क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संधी दिल्यास तोही अजून पुढील एखाद्या सामन्यात्/मालिकेत एखादे शतक करेल... पण त्याने "काळ" आणि "वेळ" दोन्ही ओळखले आहे.>>> योग, We get it, we get it! Proud

पाँटींग ऊवाचः

Over the last couple of weeks my level of performance hasn't been good enough," he said.

"My passion and love for the game hasn't changed but at the end of the day (the decision) was based on my results.
"In this series so far they have not been up to the level required of batsmen and players in the Australian team.

"I'm glad I have got the opportunity to finish on my terms."

मार्मिक!

असाम्या,
असं आहे की ईथे मला सचिन बद्दल जे वाटतं, जे त्याच्या गेल्या २ वर्षाच्या "खेळावर" अवलंबून आहे, ते मी स्पष्टपणे लिहीतो. शेवटी क्रिकेट हा खेळ आहे आणि देशासाठी खेळताना "कामगिरी" महत्वाची, रेकॉर्ड नव्हे. मी जे लिहीतो ते ईथल्या सर्वांना पटायलाच हवे असे नाही... त्यामूळे दर वेळी माझ्या मतावर काहीतरी पुन्हः ऊलट विधान करून निव्वळ शब्दाला शब्द लिहीणे हे तुला आवडत असले तरी मला त्यात रस नाही रे..
I read somewhere, words of wisdom, which I liked and truly follow.. "You don't have to win every argument, just stay true to yourself!"

बाकी चालू देत... Happy
रच्याकने: एके काळी आम्ही देखिल सचिन ला क्रिकेट चा भगवान म्हणून डोक्यावर घेतले आहेच.. तरिही सचिनने ऊर्वरीत सामन्यात वा मालिकेत अगदी त्रीशतक ठोकले तरी मी हेच म्हणेन- त्याने आता (तरी) निवृत्त व्हावे!

सचिनच्या निवृत्तिबद्दल माझं स्वतःचं मत कांहीही असलं तरीही कां व केंव्हां निवृत्त व्हायचं हा निर्णय जसा सर्वस्वीं पाँटींगचा स्वतःचा होता तसाच तो सचिनचाही असायला हवा, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. स्वतःची कामगिरी संघाला सध्यां उपयुक्त ठरत नाहीय, हें सचिनला समजत नाही पण पाँटींगला मात्र उमगलं असा पवित्रा घ्यायला मला तरी आवडणार नाही. सचिनने आतां निवृत्ति जाहीर केली किंवा नाही केली तर त्याचे बरे-वाईट परिणाम, कौतुक-टीका तो भोगेलच; संघाच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होत असेल तर निवडसमिती त्याला संघात ठेवण्या/ न ठेवण्याचा निर्णयही घेईलच. पण जो प्रतिभावंत इतक्या प्रदीर्घ काळात भारतीय क्रिकेटशी १००% समरस होऊन पक्कं इमान राखून राहिला, तो आपल्यामुळे त्याच क्रिकेटचं नुकसान होतंय असं न समजण्याइतका कच्चा व समजूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याइतका बेईमान नक्कीच नाही, ही माझी दृढ श्रद्धा आहे.
मनातून मलाही कधीं कधीं सचिनने निवृत्त होणं बरं असं वाटत असलं तरीही पाँटींगच्या खांद्यावर बंदूक ठेवून सचिनवर नेम धरण्याआधीं मीं तरी हजार वेळां विचार करीन.

भाऊ प्रचंड सहमत.

असे वाटले नव्हते पण पाँटींगच्या निव्रुत्तीने वाईट वाटून गेले. ज्या काळात मी क्रिकेटमय झालो त्या period चे फार थोडे जण उरले आहेत. त्यातलाच ज्याने भरभरून आनंद नि दुस्वास दिला असा एक जण बाहेर पडला. पाँटींगचे समोरच्या V मधले शॉट्स आठवले कि अजूनही thrilled feeling येते. २००१ मधे भज्जीने मामा बनवलेला पाँटींग आठवतो, makes me chuckle. आफ्रिकेमधल्या वर्ल्ड कप फायनलमधे झहीरची पीसे काढलेली नि श्रिनाथला जवळजवळ मैदानात रडवेला केलेले आठवते. भारताविरुद्ध त्याच्या टिपकल खडूस नि होलिअर दॅन दाऊ attitude आठवला कि सणक जाते. अ‍ॅशेस मधल्या त्याच्या breathtaking innings आठवतात and you move on. पर्थमधे hopefully he will go with bang, he deserves one last hurray.

