क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बलात्कार झालेला असताना , त्याबद्दल दिल्ली जळत असताना, सचिनला स्वतःच्या निव्रुती चार दिवस पुढे धकलता येत नाहि (इतके दिवस सर्व मिडिया ओरडत होते तेव्हा मात्र साहेब म्हणत होते - मी स्वतः ठरवीन कधी निव्रुती घ्यायची ते). आणी हे माहित असताना कि सर्व मिडिया त्याला कव्हरेज देणार. ! सनसनाटी निर्माण करायला हाच मुहुर्त बरा सापडला!
------ अत्यंत परखड मत....

भारतीय - कृपया ७:२४ ची पोस्ट संपादित करणे, खुप टोकाची आणि बोचरी आहे, अशा भाषेची é शब्दांची अवशक्ता नाही.

<< तु इतके दिलेस की त्या आठवणी आयुष्यभरासाठी पुरुन उरेल >> रोहनजी, १००%सहमत. सचिनच्या निवृत्तिविषयीं मतं कांहीही असूं शकतात व तशीं असावीतही; पण तीं व्यक्त करताना आपण एका दीर्घ, दैदिप्यमान व अभिमानास्पद कारकिर्दीसंबंधात, आदर्श वागणूकीसाठी जागतिक मान्यता पावलेल्या एका भारतीयाबद्दल व वर्षानुवर्षं अगणित जणाना निखळ आनंद देणार्‍या खेळाडूविषयीं बोलतोय, ही भावना ऐकणार्‍याना नाही जाणवली, तर खेळांचं मर्मच आपल्याला उमजलं नाही असंच दुर्दैवाने म्हणावं लागेल !

सकाळी वृत्तपत्र वाचले तेव्हा बातमी होती...पाकिस्तानविरुद्ध टी-२० आणि एक दिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची आज निवड...सचिन खेळण्यास उत्सुक...तसे त्याने निवडसमितीला कळवलंय म्हणे.....
संध्याकाळी पाहतोय तर बातमी अशी...एकदिवसीय सामन्यातून सचिनची निवृत्ती जाहीर...संघ निवडीआधी सचिनचे पत्र निवड समितीला मिळाले.
नेमकं काय समजायचं आम्ही? निवडसमितीने सांगितले?....अरे आता पूरे कर?
मग निवृत्ती जाहीर आणि पाठोपाठ संघाची घोषणा?

आदर्श वागणूकीसाठी जागतिक मान्यता पावलेल्या
------ आदर्षाच्या व्याख्या वेगळ्या असाव्यात...

भेट म्हणुन मिळालेल्या फेरारीवर सरकारने कर माफ करावा म्हणुन अर्ज खरडणार्‍याला आदर्ष म्हणावे ?

का खेळातील आणि जाहिराती मधे मिळालेल्या पैसा हा खेळातुनच मिळाला आहे असे भासवुन कोट्यावधी रुपयांचा कर बुडवणारा आदर्ष आहे ? कॅग ने त्याला सवलत दिली म्हणुन ताशेरे मारले होते.

http://articles.timesofindia.indiatimes.com/2007-05-15/india/27869492_1_...

http://www.business-standard.com/india/news/cag-faults-tax-exemptions-to...

सचिन साठी कर सल्लागारांचा आणि पत्रकारांचा मोठा ताफा काम करतो... म्हणुन त्याच्याकडुन असे वर्तन अपेक्षीत नाही.

उदयजी, 'कॅग'ने आयकर विभागावर सचिनला चूकीची सवलत दिल्याबद्दल ताशेरे ओढले आहेत; सचिनने बुद्धिपुरस्सर 'फ्रॉड' केल्याबद्दल नव्हे, असं आपलं वाचून मला वाटतं. पण आपल्या 'आदर्श वर्तणूकीच्या'च्या व्याख्येत तरीही जर सचिन बसतच नसेल , तर निदान ' दैदिप्यमान व अभिमानास्पद कारकिर्दीसंबंधात' व 'वर्षानुवर्षं अगणित जणाना निखळ आनंद देणार्‍या खेळाडूविषयीं' हे माझे बाकीचे दोन निकष तरी पहा पटतात का आपल्याला सचिनबाबत.

दैदिप्यमान व अभिमानास्पद कारकिर्दीसंबंधात' व 'वर्षानुवर्षं अगणित जणाना निखळ आनंद देणार्‍या खेळाडूविषयीं' हे माझे बाकीचे दोन
---- १०० % यात वादच नाही...

