अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली
कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. नसेल पटत तर एकदा रीमा कागती दिग्दर्शित 'तलाश' पाहा, कदाचित पटेल आणि तरीही नाही पटलं तर हरकत नाही. ओघ चालू आहे, कधी ना कधी पटेलच; अशी मला - रणजितला - एक वेडी खात्री आहे.
सुर्जनसिंह शेखावत उर्फ सूरी (आमीर खान) मुंबई पोलीसदलातील एक निरीक्षक असतो. नव्यानेच ह्या शहरात दाखल झालेल्या 'सूरी'कडे केस येते एका विचित्र अपघाताची. हा अपघात साधासुधा नसतो, कारण तो फिल्म सुपरस्टार अरमान कपूरच्या गाडीला झालेला असतो आणि त्यात अरमान कपूर जागीच ठारही होतो. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वत:च्या घरापासून बरंच दूर, एका वेश्यावस्तीजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर, कुठलीही नशा केलेली नसताना, कधीच स्वत: गाडी न चालवणारा अरमान त्याच रात्री भरधाव गाडी का चालवत असतो? अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने त्याच्या अकौंटन्टकडून मोठी रक्कम का घेतलेली असते ? रस्त्यावर कुणीही नसताना अचानक रस्ता सोडून, त्याची गाडी समुद्रात का उडी घेते ? असे अनेक विचित्र प्रश्न ह्या केसला क्लिष्ट बनवत असतात. काहीच विशेष हाती लागत नसल्याने एक अन्सोल्वेबल केस म्हणून ही फाईल बंद करावी, असंही वाटत असतं.
दुसरीकडे, एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून नाव कमावलेला सूरी स्वत:ला एक कर्तव्यशून्य पिता मानत असतो. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याच्या अपरोक्ष अपघाती मरण पावलेला असतो. ह्या अकस्मात धक्क्यामुळे सूरी आणि त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) खूप अस्थिर असतात. दोघांतला संवाद खुंटलेला असतो. मनातल्या अपराधी भावनेमुळे सूरी अबोल, एकलकोंडा झालेला असतो. ह्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रात्रीची झोप हरवलेला सूरी बहुतेकवेळा रात्र-रात्र घराबाहेरच राहत असल्याने त्याचे व त्याच्या पत्नीचे नाते अजून बिघडत चाललेले असते.
अश्या विचित्र मानसिक व कौटुंबिक कोंडीत असलेल्या सूरीला एक अनाहूत वेश्या रोझी (करीना कपूर) अपघाताची केस सोडविण्यासाठी काही मदत करते आणि त्याला मानसिक आधारही देते. तो केसच्या मुळापर्यंत जाण्याच्या दिशेने झटू लागतो. हळूहळू गुंते उलगडत जातात आणि उघडकीस आलेले सत्य त्याचा वैयक्तिक आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही बदलते.
'तलाश' म्हणजे केवळ कुठली रहस्यकथा नाही किंवा फक्त एक भावनिक नाट्यही नाही. ही तलाश, हा शोध केवळ एका पोलिसाचा नसून एका पतीचा, पित्याचा आणि एका वेश्येचाही आहे. काही वेळी म्हणूनच आपल्याला असं वाटत राहातं की दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे ? थरारनाट्य की भावनाट्य ? उत्तर आहे - दोन्ही. फलित आहे - अप्रतिम !

सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच ! पण त्याने रंगवलेला सूरी व इन्स्पेक्टर शेखावत लाजवाब.
करीना व राणी, दोघींना मर्यादित वाव असला तरी दोघीही चोख काम करतात. राणी मुखर्जी खूप आकर्षक दिसते.
छोट्याश्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी परत एकदा आपली छाप पाडतो. त्याचा पाठलाग होत असतानाचा संपूर्ण भाग अतिशय थरारक झाला आहे.
पटकथा अजून जराशी आवळता आली असती, पण जशी आहे तशीही छानच !
दिग्दर्शिका रीमा कागती, दुसऱ्याच सिनेमात खूप प्रभावी पकड दाखवते.
बऱ्याच दिवसानंतर एका सिनेमात गाणी कानांवर बलात्कार करत नाहीत. त्यासाठी राम संपत ह्यांचे विशेष आभार !
हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!
काही ठिकाणी जराशी गती मंदावली असली, शेवट झाल्यानंतरही शेवट चालू ठेवला असला, तरी 'तलाश' नक्कीच ह्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहेच.
