वर्तमानात घेतलेला भविष्याचा शोध (Talaash - Movie Review)

Submitted by रसप on 1 December, 2012 - 00:42

अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली
कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. नसेल पटत तर एकदा रीमा कागती दिग्दर्शित 'तलाश' पाहा, कदाचित पटेल आणि तरीही नाही पटलं तर हरकत नाही. ओघ चालू आहे, कधी ना कधी पटेलच; अशी मला - रणजितला - एक वेडी खात्री आहे.

सुर्जनसिंह शेखावत उर्फ सूरी (आमीर खान) मुंबई पोलीसदलातील एक निरीक्षक असतो. नव्यानेच ह्या शहरात दाखल झालेल्या 'सूरी'कडे केस येते एका विचित्र अपघाताची. हा अपघात साधासुधा नसतो, कारण तो फिल्म सुपरस्टार अरमान कपूरच्या गाडीला झालेला असतो आणि त्यात अरमान कपूर जागीच ठारही होतो. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वत:च्या घरापासून बरंच दूर, एका वेश्यावस्तीजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर, कुठलीही नशा केलेली नसताना, कधीच स्वत: गाडी न चालवणारा अरमान त्याच रात्री भरधाव गाडी का चालवत असतो? अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने त्याच्या अकौंटन्टकडून मोठी रक्कम का घेतलेली असते ? रस्त्यावर कुणीही नसताना अचानक रस्ता सोडून, त्याची गाडी समुद्रात का उडी घेते ? असे अनेक विचित्र प्रश्न ह्या केसला क्लिष्ट बनवत असतात. काहीच विशेष हाती लागत नसल्याने एक अन्सोल्वेबल केस म्हणून ही फाईल बंद करावी, असंही वाटत असतं.
दुसरीकडे, एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून नाव कमावलेला सूरी स्वत:ला एक कर्तव्यशून्य पिता मानत असतो. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याच्या अपरोक्ष अपघाती मरण पावलेला असतो. ह्या अकस्मात धक्क्यामुळे सूरी आणि त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) खूप अस्थिर असतात. दोघांतला संवाद खुंटलेला असतो. मनातल्या अपराधी भावनेमुळे सूरी अबोल, एकलकोंडा झालेला असतो. ह्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रात्रीची झोप हरवलेला सूरी बहुतेकवेळा रात्र-रात्र घराबाहेरच राहत असल्याने त्याचे व त्याच्या पत्नीचे नाते अजून बिघडत चाललेले असते.
अश्या विचित्र मानसिक व कौटुंबिक कोंडीत असलेल्या सूरीला एक अनाहूत वेश्या रोझी (करीना कपूर) अपघाताची केस सोडविण्यासाठी काही मदत करते आणि त्याला मानसिक आधारही देते. तो केसच्या मुळापर्यंत जाण्याच्या दिशेने झटू लागतो. हळूहळू गुंते उलगडत जातात आणि उघडकीस आलेले सत्य त्याचा वैयक्तिक आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही बदलते.

'तलाश' म्हणजे केवळ कुठली रहस्यकथा नाही किंवा फक्त एक भावनिक नाट्यही नाही. ही तलाश, हा शोध केवळ एका पोलिसाचा नसून एका पतीचा, पित्याचा आणि एका वेश्येचाही आहे. काही वेळी म्हणूनच आपल्याला असं वाटत राहातं की दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे ? थरारनाट्य की भावनाट्य ? उत्तर आहे - दोन्ही. फलित आहे - अप्रतिम !

talaash_350_110512050053.jpg

सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच ! पण त्याने रंगवलेला सूरी व इन्स्पेक्टर शेखावत लाजवाब.
करीना व राणी, दोघींना मर्यादित वाव असला तरी दोघीही चोख काम करतात. राणी मुखर्जी खूप आकर्षक दिसते.
छोट्याश्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी परत एकदा आपली छाप पाडतो. त्याचा पाठलाग होत असतानाचा संपूर्ण भाग अतिशय थरारक झाला आहे.
पटकथा अजून जराशी आवळता आली असती, पण जशी आहे तशीही छानच !
दिग्दर्शिका रीमा कागती, दुसऱ्याच सिनेमात खूप प्रभावी पकड दाखवते.
बऱ्याच दिवसानंतर एका सिनेमात गाणी कानांवर बलात्कार करत नाहीत. त्यासाठी राम संपत ह्यांचे विशेष आभार !
हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!

काही ठिकाणी जराशी गती मंदावली असली, शेवट झाल्यानंतरही शेवट चालू ठेवला असला, तरी 'तलाश' नक्कीच ह्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहेच.

