युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चैत्राली चांदीची भांडी रांगोळीने घासून पहा. स्वच्छ होतात बहुतेक, नाहीतर बाजारात सोल्यूशन मिळेलच.

मंजू , रुपेरिने घासल ग, पण तेवढी काही चमक नहीं आली. कालपटपणा कमी झाला एवढच. कोलगेट पावडर सुद्धा try केली.
दक्षिणा, आता रांगोळीने घासून बघते. थैंक्स दोघिन्ना.

चांदीची भांडी रांगोळीने शक्यतोवर घासू नये. भांड्यांना चरे पड्तात. टूथपेस्ट किंवा डेंचर क्लीनींगच्या पावडरने घासून बघा. छान निघतात.

चांदीची भांडी रांगोळीने शक्यतोवर घासू नये. भांड्यांना चरे पड्तात. >> +१ पण पुर्वी लोक्स रांगोळीनेच घासत.
मी मोदीकेअरचं सिल्व्हर पॉलिशचं सोल्युशन वापरते. त्याच्याएवढं उत्तम कुठलंच सोल्युशन नसेल या जगात :-P. खरच नव्यासारखी पांढरी शुभ्र होतात भांडी, देव.

त्या डब्यातल्या गाळणीवर छोटे देव ठेवायचे आणि गाळणी सोल्युशनच्या डब्यात सोडायची. ५ मिनिटांच्या आत बाहेर काढून साध्या पाण्याने धुवायचे आणि कोरड्या फडक्याने चोळून कोरडे करायचे. तांब्या भांडी ताम्हन वगैरे चमकवायचं असेल तर ते सोल्युशन मऊ कोरड्या फडक्यावर घेऊन वस्तूला चोळायचं.

वापरा आणि इथे सांगा किती खुश झालात ते Happy

हे मायबोलीकरांनी आधी करून नक्की बघितलं असणार तरी पण...
खाऊ-की गिळू अशा अवस्थेत भुकेला आलेल्या तिघांना मी गरम गरम थालिपिठं करून वाढू शकले आणि कुणीही हात धरून खोळंबलं नाही का मला खाल्लं नाही Happy
दोन तवे (ते झालच), आणि फ्लॅट प्लेट्स्चा सॅन्डविच प्रेस!
तव्यावर थालिपीठं लावायची अन दोन्ही बाजूना जरा शेकली की प्रेसमधे. पीठ मळताना तेल घालते त्यात त्यामुळे वरून खूप सोडावं लागत नाही. खूप वेळ प्रेसमधे राहून तडतडित होणार नाही हे मात्रं बघायला हवं. अशा एका-दोघांना थालिपीठाचा खाकरा हे नाव मिळालं.
त्यांच्या 'झालं? अजून एक'... च्या आधी माझं 'वाढू?' येत होतं... मजा आया.

हेच सॅन्डविच प्रेस मी डोसे करायला पण वापरते.

एका आजीकडुन तांब्याचं छोटं तपेलं (?) ती याला तपेलं म्हणते) बक्षिस मिळालं आहे. छोटं असुनही सणसणीत जड आहे. पण शेप एकदम गोड आहे याचा. मला लिविंगमधे डेकोरेशन म्हणुन किंवा प्यायचं पाणी ठेवायला ते वापरायचं आहे. ४०-५० वर्षं जुनं असल्यामुळे आतुन मात्र ते अगदी काळं काळं दिसतं आहे. त्यामुळे त्यातुन पाणी पिवु की नको ते कळत नाही. त्याला कल्हई करुन घ्यायचा सल्ला मिळाला, पण मग तांब्याचा औषधी गुणधर्म त्यात कसा उतरणार? कि कल्हई करुन वापरलं तरी चालेल? कल्हईच्या भांड्यातलं पाणी पिणं हार्मफुल असेल का?

कल्हई न करता काळं घालवण्याची काही युक्ती आहे का?

हो गं दाद, पाहिलं चिंचे-मीठाने घासुन. पितांबरीने पण घासलं. बाहेरचा कॉपरचा रंग लखलखीत झाला आहे, पण आतुन काळंच आहे.

मोदीकेअरचे सोल्युशन चांगले आहे. देव स्वच्छ झाले पण पांढुरके रखरखीत झाले ...चांदीची चमचमती झळाळी गेलीच अगदी. (आणि मला उगीचच देवांना दुधाची आंघोळ घालतात तशी आपण अ‍ॅसिडची आंघोळ घातली असे वाटून अपराधी वाटले. हे जरा कायच्या कायच आहे..पण तरी वाटलेच)
म्हणून मग मी अजून वेगळा उपाय शोधला आहे. एका प्लॅस्टीकच्या बाटलीत एरिअल्+पितांबरी +कोमट पाणि एकत्र करून त्यात चांदीची वस्तु भिजवून ठेवायची साधारण एक तास. मग ती बाटली जोरजोरात हलावायची. व मग नंतर आतली वस्तु बाहेर काढून एका मऊ फडक्याच्या चिंधीने कोलगेट पावडर लावून बोटांनीच चोळायची. व नंतर त्याला धुवून परत मऊ फडक्याने पुसून काढायचे. मस्त चमकतात मग्...करून पहा आणि सांगा....

