अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली
कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. नसेल पटत तर एकदा रीमा कागती दिग्दर्शित 'तलाश' पाहा, कदाचित पटेल आणि तरीही नाही पटलं तर हरकत नाही. ओघ चालू आहे, कधी ना कधी पटेलच; अशी मला - रणजितला - एक वेडी खात्री आहे.
सुर्जनसिंह शेखावत उर्फ सूरी (आमीर खान) मुंबई पोलीसदलातील एक निरीक्षक असतो. नव्यानेच ह्या शहरात दाखल झालेल्या 'सूरी'कडे केस येते एका विचित्र अपघाताची. हा अपघात साधासुधा नसतो, कारण तो फिल्म सुपरस्टार अरमान कपूरच्या गाडीला झालेला असतो आणि त्यात अरमान कपूर जागीच ठारही होतो. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वत:च्या घरापासून बरंच दूर, एका वेश्यावस्तीजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर, कुठलीही नशा केलेली नसताना, कधीच स्वत: गाडी न चालवणारा अरमान त्याच रात्री भरधाव गाडी का चालवत असतो? अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने त्याच्या अकौंटन्टकडून मोठी रक्कम का घेतलेली असते ? रस्त्यावर कुणीही नसताना अचानक रस्ता सोडून, त्याची गाडी समुद्रात का उडी घेते ? असे अनेक विचित्र प्रश्न ह्या केसला क्लिष्ट बनवत असतात. काहीच विशेष हाती लागत नसल्याने एक अन्सोल्वेबल केस म्हणून ही फाईल बंद करावी, असंही वाटत असतं.
दुसरीकडे, एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून नाव कमावलेला सूरी स्वत:ला एक कर्तव्यशून्य पिता मानत असतो. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याच्या अपरोक्ष अपघाती मरण पावलेला असतो. ह्या अकस्मात धक्क्यामुळे सूरी आणि त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) खूप अस्थिर असतात. दोघांतला संवाद खुंटलेला असतो. मनातल्या अपराधी भावनेमुळे सूरी अबोल, एकलकोंडा झालेला असतो. ह्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रात्रीची झोप हरवलेला सूरी बहुतेकवेळा रात्र-रात्र घराबाहेरच राहत असल्याने त्याचे व त्याच्या पत्नीचे नाते अजून बिघडत चाललेले असते.
अश्या विचित्र मानसिक व कौटुंबिक कोंडीत असलेल्या सूरीला एक अनाहूत वेश्या रोझी (करीना कपूर) अपघाताची केस सोडविण्यासाठी काही मदत करते आणि त्याला मानसिक आधारही देते. तो केसच्या मुळापर्यंत जाण्याच्या दिशेने झटू लागतो. हळूहळू गुंते उलगडत जातात आणि उघडकीस आलेले सत्य त्याचा वैयक्तिक आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही बदलते.
'तलाश' म्हणजे केवळ कुठली रहस्यकथा नाही किंवा फक्त एक भावनिक नाट्यही नाही. ही तलाश, हा शोध केवळ एका पोलिसाचा नसून एका पतीचा, पित्याचा आणि एका वेश्येचाही आहे. काही वेळी म्हणूनच आपल्याला असं वाटत राहातं की दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे ? थरारनाट्य की भावनाट्य ? उत्तर आहे - दोन्ही. फलित आहे - अप्रतिम !

सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच ! पण त्याने रंगवलेला सूरी व इन्स्पेक्टर शेखावत लाजवाब.
करीना व राणी, दोघींना मर्यादित वाव असला तरी दोघीही चोख काम करतात. राणी मुखर्जी खूप आकर्षक दिसते.
छोट्याश्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी परत एकदा आपली छाप पाडतो. त्याचा पाठलाग होत असतानाचा संपूर्ण भाग अतिशय थरारक झाला आहे.
पटकथा अजून जराशी आवळता आली असती, पण जशी आहे तशीही छानच !
दिग्दर्शिका रीमा कागती, दुसऱ्याच सिनेमात खूप प्रभावी पकड दाखवते.