(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !)
रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2012/12/talaash-movie-review.html
.....वास्तविक या भारतभूमीतील
.....वास्तविक या भारतभूमीतील भूतीनी, चेटकिणी, हडळ यांच्या अमानवीय क्षमतेची परंपरा फार उज्ज्वल असूनदेखील आधुनिक घोस्टीनीला खोलीचे दार उघडण्यासाठी कार्ड स्वाईप मेकॅनिझमचा आसरा घ्यावा लागतो, हे नवलच.... >>>:हहगलो::हहगलो::हहगलो:
पण टायटलचा संदर्भ कथेशी
पण टायटलचा संदर्भ कथेशी ज्यांनी चित्रपट पाहिलाय त्यांनाच लागेल ना? उलट 'टायटल मधे संदर्भ लागतोय' या कॉमेण्ट्स मुळेच न पाहिलेल्यांना काहीतरी क्लू मिळतोय >>>>>> फा, मला मिळाला क्लू. आता भरमसाठ सिनेमे बघून तेवढी तरी अक्कल चालायला लागलीये (नको असताना) असं म्हणावं लागेल.
मी हे टायटल वाचल्यामुळे सिनेमात भूत आहे हे गृहित धरले होतेच. बाफंचे म्हणशील तर, सिनेमाचे सगऴ्याच डिटेल्स वर इथे चर्चा सुरु आहे त्यामुळे टायटल मधून रहस्य कळतय ह्या पोस्टंपिंकेनी फार काही वेगळं ड्यामेज होईल असं वाटत नाही.
कॉमन सेन्स नी एखादा माणूस बाफं वर येणं टाळेल पण थेट टायटल मध्येच रहस्य कळत असेल तर माझ्यासारख्या सिनेमा अगदी मन लावून बघणार्यांवर बळच अत्याचार होत नाही का? नवीन लेखन वर गेलं की टायटल डोळ्यापुढे येतच.
शीर्षक बदललं आहे
शीर्षक बदललं आहे ऑलरेडी......................!
धन्यवाद रसप. माझी पोस्ट
धन्यवाद रसप. माझी पोस्ट फारएण्डला उद्देशून होती.
पण टायटलचा संदर्भ कथेशी
पण टायटलचा संदर्भ कथेशी ज्यांनी चित्रपट पाहिलाय त्यांनाच लागेल ना? उलट 'टायटल मधे संदर्भ लागतोय' या कॉमेण्ट्स मुळेच न पाहिलेल्यांना काहीतरी क्लू मिळतोय >> अमोलला अनुमोदन. स्पष्टपणे फक्त बाफाच्या टायटलवरून स्पष्टपणे कळत नव्हते, बाकीच्या पोस्ट चा संदर्भ धरला तर कळत होते . जर बाफाच्या टायटलवरून कळत असेल तर "Talaash, the answer lies within" ह्यातून पण काय ते लक्षात येईल दर्दी माणसाला
असो सगळे लूपहोल्स धरुन ही चांगलाच मनोरंजक आहे सिनेमा. थोडी लांबी कमी असती तर अधिक effective वाटला असता. नवाजिद्दीन सिद्दिकी is gem. रात्रीच्या मुंबईबद्दल वर कोणि तरी लिहिले आहे त्याला प्रचंड अनुमोदन.
*
*
oh really buvaa ? बुवा उपरोध
oh really buvaa ? बुवा उपरोध वगैरे काही तुमच्या गावी नसेलच असे धरून चालतो.
बाफ वर येण्याचा मुद्दा माझा नाहिये तेंव्हा असोच.
उपरोध म्हणजे समजले नाही
उपरोध म्हणजे समजले नाही असामी. उपरोधाने म्हंटलास तरी शेवटी माझ्या टायटलच्या मुद्द्याबाबतच फारएण्डाला अनुमोदन देत तू "टायटल बघून येवढं काही कळत नाही" असच म्हणतोयस ना?
पोस्ट बदलतो हवं तर.
मी काही चिडून वगैरे लिहीलेले नाही, फक्त येवढच सांगत होतो की वाचकांना जर संदर्भ लागत असेल तर त्यात वाचकांची चूक आहे किंवा त्यांनी खुप जास्त लक्ष देऊ नये असं कसं म्हणू शकतो आपण? त्यांनी दिलेलं टायटल इतकंही साधं, काहीच संदर्भ लागणार नाही असं नव्हतं.
