Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेश करून पाहते, थँक्स
दिनेश करून पाहते, थँक्स
besanachyaa ladavache mishraN
besanachyaa ladavache mishraN koraDe vaTate aahe. laDu vaLala jatoy paN thoDa bhagaRaL zaLay. kaay karave?
थोडा दूधाचा हबका द्या.
थोडा दूधाचा हबका द्या.
बेसनाच्या मिश्रणात थोड तुप
बेसनाच्या मिश्रणात थोड तुप पातळ करून घाला. लाडू वळले जातील.
काल एका पदार्थासाठी नारळाचे
काल एका पदार्थासाठी नारळाचे दूध काढून ठेवले होते. पण काल आणि आज करायला वेळ झाला नाही. उद्याही होणार नाहीये.
नारळाचे दूध टिकले तर पर्वा करू शकेन. आजवर कधी नारळाचे दूध टिकते की नाही हे बघायची वेळ आली नव्हती. तर प्लीज सांगा टिकते का?
साध्या फ्रिजात किती दिवस आणि फ्रिजरमधे किती दिवस टिकू शकते? चव बदलते का?
फ्रिजमधे ठेवले तर वर साय येते
फ्रिजमधे ठेवले तर वर साय येते आणि पाणी खाली राहते. जर ते वापरुन करायचा पदार्थ गरम करायचा असेल तर चवीत विशेष फरक पडत नाही. २ दिवस सहज टिकेल. फ्रिझरमधे ठेवायची गरज नाही.
सोलकढी सारखा, गरम न करायचा पदार्थ असेल, तर मात्र तो बेचव लागतो. त्यासाठी ताजे दूधच लागते.
मेक्सिकन राइस करणार होते पण
मेक्सिकन राइस करणार होते पण बारगळलं. नारळाच्या रसाच्या पोळ्यांची रेस्पी वाचली कुठेतरी ते करावं असा विचार आहे. नाहीतर दोदोल आहेच. अजून थोडा माडाचो सूर शिल्लक आहे.
जर दोन दिवसानी, खुपच घट्ट साय
जर दोन दिवसानी, खुपच घट्ट साय जमली, तर ते कोकोनट क्रीम म्हणून थाई करीत वापरता येईल. खालच्या पाण्याचा कुठल्याही पदार्थात उपयोग होईल.
थाई प्रकार कधी केलेला नाही
थाई प्रकार कधी केलेला नाही हमखास, सोप्पी, बिगारीतल्याला जमेल अशी रेस्पी विपुत द्या किंवा इथे टाकलेली असेल तर आकडा द्या.
मेक्सिकन राईस होईल कि,
मेक्सिकन राईस होईल कि, शिजवायचाच आहे ना तो !
नीधप, मी टिनमधलं नारळाचं दूध
नीधप, मी टिनमधलं नारळाचं दूध दुसर्ञा भांड्यात काडून किंवा टीनलाच प्लास्टीक र्~अप करून फ्रि़जमध्ये ठेवते..आठवडाभर किंवा इकडच्या थंड वातावरणात त्यापेक्षा जास्तही टिकतं. मग कुठच्या कुठच्या माशांच्या करीत थोडं थोडं ढकलते (ही डाएट करी
) आता मुंबईत किती टिकेल माहीत नाही पण आठवडा चालेल असं वाटतं..लगेच फ्रीज करायला हवं होतं असं वाटतं..म्हणजे मी तरी तसंच करते...
फ्रीज म्हणजे? साधं की डिप
फ्रीज म्हणजे? साधं की डिप फ्रीज?
साधं लगेच केलेलं आहे.
फ्रीजच. डीप फ्रीजला नाही
फ्रीजच. डीप फ्रीजला नाही ठेवलं मी कधीच. बर्फ होईल नं त्याचा?
वेका, कॅन उघडल्यावर उरलेला
वेका, कॅन उघडल्यावर उरलेला पदार्थ लगेच दुसर्या भांड्यात काढून घ्यावा नाहीतर काळा पडून खराब होतो.
.
.
नारळाच्या दुधावर साय धरलीतर
नारळाच्या दुधावर साय धरलीतर ते वापरायच्या वेळेला खालचे पाणी काढून ते मावे मधे थोडे गरम करुन, त्या सायीवर ओतून ढवळायचे. तसंच ना. दुध चांगले डीप फ्रीज होते. आमच्या इथे तर असे फ्रेश ना. दु. फ्रोजनच मिळते. कागदी खोक्यातून , कॅन मधून मिळणारे प्रोसेस्ड असते.
