अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली
कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. नसेल पटत तर एकदा रीमा कागती दिग्दर्शित 'तलाश' पाहा, कदाचित पटेल आणि तरीही नाही पटलं तर हरकत नाही. ओघ चालू आहे, कधी ना कधी पटेलच; अशी मला - रणजितला - एक वेडी खात्री आहे.
सुर्जनसिंह शेखावत उर्फ सूरी (आमीर खान) मुंबई पोलीसदलातील एक निरीक्षक असतो. नव्यानेच ह्या शहरात दाखल झालेल्या 'सूरी'कडे केस येते एका विचित्र अपघाताची. हा अपघात साधासुधा नसतो, कारण तो फिल्म सुपरस्टार अरमान कपूरच्या गाडीला झालेला असतो आणि त्यात अरमान कपूर जागीच ठारही होतो. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वत:च्या घरापासून बरंच दूर, एका वेश्यावस्तीजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर, कुठलीही नशा केलेली नसताना, कधीच स्वत: गाडी न चालवणारा अरमान त्याच रात्री भरधाव गाडी का चालवत असतो? अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने त्याच्या अकौंटन्टकडून मोठी रक्कम का घेतलेली असते ? रस्त्यावर कुणीही नसताना अचानक रस्ता सोडून, त्याची गाडी समुद्रात का उडी घेते ? असे अनेक विचित्र प्रश्न ह्या केसला क्लिष्ट बनवत असतात. काहीच विशेष हाती लागत नसल्याने एक अन्सोल्वेबल केस म्हणून ही फाईल बंद करावी, असंही वाटत असतं.
दुसरीकडे, एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून नाव कमावलेला सूरी स्वत:ला एक कर्तव्यशून्य पिता मानत असतो. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याच्या अपरोक्ष अपघाती मरण पावलेला असतो. ह्या अकस्मात धक्क्यामुळे सूरी आणि त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) खूप अस्थिर असतात. दोघांतला संवाद खुंटलेला असतो. मनातल्या अपराधी भावनेमुळे सूरी अबोल, एकलकोंडा झालेला असतो. ह्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रात्रीची झोप हरवलेला सूरी बहुतेकवेळा रात्र-रात्र घराबाहेरच राहत असल्याने त्याचे व त्याच्या पत्नीचे नाते अजून बिघडत चाललेले असते.
अश्या विचित्र मानसिक व कौटुंबिक कोंडीत असलेल्या सूरीला एक अनाहूत वेश्या रोझी (करीना कपूर) अपघाताची केस सोडविण्यासाठी काही मदत करते आणि त्याला मानसिक आधारही देते. तो केसच्या मुळापर्यंत जाण्याच्या दिशेने झटू लागतो. हळूहळू गुंते उलगडत जातात आणि उघडकीस आलेले सत्य त्याचा वैयक्तिक आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही बदलते.
'तलाश' म्हणजे केवळ कुठली रहस्यकथा नाही किंवा फक्त एक भावनिक नाट्यही नाही. ही तलाश, हा शोध केवळ एका पोलिसाचा नसून एका पतीचा, पित्याचा आणि एका वेश्येचाही आहे. काही वेळी म्हणूनच आपल्याला असं वाटत राहातं की दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे ? थरारनाट्य की भावनाट्य ? उत्तर आहे - दोन्ही. फलित आहे - अप्रतिम !
सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच ! पण त्याने रंगवलेला सूरी व इन्स्पेक्टर शेखावत लाजवाब.
करीना व राणी, दोघींना मर्यादित वाव असला तरी दोघीही चोख काम करतात. राणी मुखर्जी खूप आकर्षक दिसते.
छोट्याश्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी परत एकदा आपली छाप पाडतो. त्याचा पाठलाग होत असतानाचा संपूर्ण भाग अतिशय थरारक झाला आहे.
पटकथा अजून जराशी आवळता आली असती, पण जशी आहे तशीही छानच !
दिग्दर्शिका रीमा कागती, दुसऱ्याच सिनेमात खूप प्रभावी पकड दाखवते.