फक्त माझी चेष्टा करत असशील तर मग माझ्या लक्षात नाही आलं.
बुवा, अमोलला टायटलबद्दल
बुवा, अमोलला टायटलबद्दल अनुमोदन दिले नि टायटलवरून सिनेमा कळतो ह्याबद्दल पुढचे उपरोधाने लिहिले होते. पोस्ट बदलायची काही गरज नाही हो. ह्यावर आपण डो़के फोड करावी एव्हढाही महान नाहिये सिनेमा तेंव्हा असो.
ह्यावर आपण डो़के फोड करावी
ह्यावर आपण डो़के फोड करावी एव्हढाही महान नाहिये सिनेमा तेंव्हा असो. >>>>>> +१
मी ही त्यामुळेच इथे येऊन खुप आगपाखड नाही केली. करिनाचे काही डायलॉग ऐकून आणि आधी बघितलेल्या सिनेम्यांमुळे तयार झालेल्या भेज्यामुळे आधीच हिंट लागली होती. मला ससपेन्स इतका जबरी नाही वाटला की हिंट लागल्यामुळे मजा जाऊन वैताग यावा.
स्पष्टपणे फक्त बाफाच्या
स्पष्टपणे फक्त बाफाच्या टायटलवरून स्पष्टपणे कळत नव्हते, बाकीच्या पोस्ट चा संदर्भ धरला तर कळत होते .>>> हो माझेही तसेच झाले होते. तो शब्द "काळ" या अर्थाने घेतला होता मी, कारण तेथे वर्तमान वगैरे शब्द होते. (आता यावरून इतरांना क्लू मिळेल एवढे संदिग्ध येथे काही राहिलेले नसावे
)
कोणाला कसा क्लू लागेल काही
कोणाला कसा क्लू लागेल काही सांगता येत नाही पण वर्तमानातल्या xxने भविष्यातल्या.... ह्यावरुन मी तरी "काळ" असा अर्थ नाही घेऊ शकलो.
अबब ... किती ती चर्चा. तो
अबब ... किती ती चर्चा. तो अमीर सिनेमा संपवून पुढचा सिनेमा साईन करायला लागलाय. शिवाय त्याला हे इथल्या चर्चेचं कळलं ना तर तो इथल्या प्रत्येक प्रतिसादाकरता काही रक्कम डिमांड करेल हां....
जगभर गाजलेल्या 'घोस्ट'
जगभर गाजलेल्या 'घोस्ट' चित्रपटातही अशी मृतांच्या आत्म्याशी संवाद साधणारी एक 'मिडिएटर' दाखविली आहे.....अशा मध्यस्थांना 'कॉन आर्टिस्ट' असे त्यावर विश्वास ठेवणारे म्हणतात.>>>>
Con Man/ Artist म्हणजे लोकांची फसवणुक करणारे, त्यांना लुबडणारे वगैरे. Ghost मध्ये Whoopi Goldberg (Oda Mae Brown) खरी एक Psychic (अश्या लोकांना USA मध्ये Psychic म्हणतात) असते. तीला "त्या" जगाशी संपर्क साधू शकत असते. पण ती तसे न करता त्याच्या गैरफायदा घेत असते. म्हणुन ती एक Con Artist ठरते. सॅम तिच्याशी प्रथमच संपर्क साधतो.
मला एक कळले नाही. पोलिस शशी /
मला एक कळले नाही. पोलिस शशी / तैमुर इ. लोकांचे मोबाईल फोन का ट्रेस करत नाहीत. crime patrol मधे अगदी बिहार युपीचे पोलिस पण मोबाईल फोन ट्रेस करताना दाखवतात. मुंबई पोलिस इतके बधीर का दाखवलेत.
मंदार शशी ने पैसे मिळालेल्या
मंदार शशी ने पैसे मिळालेल्या दिवशीच सिम कार्ड चेंज केलेले असते.. पाहिलं नाहिस का?
आणि तैमुरचा काहीही संबंध नसतोच या अरमानच्या अपघाताशी, आणि जोवर तैमुरचा मोबाईल ट्रेस करायची वेळ येते (शशीचं चोरलेलं सिम वापरतो त्याबद्दल बोलतेय मी) तोवर तो बिचारा अल्लाह को प्यारा होतो.
