Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घट्ट म्हणजे किती साधारण ?
घट्ट म्हणजे किती साधारण ? माझं भांड तितकं जाड बुडाचं नाहीये, खाली लागेल की काय असं वाटून मी उतरवलं.
भांड्याच्या कडा सोडून गोळा
भांड्याच्या कडा सोडून गोळा भांड्यात फिरू लागेपर्यंत. भांडे जाड बुडाचे नसेल तर सतत ढवळत राहिले पाहिजे.
माझ्याकडेही लाह्या फुटणारी
माझ्याकडेही लाह्या फुटणारी मोहरी आहे.
पण ही एकाच्या शेतातली आहे व वाणवळा म्हणुन दिली आहे.
त्याचे काय करावे ? उन्हात चांगली वाळवली की नेहमी सारखी होईल का ?
सुनिता, काही मोहोर्यांचे
सुनिता, काही मोहोर्यांचे वरचे आवरण पातळ असते आणि ते कमी तपमानाला फुटते. त्यामूळे जर ती नाचणी नाही, अशी खात्री असेल, तर वाळवायची वगैरे गरज नाही.
अॅपल पिकिंग मुळे खंडीभर
अॅपल पिकिंग मुळे खंडीभर सफरचंदे घरात येऊन पडली आहेत. (लेकीचा आग्रह)
आता ती कशी टिकवायची? नुसत्या फोडी करून फ्रोझन करून ठेवली तर? किंवा दुसरी काही आयडिया सुचते का कोणाला? जॅम वगैरे करायच्या भागनडीत पडायचे नाहीये
सफरचंदाच्या चकत्या करुन
सफरचंदाच्या चकत्या करुन वाळवता येतात. त्याला ऊन नाही लागत, वार्यावर वाळतात. नेटवर सविस्तर माहिती मिळेल !
लालूची अॅपल रेलिश ची रेस्पी
लालूची अॅपल रेलिश ची रेस्पी आहे - तसे करून ठेवता येईल. अॅपल बटर करून ठेवता येईल, ऑफिसात/ शाळेत वाटता येतील , अॅपल पाय करून वाटता येईल
दिनेशदा, मेधा धन्यवाद. हे
दिनेशदा, मेधा धन्यवाद.
हे अॅपल रेलिश म्हणजे अॅपलसॉस का?
वर लिहायचे राहिलेच. या
वर लिहायचे राहिलेच. या सुकवलेल्या चकत्या काळ्या पडत नाहीत. त्या तशाच खाता येतात. योगहर्ट मधे, श्रीखंडात वापरता येतात. तसेच रेलिश वगैरेसाठी पण वापरता येतात.
माझी आई कणकेची बिस्किटे करते.
माझी आई कणकेची बिस्किटे करते. तिच्या पा़कृ प्रमाणे अमोनिया घालायचा आहे. अमेरिकेत अमोनिया मिळतो का? नसल्यास त्यास काही पर्याय आहे का?
बेकर्स अमोनिया का? ग्रॉ.स्टो.
बेकर्स अमोनिया का?
ग्रॉ.स्टो. मध्ये मिळायला हरकत नाही.
http://www.amazon.com/Castella-Ammonia-Powder-28-g/dp/B000NY4SAG/ref=sr_...
ओक्के दिनेशदा.. नुस्त्या
ओक्के दिनेशदा.. नुस्त्या वाळवून ठेवीन मग इतके उपयोग असतील तर
देवाची समई (पितळेची) तेलाने
देवाची समई (पितळेची) तेलाने रापलीय.. (चिकट काळी झाली). बर्याच वेळ घासून सुद्धा चिकट वाटतेय वर काजळी सुद्धा गेली नाहीये.
इकडची(अमेरीकेतील.. ) पितांबरी आणून केली. खरवडून पण चिकटलेली काजळी निघत नाहीये.
कोणाला काही उपाय माहीत आहे का?
तसेच पितळेचे देव घासण्यासाठी उपाय सांगा ज्याने खाचेत सुद्धा झळाळी येइल...
(दोन तास गेले.. पण चकाकी शुन्य...)
काही वेळा मी चिंचेच्या कोळात
काही वेळा मी चिंचेच्या कोळात अक्षरशः बुडवून ठेवते रात्रभर..नॉर्मली तांब्याला ही युक्ती चालते...पितळेला पण चालेल का माहित नाही...ट्राय करून बघ...आणि मग लखाखी आली की डिश व्~ओशरला लावते की मग तो तेलकटपणा जातो.
झंपी, रात्रभर कोळात बुडवून
झंपी, रात्रभर कोळात बुडवून ठेवायचे पण राप तेलकट असेल तर आधी साबणाच्या पाण्यात बुडवून तो ओशटपणा घासून घालवावा लागेल.
धन्यवाद दिनेशदा आनि वेका.
धन्यवाद दिनेशदा आनि वेका. बघते करून्(चिंच आणावी लागतील)
झंपी - एका पातल्यात साबण
झंपी - एका पातल्यात साबण पावडर टाकून त्यात समई, किंवा तेलकट, राप आलेले चांगले उकळवायचे..पाच-दहा
मिनिटे, मग पितांबरीने घासा म्हणजे स्वच्छ होईल. करुन बघ.