बऱ्याच दिवसानंतर एका सिनेमात गाणी कानांवर बलात्कार करत नाहीत. त्यासाठी राम संपत ह्यांचे विशेष आभार !
हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!
काही ठिकाणी जराशी गती मंदावली असली, शेवट झाल्यानंतरही शेवट चालू ठेवला असला, तरी 'तलाश' नक्कीच ह्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहेच.
(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !)
रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2012/12/talaash-movie-review.html
@केदार जाधव, हा 'रहस्यप्रधान'
@केदार जाधव,
हा 'रहस्यप्रधान' सिनेमा आहे.... असं मला तरी वाटत नाही. मी तसं माझ्या लेखातही म्हटलं आहेच.
मी ह्या सिनेमाचे ट्रेलर/ प्रोमोज पाहिले नाहीत. (किंबहुना, मी फार क्वचित टिव्ही पाहात असल्याने अन त्यातही माझा भर सलग एखादा सिनेमा पाहाणे किंवा क्रिकेट सामना पाहाण्याकडे असल्याने मी कुठल्याच सिनेमाचे ट्रेलरेत्यादी पाहात नाही.) जर त्यात ह्या सिनेमाची तशी छबी उभी केली गेली असेल, तर तो वेगळा भाग.... !
मी पूर्णपणे 'संदर्भ'रहित लिहिले आहे.
फालतू सिनेमा आहे.. मला फक्त
फालतू सिनेमा आहे.. मला फक्त ती प्रोफेसर ट्रिलोनी आवडली.
.. अगदी हॉगवर्ट्समधून आणून बसवली आहे.... षिनेमा अगदी बकवास आहे... तो पाण्यातला सीन ड्रॅगनफ्लाय किंवा साया मधून किमान जसाच्या तसा तरी ढापायचा की !
रसप जी , तम्हाला तुमची मते
रसप जी , तम्हाला तुमची मते मांडण्याचा अधिकार आहेच पण Biased लिहिण वाईट नाही का ? आमीर खानने केला म्हणून चित्रपट फालतू असू शकत नाही का ? हाच चित्रपट आमिर खान चा नसता तर असच परिक्षण लिहिल असत ?>>>>>>>>>>>>> केदार यांच्याशी सहमत
पिच्चर फुकटात पहायला मिळणार होता आज मला ....पण पुण्यात आज गुलामअलीच्या गझलान्ची मैफल आहे म्हणे तिकडे जायची ऑफर आली म्हणून पिच्चर कॅन्सल !!
जितू वर कुठला इन्ग्लिश पिच्चर
जितू वर कुठला इन्ग्लिश पिच्चर पण आलाय असा उल्लेख आहे तोही पाहून सान्ग कसाय ते मला इन्ग्लिश जास्त कळत नाही म्हणून मी पाहत नाही
रसप त्यांचा खरा पोटशुळ तोच
रसप त्यांचा खरा पोटशुळ तोच आहे, म्हणूनच ते वैयक्तीक पातळीवर उतरलेत, जाऊ दे.
. रसप साहेबः - मान्य आहे
.
रसप साहेबः -
मान्य आहे शा.खा. माझ्या जित्का डोक्यात जातो, तितका आ.खा. जात नाही... पण माझा तो आवडताही नाही! आणि एकाला हाणला म्हणून दुसर्याला का हाणू? मला तर सिनेमा खरोखरच खूपच चांगला वाटला. >>>> वैयक्तिक मला सुध्दा शाहरुख आवडत नाहीच आहे....तुम्ही तरी जब तक बघितला मी अजुन ही पाहिलाच नाही...;)
मी फक्त वाईट ला वाईटच म्हणतो..आमिर खान मला सुध्दा आवडतो..परंतु तुम्ही जर चित्रपटातल्या लुप पोल वर बोट ठेवुन चांगला म्हणाला असतात तर काहीच प्रोब्लेम नव्हता...या अर्थी तुम्ही फारच एकांगी लिहितात असे दिसुन आले..आणि सृष्टीचा नियम आहे...एकांगीला दुकांगी करावे लागते तरच बॅलन्स राहतो...आणि त्यामुळे जर आम्ही आमिरला हाणतोय तर तुम्हाला सुध्दा प्रोब्लेम नसावा...;)
.
