states that: "The President shall approve the composition of a team, selected by the Selection Committee."

"When somebody becomes a selector, I don't think you are aware of the constitution of the BCCI," he said. "I was not aware. I don't think even the current committee is aware of the constitution."

I have to say BCCI is way smarter than it appears Wink

jokes apart, अमरनाथ नि श्रिकांत हे आत्ता हे सगळे उघड उघड बोलू लागलेत ह्याची अधिक मजा वाटतेय, आधीची कमिटी समाप्त झाल्यावर का नाहि बोलले हे सगळे ? सगळे एका माळेचे मणी आहेत.

btw पवार साहेब अध्यक्ष असताना अजित आगरकर संघात होता का?>>> क्वचित होता. पण आगरकर हा कायमच फेवरिट राहिलेला आहे - राज सिंग डुंगरपूर, दालमिया, मुथैय्या सर्वांच्याच काळात तो संघात होता. कप्तानही अझर, सचिन, गांगुली, द्रविड असतानाही तो होता. उलट शरद पवारांच्या काळातच कमी वेळ होता संघात. सध्याच्या बोलर्सची कामगिरी - विशेषतः फिल्डिंग बघता तो अजूनही वाईट चॉईस नाही. निदान रन्स वाचवेल, आणि थोडेफार करेलही Happy

बाकी धोनीला कप्तानपदावरून दूर केले तरी विकेटकीपर-बॅट्समन म्हणून किमान एक सिरीज संधी मिळायला हवी.

आश्विन व रवीन्द्र जडेजा संघात असणे हे त्यांच्या चेन्नई सुपर किंग्स मधल्या सहभागाशी संबंधित असू शकते. जडेजा ने नुकतीच फर्स्ट क्लास मधे दोन त्रिशतके मारली आहेत हे वरकरणी योग्य कारण वाटते, पण रणजी बिणजीतील कामगिरी बघायला गेलो तर हृषिकेश कानिटकर सध्या भारताचा कप्तान हवा. कोणाच्याही खिजगणतीत नसलेल्या राजस्थान संघाचे नेतृत्व करून त्याने दोनदा रणजी ट्रॉफी जिंकून दिली आहे!

बाकी धोनीला कप्तानपदावरून दूर केले तरी विकेटकीपर-बॅट्समन म्हणून किमान एक सिरीज संधी मिळायला हवी >> टेस्ट कप्तानपदावरून नक्की दूर करावे. विकेटकीपर-बॅट्समन म्हणून नक्की संधी मिळायला हवी, खर बघता विकेटकीपर म्हणुन धोनीवर शंका घेणे चूकीचे आहे. पटेल , साहा, कार्थिक ह्यांच्यामधे तो नक्कीच सरस आहे.

२०-२० हा "पर्क" आहे तर कसोटी क्रिकेट हे "काम" - हे केल्यशिवाय ते मिळणार नाही, असे काहीतरी करायला हवे.
हा किंवा इतर असाच काही नियम करणे हे जर क्रिकेट्प्रेमी लोकांच्या हातात असते तर तसे झाले असते. सध्या क्रिकेट चा उपयोग फक्त पैसे मिळवण्यासाठी होत असल्याने जे काय खपेल ते विकायचे असे चालू आहे.

तसे इतरत्रहि - उदा. चित्रपट सृष्टीत, ज्यात जास्त पैसे मिळतात असेच चित्रपट काढायचे. मग संगित, अभिनय, इतर कला प्रदर्शन याला अत्यंत गौण स्थान.

सध्या पैसा बोलतो. उच्च अभिरुचि, विद्वत्ता यांना महत्व नाही. उदा. पूर्वी तलवार भाले घेऊन लढाई करणारे लोक होते, शूरवीर होते. पण बंदुका, मशिन गन, तोफा, बाँब यापुढे त्यांचा टिकाव कसा लागेल?
जिंकायचे तर प्रचंड अक्कल, उत्तम अभिरुचि यांच्या जोडीला इतरहि काही साधने हवीत, जसे पैसा.

आता जर असे खरे दर्दी लोक भाराभर पैसे देऊ शकले, तरच चांगला दर्जा टिकेल, नाहीतर कोण कटकट करतो, शिस्त, सराव यात वेळ घालवण्यात!

तसे पाहिले तर आजकाल या इण्टरनेट व मायबोली सारख्या साधनांमुळे प्रत्यक्ष काही न करता नुसते मोठमोठे लेख लिहून स्वतः किती विद्वान आहोत, उच्च अभिरुचीचे आहोत ते जगाला ओरडून सांगायची सोय झाली आहे. मला स्वतःला पण हा मार्ग जास्त पसंत आहे. पण मी उघडच तसे सांगतो आहे.

<< पण रणजी बिणजीतील कामगिरी बघायला गेलो तर हृषिकेश कानिटकर सध्या भारताचा कप्तान हवा. >> स्थानिक स्पर्धा कसोटी क्रिकेटच्या जागतिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्याच्या दर्जाच्या राहिलेल्या नाहीत, हाही मुद्दा द्रविडने अधोरेखित केला आहे.
<< ...लेख लिहून स्वतः किती विद्वान आहोत, उच्च अभिरुचीचे आहोत ते जगाला ओरडून सांगायची सोय झाली आहे...>> झक्कीसाहेब, आमच्यासारख्या ' टेल एन्डर्स' फलंदाजाना असले थोबाड फोडणारे खतरनाक 'बाऊन्सर्स' तुमच्यासारख्या तुफान गोलंदाजानी टाकायचे नसतात, हा अलिखीत नियम आहे क्रिकेटचा !!! Wink

वेल ३ स्पिनर्स स्पेशालिटी + जडेजा अ‍ॅज स्पिनर आणि एकच फास्ट बोलर. आपण मुंबईच्या पीच वर खेळत आहोत की नागपुरच्या? नागपुर ही पाटा आहे (निदान आजपर्यंतच्या इतिहासात होती) हे कोणी तरी धोणीला सांगावे.

आणि आता त्या जिद्दी है पर तुफान है (अश्विनवाल्या अ‍ॅड) फार बोअर मारायला लागल्या आहेत. (आजच लावल्या तरी) च्यायला, आपले लोक कशावरही संतूष्ट होऊ शकतात.

आज सामना अजिबात पहातां नाही आला. स्कोअरवरून तरी भारताने थोडं नियंत्रण मिळवलय असं वाटतं.
सचिनवरचा क्रिकिन्फोमधील लेख छान ओघवत्या भाषेत आहे व सचिनच्या मनाचा वेध घेणारा आहे. पण तो वेध अचूक आहे असं सांगणं मात्र कठीणच.

Pages