अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली
कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. नसेल पटत तर एकदा रीमा कागती दिग्दर्शित 'तलाश' पाहा, कदाचित पटेल आणि तरीही नाही पटलं तर हरकत नाही. ओघ चालू आहे, कधी ना कधी पटेलच; अशी मला - रणजितला - एक वेडी खात्री आहे.
सुर्जनसिंह शेखावत उर्फ सूरी (आमीर खान) मुंबई पोलीसदलातील एक निरीक्षक असतो. नव्यानेच ह्या शहरात दाखल झालेल्या 'सूरी'कडे केस येते एका विचित्र अपघाताची. हा अपघात साधासुधा नसतो, कारण तो फिल्म सुपरस्टार अरमान कपूरच्या गाडीला झालेला असतो आणि त्यात अरमान कपूर जागीच ठारही होतो. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वत:च्या घरापासून बरंच दूर, एका वेश्यावस्तीजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर, कुठलीही नशा केलेली नसताना, कधीच स्वत: गाडी न चालवणारा अरमान त्याच रात्री भरधाव गाडी का चालवत असतो? अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने त्याच्या अकौंटन्टकडून मोठी रक्कम का घेतलेली असते ? रस्त्यावर कुणीही नसताना अचानक रस्ता सोडून, त्याची गाडी समुद्रात का उडी घेते ? असे अनेक विचित्र प्रश्न ह्या केसला क्लिष्ट बनवत असतात. काहीच विशेष हाती लागत नसल्याने एक अन्सोल्वेबल केस म्हणून ही फाईल बंद करावी, असंही वाटत असतं.
दुसरीकडे, एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून नाव कमावलेला सूरी स्वत:ला एक कर्तव्यशून्य पिता मानत असतो. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याच्या अपरोक्ष अपघाती मरण पावलेला असतो. ह्या अकस्मात धक्क्यामुळे सूरी आणि त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) खूप अस्थिर असतात. दोघांतला संवाद खुंटलेला असतो. मनातल्या अपराधी भावनेमुळे सूरी अबोल, एकलकोंडा झालेला असतो. ह्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रात्रीची झोप हरवलेला सूरी बहुतेकवेळा रात्र-रात्र घराबाहेरच राहत असल्याने त्याचे व त्याच्या पत्नीचे नाते अजून बिघडत चाललेले असते.
अश्या विचित्र मानसिक व कौटुंबिक कोंडीत असलेल्या सूरीला एक अनाहूत वेश्या रोझी (करीना कपूर) अपघाताची केस सोडविण्यासाठी काही मदत करते आणि त्याला मानसिक आधारही देते. तो केसच्या मुळापर्यंत जाण्याच्या दिशेने झटू लागतो. हळूहळू गुंते उलगडत जातात आणि उघडकीस आलेले सत्य त्याचा वैयक्तिक आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही बदलते.
'तलाश' म्हणजे केवळ कुठली रहस्यकथा नाही किंवा फक्त एक भावनिक नाट्यही नाही. ही तलाश, हा शोध केवळ एका पोलिसाचा नसून एका पतीचा, पित्याचा आणि एका वेश्येचाही आहे. काही वेळी म्हणूनच आपल्याला असं वाटत राहातं की दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे ? थरारनाट्य की भावनाट्य ? उत्तर आहे - दोन्ही. फलित आहे - अप्रतिम !
सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच ! पण त्याने रंगवलेला सूरी व इन्स्पेक्टर शेखावत लाजवाब.
करीना व राणी, दोघींना मर्यादित वाव असला तरी दोघीही चोख काम करतात. राणी मुखर्जी खूप आकर्षक दिसते.
छोट्याश्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी परत एकदा आपली छाप पाडतो. त्याचा पाठलाग होत असतानाचा संपूर्ण भाग अतिशय थरारक झाला आहे.
पटकथा अजून जराशी आवळता आली असती, पण जशी आहे तशीही छानच !
दिग्दर्शिका रीमा कागती, दुसऱ्याच सिनेमात खूप प्रभावी पकड दाखवते.
बऱ्याच दिवसानंतर एका सिनेमात गाणी कानांवर बलात्कार करत नाहीत. त्यासाठी राम संपत ह्यांचे विशेष आभार !
हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!
काही ठिकाणी जराशी गती मंदावली असली, शेवट झाल्यानंतरही शेवट चालू ठेवला असला, तरी 'तलाश' नक्कीच ह्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहेच.
