युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोनाली, दिलेल्या लिंकमधली बलक वेगळा करण्याची पध्दत सोपी आणि नेहमिची आहे. पण भरपूर अंड्यांमधला बलक वेगळा करताना मला पाण्याची बाटली वापरण्याची कल्पना फार एफिशिअंट आणि पांढरा भाग जास्त न येऊ देता नेमका पिवळा बाहेर काढायला जास्त योग्य वाटली.

फेकू नका हो! ते बेचव चिकन नुस्तंच रश्श्यांत घालून खपलं नाही तर उरलेल्याला एखादी चटणी, ठेचा चोपडून १-३ मिनिटं हायवर ब्रॉईल केलं तरी खाण्ञालायक होतं. चिपोटले साउथवेस्ट सॉस आणि ग्रिल्ड भाज्यांसह रॅप / पनिनी सँडविच होतं, या पाककृती नको असल्याल लई भारी चवीच्या चिकन सॅलडरेस्पीसाठी संपर्क साधा... Proud

-('चंडलब रोटेसरीचिकनाचे १०१ उपयोग' या आगामी पुस्तकाची लेखिका..) Proud

मनी, त्याच्या चायनीज डिशेश चांगल्या होतात... फ्राईड राईस, सॉटेड, चिली चिकन.....
सुप, सॅलेड्, सॅन्डविच यातही वापरु शकतेस.
मृण्मयी ने सुचवल्याप्रमाणे पालक पनीर सारखी भाजी मस्त होते. पण यात हिरवी मिरची, कोथींबीर आले लसुण्, थोडा पुदिना याचा हिरवा मसाला जरुर टाक.
सुके कढई चिकनही छान होते.

बर्‍याचदा चाय्नीज पदार्थात पांढरी मिरपुड वापरायला सांगितलेले असते. पुण्यात कुठे मिळते कुणी सांगु शकेल का?

मला पाण्याची बाटली वापरण्याची कल्पना फार एफिशिअंट आणि पांढरा भाग जास्त न येऊ देता नेमका पिवळा बाहेर काढायला जास्त योग्य वाटली.>>मृण्मयी तुझे बरोबर आहे. मी तसा विचार नाही केला....मला वाटले २-३ अंड्यांसाठी कशाला हवी बाटली म्हणून मी ती लिंक दिली. तसेच अंडे थंड असेल तर बाटलीने पिवळा भाग सहज वेगळा करता येतो. पण ते नॉर्मल तापमानात असेल तर बलक लगेच फुटतो.

खारट झालेय म्हणजे त्यात इतर घटकांची भर घालावी लागणार. सुकलेल्या कैरीच्या फोडी ( बाजारात आंबोशी म्हणून मिळतात ) व त्या प्रमाणात तिखट आणि मसाला मिसळायचे. सगळे लोणचे बाहेर काढून हे कोरडेच मिसळायचे. परत बरणीत दाबून भरायचे आणि मग वर गरम करून गार केलेले तेल ओतायचे.
आंबोशी कोरडी असल्याने, ती थोडी फुगेल, म्हणून बरणी मोठीच घ्यायची. त्यात बडीशेप व थोडा गूळ घालायचा.

एक तरुणी/ बाई (अजुन प्रत्यक्ष भेट झाली नाही आहे ) स्वयंपाकासाठी येणार आहेत. 'तुम्ही काय काय बनवता ?' असं मी विचारलं असता, 'पाककृती असेल तर काय हवं ते बनविन' असा SMS आला आहे Happy
रुचिरा चे दोन्ही भाग आणि मायबोली ओट्या वर ठेउन हे हे बनवा असं सांगु शकते, पण इतर पर्याय म्हणुन स्वयंपाकाची काही तयारी करुन घेण्याच्या कल्पना सुचवा प्लिज! पोळ्या करुन घेईनच पण काही मसाले , वाटण, घाटण करुन घेता येतिल का जेणे करुन मला कामावरुन आल्यावर झटपट स्वयंपाक बनवता येइल.