(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !)

रेटिंग - * * *

http://www.ranjeetparadkar.com/2012/12/talaash-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवा तलाश पाहिला. बराच आवडला.

आवडलेल्या बाबी:
-करीना आणि नवाजुद्दिनचा अभिनय. आमिर आणि राणी फारसे प्रभाव पाडू शकले नाहीत असे वाटले. आमिरचा खूप वेळ एकच भाव होता चेहर्यावर आणि राणीला फारसा वाव नव्हता.
-संगीत, जास्तकरून पहिले गाणे
- कथा आवडली

न आवडलेल्या बाबी:
- संथ पटकथा, काही काही ठिकाणी बोअर झालं.
- शेवटचा धक्का झाल्यावर मग खूप ताणल्यासारखा वाटला. शेवट justify करायसाठी इतकं explanation द्यायची जरूर नव्हती. त्यामानाने कहानीचा शेवट खूपच crisp होता.
- पोलीस केस आणि मुलाची कथा अजून चांगल्या रितीने एकत्र गुंफता आल्या असत्या.

पण तरीही एक वेगळा चित्रपट बघितल्याचे समाधान मिळाले हे नक्की Happy

आणि हे सर्वच आघाडीचे हिरो करतातच. हे वर इतरेजणानी नमुद केलच आहे.>>> बच्चन करीत नसे हे पूर्वी कायम वाचलेले/ऐकलेले आहे. पण त्याचे ८० च्या उत्तरार्धातील चित्रपट पाहिले, की त्याने नाक खुपसायला हवे होते असेच वाटते. नाहीतरी अजून काय वाईट झाले असते ते चित्रपट? Happy

पण त्याचे ८० च्या उत्तरार्धातील चित्रपट पाहिले, की त्याने नाक खुपसायला हवे होते असेच वाटते. नाहीतरी अजून काय वाईट झाले असते ते चित्रपट?>> Happy

फारण्ड, परवानामध्ये नविन निश्चल हिरो मध्ये होता आणि अमिताभ व्हिलन. त्यावेळी त्यांच्यात काही प्रॉब्लेम झाले होते. नंतर देशप्रेमीमध्ये अमिताभने नविन निश्चलच्या रोलमध्ये बरीच ढवळाढवळ केली होती असे ऐकले होते.

तलाश पहिल्याच दिवशी बघितला. चांगला आहे नॉट द बेस्ट. मुळातच तो out and out suspense सिनेमाच नाही आहे. रसपने लिहील्याप्रमाणे सिनेमाच्या नावानुसार प्रत्येकजण कशाचा तरी शोध घेत आहे. त्यामुळे काही जबरदस्त शेवट होईल आणि सस्पेन्स फुटेल असा विचार मनात ठेऊन सिनेमा बघितला तर सिनेमा अगदीच फुसका वाटेल. अश्याच स्टाईलचा शेवट Dragonfly मध्ये आहे ना?

Spoiler: अमिरचा मुलाचा अपघात दुसर्‍या शहरात होतो ना? तिथुन बदली होऊन मुंबईत येतो ना? कारण शेवट मुंबईतील एका तलावाकाठी अमिर रडताना दाखवला आहे.

मला अमिरखानचे फक्त ३ सिनेमा त्याच्या करियरमध्ये बेस्ट वाटतात: सरफरोश, गुलाम, दिल चाहता है

मला अमिरखानचे फक्त ३ सिनेमा त्याच्या करियरमध्ये बेस्ट वाटतात: सरफरोश, गुलाम, दिल चाहता है
>>> गुलाम नाही पाहीला पण ह्या यादीत तारे जमीनपर पर पण चालेल Happy

>>अमिरचा मुलाचा अपघात दुसर्‍या शहरात होतो ना? तिथुन बदली होऊन मुंबईत येतो ना?<<

तो दुसर्‍या शहरातून बदली होऊन मुंबईत येतो, हे खरं.... पण ते पिकनिकसाठी त्याच - राहात असलेल्या - शहराच्या आसपास गेले होते, असं नाही म्हटलेलं.... कदाचित पिकनिकसाठी ते मुंबईत आले असावेत.. !! Wink

मुंबईतील एका तलावाकाठी अमिर रडताना दाखवला आहे.
>>> हा बहुतेक गोरेगावच्या आरे मिल्क कॉलनीतला तलाव आहे.
हाहाहा. कितीतरी फिल्म्सचे शुटिन्ग तिथे झाले असेल. तुम्ही तो गोष्टीत सुधा मुम्बईतलाच तलाव आहे असे का मानताय? आमिर राणी करिनासारखेच तो तलाव हे एक पात्र आहे ना फिल्ममधले. तसा तर आमिर पण पोलिस नाहीये. नाही का?