बऱ्याच दिवसानंतर एका सिनेमात गाणी कानांवर बलात्कार करत नाहीत. त्यासाठी राम संपत ह्यांचे विशेष आभार !
हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!
काही ठिकाणी जराशी गती मंदावली असली, शेवट झाल्यानंतरही शेवट चालू ठेवला असला, तरी 'तलाश' नक्कीच ह्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहेच.
(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !)
रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2012/12/talaash-movie-review.html
सुनिधी >>> संपुर्ण पोस्टीला
सुनिधी >>> संपुर्ण पोस्टीला अनुमोदन.
उदयन भाऊ, डेटा तयार ठेवून
उदयन भाऊ,
डेटा तयार ठेवून वाटच पाहात बसला होतात ना ? खरं सांगा ! अचूक सम पकडलीत कारण ! ३०० वे तुम्हीच आहात !!
मी चालुन आलेली संधी क्वचितच
मी चालुन आलेली संधी क्वचितच सोडतो रणजित भाउ
"....मलातर जवीमे मधे पण जरा
"....मलातर जवीमे मधे पण जरा अतीच वाटली होती....."
सस्मित....
पण मला वाटते जवीमेची थीमच अशी काही होती की लेखकाने गीत ला "हॅपी गो लकी काईन्ड गर्ल" रंगविले असल्याने करीनाने नायकाच्या पुढेही दोन पावले जास्त जाऊनच 'ओव्हर' वाटू शकणारा अभिनय करणे क्रमप्राप्त होते. तशी बिन्धास्त ती आहे म्हणून तर उदास उदास झालेला आदित्य त्याला हवा असणारा मोकळेपणा तिच्यात शोधू पाहतो. माझ्या कॉलेजच्या जमान्यात 'तनुजा' अशाप्रकारच्या भूमिकेत चमकली होती. त्यावेळीही चित्रपटगृहातील विशिष्ट वर्गाला तिचे तसले वागणे रुचत नसे.
'तलाश' पाहताना करीनाच्या एन्ट्रीपासून मला उगाचच असे वाटत गेले होते की, जब वुई मेटचीच छबी घेऊन ती कथेत वावरणार आहे. पण रीमाने तितकी गरज नसताना करीनाला 'चमेली' च्या चादरीतच गुंडाळून पडद्यावर आणले.
आता इतका कीस काढला आहे तर मला
आता इतका कीस काढला आहे तर मला पडलेला एक प्रश्न आहे:
spoiler alert:
करीना रस्त्यावर जखमी पडलेली असते तेव्हा शशी तिला आपल्या खोलीत आणताना दाखवला आहे पण केजरीवाल तर आपण तिचे दफन केले असं सांगतो. म्हणजे करीना मेल्यावर शशी तिला परत रस्त्यावर त्याच ठिकाणी आणून टाकतो आणि मग केजरीवाल तिथे परत येऊन तिचं दफन करतो का? तो संदर्भ काही लागला नाही
एखादा सुतळी बाँब फुटताना,
एखादा सुतळी बाँब फुटताना, त्याची वात भरभर जळत जाते.. आपण डोळे बंद करतो आणि हात कानावर ठेवतो..अपेक्षा असते की असा दणका उडेल की काय विचारता पण प्रत्यक्षात काहीच होत नाही..वात भरभर जळुन विझुन जाते आणि आपण डोळे उघडतो तर बाँब तिथेच पडलेला असतो. ----असेच काहीसे झाले.
सिक्स्थ सेन्स वगैरे वगैरे बरोबर तुलना केल्याने माझ्या अपेक्षा गगनाला भिडल्या होत्या.. शेवट अगदीच फुसका निघाला.
स्पॉयलर अलर्ट
मृत माणसे गाईड करुन खुन्यापर्यंत नेतात या विषयावर आलेल्या शेकडो चित्रपटातला (स्टर ऑफ एकोज इ. इ) एक ठरला.
टोटल डिसअपॉइंटमेंट...