१. तुम्हाला 'समाधानकारक' उत्तरं हवी आहेत. 'समाधानकारक' म्हणजे काय? हेही तुम्हीच ठरवलेलं असणार, त्यामुळे काहीही उत्तर दिलं तरी समाधान होईल असे वाटत नाही. >>>>>>>>>>
अतिशय गैरसमजुत आपली...लढाईच्या आधीच तुम्ही शस्त्रे टाकली हे बरोबर नाही राव
समाधानकारक या साठी बोललो कारण त्याचे अचुक उत्तर कथाकाराकडे सुध्दा नाही आहे..:खोखो: किमान माझ्या मनातला गोंधळ कमी होईल अश्या समाधानपुर्वक उत्तरे मिळतील अशी आशा आपल्या कडुन होती...कारण तुम्हाला चित्रपट कळाला ना...;)
.
२. तुम्ही आव्हान देताय, आवाहन करत नाही आहात.>>>>>> आधी आपल्यामनातला गैरसमज काढा जरा... जिथे मी ही प्रश्न लिहिलेत तिथे खाली एक लिंक दिली आहे...मायबोलीचे रहस्यकथाकार श्री. कौतुक शिरोडकरांची एक कथा जवळपास सारखीच आहे....परंतु ती एकदम पर्फेक्ट आहे.. वाचकाला पडणार्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शिरोडकरांनी कथेच्या शेवटी दिलेले आहे... अशी उत्तरे या चित्रपटाद्वारे मिळत नाही...आणि माझ्या मते आपण याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले... इथेच माझे आणि आपले मतभेद घडले.....
.
आपण लिहिता चांगले ....पुढिल लेखनाला शुभेच्छा......;) मतभेद तर होतच राहतील...
धन्यवाद
उदयन तुम्ही सगळे म्हणजे कोण
उदयन तुम्ही सगळे म्हणजे कोण हे आधी स्पष्ट करा, अगदी सगळ्यांच्या नावासकट ( म्हणजे आयडींसकट खरे नाव पाहीजेच असे अजीबात नाही ). म्हणजे पुढचे लिखाण थांबेल. तसेही तुम्ही बाकी बाफांवर कशी इतरांची कुचेष्टा करत असता ते मी पण पाहीले आहेच. त्यामुळे आधी दुसर्याकडे बोट दाखवतांना ४ बोटे स्वतः कडे आहेत याचे भान ठेवा, ओक्के?
वन टाईम वॉच आहे. मला आवडला
वन टाईम वॉच आहे. मला आवडला
नवाजुद्दीन पुन्हा एकदा सेंच्युरी मारून गेला. मध्यंतरापर्यंत चांगला आहे. नंतर संथ होतो.
वन टाईम वॉच. मलाही आवडला.
वन टाईम वॉच. मलाही आवडला.
बाफ उघडल्यावर डोळे बंद करून
बाफ उघडल्यावर डोळे बंद करून स्क्रॉल करीत खाली आलो. आता चाललोय तलाशला. बरंच काही कळायचं ते कळून राहीलंय या बाफवर. जय मुग्धानंद ! आता या मानसिक स्थितीत सिनेमाला गेल्यावर सिनेमा कसा वाटला कसा वाटला ते संपल्यावर इथे येऊन त्या मानसिक स्थितीत कळवतो.
मी पण आज बघणार आहे.
मी पण आज बघणार आहे.
तसेही तुम्ही बाकी बाफांवर कशी
तसेही तुम्ही बाकी बाफांवर कशी इतरांची कुचेष्टा करत असता ते मी पण पाहीले आहेच. त्यामुळे आधी दुसर्याकडे बोट दाखवतांना ४ बोटे स्वतः कडे आहेत याचे भान ठेवा, ओक्के? >>>>
.
