Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्याकडे इंग्रोत मिळणारी
माझ्याकडे इंग्रोत मिळणारी देसी आटा बिस्किटं भरपूर राहिलीयेत ते मोठठंच्या मोठ्ठं आडवं पॅकिंग वाली मिळतात ना तसली... काय करावं त्याचं? दर चहाच्या वेळी मी आणून ठेवते सगळ्यांपुढे कोणी हात लावेल तर शपथ.
चैत्राली तू पुण्यात कुठे
चैत्राली
तू पुण्यात कुठे राहतेस? कर्वेनगर मध्ये विबग्योरच्या डायगोनली अपोझिट आस्वाद नावाचं दुकान आहे तिथे हर प्रकारची पीठं विकत मिळतात. लोकवान, सिहोंर.. दोन्ही मिक्स, सोयाबिन घातलेली, इडली, डोसा, वांग्याच्या भाजीचा मसाला.. एनिथिंग.
शिवाय.. कर्वेनगरातच पल्लवी नावाची गिरणी आहे तिथे ही तयार पीठ मिळते. उत्तर दर्जा असतो. मी वापरते.
पुण्यात सहस्त्रबुद्धे व अग्रज
पुण्यात सहस्त्रबुद्धे व अग्रज ची पिथही छान आहेत.जहागिरदार बेकरी शेजारी आहे अग्रजचे दुकान!टिळक रोडला महाराष्ट्र मन्डाळाजवळ धूतकडेपण ताजी द्ळलेली कणिक मिळते.पोळ्या छान होतात.
़chole ragaDa chaan zala
़chole ragaDa chaan zala hota. ek jaN mhaNale kee asa ragaDa pahilyandach
khatoy, tyana orkiDne sangitalelya hatilanchee naave sangitalee :khokho:
Dhyanyavaad orkiD!
वत्सला, आमच्या गुरुकृपातला
वत्सला, आमच्या गुरुकृपातला रगडा / समोसा एकदा खाऊन बघाच. गेल्या ४० वर्षात आकार जरा लहान झाला, पण चव तशीच आहे !
दिनेशदा.... १०१% अनुमोदन ....
दिनेशदा.... १०१% अनुमोदन .... एवढे जुने आहे का गुरुकृपा?
दक्षिणा आणि सुचरिता , दोघिना
दक्षिणा आणि सुचरिता , दोघिना धन्यवाद.
सहस्त्रबुद्धे आणि अग्रज ची पीठे चांगली असतात का? मी कात्रजला राहते, मिळतात इथे ही पीठ. आता वापरून बघते.
कर्वेनगरात पल्लवी गिरणी नक्की कुठे आहे?
हो सामी, आधी छोटेसे दुकान
हो सामी, आधी छोटेसे दुकान होते आता ३/४ आहेत.
तसेच रुईयाजवळचे मणिस.. माझ्याच नव्हे तर माझ्या वडीलांचे पण उमेदवारीच्या काळातले म्हणजे १९५० पासूनचे, फेव्हरीट.
बर्याचदा आकाराने मोठा कांदा
बर्याचदा आकाराने मोठा कांदा असेल व कमी वापरला गेला तर तो शिल्लक रहातो.असा उरलेला कांदा बारीक चिरुन मायक्रोवेव मधे एका बाऊल मधे ठेवावा.फुल पॉवर वर १-१ मिनिट असा वेळ देवुन कांद्यातील पाणी पूर्णपणे सुकवुन घ्यावे .प्रत्येक १ मिनिटानंतर चमच्याने कांदा ढवळुन घ्यावा.असा सुकवलेला कांदा थंड झाला कि फ्रिज मधे ठेवावा.इतर पदार्थांना काद्याचा वास लागत नाही्आ कांदा भाजीसाठी किंवा मसाला वाटताना वापरावा.
३०-४० लोकांसाठी गुलाबजाम
३०-४० लोकांसाठी गुलाबजाम करून न्यायचे आहेत. बरोबर संपूर्ण जेवण असणार आहे. खवा किती आणावा लागेल ह्याचा अंदाज मला येत नाहीये. कोणी सांगु शकेल का?
दिनेशदा गुरुकृपा सायन शिवाय
दिनेशदा गुरुकृपा सायन शिवाय अजून ही इतर ठिकाणी आहे का?
काल मी घरी पण विचारले...तेव्हा नवरा म्हणाला कि ते स्वात्नत्र पूर्व काळापासून आहे ...
चैत्राली, कर्वेनगर मध्ये
चैत्राली,
कर्वेनगर मध्ये स्पेन्सर्स ओलांडलं की क्षिप्रा सहनिवास कडे जाताना तिथे डाव्या बाजूला वरती प्रियांका ब्यूटी पार्लर आहे, (खूण म्हणून लक्षात ठेवायला) अजून पुढे जात राहिलं की बरिच दुकानं लागतील, एक वॉशिंग सेंटर आहे त्याच्या थोडं पुढे आहे ही गिरणी.. अगदी डाव्या बाजूलाच.