साधंच.. नीरजा, आपल्याकडेही
साधंच..
नीरजा, आपल्याकडेही आता नारळाच्या दूधाची छोटी छोटी पाकिटे मिळतात. आयत्यावेळी कोमट पाणी घातले कि बर्यापैकी चवीचे दूध मिळते. जास्त करुन पदार्थ शिजवायचा असेल तर ते सोयीचे पडते.
नि आमटी बनवताना वापरुन टाक ते
नि आमटी बनवताना वापरुन टाक ते दुध.
आणि आता डाबरच नारळाच रेडीमेड दुध मिळत (टेट्रा पॅक ५० रु). हव तेव्हा वापरता येत.
उपम्याचे रेडिमिक्स प्रकार
उपम्याचे रेडिमिक्स प्रकार मस्त हिट्ट झाला.
धन्यवाद सुमेधाव्ही आणि दिनेशदा....
मी फक्त प्रत्येक वेळी नविन लॉट न बनवता ४-५ लॉट्स मध्ये उपमा बनवून राईस कूकरमध्ये ठेवून दिला 'कीप वॉर्म' सेटिंगमध्ये... मस्त गरम वाढता आला. अंदाजे ३५-४० लोकांना पुरला आरामात.
धारा, ही राईस कूकरची कल्पना
धारा, ही राईस कूकरची कल्पना छानच आहे. गॅसवर गरम करत ठेवला, तर हमखास तळाला लागतो.
चांदीच्या वस्तुंसाठी त्या
चांदीच्या वस्तुंसाठी त्या बटाटे उकडलेल्या पाण्यात बुडवून ठेवल्यात तर लगेच स्वच्छ होतात असा माझा अनुभव आहे. ह्या मागचे कारण माहीत नाही. लेक लहान असताना तिचे ताट, पेले, चमचे ह्या पद्धतीने साफ करत होते. अर्थात त्या पाण्यात हळद नसावी नाहितर पिवळसर झाक येते.
बटाट्याच्या रसात चेहरा डुबवला
बटाट्याच्या रसात चेहरा डुबवला तरी चकाकतो. (अनुभव नाही पण पाहिलेय एकीला करताना)
जोक्स अपार्ट, खर आहे कारण बटाट्यातील ब्लिचिंग क्षमता..
झंपे पण बटाटे शिजवलेल्या
झंपे

पण बटाटे शिजवलेल्या पाण्यात जर चिकळ्या (पावसात सपाता घातल्यावर कपड्यावर उडतात ते थेंब) उडलेले कपडे भिजवले थोडा वेळ तर स्वच्छ होतात.
श्रावण्+अधिकमास यामुळे
श्रावण्+अधिकमास यामुळे सुकटीकडे लक्ष देता न आल्यामुळे त्यात टोक्यांसारखे किडे झालेत. काय करु?
मटकी निवडायच्या ऐवजी घोळून
मटकी निवडायच्या ऐवजी घोळून जास्त सोपं जातं म्हणे. कशी घोळायची ? सर्व खडे निघतात का घोळून ?
रावी घोळून नाही निघत..
रावी घोळून नाही निघत.. निवडावेच लागते नीटच.
दीपाली टाकून द्या. खरेच
दीपाली टाकून द्या. खरेच खाण्यायोग्य नाही ते.
रावी, मटकी जर भिजतच घालायची असेल तर मोठ्या भांड्यात भरपूर पाणी घेऊन त्यात मटकी घालून हाताने जोरात ढवळायची, मग वरवरची काढून घ्यायची, मातीचे खडे विरघळतात आणि बारीक खडे, भांड्याच्या तळाशी मधे जमा होतात. बरेचसे निघतात पण तरीही, दक्षिणा म्हणतेय तशी मटकी निवडावीच लागते. मोड आल्यावर निवडणे जास्त सोपे जाते कारण खड्यांना मोड येत नाहीत
ओ के. पुढच्या वेळी आधी घोळून
ओ के. पुढच्या वेळी आधी घोळून घेईन आणि मग मोड आल्यावर निवडेन.
मोड आल्यावर निवडणे जास्त सोपे
मोड आल्यावर निवडणे जास्त सोपे जाते कारण खड्यांना मोड येत नाहीत >> सौ टके की बात
खूप कजुकतलि उरली आहे काय करु?
खूप कजुकतलि उरली आहे काय करु?
Pages