माझे प्रतिसाद वाचल्यावर असे दिसुन येईल आपल्याला..सुरुवात मी कधीच करत नाही..शेवट मात्र करतो..;)
आणि दुसर्याला उद्देशुन लिहिलेला प्रतिसादाला मी कधीच स्वतःवर घेउन शेरेबाजी कधीच करत नाही..हे आधी लक्षात घ्या.. असो.
.
मतभेद तर होणारच आपले...गत्यंतर नाही त्याला...आपणास ..शुभेच्छा.
आणि नदीकिनारी चाफ्याचे झाड
आणि नदीकिनारी चाफ्याचे झाड ... ती जागा अगदी छान आहे.
जमिनीतील हाडे कुणालाही उकरून जाळता येत नाहीत.. त्यासाठी डिस्ट्रिक्ट म्याजिस्ट्रेटची परवानगी लागते.. तिथेच चार फुले टाकून डा विंची कोडात कसे जमिनीखालील अॅनिमेशन दाखवून शेवट दाखवला, तसे काहीतरी दाखवायला हवे होते...
पण एकंदर अतर्क्य घटनाच फार आहेत... ढीगभर पात्रे, ढीगभर प्रसंग , ढीगभर उपकथानके म्हणजे सस्पेन्स ... असले येडगळ विचार असलेली मंडळी असतात, त्यापैकी हा सिनेमा आहे.
आणि हो!!!!! शारुखला येडं वाकडं बोलायचं न्हाई !!!!!!!!!!!!!!! यापेक्षा ओम शांती ओम नक्कीच चांगला आहे.. !!! कुठं ते इसी झूमर के नीचे....... !! आणि कुठं हे इसी पेड के नीचे .................... !!!!
मला तरी तो शॉट बघताना ते झूमरच आठवले आणि माझे मन अगदी शारुखप्रेमाने भरून आले! 
अरेरे कशाला भांडता? मला तर
अरेरे कशाला भांडता?
मला तर अमिर, शारू़ख सल्लुच काय सैफ पण चांगला वाटतो.
आताच पाहून आलो. थोडी कल्पना
आताच पाहून आलो. थोडी कल्पना आल्याने रसभंग होईल असं वाटलेलं पण उलट हा प्रवास सुरुवातीपासून सुसंगत असल्याचं जाणवत गेलं. सर्वात आधी शीर्षकाला पैकीच्या पैकी गुण दिले पाहीजेत. सिनेमाची खरी कहाणी ही नायकाचीच आहे. एका केसच्या संदर्भात अशा काही घटना घडतात कि त्याला स्वतःच्या बाबतीत घडलेल्या कहाणीकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोण मिळतो. नायकाच्या मनावरचं जे ओझं असतं तीच खरी कहाणी. केसच्या संदर्भात घडणा-या घटना आणि त्याचा तपास हा एक असा भाग आहे कि शेवटपर्यंत तरी प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात सिनेमा यशस्वी ठरला आहे. मात्र केसचा शेवट अॅक्सेप्ट करण्याबाबत नक्कीच दुमत होणार. ज्यांना हा भाग अॅक्सेप्ट करता आला त्यांच्यासाठी हा एक अप्रतिम सिनेमा आहे, पण ज्यांना हा शेवट पचवता येणार नाही त्यांच्यासाठी हा सिनेमा कसा असेल याची कल्पना करू शकतो. मात्र रात्रीची मुंबई, वेश्यावस्तीतलं वातावरण, पोलिसांचे नैसर्गिक संवाद, तपासात नसलेला आक्रस्ताळेपणा या साठी गुण द्यायला अडचण येणार नाही. छायाचित्रणाचं वैशिष्ट्य असं आहे कि ज्याला तांत्रिक बाबींमधेगती नाही तो ही छायाचित्रणाला दाद दिल्यावाचून राहणार नाही. रात्रीची मुंबी हे कहानीतल्याप्रमाणे सिनेमाचं एक पात्र बनून समोर येतं. सिनेमाचं दहा दिवसांचं रिशूट करण्यावरून आमीर आणि दिग्दर्शिकेच वाजल होतं त्यामुळे ऑगस्टच्या ऐवजी आता हा सिनेमा रिलीज झाला अशा बातम्या मध्यंतरी होत्या. साजिराने म्हटल्याप्रमाणे आमीरने रिस्क घेतली आहेच मात्र प्रयोग आणखी खुलवायला वाव होता असं वाटतं. तरीही या धाडसाबद्दल त्याचं अभिनंदन करायलाच हवं.