सुमेधाव्ही, एक किलो खव्यात
सुमेधाव्ही,
एक किलो खव्यात दोनशे ग्रॅम मैदा मिसळला असता त्याचे साधारण हल्लीच्या दोन रुपयाच्या नाण्याएवढे १०० गुलाबजाम होतात.
मंजूडी _/\_ अफलातून आहेस तू
मंजूडी _/\_ अफलातून आहेस तू
सामी, त्यांची शाखा नाही कुठे
सामी, त्यांची शाखा नाही कुठे पण त्यांचे सामोसे, त्या ब्रांडखाली अनेक दुकानात मिळतात. रगडा मात्र फक्त त्याच दुकानात मिळतो.
मंजूडी लयभारी आहेस तू!
मंजूडी लयभारी आहेस तू!
मी नाय मी नाय.... माझी
मी नाय मी नाय.... माझी आई-आजी-मावश्या-माम्या
चैत्राली, बिबवेवाडीत
चैत्राली,
बिबवेवाडीत रम्यनगरीच्या दुकानांच्या रांगेत कुळकर्णीच्या गिरणीतही तयार पिठं मिळतात, चांगली असतात
<<<<अग्गोबाई बर झाल तुम्ही
<<<<अग्गोबाई बर झाल तुम्ही सगळ्यानी विचारलत म्हणून नीट बघितल पाकिटावर तर "रागी" अस लिहिल आहे, अगदी छोट्या अक्षरात !
गेले ८-१० दिवस घरातले सगळे फोड्णीत रागीच्या लाह्या न रागावता खाताहेत !
आता या अर्धा किलो रागी च काय करू ??
रागे भरू का तिला ?>>>>>
गेले काही दिवस मी पण हाच प्रॉब्लेम फेस करतेय. फोडणीत मोहरी टाकली की लाह्या फुटतात. ईथे हा प्रश्न टाकायचा विचार चाललाच होता पण वेळेअभावि ते जमले नाही. पण आता माझ्याकडची सो-कॉल्ड मोहरी कमी राहिली आहे.
अग बहुधा हा गोंधळ रागी या
अग बहुधा हा गोंधळ रागी या नावाने होतो...इंग्लिश रागी म्हणजे नाचणी आणि हिंदीत रागी म्हणजे मोहरी..
हिंदीत रागी म्हणजे मोहरी..
हिंदीत रागी म्हणजे मोहरी.. >>>> रागी नाही, राई.
त्यातही बारीक मोहरी म्हणजे सरसों आणि जाड्/मोठी मोहरी म्हणजे राई.
गुरुकृपा ने त्यांच्या दुकानात
गुरुकृपा ने त्यांच्या दुकानात पण पाट्या लावल्यात आमची कुठेही शाखा नहीं म्हणून, त्यांचे समोसे A१ नावाने हिट आहेत ...में पण गुरुकृपा अणि मणि ची पंखा आहे
छे आठवणी च नुसत्या 
त्यांची सिन्धी कर्री आणि राईस पण मस्तच असतो
दक्षिणा आणि स्निग्धा , once
दक्षिणा आणि स्निग्धा , once again थैंक्स.
इंदिरानगर मधे नविन ग्राहक पेठ चालू झाल आहे, महेश society जवळ.
तिथे बघते.
अरे हो की... रागी का वाटले
अरे हो की... रागी का वाटले मला काय माहित!
चैत्राली, ते इंदिरा नगर नाही
चैत्राली,
तिथे सकस, अग्रज दोन्ही मिळतात.
ते इंदिरा नगर नाही गं, भारत ज्योती म्हणतात त्याला, माझ्या घराच्या अगदी जवळ
स्निग्धा, तुम्हाला सम्पर्क
स्निग्धा,
तुम्हाला सम्पर्क मधून mail पाठवलिये.
Manjudi, tula gulabjam chi
Manjudi, tula gulabjam chi tried and na fasanari recipe mahiti ahe ka? asel tar please de na. mala khavayche gulabjam avadatat far pan ithe milat nahit..
..tyamule khane hot nahi.
चांदीची भांडी स्वच्छ
चांदीची भांडी स्वच्छ करण्याबद्दल कुठे विचारू?
अनारसे : तयार पीठ आणलं
अनारसे : तयार पीठ आणलं आहे.

तळण्याऐवजी बेक करता येतील का ? कसे ?
कोणी प्रयोग केला आहे का ?
मला ता सुचलेली हि कल्पना मायबोलीकरांना यापूर्वीच सुचली असेल, खात्री आहे.
मंजुडी धन्यवाद्..पण मग ३०-४०
मंजुडी धन्यवाद्..पण मग ३०-४० लोकांना अमर्यादीत पक्वान्न करण्याकरता दीड कीलो खवा ठिक होईल ना?
Pages