(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !)
रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2012/12/talaash-movie-review.html
>>आणि शशीकडे तिला आणले असेल,
>>आणि शशीकडे तिला आणले असेल, तर मग त्या दिवशी शशीकडे ती दुसरी "मुलगी " पण असणारच ना. कारण खून झालेल्या रात्री ती शशीच्या बरोबरच त्याच्या खोलीतच असते . तसेच शशी त्या रात्री त्या हीरोला ह्या संदर्भातच भेटलेला असतो कारण तो त्या मुलीला सांगतो कि अपुन ने कल उसको देखा था.....म्हणजे तो हीरो.. ह्या प्रकरणाची आवरा-सावर शशीला करायला सांगतो....म्हणजेच करीनाला ते तसेच सोडून नाही जात तर शशीकडे सोपवून जातात्....कन्फ्युझिंग ...
<<
करीनाचा अपघात ही ३ वर्षांपुर्वी घडलेली घटना आहे. हा संदर्भ लक्षात घ्या म्हणजे कन्फ्युझिंग वाटणार नाही.
मी काल एम टीव्हीवर तलाश मधल
मी काल एम टीव्हीवर तलाश मधल करीनाच गाण पाहील मुस्कान झुटी है मुंबई/पुणेत थिएटरात दाखवलय कॉय (कसली भारीदिस्तेय त्यात ) आमच्या ईकडे बीगसीनेमा थिएटरात नाही दाखवलं

आता सिनेमाची पटकथाच लिहून
आता सिनेमाची पटकथाच लिहून टाका इथे.
अजून लिहायचे काही शिल्लक असेल तर ते पण लिहा. स्पॉयलर अॅलर्ट वगैरे संकेतांची गरज तर कधी भासलेलीच नाही या बीबीवर..
मी पाहिला. चांगला होता. अख्तर
मी पाहिला. चांगला होता. अख्तर आणि कंपनीला पाण्याखाली बुडी मारल्यावर आत्मशोध लागतो असे दाखवायला आवडते वाटते. असो.
पण मला अजुनही कळले नाहिये की शशीला मारायची सुपारी कोण देत ? तो कसा मरतो? आणि असे काही लूज एन्ड्स आहेत ज्याचा संदर्भ लागत नाही.
माधवी शशीला मारायची सुपारी
माधवी शशीला मारायची सुपारी केजरीवाल देतो , तो डोक्यात गोळी बंदुकीची लागून मारतो
चला लोक्स करीनाचे दर्शन घ्या
चला लोक्स करीनाचे दर्शन घ्या आणी बंद करा
काय भुतीन
काय भुतीन दिसते..........असल्या भुताने मला झपाटले तर लाईफ झिंगालाला.......;)
.
.
भुत पण मेकअप करतात ...........कपडे बदलतात..... ?
पुर्वीची भुते.....बजेट कमी होते म्हणुन फक्त पांढर्या साडीतच असायचे
स्पॉयलर
स्पॉयलर अॅलर्टः
@फारएण्ड,
>>पण टायटलचा संदर्भ कथेशी ज्यांनी चित्रपट पाहिलाय त्यांनाच लागेल ना? उलट 'टायटल मधे संदर्भ लागतोय' या कॉमेण्ट्स मुळेच न पाहिलेल्यांना काहीतरी क्लू मिळतोय<<
तेच तर !
(आणि असंही आता न समजण्यासारखं काय उरलं आहे? अख्खा सिनेमा - सुरुवात, शेवट, मधले कित्येक सीन, (जसा कसा आहे तसा) सस्पेन्स - सगळंच तर सांगून झालंय!! मला तर असं वाटतं की, ज्यांनी सिनेमा अजून पाहिलेला नाही, त्यांनी हा बाफ वाचावा आणि तिकिटाचे पैसे वाचवावेत आता!) डोळा मारा
<<
काय कमाल आहे !
'अता काय ऑलरेडी कळलय लोकांना तर राहुच दे हेच टायटल' अॅटिट्युड खरच कम्माल आहे
अहो, साधी गोष्ट, इथल्या इतर पोस्ट्स बीबी उघडल्या शिवाय दिसत नाहीत पण तुम्ही दिलेलं टायटल सारखं मायबोलीच्या अनुक्रमणिकेत दिसतं ना, ज्यांना वाचायचं नसतं त्यांनाही हे टायटल तरी दिसतच डोळ्यावर पडल्याने !