राणि मुखर्जीने यात अतिशय सुंदर अभिनय केला आहे. फ्लॅशबॅकमधे दिसणारी ग्लॅमरस राणी आणि वर्तमानात चारचौघींसारखी नॉन ग्लॅमरस, टिपीकल राणी उभी करण्यात पटकथाकार आणि दिग्दर्शिकेने खूप विचार केलेला दिसतोय. शेखावतचं पात्र तर बारीक सारीक डिटेल्समधून उभं राहतं. आमीरने अभिनय केलाय असं वाटलंच नाही. संपूर्ण सिनेमाभर तो एका संयत भूमिकेत स्वाभाविकपणे वावरतो. कुठेही अभिनयाचं प्रदर्शन वगैरे होऊ दिलेलं नाही. शेवटच्या सीनमधे मात्र तो काय दर्जाचा अभिनेता आहे हे त्याने दाखवून दिलं. किमान त्या अभिनयाने तरी स्तब्ध व्हायलाच होतं. मात्र त्याच सीनमधे त्याचं वय वाढलंय हे दिसून येतं. आणि नसीमुद्दीन सिद्दिकी !! या माणसाबद्दल काय बोलावं ते समजतच नाही. इर्फान खानला खाणार हा काही दिवसात ! कसला नैसर्गिक वावर आहे त्याचा. हॅट्स ऑफ !!
एका इंग्लिश कादंबरीची राहून राहून आठवण येत होती. बहुधा तिच्यावर हॉलीवूड मूवी बनलेला आहे. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी !!
अगदी निराश किंवा हताश किंवा
अगदी निराश किंवा हताश किंवा हतबल व्हायला होत नाही ना शेरुखबाबाच्या शिणुमासारखे? मंग बघावाच बाई उद्याच्या उद्याला.
>>>>>>>>>>>
हा सिणूमा आधी शहारुखलाच ऑफर झाला होता..... त्याने स्क्रिप्ट न आवडल्याने नाकारला.
)
एका मुलाखतीत आमीरनेच म्हटलेय की हे मला उशीरा कळलं नाहीतर मी कदाचित हा सिनेमा नाकारला असता. (असं का ते त्याचे त्यालाच माहित
बाकी एक नक्की... इथे आमीरच्या जागी शहारुख असता तर केवळ आमीरच्या उपस्थितिमुळे बर्यापैकी कुलूप लागलेल्या कित्येक तोंडांनी ठिकठिकाणी चित्रपटावर तोंडसुख जरा जास्तच घेतलं असतं....
(नॉट ऑन्ली मायबोली एकम्दर सगळ्याच ठिकाणी)
आमीरच्या असण्याने बहुतेकांनी मूग गिळलेत एवढंच.
बघितला .. आवडला .. ( मला आमिर
बघितला .. आवडला .. ( मला आमिर खान आवडतो!)
रसप, साजिरा, स्मृतिच्या स्मृती +१
शेवटचा सीन दाखवलाय तिथे
शेवटचा सीन दाखवलाय तिथे "रिअॅलिटी" लेव्हलचा सिनेमा पार "फँटसी" लेव्हलला जातो......
पूर्वार्ध आणि नंतर थोडा फार छान आहे पण नंतर पकड सुटलीये.
शेवटच्या सीनमध्ये थोडा बदल केला असता तर बरं झालं असतं असं वाटून गेलेय. शेवटच्या अपघातात एकतर आमीरने स्वतः प्रयत्नपूर्वक सुटून बाहेर आल्यावर त्याला किनार्यावर करीना दिसणं किंवा मग
सर्व भूतकाळातल्या घटना सांगितल्यावर अरमान कपूरचा मित्र पोलिसांना गुंगारा देऊन पळतो.. त्याचा पाठलाग आमीर करत असताना त्या मित्राचा "सिमिलर पधतीनेच" अपाघात होतो आणि हे मागच्या गाडीतून (पोलिस व्हॅन) पाठलाग करणारा अमीर पण बघतो (सहाजिक आहे, जे त्या मित्राला समोर दिसेल ते आमीरलाही दिसत आहेच, मूळ कथेनुसार :स्मित:) आणि त्याला रहस्याची उकल होते....