'कॅग'ने आयकर विभागावर सचिनला चूकीची सवलत दिल्याबद्दल ताशेरे ओढले आहेत; सचिनने बुद्धिपुरस्सर 'फ्रॉड' केल्याबद्दल नव्हे, असं आपलं वाचून मला वाटतं.
---- त्याच्या कडे कर सल्लागारांचा ताफा आहे. त्याच्या आदेशानुसार आणि कायद्यात बसू शकेल असे पैसे वाचवण्याचे मार्ग त्याला ते सांगत असतील, तो त्याचा हक्क बनतो, त्याने कागद पत्र सादर केल्यावर, आयकर खाते त्याची शकानिशा करत असतील.... CAG चे ताशेरे आयकर खात्याने मान्यता देण्याबाबत आहे. त्याच न्यायाने फेरारीच्या करमाफी बाबत दोष अर्थ मंत्र्यां कडे जातो.... पण कुठल्या प्रकारच्या उत्पन्नावर कर आहेत याबाबतचे नियम सहज समजतील असे सुट सुटीत आहेत.

याच पळवाटा इतरांनी वापरल्यास त्याला 'फ्रॉड' असेच म्हणतात...

सचिनच्या निवृत्तिविषयीं मतं कांहीही असूं शकतात व तशीं असावीतही; पण तीं व्यक्त करताना आपण एका दीर्घ, दैदिप्यमान व अभिमानास्पद कारकिर्दीसंबंधात, आदर्श वागणूकीसाठी जागतिक मान्यता पावलेल्या एका भारतीयाबद्दल व वर्षानुवर्षं अगणित जणाना निखळ आनंद देणार्‍या खेळाडूविषयीं बोलतोय, ही भावना ऐकणार्‍याना नाही जाणवली, तर खेळांचं मर्मच आपल्याला उमजलं नाही असंच दुर्दैवाने म्हणावं लागेल ! >> +१. भाऊ एव्हढे बोलून सोडून द्या. खेळ नि खेळाच्या बाहेरचे जग ह्यामधे फरक आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे हे ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांच्याशी वाद का घालताय ? तुम्हा आम्हाला सचिनने खेळाची मजा लुटण्याचा आनंद दिला ह्याबद्दल त्याचे मनात आभार मानून पुढे सरकूया.

My favorite moment of Sachin is "he crying on shoulders of Sanjay Manjrekar after loss in Eden Gardens in 96 semi final against lanka." It showed what Sachin really is. Next closest is Sharajah blast against Aussies followed by 2003 Pakistan match. केवळ ह्या तीन प्रसंगासाठी मी सचिनचा सदैव र्‍हुणी आहे. रोहनने वर लिहिलय तसे माझ्या वयाच्या बहुतेकांचे क्रिकेट प्रेम सचिन मूळे सुरु झाले.

<< माझ्या वयाच्या बहुतेकांचे क्रिकेट प्रेम सचिन मूळे सुरु झाले. >> माझ्या वडिलांचं क्रिकेटप्रेम सी. के. नायडूंमुळे सुरूं झालं. ते क्लब क्रिकेट खेळले होते व क्रिकेटची जाणही त्याना खूप चांगली होती. वयाच्या नव्वदीच्या आसपास डोळ्यांवर ताण यायचा म्हणून त्यानी टीव्हीवर सामने पहाणं थांबवलं, फक्त दोन अपवाद सोडून; शेन वॉर्न गोलंदाजी व सचिन फलंदाजी करायला आला कीं ते खुर्ची सरसावून टीव्हीसमोर बसायचे. त्यावेळीं नव्वदीतल्या त्यांच्या चेहर्‍यावरचा ओसंडणारा आनंद, ते देत असलेली उत्स्फुर्त दाद मला निखळ क्रिडाप्रेमाचं महात्म्य पटवून गेली. आतां तर मी स्वत:ला 'सचिनवेडा' म्हणवून घ्यायलाच आसुसलेला असतो !! फक्त, असं लोभस वेड कवटाळण्याची सुवर्णसंधी सचिन, वॉर्नसारखे खेळाडू सध्याच्या पिढीला आयते देत असताना तिकडे पाठ फिरवतान कुणाला पाहिलं कीं खूप वाईट वाटतं इतकंच !!!

रोहनजी, आवडलं.
एक वर्ग राहिलाच त्यांत; " आतां बघा भारतातले इतर सर्व खेळ उर्जितावस्थेला येतील ! ", असं म्हणणार्‍यांचा !!
धन्यवाद.

