Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनु, राजमा राईस कर. भात मोकळा
अनु, राजमा राईस कर.
भात मोकळा शिजवुन घे. त्यात राजमा मिक्स कर वरतुन पोटॅटो फ्राईज (शु स्ट्रिं किंवा वेजेस) घाल आणि खपव
धन्यवाद लाजो! ही पण चांगली
धन्यवाद लाजो! ही पण चांगली युक्ती आहे. करुन बघते.
वत्सला,राजमा किती उरला
वत्सला,राजमा किती उरला आहेब्त्या अंदाजाने एक/अर्धा उकडलेला बटाटा कुसकरुन त्यात थोडी टोमॅटो प्युरी,मीठ घालुन सारखा कर.वरुन पुन्हा जिरे-हिंगाची फोडणी दे.सौम्य चवीचा राजमा तयार होईल.
दुसरे असे कि, आहे त्या राजम्याला मिक्सरमधे वाटुन त्यात मावेल तितकी कणीक्,प्रमाणात आले,लसुण्,हिरवी मिरची पेस्ट व मीठ घालुन त्याचे पराठे कर्.मी छोले व राजमा थोडासा उरला कि नेहमी पराठे करते.
त्या साबुदाण्याच्या पिझ्झा
त्या साबुदाण्याच्या पिझ्झा वेसवर प्रयोग चालू आहेत. मी तो मालिकावाल्यांना चंद्र म्हणूनही वापरायला देता येईल, असे सूचवले होते ! पण काल त्यावर लाटणे, बत्ता आधी जड वस्तूंनी हमला झाला बहुतेक !
दिनेशदा, हिम्मत नाहि झाली
दिनेशदा,

हिम्मत नाहि झाली लाटण/ बत्ताने हमला करायची. अस जोरात हमला केला तर बिल्डिंगमधील सगळी लोक जमतील ह्या भितीने साबुदाणा पि़झाबेस तसाच ठेवला आहे.
एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये देवू याका त्या चंद्राला.
छापखान्यातला कटर वापरुन साबु
छापखान्यातला कटर वापरुन साबु पिझ्झाचे लहान लहान तुकडे करा.. सांडगे म्हणून तळा.
जा. मो. प्या. छापखान्यातला
जा. मो. प्या. छापखान्यातला कटर त्यासाठी विकत घ्यावा लागेल.
खूप कडक झाला आहे का साबुदाणा
खूप कडक झाला आहे का साबुदाणा पिझ्झा बेस? ताटलीत पाणी घेऊन त्यात भिजत घाल. मौ झाला की मोडून मिक्सरमधून काढ. मग (१) त्याची कांजी कर कपड्यांना किंवा (२) जरासं गरम करुन उन्हात चिकवड्या घाल.
अश्विनी के, पण तो पिझाबेस
अश्विनी के, पण तो पिझाबेस तसाच उन्हात वाळवला बिना मीठाचा.


आता परत भिजत घालू का??
साबुदाणा वडा खायचा होता उपवासाला पण त्या दिवशी खरा उपवास आणि उपद्व्याप झाला.
अजून साबुदाणा वडा बनवायची ईछा नाही राहिली.
असाही तो फुकट गेल्यात जमा आहे
असाही तो फुकट गेल्यात जमा आहे ना? मग करुन पाहा प्रयोग
गरम पाण्यात बुडवून ठेव. अर्ध्या तासातच तो काय उजेड पाडणार आहे त्याची चुणूक दिसेल. हवं तर बत्त्याने फोडून थोडासाच तुकडा वापर.
बिचारी गं तू
आधीच साबुदाण्याने डोकं फिरवलं असेल, त्यात आमचे सल्ले.
हो तुमचे सर्वांचे सल्ले फार
हो तुमचे सर्वांचे सल्ले फार उपयोगी पडतात. म्ह्णून ईथे धाव घेतली.
हा प्रयोग उद्या करुन पहाते.
तरी मागे मला एकदा सा खिचडी
तरी मागे मला एकदा सा खिचडी बद्दल सल्ला देताना दिनेशदांनी सांगितले होते, त्यात शेंगदाणे सोड्ले तर काही पौष्टिक नस्ते..
त्यांचा सल्ला तुम्ही पण वाचून ठेवला असता तर साबुदाणा आणुन विकतचा उपास घडला नसता ...;)
साबुदाण्याचा पिझ्झाबेस
साबुदाण्याचा पिझ्झाबेस फ्रिज्बी म्हणून खेळायला वापरा.
papae shillak asel tar
papae shillak asel tar mitramandalina bolavun sampavita yete
ramdas
साबुदाण्याचा पिझ्झाबेस
साबुदाण्याचा पिझ्झाबेस फ्रिज्बी म्हणून खेळायला वापरा.
>>> चुकून तुपाच्या कढईत पडला तर तळला जाऊन फुलायचा.
हा धागा हळुहळु पाकॄ मधुन
हा धागा हळुहळु पाकॄ मधुन निघुन इनोदी मध्ये जाऊन बसणार असं दिसतंय ..:)
वेका, दिनेशदांनी तुम्हाला
वेका, दिनेशदांनी तुम्हाला सल्ला दिला तेव्हा वाचलेला.
, पण सा.वडा खूप आवडतो म्ह्णून बनवायचा प्रयत्न केलेला. 