असं काहीतरी पण चाललं असतं नक्कीच...... त्यात आमीरला पण गाडीत गोवणं आणि विचित्र पधतीने त्याची सोडवणूक झालेली दाखवणं यामुळे शेवटाचा चोथा झलाय....
बाकी एकदा नक्कीच पहाण्यासारखा, करीना लोक्स ब्युटीफूल..... नवाजुद्दीन झकास...
नवाजुद्दीन बद्दल राहून राहून एकच वाटतेय...... काही वर्षापूर्वी "राजपाल यादव" पण असाच ईमर्ज झाला होता आणि सगळ्या चित्रपटात छोट्या छोट्या भूमिकात अक्शरशः "छा गया था".... आता दिसत पण नाही कुठे...... तसं या गुणी कलाकाराचं न होवो हीच प्रार्थना...... इथे डोक्यावर घ्यायला आणि पायदळी तुडवायला वेळ लागतच नाही
शक्यतोवर सगळी उकल होणार नाही असं लिहून माझं शेवटाबद्दलचं मत मांडलेय तरी कमी जास्त झालं असल्यास अजून न बघितलेल्यांनी चू.भू.द्या.घ्या.)
करीनाचं बरंच कौतुक चाललंय पण
करीनाचं बरंच कौतुक चाललंय पण मला काही ती एक्सेप्शनल वाटली नाही .. तेच ते सिडक्टिव्ह लुक्स् देणं एव्हढंच करता येतं तिला ..
भुंग्या ब-याच हिण्टस मिळताहेत
भुंग्या
ब-याच हिण्टस मिळताहेत या प्रतिसादातून...पहिलटकरांवर दया कर.
शेवट माहीत असल्यावर करीनाचे
शेवट माहीत असल्यावर करीनाचे ते लुक्स पटतात. ( तिचे फारसे सिनेमे पाहत नाही त्यामुळेही असेल कदाचित )
जाऊदे रे किरण...... आता
जाऊदे रे किरण...... आता शिव्या खायची सवय झालीये

मी आपला मला सुचलेला शेवट लिहिलाय रे..... बहुतेकांचा (आपले रेग्युलर चित्रपट धुरंधर :स्मित:) झालाय एव्हाना बघून ...... जेंव्हाचे तेंव्हा लिहिलेलं बरं असतं नाहीतर राहून जातं.
भुंग्या , बरं चल मी पण संयम
भुंग्या , बरं चल मी पण संयम सोडतो किंचित
आमीर आणि राणीच्या मधले संबंध हा सिनेमाचा आत्मा असायला हवा होता. त्यातले ताणतणाव आणखी ताकदीने मांडायला हवे होते. या दोन कथा समांतर चालताना मानवी भावभावना, नातेसंबंध मांडणारी कथा किंचित डावी झाली आहे. तिथे पटकथा कमी पडली आहे. या कहाणीचा शेवट हा ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर नायकाला आणण्यासाठी कथेमधे अशा एका केसचा तपास आवश्यक होता कि नायकाला या शक्यतेचा विचार करायला ती भाग पाडेल. ही कथालेखकाची कल्पना असल्याने आपल्याला ती आवडते किंवा नाही आवडत. पण ज्या तपासाचं निमित्त होतं त्यात कमर्शियल पोटेन्शियल जास्त असल्याने मेन स्ट्रीम आणि ऑफबीटचं एक मिश्रण समोर येतं ज्यात पोलीस तपासाचा भाग मुख्य कथा बनला आहे. यावर पुन्हा एकदा हात फिरवायला हवा होता असं वाटतं.
शेवटी सिनेमा असा उलटसुलट विचार करायला भाग पाडतो हे यशच आहे.