मला असं वाटतं की त्यानं निदान एक मॅच खेळुन निवृत्त व्हायला हवं होतं. अनिल कुंबळेला सगळ्या खेळाडुंनी उचलुन पॅव्हॅलियन मधे नेलं तसं. मैदानावरूनच ही माझी शेवटची मॅच असं खेळुन स्टँडींग ओवेशन घेवुन जायला हवं होतं. तेवढं त्यानं आपल्याला द्यायला हवं होतं.

धोणीची वन ऑफ द बेस्ट इनिंग. पाकसोबतच्या त्या १८३ नंतरची मला आवडलेली. हॅट्स ऑफ ! वेल प्लेड. आता हारलो तरी हरकत नाही, पण २९ वर ५ ते २१७ वर ६ ( अ‍ॅन्ड काउंटींग ) प्रवासच मस्त होता.

OMG! भूवीचा पहिला (इनिंगचाही) बॉल काय होता! दुसर्‍याही बॉलवर आउट होता. कमॉन बिली !

कमॉन गाईज वि कॅन डू इट !

२९-५ वरुन २२७-६ केले ...... मोठा चमत्कारच होता....
असो.....पुढचे दोन्ही मॅच मधे चांगले खेळा...वर्ष बदलेल.....नशिब पण बदलेल ........ Happy

परवा कुठेतरी वाचले की भुवनेश्वरला इंग्लंड विरुद्ध खेळवायला पहिजेल होते..... भुवन विरुद्ध इंग्रजांचा इतिहास खराब आहे Happy
मस्त बॉलिंग करतोय पठ्ठ्या!

धोनी मस्तच खेळला आज्.....रैना आणि अश्विननेही मस्त साथ दिली त्याला!

आता हारलो तरी हरकत नाही,

बरं झालं तुमची हरकत नव्हती, नाहीतर लोकांनी केव्हढा आरडा ओरडा केला असता, हरले म्हणून.

आता सचिनची जागा धोणी घेणार. शतक केले की सामना हरणार!!

नाहीतर लोकांनी केव्हढा आरडा ओरडा केला असता >> हो ना ! म्हणूनच ते लिहिले.

आता सचिनची जागा धोणी घेणार. शतक केले की सामना हरणार! >>

हो त्यांना विचारायचे आहे की, आता धोणीचे शतक झाल्यावरही हारलो आपण, मग? च्यायला सच्याने अश्या अनेक सिच्युएशन मध्ये शतक ठोकले आहे, आणि हे बसतात सच्याने शतक काढले की आपण हारलोच म्हणून.
Knocks like this separates men from boys ! आणि म्हणूनच सचिन सचिन होता. असो !

बाकी बोवाजी तुम्ही कुठे गायब झाला आहात अश्यात, त्यामुळेच मॅच हारतो आपण, जरा गणपतीला पाण्यात टाका, तुमचे (तरी) ऐकेल तो.

एक क्रिकेटर व समालोचक म्हणून टोनी ग्रेगच्या निधनाने क्रिकेटची सरासरी उंची कांही अंशीं तरी कमी झाली असावी ! Sad
माईक हसीने निवृत्ति जाहीर केलीय ! ऑसीजविरुद्धच्या मालिकेआधी भारताला सतत खुपणारा एक मोठा कांटा कमी झाला !!! मला त्याच्या निरोपाच्या भाषणातील हा भाग भावला -
"It's a little bit sad and I will miss certain parts of it. But there's so much more to life than just playing cricket, and I have those fantastic memories, but there's going to be a lot of things I certainly won't miss, like the really sick feeling in the stomach when you have to go out and bat in a Test match, the constant time away from home, training, travel, hotels and airports. It does wear you down after a while. "

जरा गणपतीला पाण्यात टाका,
मला वाटते, गणपतीबाप्पा पेक्षा, बीसीसीआय च्या सर्व लोकांना - खेळाडू, समालोचक, निवडसमिती, अध्यक्ष, सेक्रेटरी,- या सर्वांना बरेच दिवस पाण्यात बुडवून ठेवावे. जरा शांतता होईल.

<< ....आणि नेहमीप्रमाणे झक्कींचा षटकार! >> हो, झक्कीजी, इथं अशीच फटकेबाजी कृपया नियमितपणे करत रहा; नाही तर कुणीतरी तुमच्याही इथल्या निवृत्तिची मागणी करायला कमी नाही करणार ! मग आमच्यासारख्या वेड्याना पुन्हा मनस्ताप !! Wink

When Sachin used to score heavily and India used to lose , he was selfish and playing for records . When Dhoni scores and India loses, he fought alone so bravely !Today's DHONI's inning was as selfish and for records as it can be , still it's ok! sad Sad

Pages