क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< आज भाऊंची कॉलर टाईट >>सध्यां आपल्या क्रिकेटरांसंबंधी चांगलं बोलणं म्हणजे 'कॉलर टाईट' होण्याऐवजी कोण आपली कॉलर तर पकडणार नाही ना, याचीच धास्ती वाटते !! Sad

चला..........उद्या लंच पर्यंत टिकलो तर ५ किलो पेढे वाटीन म्हणतोय डोळा मारा >> काहीही बोलू नका उदयन . अजून १६ विकेट आहेत आपल्या , उद्या संध्याकाळ पर्यंत तर आपण हारत नाही घ्या Wink

मी याच इनिंग बद्दल बोलत आहे......आजकाल पुर्ण मॅच बद्दल काही भकित करणे तर नॅस्ट्राडॅमस ला सुध्दा शक्य होणार नाही Wink

आजकाल पुर्ण मॅच बद्दल काही भकित करणे तर नॅस्ट्राडॅमस ला सुध्दा शक्य होणार नाही>> आजची आपली बॅटिंग बघितल्यानंतर शेंबडं पोर पण भाकित करू शकेल Wink

क्रिकेटबद्दल दोन गोष्टी बोलल्या जातात....
१) क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स!
२) क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज!

देवसाहेब , तिसरी गोष्ट बोलली जाते ती -
३] क्रिकेट इज अ गेम प्लेड बाय २२ फ्लॅनेल्ड फूल्स !! [ *अँड वॉच्ड बाय मिलीयन्स ऑफ फूल्स !! ]

[* माझी पुस्ती Wink ]

सध्यां आपल्या क्रिकेटरांसंबंधी चांगलं बोलणं म्हणजे 'कॉलर टाईट' होण्याऐवजी कोण आपली कॉलर तर पकडणार नाही ना, याचीच धास्ती वाटते ! >> Happy

धीर धरा सरजी, चावलाने चार घेतल्यात तर जाडेजा शतक मारणार Wink

धोनीला म्हणावं हीच वेळ आहे टीकाकारांना गप्प करण्याची. वर्ल्ड कप फायनलसारखी एखादी इनिंग खेळ म्हणावं आता.

आश्विन, जडेजा यांनी आता ही मॅच वाचवण्यासाठी, जिंकण्यासाठी काही केले तर आपण त्यांना 'मानू'! Happy

<< आश्विन, जडेजा यांनी आता ही मॅच वाचवण्यासाठी, जिंकण्यासाठी काही केले तर आपण त्यांना 'मानू'! >> फारएन्डजी, असे काडीचे आधार मी देखील कित्येक वर्षं आपण अजूनही क्रिकेट कां पहातो यासाठी सबब म्हणून शोधत असायचो ! आतां मात्र हा आपल्याला झालेला असाध्य आजारच आहे हें ओळखूनच मीं क्रिकेट बघतो; त्रास व त्रागा खूपच कमी होतात ! Wink

२४ ( १२ मॅचेस) इनिंगमध्ये एखादी खेळली जरी घोणीने तर त्याला डोक्यावर का घ्यायचा?

आपण मॅच हारली तर बरे ! डोन्ट डिझर्व्ह ! निदान त्यामुळे टीम मध्ये बदल तरी होतील.

इतके सगळे धडपडत असताना रहाणेला का खेळवत नाहीत कुणास ठाउक?
या सगळ्यात रणकंदनात डंकन फ्लेचरचा काहीच प्रभाव जाणवत नाहीये.... इतके पैसे खर्चून नेमलेल्या कोचकडे कोणी बोट दाखवतानाही दिसत नाहीये.... सगळे आपले धोनी आणि सचिनच्या मागे लागले आहेत!

कोहली , धोनी लढले तरी . आता त्रिशतक सम्राट जडेजा यानी अर्धशतक जरी झळकावले तरी आपण मॅचचे कंट्रोल घेऊ शकतो .