मागे इथे कुणीतरी उपम्याचे
मागे इथे कुणीतरी उपम्याचे रेडिमिक्स केले होते ना? त्यांच्याकडे बरेच पाहुणे यायचे होते, मग ऐन वेळी फक्त पाणी टाकून झटपट उपमा तयार करून गरमागरम सर्व्ह केले होते... ती चर्चा सापडत नाहीये. मदत प्लीज.
धारा, नेहमी उपम्याला करतो
धारा, नेहमी उपम्याला करतो तसेच करायचे फक्त पाणी घालायचे नाही.
हिरव्या मिरच्यांच्या जागी लाल मिरच्या वापरल्या तर चांगले. हिरव्या वापरल्या तर कुरकुरीत होईपर्यंत परतायच्या. कांदा देखील, अगदी सोनेरी रंगावर परतायचा. ओले खोबरे / लिंबू मात्र आयत्यावेळीच वापरायचे.
आयत्यावेळी पाणी गरम करताना त्यात थोडे साजूक तूप आणि ताक टाकायचे. मग हे कोरडे मिश्रण टाकून, ढवळून वाफ आणायची. रवा जाडा आहे किंवा बारीक त्यावर पाण्याचे प्रमाण ठरवायचे.
म्हणजे कांदा + मिरच्या +
म्हणजे कांदा + मिरच्या + भाजलेला रवा यांचं मिक्स करायचं... आणि ऐनवेळी फोडणीत भिजवलेली उडीद दाळ + कढीपत्ता + मोहोरी टाकायची मग मूदीवर वरून खोबरं+लिंबू+कोथिंबीर टाकायची. मी बरोबर बोलतेय का?
मला हवी होती ती चर्चा इथे
मला हवी होती ती चर्चा इथे आहे: http://www.maayboli.com/node/26595?page=45
सुमेधाव्हीकडे गेट-टू-गेदर होते.
आयत्या वेळी उडिद डाळ भिजवायची
आयत्या वेळी उडिद डाळ भिजवायची गरज नाही, ती कांदा / मिरचीसोबतच तेलात परतायची. रव्याबरोबर शिजते ती.
ग्रेट... थँक्यु दिनेशदा!
ग्रेट... थँक्यु दिनेशदा!
धारा, मी आदल्या दिवशी फोडणीत
धारा, मी आदल्या दिवशी फोडणीत कांदा, कढिपत्ता, काजू, भिजलेले दाणे, डाळ, मिरचि इ.इ सगळे परतून त्यात भाजलेला रवा घालून अंदाजाने मिठ व साखर घालून मिक्स तयार करुन ठेवले. त्याचे एका कढईत तयार उपमा आरामात मावेल अश्या अंदाजाने भाग केले. आणि मग कार्यक्रमाच्या दिवशी एका पातेल्यात मंद गॅसवर पाणि तापत ठेवले होते. जसे जसे लागेल तसे कढईत मिक्स घेवून थोडे गरम करून मग नंतर गरम पाणि व तूप मिक्स करून एक दणदणीत वाफ आणायची. मग लिंबु, खोबरे कोथिंबीर आयत्या वेळेस वाटीच्या तळाशी घालून त्यावर उपमा घालून मुद... ....वाया न जाता मस्त उपमा रेडी झाला. नंतर उरलेले मिक्स फ्रिजमधे ठेवले. लागेल तसे वापरले.
अरे व्वा.... सुमेधाताई -- हे
अरे व्वा.... सुमेधाताई -- हे असे रेडीमिक्स छान्च.......आयत्यावेळी वेळ वाचतो आपला..नक्की करुन पाहिन,
अजुन काय काय असे करुन ठेवता येईल सांगाल काय????
झंपी : माझ्याकडे इलेक्ट्रिक
झंपी : माझ्याकडे इलेक्ट्रिक कुकर आहे, तो साफ करायचं जे सोल्यशन आहे ( नॉन अॅब्रेझिव्ह ) त्यानं समया वगैरे मस्त निघतात ( अगदी ग्रीस, काजळी असली तरी ). समया, मूर्त्यांना लावून एका ओल्या फडक्यानं किंवा प्लास्टिकच्या घासणीनं घासायचं १०-१५ मि. लखलखीत होतात.
मसाल्यान्ना आणि मसाल्याच्या
मसाल्यान्ना आणि मसाल्याच्या पदार्थांना डार्क brown रंगाचे किडे लागले आहेत. मसाले तर टाकुन देणारच आहे. परत लागु नये म्हणुन काय करता येईल? एक एक पदार्थ वाया जाताना पाहुन अशक्य चिडचिड होते आहे
गेल्या दोन तीन वेळेपासून आता
गेल्या दोन तीन वेळेपासून आता मी लावलेल्या दह्याला ही तार येऊ लागली आहे.
माझं नक्की काय चुकतंय?
madhuragodbole, मसाले फ्रीज
madhuragodbole, मसाले फ्रीज मध्ये एअर टाइट डब्यांमध्ये ठेवा.
हिंगाचा खडा पण टाकून ठेवतात मसाल्यांमध्ये.
दक्षिणा, विरजण बदल. भांडे गरम
दक्षिणा, विरजण बदल. भांडे गरम पाण्याने धुवून, कोरडे करुन घे. मग त्यात विरजण लाव. शक्य असल्यास त्यात तुरटी फिरव.
Pages