इतर सिनेमांचं ठिक आहे पण निदान सप्स्पेन्स असलेलल्या चित्रपटा बद्दल कोणाला हिन्ट देउ हा कॉमन सेन्स आहे!
वर बिनुने लिहिलय ना इथल्या पोस्ट्स वाचला नवह्त्या तरी या तुम्ही दिलेल्या टायटल च्या "शब्दां" मुळे तिला सस्पेन्स लक्षात आलं !
असो.. कीप इट अप !
शीर्षक बदललं
शीर्षक बदललं आहे............
रहस्यभेदाच्या गुन्ह्यातून आता माझी मुक्तता (की मुक्ती?) करण्यात यावी.......!
मी_केदार शशीला मारायची सुपारी
मी_केदार
शशीला मारायची सुपारी केजरीवाल देतो , >>
पण मग तो तैमुर ला का म्हणतो की मी तर त्याला पैसे द्यायला आलो होतो 'मेलेमे'???
तो डोक्यात गोळी बंदुकीची लागून मारतो >>>>
ओक्क्के! सो तो बंदुकीची गोळी लागुन मरतो. एवढेच ध्यानात घ्यायचे,
'कोणी आणि कसे' ह्या प्रश्नांची उत्तरे 'सिनेमॅटिक लिबर्टी!'
पण मला अजुनही कळले नाहिये की
पण मला अजुनही कळले नाहिये की शशीला मारायची सुपारी कोण देत ? तो कसा मरतो? आणि असे काही लूज एन्ड्स आहेत ज्याचा संदर्भ लागत नाही.>>>
शशी संजय केजरीवाल आणि अरमान ला ब्लॅक मेल करत असतो. अरमान मेल्यावर, संजय शशीच्या जाचा ला कंटाळुन त्याला मारायची सुपारी देतो. प्रोफेशनल किलर त्याला मेळ्यात अज्ञात ठीकाणी उभाराहुन टिपतो. हे शशी मरतो तेंव्हा दाखवले आहे. तसेच केजरीवाल ला पोलीस अटक करायला जातात तेंव्हा ही तो सांगतो. सगळ्या घटना दाखवलेल्या आहेत किंवा संवादातुन उभ्या रहातात.
वर कोणी तरी लिहिले आहे की रोझी फक्त शशीच्या गर्लफ्रेंड ला सोडवायला का सांगते सुरीला. तर शशी ची गर्ल फ्रेड ही एकमेव व्यक्ति असते जिला त्या अॅक्सीडेंट च्या रात्री शशी अरमान ला भेटला हे माहित असते आणि तैमुर हा ह्या प्रकरणामधला लाभार्थी आहे हे ही माहित असते. तसच हिरवी बॅग वगैरे अनेक कड्या माहित असतात. म्हणुनच तिचा सुरीवर विश्वास बसण्यासाठी सुरीने तिला त्या नरकातुन सोडवले तरच ही माहिती त्याला पोहोचेल आणि विश्वासार्ह वाटेल. म्हणुन त्याला इतर स्त्रीयांना सोडवुन काय फायदा.....
मी_केदार ते पार्श्वगीत आहे,
मी_केदार ते पार्श्वगीत आहे, असं कसं कट झालं असेल?
रसप मी तर आत्ता काल पाहिला
रसप
मी तर आत्ता काल पाहिला सिनेमा. मला तर काही फरक पडला नाही तुमच्या शिर्षकामुळे. मी कदाचित फक्त परिक्षण वाचले पोस्टी वाचल्या नाही म्हणुन असेल.
पण मग तो तैमुर ला का म्हणतो
पण मग तो तैमुर ला का म्हणतो की मी तर त्याला पैसे द्यायला आलो होतो 'मेलेमे'???>>>
असतो ना... तिच त्याची स्ट्रॅटेजी दाखवली आहे. पैसे घेवुन तो उभा असतो आणि तेंव्हाच किलर त्याला टिपतो. तो तैमुर ला ही तसेच मारतो. पैसे देतो पण किलर ला त्याच्या मागे लावुन देतो. तो सापडल्यावर त्याच्या कडुन खरे काढुन घेवुन मारुन टाकायला सांगतो. पैसे गेले तरी चालतिल. हा अॅटिट्युड दाखवला आहे
रच्याकने... तैमुरचे पैसे त्या उतारवयाच्या वेश्ये कडे , निर्मला कडेच रहातात.... म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणात तिचा फायदाच होतो....