योग मला वाटले नव्हते कि तुला माझ्या कोपरखळ्या एव्हढ्या खटकत असतील, ज्यांची सुरूवात तूच केली होतीस. no hard feelings dude from my side.

<< असे वाटले नव्हते पण पाँटींगच्या निव्रुत्तीने वाईट वाटून गेले. >> अगदीं खरंय. 'पाँट्या'वर इथं रागाने झोड उठवली जात असताना एक शैलीदार , हुकमी फलंदाज, चपळ क्षेत्ररक्षक व सदैव स्वतःला 'फिट' ठेवणारा खेळाडू म्हणून पाँटींगचं कौतुक करून मीं मागें इथं कांहीसा रोषही ओढवून घेतला होता. आगाऊपणाची तीटही या महान फलंदाजाला कांहीशी शोभूनच दिसायची ! निवृत्तिबद्दलची त्याची मुलाखत एका परिपक्व, आकर्षक फलंदाजाला शोभेशीच !! पाँटीगला निरोपाच्या कसोटीसाठी व निवृत्तिनंतरच्या काळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

एक बराचसा संतुलीत लेख.. :
http://www.espncricinfo.com/india-v-england-2012/content/current/story/5...

>>It is not the ideal situation, but India are hardly the ideal team.
couldn't agree more!
(कलकत्ता मॅच बोरींग ड्रॉ होईल असे ऊगाच वाटते आहे... दोन्हीकडून भरपूर धावा कुटल्या जातील.)

<< आपल्या DNA मध्ये "श्रध्दा" अधिक आहे. >> खरंच? पण मला तर वाटलं होतं पारतंत्र्यानंतर ती फक्त इतर देशांतील खेळाडूंच्या बाबतीतच उफाळून येते ! सचिनच्या नेकीबद्दल श्रद्धा आहे म्हणून मला माझा डीएनए तपासावा तर नाही ना लागणार !!

चपळ क्षेत्ररक्षक व सदैव स्वतःला 'फिट' ठेवणारा खेळाडू म्हणून पाँटींगचं कौतुक >> ओह हा मुद्दा सटकूनच गेला वर लिहिताना Sad He was one of the best and safest fielders in World Cricket. मिडऑन ला उभे राहात टाळ्या वाजवत प्रोत्साहन द्यायची त्याची स्टाईल कशी विसरता येईल.

This is spot on

As for Tendulkar's place in the side, let's also apply the same yardstick for some others. Gautam Gambhir has struggled for longer, Yuvraj Singh has looked more out of sorts, Zaheer Khan is less fit, and R Ashwin is less athletic than Tendulkar. The elephant that nobody used to speak about is now hiding other people's failures just because he is so big. During a Test that was the biggest failure of Indian spinners - on a designer track, after winning the toss, and with runs on board - all we saw was people telling Tendulkar it's time to go.

It's not that Tendulkar is getting any preferential treatment from the Indian selectors, it's just that Indian cricket is going through a phase weak enough to justify his continued selection. If the cupboard was brimming with such exceptional talent, why would we keep going back to Suresh Raina and Yuvraj? ...

On relative performance alone - yes, it has come down to that and why shouldn't it? - we can't ask Tendulkar to retire. It's the age that is not on his side, and it will be wrong if he plays all the home Tests and retires before the South Africa tour, sending a virtual debutant to the vultures. If he feels that barring unforeseen injuries he can make it to South Africa - and he is the best judge of his fitness - he should continue. It is not the ideal situation, but India are hardly the ideal team.

you can read the rest here ... http://www.espncricinfo.com/india-v-england-2012/content/current/story/5...

"Why does Dhoni want a square turner on the first day? Then why are you selling tickets for five days? It's immoral," Mukherjee told CNN-IBN.
मुखर्जी हे कोलकत्ता खेळपट्टी बनवणारे क्यूरेटर आहेत.