चीकू,अपघात झाल्यावर केजरीवाल
चीकू,अपघात झाल्यावर केजरीवाल फक्त आपल्या मित्राला गाडीत घेतात आणि करीनाला मरणासन्न अवस्थेत रस्त्यातच सोडून जातात आणि शशी तिला आपल्या खोलीवर आणून उपचार करायचा प्रयत्न करतो पण ती मरते. त्याचा फायदा शशी घेऊन केजरीवालला ब्लॅकमेल करतो, कारण करीना त्यांच्यामुळे ऑफ्फ झालेली असते.
(आता मला धरून मारा :फिदी:)
सस्मित, गमतीनी लिहीलं असेल तर
सस्मित, गमतीनी लिहीलं असेल तर तुम्ही मनावर घेऊ नका. इथे किंवा अन्य कुठल्याही खुप चर्चा झालेल्या बाफं वर मध्येच कोणाला तरी हुक्की येते येऊन चर्चा करणार्यांची "किती कीस पाडताय" अशी कुचेष्टा करायची, त्या करता मी लिहीलं.
नमस्कार मंडळी, चर्चेत उशिरा
नमस्कार मंडळी, चर्चेत उशिरा आल्याबद्दल सॉरी!! मला तलाश आवडला..आणि रसप यांचं परीक्षणसुद्धा!!
मान्य आहे की कथेत खूप लूज एन्ड्स आहेत पण काहीतरी वेगळं पाहायला मिळाल्याचं समाधान नक्की मिळालं...
@मनस्मी: सिक्थ सेन्समध्ये
@मनस्मी:
सिक्थ सेन्समध्ये सुद्धा रहस्य उघड करणाऱ्या हिंट्स होत्याच की...माझ्या मते तेव्हा ते नवीन वाटलं म्हणून जास्त आवडलं!
चला आता मी जरा शिळ्या कढीला
चला आता मी जरा शिळ्या कढीला ऊत आणू का?
एका भूताने / आत्म्याने जिवंत व्यक्तीशी संपर्क साधू पाहणे इल्लॉजिकल टाईप्स असले तरी ह्या विषयावर सिक्स्थ सेन्स, घोस्ट इ. बरेच सिनेमे येऊन गेले आहेत. आणि कथा अतर्क्य (किंवा "खर्या जीवनात असे कधी घडते का?" असे प्रश्न पडतील अश्या) असूनही लोकांनी नावाजलेले/ लोकांना आवडलेले आहेत. हिंदीत गेला बाजार शाहरुख चा 'ओम शांती ओम' ही होताच की! (तसे म्हटले तर डायनॉसोर व तसल्या अचाट प्राण्यांवर [जे प्रत्यक्ष आयुष्यात घडणे अशक्य आहे हे माहित असूनही] ज्युरासिक, गॉडझिला इ. सिनेमांची लाटही आली व त्या त्या काळापुरते त्या सिनेमांना लोकप्रिय करून गेली.) त्यामुळे आमीर ने असा सिनेमा कसा काय स्वीकारला, वै. वै. प्रश्न मलाही सुरुवातीला पडूनही इथे एका पोस्टीत कुणीतरी म्हटलेय त्या प्रमाणे 'अजून एक वेगळा प्रयोग' ह्या नावाखाली आमीरला सूट द्यायला माझी तरी हरकत नाही.
माझ्या मते सिनेमाचे जे मुख्य बीज आहे ते आहे एका केस वर काम करत असताना स्वतःच्या आयुष्यातील एका दु:खदघटनेबद्दलचे गिल्ट विसरून नव्याने सहजीवन सुरु करण्याची प्रेरण मिळणे! आणि त्यासाठी त्या मृत मुलाच्या आत्म्याने कॉन आर्टिस्ट मार्फत राणी आणि पर्यायाने आमीर शी संपर्क साधणे. आता आमीरचा ह्या गोष्टीवर विश्वास बसण्यासाठी त्याला स्वतःला तसा अनुभव येण्यासाठी एक घटना उभी करायला हवी. त्यासाठी करीनाच्या स्टोरीची योजना! पण ही गुंफण नीट जमली नाहीये असे एकंदरीत वाटले.