पण जुन्या सिम चा रेफरन्स ने
पण जुन्या सिम चा रेफरन्स ने शशी कुणाशी बोलला वगैरे चेक करता येते. जेव्हा ते जुने सिम तैमुर activate करतो तेव्हा तरी पोलिसांना कळले असते ना. असो.. आपण कशाला एवढा विचार करायचा.
अगदी कीस पाडताय लोक्स
अगदी कीस पाडताय लोक्स
मी_केदार ते पार्श्वगीत आहे,
मी_केदार ते पार्श्वगीत आहे, असं कसं कट झालं असेल? >>>> दक्षे ते आहेच पण तूनळी वर खास विडीओ आही आनी काल टीव्ही वर पण प्रोमो पहिला
"....अगदी कीस पाडताय
"....अगदी कीस पाडताय लोक्स..."
~ खरंय....आणि हीच या चित्रपटाची जमेची बाजू आणि आमीर खानची महती होय. एखाद्या चित्रपटातील उणीवांवर जर १००+ प्रतिसाद इथे उमटत असतील, तर एकप्रकारे हे त्या चित्रपटाचे यशच समजले जावे.
[तेंडुलकर जेव्हा त्रिफळाचीत होतो, त्याचवेळी संघातील अनेक खेळाडू त्या त्या सामन्यात तसे बोल्ड होतात. तरीही लोक चर्चा करतात, नवल व्यक्त करतात सचिनच्या त्या बाबतीतील कच्च्या दुव्यांची, वैगुण्याची....म्हणजे एकप्रकारे सचिनवरील आपल्या प्रेमाचे ते द्योतकच मानले जावे......आमीरच्याबाबतीत तेच घडत आहे.]
अगदी कीस पाडताय
अगदी कीस पाडताय लोक्स...">>>>>>>>> एका लग्नाची दुसरी गोष्ट नंतर एवढं फूटेज बहुतेक तलाश लाच मिळालं असेल
किती कीस पाडताय, किती कीस
किती कीस पाडताय, किती कीस पाडताय म्हणत म्हणत ज्यांना ह्या कीसात फार रस नाही असं वाटतय तेही बाकी काम धंदा सोडून ह्या चर्चेचा किस घ्यायला आलेच ना? कैत्तरी आपलं! आता सिनेमा इतक्या लोकांनी पाहिला, तर सगळ्यांना आपापली मतं इथे मांडावीशी वाटणार नाही का? की आपल्या पोस्टीनी बोटभर कीस पडेल ह्या भितीनी काहीच बोलायचं नाही? बाकी कुठल्या विषयावर तुम्ही ही भुगा पाडला असेल स्वतःचा आणि दुसर्याच्या भेज्याचा ते विसरु नका आणि नसेल ही पाडला तरी असते लोकांना हौस कीस पाडायची असं मनातल्या मनात म्हणा आणि बाफं वर काहीच लिहू नका, जमल्यास.
कमाल आहे माझ्या संयमाची. २५०
कमाल आहे माझ्या संयमाची. २५० प्रतिसाद दिसुनही मी हा धागा उघडला नव्हता. शिर्षकाकडेही दुर्लक्ष केले होते. त्यामुळे वाचले. रहस्यमय सिनेमाचे धागे उघडायचे पण नसतात तो सिनेमा पाहिल्याशिवाय हे साधे गणित वापरल्याने माझ्यासाठी गुपीते गुपीतेच राहिली.
सिनेमाने खुप निराशा केली. सिनेमाची जाहीरात ही मनाचा शोध, नात्याचा शोध, कसलातरी प्रवास अशी काही केली नव्हती त्यामुळे सॉलीड्ड रहस्यमय असणार हे गृहीत धरुन पाहिल्याने निराशा झाली. स्वतःचा शोध, प्रवास वगैरे नंतरची सारवासारवी वाटते मलातरी. आता कदाचीत सर्व माहीत झाल्यावर दुसर्यांदा टीव्हीवर पाहिल्यावर जास्त आवडु शकेल.
रहस्याची तर सुरुवातीलाच २ सीनमधे शंका आली होती पण प्लॅम्चेटवाल्या बाईचे आमीरला उद्देशुन म्हटलेल्या त्या एका वाक्याने १०० टक्के खात्री झाली व तिथेच सर्व रुची संपली, फक्त का, कसे इतकेच राहिले ते पण पोकळ निघाले. कथेतच दम नाही, अगदी छोटी कथा वर त्यात नाविन्य काहीच नाही मग त्यात जीव किती घालणार? म्हणुन हळुहळु चालले होते सर्व. (सिक्स्थ-सेन्स व कहानी बरोबर तुलना तर अशक्यप्राय. त्यातही sixth-sense अत्युतम होता).