धन्स मृण्मयी, ramdas kelkar, अश्विनी के.
३ जूनला हे. मा.बो. च गटग आहे तेव्हा साबुदाण्याचा पिझ्झाबेस फ्रिज्बी म्हणून खेळायला वापरते.
हे गटग हीट जाणार तर....
हे गटग हीट जाणार तर....
फायनली...मी २५ वाट्या रवा
फायनली...मी २५ वाट्या रवा भाजून ठेवला व त्याचा पाणि न घालता उपमा मिक्स करून ठेवले व त्याचे ५ भाग केले. लागेल तसे वापरायचे असे ठरवले. उकळलेले पाणि घातले की २ मि. मधे उपमा तयार होईल असे. उपमा, ब्.व, नारळाची बर्फी चहा/कॉफी असा मेनू होता. ५३-५४ लोक्स आले. टोटल २० वाट्यांचा उपमा पुरला. कोणताही पदार्थ लिमिटेड नव्हता ..ब.व सकट. बव १०० पुरले. ७-८ उरले.
ग्रेट... ही आयडीया
ग्रेट... ही आयडीया पटली!!!
गटग म्हण्जे काय? ३ जून ला ते कुठे आहे?
माझ्याकडे जवळपास ३ किलो
माझ्याकडे जवळपास ३ किलो तांदुळ आहेत. पण त्यात टोके पडलेत. मी तिरफळं घालुन ठेवलीयत पण कमी झाले नाहीयत. मी घरी नसल्याने दिवसभर उन्हात ठेवता येणार नाहीयत. दुसरा काही उपाय आहे का ते टोके निघुन जाण्यासाठी??
योडी, माझी आई तांदूळामध्ये
योडी, माझी आई तांदूळामध्ये कांदे घालून ठेवते, त्याने टोके पडत नाहीत. कांदे घालून पहा.
आर, आधीच टोके पडलेत ते काढुन
आर, आधीच टोके पडलेत ते काढुन टाकायचेत.
तांदूळ कांदे घालून एका ताटात
तांदूळ कांदे घालून एका ताटात ठेवा, टोके कदाचित निघून जातील आणि मग ते कांद्यासकट डब्यात भरुन ठेवा.
मला नक्की माहिती नाही, पण
मला नक्की माहिती नाही, पण बहुतेक तांदूळ उन्हात ठेवू नयेत.
बोरीक पावडर लावल्यास टोके
बोरीक पावडर लावल्यास टोके मरतील, पण तांदूळ वापरताना, ते चांगले धुवून घ्यावे लागतील.
पातळ कापडात (मच्छरदाणी सारख्या) पार्याच्या गोळ्या, किलोला ४/५ अशा घालून ठेवायच्या.
उन्हात ठेवल्यास टोके मरत नाहीत, ते सावलीच्या दिशेने जातात आणि घरभर पसरतात. वरील दोन्ही उपायाने ते मरतील. पण तरीही, फारच टोके झाले असतील, तर तो तांदूळ वापरु नये. त्यांची सूक्ष्म अंडी त्यातच राहतात.
तर तो तांदूळ वापरु नये.
तर तो तांदूळ वापरु नये. त्यांची सूक्ष्म अंडी त्यातच राहतात.
>>
मलाही तसंच वाटतंय पण इतका तांदुळ टाकुन देणंही जिवावर येतंय.
योडी, खाताना मनात शंका येत
योडी, खाताना मनात शंका येत राहणारच ना ! बोरीक पावडरचा उपाय ठिक आहे पण मग नंतर प्रत्येकवेळी शिजवताना चोळून चोळून धुवावे लागतील.
धान्यरक्षकात ३ कापसाचे बोळे
धान्यरक्षकात ३ कापसाचे बोळे बुडवून तांदुळाच्या डब्यात (१ तळाशी, १ मधोमध आणि १ वर) घालून ठेवले तर वर्षभरही तांदूळ व्यवस्थित राहतात.
योडे टोके पाखडून टाक. उन्हात
योडे टोके पाखडून टाक. उन्हात तांदूळ ठेवले की त्याची चव बिघडते असं माझ्या बाईने मला सांगितलं.
Pages