घोस्ट सिनेमात डेमी मूर चा व्हूपी गोल्डवर्ग वर आधी विश्वास नसतो. तिला वाटत राहते की आपल्या पतीच्या निधनाची माहिती असणारी ही स्त्री तिच्या भावनांशी खेळून गैरफायदा मिळवू पाहते की काय, पण तिचा मृत पती ज्या पद्धतीने तिच्याशी संपर्क साधतो त्यामुळे आपण कथेत खिळून राहतो. उदा. फक्त त्या दोघांना माहीत असलेल्या गोष्टी त्याने व्हूपी मार्फत पत्नीला सांगू/ आठवण करून देऊ पाहणे.
इथे त्या मुलाने राणीशी साधलेला संपर्क तितका इफेक्टिव्ह वाटत नाही. 'आमीरच्या आयुष्यातल्या त्या घटनेला केंद्रस्थानी ठेवायचे आहे की करीनाच्या सूडकथेला' ह्या गोंधळात सिनेमा असल्यासारखा वाटतो. कदाचित इतक्या लहान मुलाला आत्मा स्वरूपात दाखवणे दिग्दर्शकाला इन्सेन्सेटिव्ह वाटले असावे म्हणून त्याचा फक्त आवाज ऐकवण्यात आला असावा. प्रत्यक्ष मुलगा (अर्थात फ्लॅशबॅक वगळून) कुठेही दिसत नाही.
इथे करीना आमीरच्या संपर्कात कुणा कॉन आर्टिस्ट मार्फत वै. येत नाही. डायरेक्ट मानवी अवतारातच येते. तर त्याचे काहीतरी पुचाट स्पष्टिकरण सिनेमात दिले आहे की 'काही लोक मेल्यानंतर सहज दुसर्या दुनियेत जातात. जसे की आमीरच्या मृत मुलाचे झाले म्हणे! पण काही लोक करू शकत नाहीत ते मानवी रूप घेऊ शकतात.' आता करीनाला आमीरशी डायरेक्ट संवाद साधताना दाखविण्यासाठी केलेला उगीचचा खटाटोप वाटतो. आणि करीना जर का डायरेक्ट साधू शकत आहे तर नुसते क्लूज देत बसण्यापेक्षा खरी स्टोरी ती लगच्या लगेच सांगू शकतेच की. किंवा मग तिचा सूड तिला स्वतःलाच घ्यायचा असेल तर आमीरला मदत तरी करण्याचे कारण काय? आमीरला तिचे खुनी सापडोत वा ना सापडो तिची ती सूड घ्यायला समर्थ आहेच की. तसेही अरमान ला तिने संपवले आहेच! केजरीवाललाही तिला हवे त्या पद्धतीने संपवू शकते आहेच.
मग आमीरच्या व्यक्तिगत आयुष्यात आपण उपयोगी पडण्याच्या उर्मीने की काय ती आमीरला ही खुनाची केस उकलवण्यात मदत करते किंवा मग 'आपण गायब झालो तरी कुणी साधी चौकशीही केली नाही, आपल्यासारख्यांची इथे कुणाला पर्वा नाही.' ही जी तिची खंत आहे (जी ती एका संभाषणादरम्यान आमीरला बोलते) त्यामुळे 'आपला मृतदेह कुणालातरी सापडावा व आपल्या मृत्यूची घटना' लोकांसमोर यावी अशी तिची इच्छा असावी म्हणून हा आमीरला मदत करण्याचा खटाटोप ती करते असे आपणच आपल्याला स्पष्टीकरण द्यावे लागेल. पण ते ही पुरेसे वाटत नाहीच. कारण तसे असेल तर आमीरला एक एक टप्प्यावर एक एक क्लू देण्याची काहीच गरज नाही. डायरेक्टच सांगता आले असतेच. पण मग सिनेमाची लांबी कशी वाढली असती? त्यामुळे आमीरच्या व्यक्तिगत आयुष्यातील सल निपटला जाणे आणि त्यासाठी करीनाच्या मृत्युचे गूढ उकलले जाणे हे तितकेसे नीट गुंफले गेले नाहीये, हे माझे मत!