भुंग्या आगावेस ! बाकी बाकी
भुंग्या
आगावेस !
बाकी
बाकी एक नक्की... इथे आमीरच्या जागी शहारुख असता तर केवळ आमीरच्या उपस्थितिमुळे बर्यापैकी कुलूप लागलेल्या कित्येक तोंडांनी ठिकठिकाणी चित्रपटावर तोंडसुख जरा जास्तच घेतलं असतं....
आमीरच्या असण्याने बहुतेकांनी मूग गिळलेत एवढंच. फिदीफिदी (नॉट ऑन्ली मायबोली एकम्दर सगळ्याच ठिकाणी)
यासाठी हजार मोदक तुला
सिनेमा आवडला. (ज्या मुलांशी
सिनेमा आवडला.
(ज्या मुलांशी वेश्याव्यव्सायाबाबात बोलता येणं शक्य नाहीय अशा वयाच्या) मुलाना नेवू नये ...(वै म)
रहस्य २-४ सीन आधी कल्पना आली ( म्हणजे सिनेमा बघताना वेगवेगळ्या थेयरीज करणं सुरू होतं..त्यातली एक बरोबर निघाली .) ...तरी पडद्यावर ते रहस्य जसं उलगडलं ते वेगळंच..
थेटरात ( च) बघा.
>>>हा सिणूमा आधी शहारुखलाच
>>>हा सिणूमा आधी शहारुखलाच ऑफर झाला होता..... त्याने स्क्रिप्ट न आवडल्याने नाकारला.>> स्क्रिप्टमध्ये वेडगळ अॅक्टींगला वाव नाही ते त्याला वेळीच लक्षात आल्यामुळे त्याने नाकारलं आणि आमच्यासारखी मंडळी बचावली.
मूव्ही बघितल्यावर बरेच प्रश्न
मूव्ही बघितल्यावर बरेच प्रश्न प्रेक्षकाला पडतात त्यामूळे जरा न आवडण्यासारखा
पण फक्त वन टाईम वॉच !!!
आवडला सिनेमा ! साजिरा यांची
आवडला सिनेमा ! साजिरा यांची पोस्ट खूप आवडली !
सायो किरणच्या पोस्टला
सायो
किरणच्या पोस्टला अनुमोदन.
आता माझे चारआणे
हा चित्रपट पहावा कारण.....
१. चित्रपट उत्कंठावर्धक आहे. धक्कातंत्राचा अतिशय उत्तम वापर.
२. चित्रपट पाहताना आपण प्रसंगानुरूप प्रत्येक पात्रावर 'संशय' घ्यायला लागतो.
३. सर्व पात्रांचा अभिनय अतिशय सुरेख आणि त्यांची मांडणीही उत्तम, आणि महत्व.
४. एकही संवाद वायफळ बिनबुडाचा नाही.
५. दोनच गाणी, दोन्ही उत्तम.
६. कहानी मध्ये कोलकत्ता शहर हे एक पात्र होऊन भेटतं, त्यापेक्षा कितीतरे पटीने या चित्रपटात मुंबई 'वजनदार' होऊन दिसते.
७. मुंबईच्या नाईटलाईफचं अत्यंत सफाईदार चित्रिकरण.
८. 'सिंघम्','दबंग' सारख्या चित्रपटात दिसलेल्या इन्स्पेक्टर पेक्षा एक वेगळाच इन्स्पेक्टर साकारण्यात आमिर यशस्वी.
९. अख्ख्या सिनेमात राणी आणि आमिरचं तणावपुर्ण नातं प्रभावीपणे मांडलंय. इतकं की त्या दोंघाच्यातला पहिला संवाद हा इंटरव्हल नंतर येतो.
१०. अख्ख्या सिनेमात एकच थपडेचा सिन.
११. वेश्यावस्तीचा बकालपणा अतिशय वास्तव.
१२. आमिरच्या मनातली घालमेल.... मुलगा फिरायला जातो म्हणतो तो प्रसंग आठवून आपण हे टाळू शकलो असतो असा विचार करून.. घेतलेला प्रसंग सुरेख.