वर्षाला एक....अथवा हातातील चित्रपट पूर्ण झाल्याशिवाय दुसरा स्वीकारायचा नाही, अशा भूमिकेतून आपली चित्रपट कारकिर्द घडविणारा आमीर खानसारखा समंजस अभिनेता ज्यावेळी 'तलाश' स्वीकारतो त्याचवेळी ही बाब अधोरेखीत झालेली होती की या चित्रपटामध्ये 'हटके...' पटकथा असून त्याचे सादरीकरण वेगवान असणार.

'तलाश' ची कथा आणि तिची मांडणी....लॉजिक.... कुणाला पटो वा न पटो [आणि तसे झाल्याचे इतक्या प्रतिसादानंतर स्पष्ट दिसत आहेच] पण तलाश आमीर खानने का स्वीकारला असावा असे म्हणता येणार नाही, किमान इतका तरी तो प्रभावी झाला आहे हे नि:संशय.

'तलाश' मध्ये जितक्या उजव्या बाजू आहेत तितक्याच डाव्याही असू शकतील हे पाहाणार्‍याच्या वृत्तीवर अवलंबून आहे. म्हटला तर रहस्यपट, पण तलाश नक्कीच केवळ रहस्यपट न राहता एका सुखी जोडप्याच्या संसाराला मुलाच्या अपघाती अकाली मृत्यूने लागलेली दृष्ट आणि त्यामुळे त्या दोघांची घालमेल तर दाखवितोच, शिवाय त्या घालमेलीतूनच नायकाची नोकरीच्या ठिकाणी निर्माण झालेली अस्वस्थता दिग्दर्शिकेने छान पकडली आहे.

[रसप.....एक शंका आहे.....चित्रपट मी पाहिला, पण आता लक्षात येईना की, कारमध्ये सीमरनला मौजमजेसाठी तीन युवक घेऊन जाताना दाखविले आहे, पैकी ज्या निखिल देशपांडेमुळे तो अपघात घडतो, तो निखिल केवळ जखमी होतो की तोही शेवटी यमलोकी जातो ? जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत घरी दाखविला आहे व त्याला इन्स्पेक्टर शेखावत भेटतोही. ]

....वरील शंकेचा आणि 'रहस्यभेदा'चा काही संबंध नाही हे 'तलाश' न पाहिलेल्या सदस्यांनी कृपया लक्षात घ्यावे.

अशोक पाटील

@अशोक. ,

निखिल देशपांडेचा मृत्यू झाल्याचे दाखवलेले नाही. ते आवश्यक वाटले नसावे कारण असंही त्याची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी झालेली दाखवलेली आहे. फर्दर, झाल्या अपघातात व त्यानंतर घडलेल्या हलगर्जीपणात त्याचा काही हात नसल्याने त्याला जीवंत सोडला असावा!

निखिलच्या मृत्यू झालेला दाखवला नसेल तरिही तसा उल्लेख आहे. संजय केजरीवाल जेव्हा त्याच्या वडिलांना आपण प्रॉब्लेम मध्ये फसलोय अस सांगत असतो तेव्हा निखिलचा मृत्यू टेरेसवरून पडून झाला नाही, आम्ही खोटं सांगितलं असं सांगतो.

तेव्हा निखिलचा मृत्यू टेरेसवरून पडून झाला नाही, आम्ही खोटं सांगितलं असं सांगतो.>>> मॄत्यु नाही गं दक्षे, अ‍ॅक्सिडेंट झाल्याचं सांगतो तो. निखिल जिंवंत असतो पण तो बेडरिडन आहे व अपघातानंतर काही बोललेला नाही.

[रसप.....एक शंका आहे.....>>>> माझी पण. कित्ती दिवस झालं विचारावं विचारावं म्हणत होतो.

शशी कार मधुन सगळ्या मुलींना घेउन जात असतो. नाक्या नाक्यावर पोलीस बघतो. तेंव्हा करीना त्याला विचारते, पसिना क्यौं छुट रहें है शशी? (हिंदी समजुन घ्या) तेंव्हा शशी न ऐकल्यासारखे का करतो बरं?

माझ्या मते तरी तो सिन पुर्ण गंडलाय.