इडली / डोसा / उत्तप्पा / ढोकळा यांच्यासाठी वाटण करुन ठेवणे - डाळ इत्यादी आधीच भिजत घालून ठेवावी लागेल.
नारळ खोवणे
उपमा / शिर्‍यासाठी रवा मंद आचेवर भाजून ठेवणे
शेंगा टाइप भाजी निवडून मोडून ठेवणे
पालेभाज्या निवडून, धुऊन, चिरून ठेवणे
कोशिंबिरिसाठी मुळा / गाजर / कोबी इ किसून ठेवणे.
हिरवी चटणी / ठेचा बनवून ठेवणे -
वापरत असाल तर कांदा खोबर्‍याचं वाटण करुन ठेवणे
डाळ / बटाटे इ कूकरमधून शिजवून ठेवणे
मटण / चिकन ला आवडीनुसार वाटण / मॅरिनेड लावून ठेवणे
दाण्याचे कूट करून ठेवणे

चिंच-खजूर ची चटणी बनवून ठेवणे. आयत्या वेळी सगळीकडे वापरता येते.
दाणे भाजून ठेवणे. कूट लिहीलेच आहे वर. पण नुसते भाजलेले दाणे पण काढून ठेवणे.
कोथिंबीर निवडून ठेवणे.
आवडत असेल तर डाळींबाचे दाणे काढून ठेवणे (आयत्या वेळी दहीबुत्ती किंवा इतर पदार्थांत घालता येतात)
फळे चिरुन ठेवणे (हे हेल्दी आहे की नाही हे मी सांगू शकत नाही पण फळे चिरुन फ्रीज मधे ठेवलेली असतील तर थंडगार खायला मस्त वाटते.)

>>>पाककृती असेल तर काय हवं ते बनविन' असा SMS आला आहे<< नशिबवान आहात. Happy

१)टोमॅटो + कांदा + आलं वाटण घ्या करून. सगळ्यात वापरु .. ओतु शकता. पटकन जेवण. Wink

अवांतरः अलीकडेच एका पंजाबी बाईला कामाला ठेवली होती... दर वीकेंडला २ किलो टोमॅटो व कांदे संपवायची. प्रश्ण तो न्हवता पण मिळेल त्या प्रकारात तीच पेस्ट.. ....नकोसे झाले. बरं माझ्या पद्धतीने करते का? खाके देख मेरा पालक... उकळवून उकळवून चोथा केलेला पालक...
एकच पद्धत, कुठलीही भाजी असो. कांदा व टोमॅटो कच्चा वाटायचा, आलं, आमचूर,जीरं टाकायचे व खदाखदा उकळवायची गॅस मोठा करून. ती पेस्ट सगळ्यात ओतायची.(पालक उकळवून वाटून, पुन्हा उकळवायचा ह्या पेस्ट सोबत), चणे, फली, दूधी,कारलं,चिकन

>>>अलीकडेच एका पंजाबी बाईला कामाला ठेवली होती... दर वीकेंडला २ किलो टोमॅटो व कांदे संपवायची. प्रश्ण तो न्हवता पण मिळेल त्या प्रकारात तीच पेस्ट.>>

बरोबर आहे. पंजाबी लोकं ज्यात त्यात तीच पेस्ट/ मसाला घालतात. इंग्रोत मिळणारी मोठ्ठी कांद्याची पिशवी आणून ते , टोमॅटो, आलं लसूण असा सगळा मसाला वाटून छोट्या छोट्या डब्यांमधे (एका वेळेला लागेल एवढा) भरुन फ्रिज करणं ही आयडिया असते म्हणजे जेवण पटपट होतं.

सगळ्यात काय ती पेस्ट... दूधी पासून ते चण्यापासून.. ते चिकन मध्ये. एकच वास सगळ्या जेवणाला. ज्यात त्यात आम्चूर पण घालायचे... नको म्हणताना बचाकभर तेल ओतून, त्यात पेस्ट व पाणी ओतून बराच वेळ टोपात चमचाचा खाण खाण आवाज करत मग ती पेस्ट आटवून भाज्या घाला. त्या बसा भुजवत.... (भुजना अच्छा रहता है म्हणत).. राम राम सांगून पाठिवलं. Proud
जगातले टोमॅटो संपले की पंजाबी लोक जेवण कशात करतील हा मोठा प्रश्ण आहे.