माझ्या मते पाँटींग आणी सचिन यांच्या निव्रुत्तीची तुलना करता येणार नाही .
त्यात एक मोठा Variable आहे . तो म्हणजे ऑझी क्रिकेट बोर्ड. त्यानी याआधीही भल्याभल्याना निव्रुत्तीवेळी झटके दिले आहेत .
पाँटींगलाही पहिल्या २ कसोटीनंतर त्यानी तू पुढची सिरिज खेळणार नाहीस , तेव्हा निव्रुत्तीचे काय ते तू ठरव असे सांगितले असण्याची शक्यता आहे (रोमेल प्रमाणे) अन्यथा अ‍ॅशेस खेळायची इच्छा त्याने अनेकदा बोलून दाखवली होती . On my terms वगैरे थोडे जास्त वाटले .
सचिन बाबत बीसीसीआय असे काही करेल अशी शक्यता (असलीच तर ;)) फारच कमी आहे .

त्यात एक मोठा Variable आहे . तो म्हणजे ऑझी क्रिकेट बोर्ड. त्यानी याआधीही भल्याभल्याना निव्रुत्तीवेळी झटके दिले आहेत .
---- चांगला खेळ करा आणि संघात स्थान टिकवा असा ऑसी चा आदर्ष आहे, त्याचे काटेकोर पालन ते करतात. पुर्व पुण्यावर तुम्ही किती काळ संघात अडगळ बनणार.

<< तो म्हणजे ऑझी क्रिकेट बोर्ड...तेव्हा निव्रुत्तीचे काय ते तू ठरव असे सांगितले असण्याची शक्यता आहे >> असेलही, पण सचिनच्या निवृत्तिबद्दल जगभर इतकी चर्चा होत असताना बीसीसीआय, निवडसमिति यानी अनौपचारिकपणे या विषयावरचे सचिनचे विचार जाणून घेतले असण्याची शक्यता मात्र मग आपण कां नाकारतो ? ' सचिनला काढण्याची बोर्डाची हिंमत नाही', ' सचिन केवळ पूर्व पुण्याईवर हट्टीपणाने अडगळ बनून राहिला आहे ' , यांतलं सत्य किती व आपला कल्पनाविलास किती याची पडताळणी कधी कोणी केलीय ? कशावरून बोर्डानेच सचिनला निदान द. आफ्रिकेच्या दौर्‍यापर्यंत त्याने निवृत्तिचा विचार करूं नये, असं अनौपचारिकपणे नसेल सुचवलं ? सचिनच्या गेल्या वीस वर्षांतील आदर्शवत वागणूकीमुळे एवढी शक्यताही आपल्या मनात निर्माण होऊं नये ? बीसीसीआयबद्दल अनेक रास्त तक्रारी असल्या तरीही आपल्या देशातलं क्रिकेटही चांगल्यापैकी ' वेल ऑर्गनाईझड ' आहे हें मान्य न करतां फक्त ऑझी क्रिकेट बोर्डाकडेच जणूं काय निर्णयक्षमतेची मक्तेदारी आहे असं आपण गृहीत धरणं योग्य आहे का ? माझ्या मनात हे प्रश्न येतात व मी एक सचिनवेडाच आहे असं मीं स्वतःला बजावूनही हे प्रश्न उत्तराचा आग्रह धरतातच !!

भाऊ , तुमचा गैरसमज होतोय . मी बीसीसीआय्/सचिन बद्द्ल बोलतच नव्हतो .
पाँटींग On His Terms गेला किंवा त्याने स्वतःचा फॉर्म नव्हता हे स्वत: जाणून निव्रुत्ती घेतली याचे अगदी उदात्तीकरण Cricinfo वगैरे वर चाललय त्याबद्दल बोलत होतो .
सचिनची निव्रुत्ती या विषयावर मला नक्की काय वाटते हे हल्ली मलाच कळत नाहीये Happy

<< भाऊ , तुमचा गैरसमज होतोय . मी बीसीसीआय्/सचिन बद्द्ल बोलतच नव्हतो . >> मान्य व मी त्याबद्दल मनापासून दिलगीरी व्यक्त करतो. पण इथल्या पाँटींगच्या निवृत्तिच्या उदात्तिकरणाचा रोख सचिनकडेच अधिक आहे असं जाणवल्याने हा गैरसमज झाला. क्षमस्व.