पण आमीर मस्त, सिद्देकी बेश्ट, शशी ची मैत्रिण पण आवडली. अपेक्षेप्रमाणे करीना खोटी वाटली, वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे फक्त मादक हावभाव करत मादक आवाजात बोलायचे हेच करत होती. माफ करा ते पण खोटेच वाटले. बाकी रात्रीची मुंबई आवडल्याचे वगैरे प्रतिसादांना अनुमोदन.
पण सिनेमा पाहिल्यावर समाधान वाटते ते समाधान मिळाले नाही.
पण आमीर मस्त, सिद्देकी बेश्ट,
पण आमीर मस्त, सिद्देकी बेश्ट, शशी ची मैत्रिण पण आवडली. अपेक्षेप्रमाणे करीना खोटी वाटली, वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे फक्त मादक हावभाव करत मादक आवाजात बोलायचे हेच करत होती. माफ करा ते पण खोटेच वाटले. बाकी रात्रीची मुंबई आवडल्याचे वगैरे प्रतिसादांना अनुमोदन. >> +१
मलाही (१-२ सिनेमे वगळल्यास) करीना नेहमीच 'फेक'च वाटत आली आहे...
किती कीस पाडताय, किती कीस
किती कीस पाडताय, किती कीस पाडताय म्हणत म्हणत ज्यांना ह्या कीसात फार रस नाही असं वाटतय तेही बाकी काम धंदा सोडून ह्या चर्चेचा किस घ्यायला आलेच ना? कैत्तरी आपलं! आता सिनेमा इतक्या लोकांनी पाहिला, तर सगळ्यांना आपापली मतं इथे मांडावीशी वाटणार नाही का? की आपल्या पोस्टीनी बोटभर कीस पडेल ह्या भितीनी काहीच बोलायचं नाही? बाकी कुठल्या विषयावर तुम्ही ही भुगा पाडला असेल स्वतःचा आणि दुसर्याच्या भेज्याचा ते विसरु नका आणि नसेल ही पाडला तरी असते लोकांना हौस कीस पाडायची असं मनातल्या मनात म्हणा आणि बाफं वर काहीच लिहू नका, जमल्यास. >>>>>>>> हे माझ्या पोस्टीसाठी (च) आहे असे समजते. वैद्यबुवा, काही काम्धंदे नाहीयेत का? उगीच कोणाचीही कुठलीही पोस्ट घेउन बकवास लिहित बसलात ते. मला इथे जे लिहायच ते मी लिहेन किंवा मनातल्या मनात बोलेन ते तुम्ही सांगु नका. ते मी गंमतीनेच लिहिलं होतं आणि मंजिरी सोमण आणि अशोक मामांनी ही तसंच घेतलय. तुम्हाला ते जमत नसावं. तुम्हीच बाफवर कय्च्याकय लिहत जाउ नका. जमल्यास
मलाही (१-२ सिनेमे वगळल्यास)
मलाही (१-२ सिनेमे वगळल्यास) करीना नेहमीच 'फेक'च वाटत आली आहे..>>>>>>>>>>> मला तर नेहमीच. १-२ सिनेमांचा पण अपवाद नाहीये. कुणाला कितीही आवडो कितीही अॅवार्ड मिळोत मलातर जवीमे मधे पण जरा अतीच वाटली होती.
मलाही (१-२ सिनेमे वगळल्यास)
मलाही (१-२ सिनेमे वगळल्यास) करीना नेहमीच 'फेक'च वाटत आली आहे..>>>>>>>>>>> मला तर नेहमीच. १-२ सिनेमांचा पण अपवाद नाहीये. कुणाला कितीही आवडो कितीही अॅवार्ड मिळोत मलातर जवीमे मधे पण जरा अतीच वाटली होती. >> सत्यवचन!!
>> सत्यवचन!! >> +१
>> सत्यवचन!!
>> +१
सत्यवचन!!>>>>>>>>>>
सत्यवचन!!>>>>>>>>>>
३ ० ०..........पोस्टी इतका
३ ० ०..........पोस्टी
इतका तर चित्रपट सुध्दा हिट्ट झाला नाही...ऑफिशल कलेक्शन ७५ करोडच आहे 
Pages