@माधवी, >>रसप मी तर आत्ता काल
@माधवी,
>>रसप
मी तर आत्ता काल पाहिला सिनेमा. मला तर काही फरक पडला नाही तुमच्या शिर्षकामुळे. मी कदाचित फक्त परिक्षण वाचले पोस्टी वाचल्या नाही म्हणुन असेल.<<
असो..! मी विचार केला की, इतकया छोट्याश्या कारणासाठी उगाच कशाला कुणाची नाराजी घ्या !
धन्यवाद !
धन्यवाद !
धन्यवाद !
धन्स, मोहन की मीरा
धन्स, मोहन की मीरा
मला काही फरक नाही पडला टायटल
मला काही फरक नाही पडला टायटल मूळे.
ज्याला वाचायचे असते ते वाचणारच ना...
>>
>>पण टायटलचा संदर्भ कथेशी ज्यांनी चित्रपट पाहिलाय त्यांनाच लागेल ना? उलट 'टायटल मधे संदर्भ लागतोय' या कॉमेण्ट्स मुळेच न पाहिलेल्यांना काहीतरी क्लू मिळतो>><<
+१
चला करीनाबाईचे रहस्य उघड्यावर
चला करीनाबाईचे रहस्य उघड्यावर आले अखेरीस इथल्या प्रतिसादांच्या गिरसप्प्यातून.
बाकी काही सदस्य म्हणतात त्यानुसार बर्याच 'कमजोर कडी' आहेत पटकथेत, पण तितकी लिबर्टी देणे/घेणे क्रमप्राप्त मानले जावे.
तसे पाहिले तर..... हॉटेल लिडोमधील एक प्रसंग अतार्किकच वाटतो....म्हणजे सीमरन उर्फ रोझी तर इन्स्पेक्टर शेखावतशिवाय कुणालाच दिसत नाही, हे तर उघडच होते नंतर. म्हणजेच ज्यावेळी सूरीला घेऊन रोझी लिडोमध्ये येते आणि हॉटेलमधील एका पॉश म्हटल्या जाणार्या रूमकडे जाते, ह्या प्रसंगात तिथल्या स्टाफला एक थ्री स्टार इन्स्पेक्टर एकटाच आपल्या हॉटेलमध्ये आला आहे असेच दिसणार हे मान्य करणे गरजेचे होते. हा इन्स्पे.शेखावत लिडोच्या काऊन्टरवर काही कसलीच चौकशी न करता थेट वरच्या मजल्यावर चालला आहे.....लॉक असलेल्या रुममध्ये कार्डाशिवाय प्रवेश करीत आहे....बेडवर निर्धास्त पहुडला आहे....ह्या बाबी हॉटेल मॅनेजर वा अन्य सर्व्हिस स्टाफला दिसत नसतील ? अन् दिसत असेल तर मग त्या शासकीय वर्दी अंगावर असलेल्या वरच्या पदावरील इन्स्पेक्टरला मॅनेजर/रीसेप्शनिस्ट "येस्स सर, मी आपल्यासाठी काय करू शकतो ?" असे त्यानी विचारणे हा त्यांच्या ड्यूटीचाच भाग आहे.
[त्यातही विशेष म्हणजे त्या रुमचे लॉक रोझी आपल्याकडील कार्ड स्वाईप करून उघडते आणि सूरीला आत येण्याचे निमंत्रण देते....
.....वास्तविक या भारतभूमीतील भूतीनी, चेटकिणी, हडळ यांच्या अमानवीय क्षमतेची परंपरा फार उज्ज्वल असूनदेखील आधुनिक घोस्टीनीला खोलीचे दार उघडण्यासाठी कार्ड स्वाईप मेकॅनिझमचा आसरा घ्यावा लागतो, हे नवलच....
:-D]
जेव्हा आमिर अरमानच्या बायकोला
जेव्हा आमिर अरमानच्या बायकोला भेटायला जातो (आणि तिथे संजय पण असतो), तेव्हा आमिर त्या दोघांकडे संशयाने बघतो, तेव्हा वाटले कि आमिर आता नक्की याची सगळी माहिती काढणार. निदान त्याला संशयित तरी ठरवणार आणि एक हवलदार तरी त्याच्या मागावर सोडणार.