आजच्या पार्टनरशीप मुळे आता हारण्याऐवजी ड्रॉ कडे वाटचाल सुरू झाली आहे असे वाटते. थॅक्स धोणी आणि कोहली ! पण धोणीने १ धावेसाठी पेशन्स का सोडला देवच जाणे. उलट तो राहिला असता तर आपण १०० चा लिड देऊ शकलो असतो.

स्वतःसाठी जेव्हा तुम्ही खेळतात तेव्हा शतक काय द्विशतक सुध्दा करु शकतात >>. मग हे सर्व लोक ५, १० धावा काढून आउट होतात ते देशासाठी खेळतात आणि मॅच हारवतात असे म्हणायचे आहे का? मी तर म्हणेन स्वतःसाठी प्रत्येक मॅच मध्ये ५० /१०० धावा काढाना, कोणी अडविले? तेवढेच भारतात पहिले पाच लोक ५०० काढतात अशी पब्लीसिटी होईल आणि कदाचित मॅच जिंकू की. Happy

पहिले ३ मॅच मधे कुठे गेलेला सुज्ञपणा या दोघांचा ?????????? Uhoh
.
.
लोकांनी शिव्या द्यायला लागले तेव्हा कुठे स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खेळले ... खरच जर देशासाठी खेळले असते तर सेट झाल्यावर किमान वेगाने धावा काढल्या... किमान त्यांचे ३३० धावा तरी आजच्या चहापान च्या जवळपास ओलांडले असते... तळाच्या फलंदाजांनी हाणामारी करुन किमान ८० धावां तरी जास्त बनवल्याअसत्या तर... उद्या दोन दिवसात निकाल मिळु शकला असता....

. मग हे सर्व लोक ५, १० धावा काढून आउट होतात ते देशासाठी खेळतात आणि मॅच हारवतात असे म्हणायचे आहे का >> Lol

लोकांनी शिव्या द्यायला लागले तेव्हा कुठे स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खेळले>>> ते नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. पण निदान तेव्हातरी खेळले. स्वतःसाठी तर स्वतःसाठी, निदान खेळा तरी असे म्हणायची वेळ आली आहे सध्या.

मग हे सर्व लोक ५, १० धावा काढून आउट होतात ते देशासाठी खेळतात आणि मॅच हारवतात असे म्हणायचे आहे का >>> Lol

आजच्या पार्टनरशीप मुळे आता हारण्याऐवजी ड्रॉ कडे वाटचाल सुरू झाली आहे असे वाटते. थॅक्स धोणी आणि कोहली ! >>> पण मॅच ड्रॉ (हा शब्द येथे असा देवनागरीत लिहीणे मॅच ड्रॉ करण्यापेक्षा अवघड आहे Happy ) करण्यात काय अर्थ आहे, सिरीज तर जाईलच. त्यापेक्षा उरलेल्या दोन दिवसांत आक्रमक खेळून जिंकण्याचा प्रयत्न करताना हरले तरी चालेल. धोनीने मागच्या वर्षी विंडीज मधे केले तसे करू नये.

आक्रमक खेळून जिंकण्याचा प्रयत्न करताना हरले तरी चालेल >>> बरोबर आहे. पण प्रयत्न करून. अन्यथा आपण पहिल्या इनिंग मध्ये गुंडाळून जाऊन फॉलोऑन मध्येही हरलो असतो. Happy

आज आक्रमकपणे इनिंग डिक्लेअर केली ते चांगले झाले. नाहीतर अश्विनला दोनदा संदेश पाठवून पण तो १ धाव पण घेत नव्हता. ह्या लोकांवर नंतर काही कारवाई होते का ते माहित नाही, पण पहिल्या १ तासात आपण घोळ घातलाच. तसेही आउट होणारच होते तर मारायला हवे होते पण अश्विन ढिम्म !