एक शंका माझी पण

रसप यांचं स्वतःच मल्टीप्लेक्स आहे का औरंगाबादेत ? किंवा स्वतःचा पॉपकॉर्न चा स्टॉल ??? खिलाडी ७८६ चं परीक्षण आलं नाही अजून Proud

@ दक्षिणा....

संजय आपल्या बापाला प्रथम तैमूरकडून आलेल्या 'ब्लॅक मेल' वाबत सांगतो आणि मग निखिलबाबत खुलासा करतो की, 'तो आपल्या जुहू बंगल्याच्या टेरेसवरून पडला नव्हता तर त्याचा कार अ‍ॅक्सिडेन्ट झाला होता....' म्हणजेच तो अजूनी जिवंत आहे मात्र मारामुळे स्मृतिभ्रंश झाला आहे, असा अर्थ निघतो.

@ निवांत पाटील....

तो कारमधील सीन... दलाल शशी, दोन अन्य कॉल गर्ल्स + करीना.... गंडलेला नाही. शशीला फुटलेला घाम पाहून करीना जरून ते वाक्य उच्चारते, पण ते शशी ऐकू शकत नाही त्यामुळे त्यावर त्याची काहीच प्रतिक्रिया दिसणार नाही पडद्यावर. आता तो का ऐकू शकत नाही, याचे उत्तर इथे देता येणार नाही....[रहस्यभेद होईल....!]

अशोककाका

आमीरने स्वतःच एका वाहिनीवर ब-यापैकी रहस्यभेद केलाय या बाबतीत. ती गोष्ट आधी माहिती असेल तर पिक्चर ब-यापैकी एण्जॉय करता येतो हे स्वानुभवाने सांगतो. अपेक्षाभंग होत नाही.

हो, किरण....मी पाहिला तो कार्यक्रम....स्टार प्लसवरील विविध मालिकेतील कलाकारांच्यासमोर तो गप्पा मारीत बसला होता, आणि तुम्ही म्हणता तसा [किंचित असा] रहस्यभेद केला होता.

तसा त्यापेक्षा जादाचा इथे मी केला तर 'रसप दादा' मला कच्चा खातील, थेट कोल्हापूरला येऊन.... Uhoh त्या भीतीपोटी मी वरील प्रतिसाद त्यातल्या त्यात सौम्य केला आहे....

अत्यंत जड अंतःकरणाने नमूद करावेसे वाटते आहे की, खिलाडी ७८६ हा सिनेमा मी काल व आज पाहू शकणार नाही. पहिल्या दोन दिवसांनंतर सिनेमा थेटरात जाऊन पाहाणे माझ्या 'उसूल के खिलाफ' असल्याने.... आता पाहाणारही नाही !

हे भले, रणजित !!! मग ही बातमी तर २१.१२.२०१२ पेक्षाही चिंताजनक वाटणार खिलाडी ७८६ चे टिपिकल 'रसप' रसग्रहण वाचण्याकरीता देव पाण्यात बुडवून बसलेल्या इथल्या रसिक सदस्यांसाठी.

चुकुन सुध्दा रसप खिलाडी ७८६ पाहु नका........... Wink
उगाच..................... सगळ्यांचाच उध्दार कराल Happy
............................ मला आता अक्षय चा उध्दार करायला कंटाळा आलाय Wink

अरे रणजित.....२१.१२.२०१२ रोजी जगबुडी होणार आहे ना !! [फक्त माझ्यासारखे पोहायला येणारेच सदस्य वाचणार आहेत म्हणे....!!]

खिलाडी ७८६ ची कथा हिमेश रेशममियां यांनी लिहीलीये यावरून सगळी कल्पना यावी. त्यात एका भूमिकेसाठी अमिताभ बच्चन उपलब्ध झाले नाहीत म्हणून मलाच ती भूमिका करावी लागली हे वक्तव्य ऐकून या जन्माचे सार्थक झालेय.

कथा पण लिहीलीये? गाणीही गायलीत! अरे देवा!
एका भूमिकेसाठी अमिताभ बच्चन उपलब्ध झाले नाहीत म्हणून मलाच ती भूमिका करावी लागली हे वक्तव्य ऐकून या जन्माचे सार्थक झालेय.>> Lol

बहुतेक तो अक्कल उडून गेल्यानंतर टोपी घालायला लागला असावा.. अमिताभने नाकारलेली भूमिका..? इन्टरव्ह्यू घेणारासुद्धा फुटला असेल हे ऐकून -
>>त्यात एका भूमिकेसाठी अमिताभ बच्चन उपलब्ध झाले नाहीत म्हणून मलाच ती भूमिका करावी लागली<<

Pages