१३. नवाजुद्दीन सिद्दीकी बरोबरच्या अभिनेत्रीलाही छोटासा रोल असून तिने उत्तम अभिनय केला आहे.
१४. नवाजुद्दीन सिद्दिक्की बद्दल काय बोलायचं? हॅट्स ऑफ टू हिम. बराचसा सिनेमा त्याने खाल्लाय.
१५. खास करून करिनाचे डायलॉग एकदम वजनदार.
उदय, तुला पडले तसे मलाही बरेच
उदय, तुला पडले तसे मलाही बरेच प्रश्न पडले सिनेमा पाहताना, पण जे वास्तवात घडू शकत नाही तेच फक्त सिनेमात घडते त्यामुळे थोडी ढिल द्यावी सिनेमांना आणि त्यांच्या कथांना..
१) त्या अपघाताआधी बरेच तसेच अपघात त्याच जागी झाले..ते कुणाचे, कशासाठी, का झाले ?
बर झाले तर झाले.... त्या अपघातांची साधी चौकशी करावीशी वाटली का नाही ? --> या गोष्टीचा फारच वरवरचा उल्लेख आहे सिनेमात, बहुतेक उत्कंठा वाढावी यासाठी.
३) करीना ३ वर्ष काय करत होती ? शेखावत ची वाट बघत होती का ? --> अरमानला मारण्यासाठी बहुतेक ती तो एकटा निघण्याची वाट पहात असेल. तो जनरली ड्रायव्हर आणि मेकप मन बरोबर जात असतो. आणि शेवटी शेखावत हा हिरो आहे ना? त्याची वाट ती पाहणारच. एक साध्या दुधवाल्याने रहस्याची उकल केली असती तर आपण षिणुमा पाह्यला असता का?
४) करीना ने आपले खरे नाव सांगितले असते तरी काय फरक पडला असता ? >> काही फरक पडला नसता... तिला तिचं खरं नाव आठवलं नसेल हो
५) तिने केवळ त्या विशिष्ट मुलीलाच का सोडवले ? त्रासात तर बर्याच होत्या..? >> शशीच्या गर्लफ्रेंडपर्यंत पोचवणं हे करिनासाठी महत्वाचंच ना उदय? त्याशिवाय तो पुढच्या कडीपर्यंत पोचणार कसा?
६) निव्वळ फोन वरुन धमकावल्यावर लगेच कोणी २० - २० लाख ३ वर्ष देत का ? >> देऊ शकतं. कारण ती मुलगी मेलेली असते आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे पैसे हे त्या तिघांच्या आर्थिक परिस्थितीनुसार मागितलेले असतात.
७) या सर्व प्रसंगात तैमुर चा काय संबंध..? त्याने काय केलेले चुकिचे ? >> तैमुरचा थेट संबंध नसला तरिही त्या मुलिच्या मृत्यूचा तो उपयोग करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून बहुतेक त्याला तिथल्या तिथे संपवावे लागते.
८) कमिशनर स्वतः पोलिस स्टेशन मधे येउन भेट घेतात एका इस्पेक्टरची ? इतका महत्वाचा आहे तो ? >> सहज पाहणी करायला आलेला असू शकतो.
९) शशीला जर माहीम मधे जत्रेत सर्वांदेखत गोळी झाडुन ठार मारले तर त्याचा मृत्युदेह पाण्यात कसा सापडला ? >> पाण्यात कुठे मिळतो त्याचा मृतदेह? शवविच्छेदनगृहात दाखवलाय. आणि सिनेमात सगळीकडे तो 'मेले में' मेला असाच उल्लेख आहे की.
असो.. मला जे उमगलं ते सांगायचा प्रयत्न केलाय, आता माझ्यावर प्रश्नांची बंदूक रोखू नकोस.
मला वैयक्तिकरित्या हा सिनेमा आवडला. सकाळच्या परिक्षणात एक अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. पोहोचण्याच्या ठिकाणापेक्षा प्रवास ज्यांच्यासाठी महत्वाचा आहे त्यांना हा सिनेमा आवडेल. मी प्रवासवाली.
Pages