तो जलपरी सीनही खूप हास्यास्पद आहे खरेच! भुंग्याने (किंवा मग किरण ने मला वाटते!) सुरुवातीच्या पोस्टींमध्ये हा सीन वेगळ्या पद्धतीने घेतला असता तर आणखी इफेक्टिव्ह झाला असता, हे सांगताना जे दोन व्हेरीएशन्स लिहिले आहेत, ते मलाही पटले. जलपरी सीन पेक्षा ते नक्की बरे वाटले असते.
तसेच 'त्या हवालदाराने त्याच
तसेच 'त्या हवालदाराने त्याच ठिकाणी ह्या आधीही अश्या पद्धतीने अपघाती मृत्यू झालेले आहेत हे सांगणे' हा सीन उगीचच प्रेक्षकांना गंडवण्यासाठी आहे असे वाटते. कारण पुढे त्याचा काहीच संदर्भ दिला गेलेला नाही. जसे की आधीच्या त्या घटनांचा सूरीने मागमूस काढण्याचा प्रयत्न करणे, त्यांचा आताच्या घटनेशी काही संबंध आहे का ते पडताळणे इ. वर कुणीतरी कहानीशी ह्या सिनेमाची तुलना केली आहे. कहानी मध्ये आधी दाखविलेल्या प्रत्येक सीनचा तसेच संवादांचा संदर्भ शेवटी रसस्यभेद झाल्यानंतर लागतो. तसे तलाश मध्ये होत नाहीये. काही धागे, गुंते अनुत्तरीत राहिलेत इतके खरे!
निंबुडा _____/\______
निंबुडा _____/\______
सस्मित, नक्की कशासाठी
सस्मित, नक्की कशासाठी कोपरापासून हात जोडलेस?
निंबे, तुला यात सस्मितचं कोपर
निंबे, तुला यात सस्मितचं कोपर कुठून दिसलं........
मला तर ती साष्टांग तुझ्ह्या पायावर लोळताना..... आय मिन लोटांगण घालताना दिसते आहे
तुम्हारी शरण मे..... निंबुडादेवी..... निंबुडादेवी
मी आज पाहिला.मला तरी
मी आज पाहिला.मला तरी आवडला!
(की मीच जास्त विचार केला ?)
बर्याच लोकांना कथा समजली नाहिये का???. किंवा फार लिटरली घेतली आहे. ते भूत आतच कसे गेले अन किल्लीच का लागली इ प्रश्न बघून तसे वाटले मला
<स्पॉइलर अॅलर्ट>
हा सिनेमा सिआयडी छाप नाही, रामसे छाप पण नाही. हा सायकोथ्रिलर आहे असा विचार करून पहा. आमीर्चे पात्र कित्येक दिवस झोपले नसते, तो सतत तणावात, मुलगा मेल्याच्या दु:खात असतो, स्वतःला अपराधी मानत असतो. काय केले असते म्हणाजे मी मुलाला वाचवू शकलो असतो हे गिल्ट कायम त्याला छळत असते. त्याला क्लोजर नसते मिळालेले! थोडक्यात मानसिक स्थिती खराब. अशा वेळी ही केस येते. पण ही केस सोडवणे किंवा खुनी शोधणे हा सिनेमाचा विषय नाहीच असा विचार करा. आमीर ला तलाश आहे ती त्या क्लोजर ची.
काय लोक असतात !!
त्याच्यापुरत्या क्लोजर ची.
त्यावेळीच रानीला शर्नाझ कडे जाताना पाहून दोघांचे भांडण, रानीचे तिच्यापुरते एक्सप्लेनेशन. तिला त्या बईकडे मुलाला पुन्हा भेटतायेण्याचे औषध - तिच्यापुरते क्लोजर सापडलेले आहे! आमीर भांडणानंतर तिथून निघून जातो ड्राइव्ह वर आणि बूम! फ्लॅशबॅक , त्यानंतर त्याच्या मनाची तडफड अन त्याच क्षणी करीनाचई एन्ट्री?
या सगळ्यातून मी तरी एवढाच निष्कर्ष काढला की मे बी सबकॉन्शस माइन्ड मधे अर्धे जागेपणीचे ते त्याचेच मनाचे खेळ आहेत.
असो. मी तरी एन्जॉय केला सिनेमा.