अहो भाऊ , दिलगीरी कसली त्यात ?:)
बाकी ते पाँटींगच्या निवृत्तिचे "लेकी बोले सुने लागे" टाईप टोमणे आम्हीही अगदी फेबु , समस पासून समोरासमोर चर्चेत ही ऐकतोय , म्हणूनच थोडी चिड्चिड झाली , अदरवाईज एक खेळाडू म्हणून (आणी फक्त खेळाडू म्हणूनच ) त्याच्याबद्दल आदर आहेच Happy

काल झी न्युज वर गुमनाम क्रिकेटर वर एक कार्यक्रम होता.... एकेकाळचे दिग्गज खेळाडु आता सध्याच्या स्थितीला काय करत आहे यावर होता....
जेव्हा बघितला तेव्हा अ‍ॅम्ब्रोज वर दाखवत होते....एवढा मोठा दिग्गज गोलंदाज ..एकेकाळी त्याला स्पिड आणि निव्वळ त्याला ६.५ फुट शरीराला बघुनच भिती वाटत होती फलंदाजांना ...तोच अ‍ॅम्ब्रोज आता वेस्ट इंडीज मधे एका होटेल च्या छोट्याश्या बँड मधे गिटार वाजवत आहे ... Sad मला वैयक्तिक तरी फार वाईट वाटले... Sad Sad .. निवृत्ती नंतर खरच काही खेळाडुंना काहीच उरत नाही...म्हणुन कधी कधी मला आयपीएल बरोबर वाटते किमान पैसा तरी मिळतो...

उदयन , वाईट वाटले वाचून . Sad
अ‍ॅम्ब्रोस आमचा एकदम आवडता . एखादा विषय पार डोक्यावरून गेला याला आमच्या बोलीभाषेत "कर्टली अ‍ॅम्ब्रोस बाऊन्सर " अस नाव आहे .

त्याची साथ म्हणुन रिची रिचर्डसन सुध्दा त्याच बँड मधे आहे..... Sad दोघेही महान खेळाडु होते....

<< मला वैयक्तिक तरी फार वाईट वाटले... >> उदयनजी, मला वाचल्याचं पक्कं आठवतं कीं द्वारकानाथ संझगिरी [ किंवा कुणीतरी भारतीय पत्रकार ] अँब्रोजला भेटले होते ; अँब्रोजने 'गिटार' हीच त्याची पहिली व खरी पॅशन आहे व क्रिकेटमधे त्याला आतां अजिबात रस नसल्याचं सांगितलं होतं. [ इथल्या इतर कुणी तरीही हें वाचलं असण्याची शक्यता आहे ] . अँब्रोज परिस्थितीमुळे नव्हे तर मनापासूनच्या आवडीमुळे हें काम करत असावा अशी दाट शक्यता आहे .
<<एवढा मोठा दिग्गज गोलंदाज ..>> १००% सहमत.

मला वाईट यासाठी वाटलेले की एक सामान्य कुवतीचा गोलंदाज बिशप आपले अतिसामान्य ज्ञान पाजळत देशोविदेशी फिरतो तर हा महान गोलंदाजाचे ज्ञान आणि कुवत त्यपेक्शा जास्त आहे

त्याची साथ म्हणुन रिची रिचर्डसन सुध्दा त्याच बँड मधे आ >> That's an irony. १९९५ च्या वर्ल्ड कपमधे त्यांचे एव्हढे फाटले होते कि रिचर्डसन कप्तान असूनही त्याचे कोणी ऐकत नसत. सेमी फायनल हरण्यामागे हे एक मह्त्वाचे कारण होते.

मला वाईट यासाठी वाटलेले की एक सामान्य कुवतीचा गोलंदाज बिशप आपले अतिसामान्य ज्ञान पाजळत देशोविदेशी फिरतो >> बिशप सामान्य कुवतीचा गोलंदाज ? जर injury मूळे लवकर संपला नसता तर बिशप , वॉल्श नि अँब्रोज ह्या त्रयिची गणना त्यांच्या आधीच्या चौघांबरोबर केली गेली असती असे होल्डींग वगैरे म्हणतात. विचार कर त्यातला एक लवकर गेल्यानंतरही उरलेल्या दोघांनीही विंडीजचा झेंडा किती वेळ उभा ठेवला होता ते.

निवृत्ती नंतर खरच काही खेळाडुंना काहीच उरत नाही...म्हणुन कधी कधी मला आयपीएल बरोबर वाटते किमान पैसा तरी मिळतो... >> हे म्हटल्यानंतर commentary मूळे त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामधे मग्न राहता येते हेही नसे थोडके.

अँब्रोजला भेटले होते ; अँब्रोजने 'गिटार' हीच त्याची पहिली व खरी पॅशन आहे व क्रिकेटमधे त्याला आतां अजिबात रस नसल्याचं सांगितलं होतं >> हे बहुधा लोकप्रभामधे वाचलेले आठवते.

Pages