आणि करीना त्याला एवढी माहिती देत असते, तर तो पोलिस असुन एकदा सुद्धा तीची माहिती काढायचा प्रयत्न करत का नाही?
आधुनिक घोस्टीनीला खोलीचे दार
आधुनिक घोस्टीनीला खोलीचे दार उघडण्यासाठी कार्ड स्वाईप मेकॅनिझमचा आसरा घ्यावा लागतो, हे नवलच.... >> मामा

पेरू ती आमिरला मदत करत असते
पेरू ती आमिरला मदत करत असते ना? मग तो कशाला तिची माहिती काढेल?
शनिवारी पिक्चर पाहिला. इथे
शनिवारी पिक्चर पाहिला. इथे ऑलरेडी रहस्यभेद झालेला होताच पण उलट त्यामुळे चित्रपट बघताना लिंक्स लागत होत्या त्याच्यात्या वेळेला त्यामुळे पिक्चर संपल्यावर नवर्याच्या प्रश्नांच्या सरबत्तीला धडाडीने तोंड देऊ शकले आणि त्यावर त्याच्यासमोर 'मी किती हुश्शार आहे, पटापट संदर्भ लागतात मला' अशी फुशारकीही मारता आली.
पिक्चरबद्दल :
ठिकठाक वाटला. आमीर ने स्विकारण्यासारखं काहीच नाहीये यात, त्याच्याजागी दुसरा कोणीही, अगदी इमरान हाश्मी ही चालला असता कारण आमीरपेक्षा कितीतरी धडाडीने आमचे एसीपी प्रद्युम्न रहस्यभेद करतात हो! हा शेखावत तर अगदी हातपाय गाळून बसलेला रड्या इन्सपेक्टर वाटतो. (अपवाद : शशीच्या गर्लफ्रेंड्ला सोडवताना एका दलालाला एक फाइट मारतो) बाकी कम्प्लिट पिक्चर करिनाचाच आहे. परफेक्ट सूडकथा. नाही म्हणायला सरतेशेवटी प्लॅनचेट करणार्या शेजारणीकडे जाते म्हणून बायकोवर "काय बावळटपणा आहे" म्हणून डाफरणारा आमीर अॅटलिस्ट तिच्या भावनांना समजू शकतो एवढाच काय तो त्याच्या व्यक्तीगत आयुष्यात फायदा.
राणी अगदी परफेक्ट हाऊसवाइफ वाटते.. नो वन किल्ड जेसिका मधली हीच का ती डॅशिंग न्यूज रिडर, मीरा असा प्रश्न पडावा इतका कमालीचा घरेलूपणा आहे तिच्या वावरण्यात, त्या मानाने तिला स्कोप कमी आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा पिक्चरमधला बेस्ट पार्ट आहे. काही प्रसंगात त्याने खरंच आमीरला खाल्लंय (जरी मला आमीर आवडत असला तरी). कहानी मधला एसीपी खान नाहीतर तैमूर, काहीही चालतं त्याला.
थोडक्यात, कुणीतरी वर म्हणलंय तसं, रहस्य माहिती होऊनही पिक्चर बघायला उलट मजाच आली
नाही म्हणायला सरतेशेवटी
नाही म्हणायला सरतेशेवटी प्लॅनचेट करणार्या शेजारणीकडे जाते म्हणून बायकोवर "काय बावळटपणा आहे" म्हणून डाफरणारा आमीर अॅटलिस्ट तिच्या भावनांना समजू शकतो एवढाच काय तो त्याच्या व्यक्तीगत आयुष्यात फायदा.>>>>
हा तर झालाच... पण आमीर आपल्या मुलाचा संदेश वाचुन स्वतःच तयार केलेल्या चक्रव्युहातुन सुटतो. तो स्वत्;ला मुलाच्या मृत्यु ला जबाबदार मानत असतो. मुलाला आपण वाचवु शकलो नाही ही खंत आणि आपल्या मुळे तो मेला हे ओझं तो बाळगत असतो. मुलाच्या संदेशाने ते ओझं हलकं होतं..... त्याला मुलाशी रेलेट व्हायचं असत.... राणी आधी एकदम मिटलेली दाखवली आहे. पण शेजारणीच्या मदतीने मुलाशी रीलेट झाल्यावर थोडी आनंदी, मोकळी, ओझं उतरल्या सारखी दाखवली आहे ( अगदी सुक्ष्म बदल... जसे आधी सगळे मळ्खाउ रंग.. पण सिनेमाला जाताना लाल ब्लाउज आणि छान साडी. नंतरही गर्द जांभळी हिरवी साडी. थोडे नीट तयार होणे)... छोटे प्रसंग आहेत पण बदल दिसतो. सुरीला ही हा बदल जाणवुन अचंभा वाटतो. त्याचं श्रेय तो डॉक्टर च्या औषधाला देताना दाखवला आहे.