मला इतर लोकांनी अधीच सांगितले होते इथे या बाफवर अनेकांनी कसलाही साधा पाचपोच न बाळगता सगळीकडे रहस्यभेद केलाय म्हणून. मी त्यामुळे इथे फिरकलेच नाही ते बरे केले ते आता प्रत्यक्ष पाहिल्यावर लक्षात अले!!
करिनाच भूत आहे व त्या भुताचा
करिनाच भूत आहे व त्या भुताचा जिव वाचविण्याच्या नादात तो पहिला अपघात घडला. अन आमिरशी बोलणारी करिना हीच त्या अपघाताचं कारण (भूत) आहे एवढं जर आधिच कळलं तर सिनामा खरच आवडतो. पण हे आधी माहित नसलं अन करिनाचं भूत असण सस्पेन्स राहिलं तर तो सस्पेन्स जेंव्हा कळतो तेंव्हा हसू आवरत नाही. थोडक्यात सस्पेन्स सोडला कि शिनुमा एकदम झकास.
मी मुद्दामून शेवट पर्यंत
मी मुद्दामून शेवट पर्यंत परीक्षण वाचले नव्हते. मागच्या रविवारी जाऊन बघितला एकदाचा. सोलिड आवडला. एकदा तरी पाहण्यासारखा नक्किच आहे. एकंदर सध्या हिंदी सिनेमे चांगले येत आहेत या वर्षात पाहिलेले विकी डोनर /कहानी /तलाश /इंग्लिश विन्ग्लीश
दक्षिणा/मोहन की मीरा उत्तम पोस्ट. कहानी मधला एसीपी खान आणि तैमूर म्हणजेच नवाजुद्दीन सिद्दीकी हे मला खूप नंतर कळले. अगदीच वेगळा दिसतो . जबरदस्त अभिनय .<<या सगळ्यातून मी तरी एवढाच निष्कर्ष काढला की मे बी सबकॉन्शस माइन्ड मधे अर्धे जागेपणीचे ते त्याचेच मनाचे खेळ आहेत.>> मैत्रेयी च्या पोस्ट मधले हे वाक्य पण पटते आहे. एकदम वेगळाच विचार 
xxxxxxx.. | 2 December, 2012
xxxxxxx.. | 2 December, 2012 - 22:45
भुंग्या , बरं चल मी पण संयम सोडतो किंचित स्मित
आमीर आणि राणीच्या मधले संबंध हा सिनेमाचा आत्मा असायला हवा होता. त्यातले ताणतणाव आणखी ताकदीने मांडायला हवे होते. या दोन कथा समांतर चालताना मानवी भावभावना, नातेसंबंध मांडणारी कथा किंचित डावी झाली आहे. तिथे पटकथा कमी पडली आहे. या कहाणीचा शेवट हा ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर नायकाला आणण्यासाठी कथेमधे अशा एका केसचा तपास आवश्यक होता कि नायकाला या शक्यतेचा विचार करायला ती भाग पाडेल. ही कथालेखकाची कल्पना असल्याने आपल्याला ती आवडते किंवा नाही आवडत. पण ज्या तपासाचं निमित्त होतं त्यात कमर्शियल पोटेन्शियल जास्त असल्याने मेन स्ट्रीम आणि ऑफबीटचं एक मिश्रण समोर येतं ज्यात पोलीस तपासाचा भाग मुख्य कथा बनला आहे. यावर पुन्हा एकदा हात फिरवायला हवा होता असं वाटतं.
शेवटी सिनेमा असा उलटसुलट विचार करायला भाग पाडतो हे यशच आहे. >>>>>>
कुणीच कशी नाही पाहिली ही पोस्ट ?
अवघडै
बा द वे, मला तलाश प्रदर्शित
बा द वे,
मला तलाश प्रदर्शित होण्याआधी कोणीतरी सांगितलं होतं म्हणे हा चित्रपट 'आरुषी हत्याकांडा'वर आहे!
काहीही...