मनि माऊ चिंच त्या भांड्यातच भिजत घालावी. मग चार तासाने चिंचेने भांडे आतून घासायचे, मग हार्ड स्क्रबर ने घासायचे. जुने असल्याने हेच तीन चार दा करावे लागेल. शक्यतो कल्हई करू नका, पाणी प्यायले नाही तरी डेकोरेटिव्ह म्हणून वापरता येइल नक्की. फोटो टाकाल का जमल्यास. जुने भांडे म्हणजे छान वाट्ते बघायला.

चिंचेने घासल्यावर मग व्हिमबार ने हीच प्रोसीजर दोन तीन दा.

सुमेधा, त्यांच्या डब्यावर स्पष्ट लिहिलं आहे की ५ मिनिटांच्यावर सोल्युशनमध्ये ठेवू नये. माझी भांडी, देव कधीच खरखरीत झाले नाहीत. आणि मऊ फडक्याने जरा चोळलं की पॉलिश होऊन चमकतातही. Happy

केश्वी बरोबर आहे. जास्त वेळ भिजवून ठेवले तर चांदी त्या सोल्युशन मधील घटकांबरोबर संयुग फॉर्म करते. मग ते पांढुरके दिसतील. तुमचा एक तास भिजविण्याचा वेळ जास्त आहे. कोरडे झाल्यावर मऊ फडक्याने जसे जुने धोतर किंवा सुती ओढ्णी ने पुसून घेतले म्हणजे चकाकी येइल.

मी मोदी केअरमधे १ मिनिटच देव बुडवला होता....असो.....माझा अनुभव १० वर्षापूर्वीचा आहे. आता कदाचित चांगला बदल केला असेल त्यांनी..

मी तरी चांदीची भांडी , देव स्वच्छ करताना कोलगेट पावडर एखाद्या जुन्या टुथ्ब्रशने घासते, छान चमचम करतात.
करुन पहा....:)

मी दररोज पुजा-बिजा करत नाही. एखाद्या दिवशी अंगात आल्यासारखे मग देव आंघोळीला काढते.
"... आई देव घासतेय" असं माझ्या लेकाने माझ्या आईला सांगून झीट आणली होती.
सॉरी... अवांतर झालं हे.

मोदी केअरचे ते लीक्वीड म्हणजे..एका टेफ्लॉनच्या डुबुक स्टॅन्डवर गणपतीबाप्पा ठेवून तो स्टॅन्ड अ‍ॅसिडमधे बुचकळला होता.. काळा काळा बाप्पा कॅप्सुल लिफ्ट मधे बसून खाली गेला व गोरा गोरा होऊन वर आला.....नवर्‍याने देवाला अ‍ॅसिडची आंघोळ घातलीस असे सांगितल्यावर फारच अपराधी वाटले होते. Happy

मोदी केअरचे ते लीक्वीड म्हणजे..एका टेफ्लॉनच्या डुबुक स्टॅन्डवर गणपतीबाप्पा ठेवून तो स्टॅन्ड अ‍ॅसिडमधे बुचकळला होता.. काळा काळा बाप्पा कॅप्सुल लिफ्ट मधे बसून खाली गेला व गोरा गोरा होऊन वर आला.....नवर्‍याने देवाला अ‍ॅसिडची आंघोळ घातलीस असे सांगितल्यावर फारच अपराधी वाटले होते. Happy

कल्हई न करता काळं घालवण्याची काही युक्ती आहे का?>
काल्हई पितळेच्या भांड्यांना करतात ना?
आणि एकदम जुन तांब्याच भांड असेल तर ते आतमधुन काळच असत वाटत.
आमच्याकडे मालवणला असताना तांब्याच्या जुन्या कळश्या होत्या. त्या तर दिवसातन ३ ते ४ वेळा धुतल्या जायच्यात. दिवसातन एकदा चिंच लाउन आणि मग साध्या साबणाने. पण त्या सुद्धा आतन काळ्या होत्या.

माझ्या नवर्‍या ने बाजारातुन फ्रेश यिस्ट नावाचा प्रकार आणला आहे . हे नक्की कसे वापरतात? म्हणजे ब्रेड बनवताना डायरेक्ट मैद्यात टाकायचे की ड्राय यिस्ट प्रमाणे कोमट पाण्यात भिजवायचे??? लवकर मदत करा, आज मला सुरती बटर आणि बन्स बनवायचा ताप चढला आहे.;)

सशलच्या या http://www.maayboli.com/node/30046 पाकक्रुतीने रवा बेसन लाडु केले पण पाकासाठी १ कप पाणी घेण्याऐवजी चुकुन २ कप Uhoh घेतले. आता लाडु (शिरा?) तर मऊ झाले आहेत , चवीलाही छान लागतायत. पण टीकतील का? काय करावे?

Pihu, पाणी जास्त म्हणजे पाक कच्चा राहिला. एखाद दोन दिवस बाहेर चांगले राहतीलही, पण सेफर साइड म्हणून रेफ्रीजरेट करा. खायच्या वेळेला बाहेर काढून १०-१५ सेकंद मायक्रोवेव्ह करून (मऊ होण्यासाठी) मग खायला द्या.

मी आंबा नारळाच्या वड्या केल्या - आंबा पल्प आणि इंडीयन स्टोरमधे मिळणारा ओला नारळ - वापरून. त्या खूप ओल्या राहील्या, गार झाल्या तरी वडी नाही पडते :(, ओव्हन मधे ठेवावं का परत गॅसवर ठेवू परत ?

Pages