शेवटी त्याला मुलाचा संदेश मिळाल्यावर त्याचं तुटुन जाणं आमीर ने फार छान दाखवलं आहे. त्या संदेशात लपलेला अर्थ त्याचं सगळं आयुष्य बदलुन टाकणारं असत. त्या आधी बायकोचे नवे चाळे, नवे उद्योग, आता त्याचा संदर्भ च बदललेला असतो.
रच्यकने.... शेहेनाज पटेल,
रच्यकने....
शेहेनाज पटेल, राणीची शेजारीण प्लँचेट करत नसते, ती "मीडियम" दाखवली आहे. "ऑटो रायटर". असे म्हणतात की ऑटो रायटर ना मॄतांचे संदेश येतात. ते त्या मॄताच्या शब्दात, व भाषेत लिहु शकतात. अगदी ती भाषा त्यांना अवगत नसली तरी. काही काही वेळेस ते मॄत व्यक्तिचं अक्षरही ( हँडरायटिंग) ही काढतात.
रसप, काहीही क्ल्यु मिळाला
रसप,
काहीही क्ल्यु मिळाला नव्हता तुमच्या आधी दिलेल्या टायटल मधुन.
सगळे क्ल्यु प्रतिसांदातुनच मिळाले.
मोकीमी, बापरे, वाचूनच डेंजरस
मोकीमी, बापरे, वाचूनच डेंजरस वाटतंय हे.
छोटे बदल दाखवले आहेत मान्य पण मेनली तो त्या सगळ्या गोष्टींकडे करिनाच्या रेफरन्स ने बघायला लागतो आणि विश्वास बसायला लागतो त्याचा त्या गोष्टींवर. मुळात असं काही असतं हेच मुळी त्याला त्या केसच्या संदर्भाने स्विकारावंसं वाटतं... नाहीतर बायको एवढी बोंब मार-मारून सांगत असते की मुलाला त्याच्या डॅडाशी बोलायचंय तेव्हा अगदी हुडूत करतो तो तिला. (तसंही बायको काहीतरी पोटतिडकीने सांगतेय ते नवरा गांभिर्याने घेईलच कसा म्हणा... अतिशय वास्तवदर्शी घेतलाय पिक्चर :हाहा:)
मोकीमी, बापरे, वाचूनच डेंजरस
मोकीमी, बापरे, वाचूनच डेंजरस वाटतंय हे.>>>>
ऑटो रायटर असतात. आणि कधी कधी आपल्याला अचंभित करतिल अशा डिटेल्स ते देतात. माझ्या एका मैत्रिणीला त्याचा अनुभव आहे. त्या ऑटो रायटर करवी ती आपल्या दिवंगत पतीशी बोलायची. मी घाबरुन जास्त डिटेल्स कधीच विचारले नाहीत.
जगभर गाजलेल्या 'घोस्ट'
जगभर गाजलेल्या 'घोस्ट' चित्रपटातही अशी मृतांच्या आत्म्याशी संवाद साधणारी एक 'मिडिएटर' दाखविली आहे.....अशा मध्यस्थांना 'कॉन आर्टिस्ट' असे त्यावर विश्वास ठेवणारे म्हणतात.
ओडा मे ब्राऊन या नावाच्या कॉन आर्टिस्टकडून त्या चित्रपटात हकनाक मारला गेलेला नायक आपल्या प्रेयसीशी संवाद साधतो आणि गुन्हेगारांना शासन करतो असे दाखविले गेले होते.
'तलाश' मधील शहरनाझ पटेल हिची भूमिकाही याच पठडीतील आहे.
अशोक, हम्म, आधी सुरवातीला
अशोक, हम्म, आधी सुरवातीला वाटलं होतं की ती उगाच थोड्याफार माहितीच्या आधारे रोशनीच्या भावनांशी खेळतेय की काय, पण ती जेन्युइनली करत असते ते सगळं
Pages