हो माधवी मी पण असेच ऐकले होते
हो माधवी मी पण असेच ऐकले होते
कुणीच कशी नाही पाहिली ही
कुणीच कशी नाही पाहिली ही पोस्ट ? >>>
खरंच की! मी मांडलेल्या पोस्टशी (सिनेमाचे जे मुख्य बीज आहे ते आहे एका केस वर काम करत असताना स्वतःच्या आयुष्यातील एका दु:खदघटनेबद्दलचे गिल्ट विसरून नव्याने सहजीवन सुरु करण्याची प्रेरण मिळणे! ......) ही पोस्ट एकदम मिळतीजुळती आहे ना! किरण्याची आहे ती पोस्ट!
हा सायकोथ्रिलर आहे असा विचार
हा सायकोथ्रिलर आहे असा विचार करून पहा....
>>
मैत्रेयी, एक वेगळा अँगल म्हणून हा विचार ठिक आहे. पण दुर्दैवाने चित्रपटात तसे अधोरेखित करण्यात आलेले नाही. त्याच्याच मनाच्या एका कप्प्याने ह्या केस च्या डीटेल्स वरून त्या मृत मुलीचे मनातल्या मनात एक रेखाचित्र बनवून तिच्याशी संवाद साधत आपल्या व्यक्तिगत गिल्ट मधून बाहेर येण्याचा मार्ग स्वतःच शोधला, अशी थीम असती तर करीनाच्या केस चा उलगडा झाल्याचे, तिचा मृतदेह तिने सजेस्ट केलेल्या ठिकाणी मिळाल्याचे इ. सीन्स चित्रपटात घालण्याची काहीच गरज नव्हती. उलट तसे दाखवण्यात आल्याने पटकथेला आणि एकुणच सिनेमा बनवणार्यांना करीना ही भूतच होती (व आमीरच्या मनातले कल्पनेने बनवलेले पात्र नव्हे) हेच दाखवायचे आहे असे दिसते, व त्यामुळेच सिनेमा शेवटच्या भागात हास्यास्पद झाला आहे.
तुम्ही मांडलेल्या कल्पनेनुसार सिनेमाची थीम असायला हवी होती, खरेच!
ह्यावरून आठवले, मध्यंतरी सर्व
ह्यावरून आठवले, मध्यंतरी सर्व नवोदित कलाकार घेऊन एक मल्टिस्टारर सिनेमा पाहिला होता. कुणी ओळखीचे कलाकार नव्हते. ख्रिसमस च्या एका पार्टीत लहानपणी ग्रूप मधल्याच एका कडून एका मुलीचा मर्डर झालेला असतो. नंतर शिक्षण संपवल्यानंतर हे विसरून जो तो आपापल्या उद्योगाला लागतो. सगळे विभक्त होतात. तेव्हा एकेकाला चिट्ठी पाठवून सगळ्यांना एकत्र आणले जाते. व एक थरारथ नाट्य चालू होते. ह्या सगळ्या मागचा सूत्रधार कोण हेच शेवटपर्यंत समजत नाही. त्यातले एक पात्र शेवटपर्यंत प्रत्य्क्षात अस्तित्त्वातच नाही, हा शेवटचा धक्का सही आहे. पण म्हणून ते भूत होते असे नाही. अस्तित्त्वातल्याच एका पात्राच्या मनाचे खेळ असतात. असे काहीसे कथानक होते. खूप ग्रेट नाही म्हणता येणार, पण रहस्याचा उकल शेवटपर्यंत न होऊ देण्याची चांगली शिकस्त केली गेली होती. सिनेमाचे नाव आठवत नाहीये.
एकही पोस्ट न वाचता....
एकही पोस्ट न वाचता....
निंबे शांत गदाधारी भीम !
निंबे
शांत गदाधारी भीम ! शांत !
विस्मयाने पण तुझी पोस्ट वाचलेली नाही.
गैस पे गैस, गैस पे गैस, गैस पे गैस !!
हलकेच घेणे
अजून सुरूच आहे हे
अजून सुरूच आहे हे
विस्मयाने पण तुझी पोस्ट
विस्मयाने पण तुझी पोस्ट वाचलेली नाही. >>>
अजून सुरूच आहे हे >>> तलाश
अजून सुरूच आहे हे >>>
तलाश अभी खतम नही हुई मेरी दोस्त!
म्हणजे माहीत आहे तर
म्हणजे माहीत आहे तर
Pages