अग्गोबाई बर झाल तुम्ही सगळ्यानी विचारलत म्हणून नीट बघितल पाकिटावर तर "रागी" अस लिहिल आहे, अगदी छोट्या अक्षरात !
गेले ८-१० दिवस घरातले सगळे फोड्णीत रागीच्या लाह्या न रागावता खाताहेत !
आता या अर्धा किलो रागी च काय करू ??
रागे भरू का तिला ?
>>>>
ह्या पोस्ट वर इतकी हसलेय की विचारता सोय नाही. Rofl
मोहरी ऐवजी नाचणीची फोडणी ! अशक्य! Lol

आता या अर्धा किलो रागी च काय करू ??
>>>
नाचणीच्या पीठाच्या पाटवड्या अशी रेसिपी वाचली होती कुठेतरी. नाचणी भाजून त्याचे मिक्सर मधे दळून पीठ करता येईल बहुतेक.

घरात उडीद डाळ संपलीय. पण अक्खे काळे उडीद आहेत. तर ते आणि तांदूळ वेगवेगळे भिजवून वाटले का?ते आंबवुन मग डोसे/ घावन असं काही करता येइल का?

प्रयोग करता येईल, पण पिठाला काळसर रंग येईल, शिवाय नीट आंबेल का याची शंका वाटते.
अख्ख्या उडदाची, माखी दाल करता येईल.

ऑर्किड, अक्खे काळे उडीद मिक्सरवर भरड काढा उडीदाचे दोन तुकडे होतील एवढच मिक्सरवर फिरवा आणि मग भिजत घाला, भिजल्यावर साल निघतील.

ऑर्कीड, मी आजकाल सालवालीच उडदाची डाळ आणून इडली आणि दोश्याचं पीठ करते. हो रंग काळसर होतो पण मला स्वत्।ला ही सालवाली डाळ हेल्दी वाटते. व्यवस्थित आंबतं आणि मुलं इडल्या खातात. no probs Happy
तुम्ही जर हे उडीद चांगले वाटू शकाल तर प्रयत्न करा..मिक्सर दणदणीत हवा असण्याची शक्यता आहे Proud

रगडा पॅटिस करताना रगड्यासाठी फ्रोजन वटाणे वापरले तर चालेल का? पुर्वी वटाणे भिजवुन केला आहे पण सध्या कोरडे वटाणे नाहीयेत आणि इंग्रो फार लांब आहे.

मला नाही वाट्त रगडा इफेक्ट येईल...तुमच्याकडे छोले (can/खरे) आहेत का? त्याचा पण रगडा होतो किंवा ते तुम्हाला विदेशी दुकानातही मिळेल Happy

हो हो छोले आहेत! त्याचा पण रगडा करतात हे माहिती नव्हते मला. छोले टाईप करायचा रगडा की नेहमी रगडा करतो तसाच?
धन्यवाद!

ऑर्किड, जुन्या धाग्यावर बी आणि माझे ह्याबाबतीत बोलणे झाले होते. उडीद भिजवून ठेवायचे ४ ५- तास. मग त्यांची साले सुटी होतील. ती हाताने चोळून, रोळून मग बाहेर काढून टाका. ही जरा टाइम कंझ्युमिन्ग प्रोसेस आहे.
तरी सालासकट भरडण्यापेक्षा बरे. मग १/१०थ साले राहिली की ती वेचून काढता येतील. मग नेहमीसारखेच वापरता येइल.वाटून वडे, डोसे इत्यादीचे पीठ बनविणे. असे. काली दाल तर आहेच.

धन्यवाद आरती, वेका, अमा!
थोड्या प्रमाणात प्रयोग करते.:)
वत्सला, छोले भिजवून नेहमीसारखाच रगडा करायचा. सायनचे गुरूकृपा, ठाण्याचे प्रशांत हॉटेल इथे त्या काबूली चण्याचाच रगडा देतात.

कोणी रेडीमेड आटा वापरता का? कुठल्या कंपनीचे चांगलेअसते, म्हणजे खरतर असा वापरना चांगला का?
मला खरच वेळ होत नाहीये गहू आणा, निवडा , दलून आणा. मी आशीर्वाद आटा वापरला आणि सध्या पतंजलिचा आटा वापरतिये. पण दोन्हीच्या पोळ्या घरच्याना आवडल्या नाहीत.
कोणी guide करू शकेल का?

Pages