हे लोक कुठल्या टॅक्टीज लढवतात ते कळत नाही. दरवेळी आपली बोलरची निवड चुकली आहे. फक्त एका मॅच मध्ये आपण आणि ते, तीन तीन स्पिनर्स ला घेऊन खेळलो. अन्यथा दोन वेगवान गोलंदाज नेहमी हवेत.
एका फास्ट बोलरची (उमेश यादव किंवा आवना पण चालला असता) गरज आहे असे वाटते. अनइव्हन बाऊंसमुळे विकेट मिळाल्या असता. आता (चौथ्या दिवशी) साडेपाच सेशन बाकी असताना आपण हरलो तर ते केवळ फास्ट बोलर नसल्यामुळे. आपण त्यांना आज ऑलाऔट केले तरच ही मॅच जिंकू शकतो. अन्यथा उद्या पहिल्या सेशन मध्ये गेले तरी ते मग ड्रॉ च्या दृष्टिने खेळतील कारण अ‍ॅडव्हाटेंज त्यांचे आहे.

धोनी च्या नावावर अजुन एक रेकॉर्ड लागणार बहुदा........ भारतात पहिल्यांदा मालिका गमवण्याचा.......

या मुर्खाने काल ५० रन्स झाल्यावर जलद गतीने किमान एकाबाजुने तरी खेळायला हवे होते... जर आज सकाळी डाव घोषीत करणारच होते तर सुरुवातीचे १५ ओवर्स तरी कशाला खेळले.. तेव्हढाच अ‍ॅड्व्हांटेज आपल्याला सकाळच्या वातावरणाचा मिळाला असता.....
.
.आणि जर खेळायचेच होते तर सुरुवातीपासुनच हाणामारी करायची होती......असे पण ३३ रन्सचीच आघाडी होती त्यांच्याकडे ..... लवकर झटपट खेळुन..किमान ८०-९० रन्स करुन ५० रन्स ची तरी आघाडी घ्यायची होती..
.
.
आता इंग्लंड तर आरामात आजचा दिवस खेळुन काढेल... त्यांना मॅच ड्रॉच करायची आहे...
.
धोणीचे लक आता संपले......बसवा त्याला आता घरी.......१० मॅच मधुन १ इनिंग खेळुन काय उपयोग...?

शेवट फलंदाजी आपल्याला करायची आहे . तेंव्हा तीस चाळीस धावांचा फरकही निर्णायक ठरूं शकतो [ विशेषतः फलंदाजीचा सध्याचा आपला फॉर्म बघतां ! ]. << तेव्हढाच अ‍ॅड्व्हांटेज आपल्याला सकाळच्या वातावरणाचा मिळाला असता..... >> सहमत. आत्मविश्वास नसताना कांहीतरी विक्षिप्तपणा करून ' जमलं तर जमलं', अशी बिनहिशेबी जुगारी वृत्ती तर नाही ना या निर्णयामागे !!!

<<आपण आपल्याच घरात ...आणि इंग्रज मस्त आरामात ....>> ' इंग्रज इथं तब्बल तीनशे वर्षं हेंच करत होते, आतां कांही दिवस केलं तर कशाला एवढी बोंबाबोंब ', असं धोनीने म्हटलं तर !!!! Wink

<< तीनशे? >> ब्रिटीश सरकारच्या अधिपत्याखाली जरी हा देश अधिकृतपणे १८५८ मधे आला, तरीही ईस्ट इंडीया कंपनीमार्फत इंग्रजच आपल्याला आपल्याच घरांत असं खूप आधीपासूनच खेळवत नव्हते का ?
शिवाय, आंकडेवारीत मी कच्चा आहे हें तर मीं केंव्हाचंच कबूल करून आहे !! Wink

ब्रिटीश सरकारच्या अधिपत्याखाली जरी हा देश अधिकृतपणे १८५८ मधे आला, तरीही ईस्ट इंडीया कंपनीमार्फत इंग्रजच आपल्याला आपल्याच घरांत असं खूप आधीपासूनच खेळवत नव्हते का ?

>> भाउ... घ्या आकडेवारी.. Wink १९४७ - १६०१ = ३४६ वर्ष. पहिली ६ वर्ष बस्तानाची सोडली तरी ३४० कुठे नाही गेली.. Happy

रच्याकने,,,, नशीब पोर्तुगिझ क्रिकेट खेळत नाहीत.. Wink Proud

Pages