Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुमेधावी, ती अनारश्याची लिंक
सुमेधावी, ती अनारश्याची लिंक देता का?
अरे वा, टोस्टच्या चुर्याचे
अरे वा, टोस्टच्या चुर्याचे चुरमा लाडू अशा नव्या रेसिपीचा जन्म झाला तर !
दिनेशदा, लाडू वाया जाणार नाही
दिनेशदा, लाडू वाया जाणार नाही ह्याची १००% खात्री होती. धन्यावाद
पिठीसा़खर ऊरली आहे .. काय
पिठीसा़खर ऊरली आहे .. काय करता येईल?
दीपाली कोशिंबिरीत, पोळी
दीपाली कोशिंबिरीत, पोळी तुपावर पसरून संपू शकेल.
किती उरलीये. ?
किती उरलीये. ?
कोशिंबीरीत पिठीसाखर...
कोशिंबीरीत पिठीसाखर...
पावकिलो असेल..
चहामधेही वापरु शकता.. जवळपास
चहामधेही वापरु शकता.. जवळपास ज्या ठीकाणी साधी साखर वापराता त्या एवजी पिठीसाखर चालतेच
बघा, अशी लाही होते आहे. कधी
बघा, अशी लाही होते आहे.
कधी नव्हे ती (स्वस्त मिळाली म्हणून) जास्त घेतली आहे मोहरी.
मोहरीच आहे की नाचणी?दोन्ही
मोहरीच आहे की नाचणी?दोन्ही सारखेच दिसतात.फक्त नाचणी लाल असते.
deepa_s, मोहोरीची लाही होऊ
deepa_s, मोहोरीची लाही होऊ शकेल का? ही मोहोरीऐवजी नाचणी तर नाही ना वापरलेली?
पाव किलो - चहा/सरबत + भाजी-
पाव किलो - चहा/सरबत + भाजी- आमटीत गोड घालत असाल तर + शिरा इ. गोड पदार्थात इ.इ. लगेच संपेल
वरची मोहरीच आहे का? की राजगिरा? राजगिरा कोरडा भाजला तर लाही होते. तेलात काय माहित ?
वरचा जो प्रकार आहे तो
वरचा जो प्रकार आहे तो पोलपाटावर ठेवून, चमच्याने दाबून बघायचा. मोहरी असेल तर थोडेसे तेल येईल, आतली
पिवळी डाळ वेगळी होईल.
राजगिरा आणि नाचणी यांच्या बाबतीत ते होणार नाही.
मला ती गावरान मोहरीच वाटतेय.
मोहोरल्यासारखी दिसतेय ती
मोहोरल्यासारखी दिसतेय ती मोहोरी..
वर्षा_म ताई, आपण ते सोया
वर्षा_म ताई, आपण ते सोया क्रिम मँगो कुल्फीसाठी वापरु शकाल
केशर वेलची जरा सढळ हाताने घाला 
दीपा ती नाचणी असेल..परवा मी
दीपा ती नाचणी असेल..परवा मी हे सेम अशीच फसगत झालेली पाहिली.. त्यामुळे एकदम ताजाताजा अनुभव आहे
अग्गोबाई बर झाल तुम्ही
अग्गोबाई बर झाल तुम्ही सगळ्यानी विचारलत म्हणून नीट बघितल पाकिटावर तर "रागी" अस लिहिल आहे, अगदी छोट्या अक्षरात !
गेले ८-१० दिवस घरातले सगळे फोड्णीत रागीच्या लाह्या न रागावता खाताहेत !
आता या अर्धा किलो रागी च काय करू ??
रागे भरू का तिला ?
deepa_s > तूरीची आणी
deepa_s >
तूरीची आणी चण्याची डाळ मला लग्नानन्तर ओळखता येत नसे त्याची आठवण झाली.
सामी खूप लोकांचा प्रॉब्लेम
सामी
खूप लोकांचा प्रॉब्लेम असतो हा, डोन्ट वरी यू आर नॉट डिफरन्ट 
(No subject)
दिपा तुझ्याकडे भिड असेल तर
दिपा तुझ्याकडे भिड असेल तर दोन तीन तास भिजत घालुन मिक्सरमध्ये जाड्सर वाटुन घे आणि घावणे काढ.
फ्लेवर्ड मिल्क करायला वापरतो
फ्लेवर्ड मिल्क करायला वापरतो त्या २ पावडरी उरल्या आहेत. एक मँगो नी दुसरी चोकोलेट फ्लेवर.
)
काय करता येइल? प्लिझ दुधाचे पदार्थ नको.. गोड पुर्या करायला वापरु का?
(काही तिखट करता येइल का ह्याचं...
त्यात जे प्रिझरवेटीव्ह
त्यात जे प्रिझरवेटीव्ह वापरलेले असतात ते त्या तपमानालाच योग्य ठरतात. तळलेल्या पदार्थात ते कदाचित कडवट लागतील.
बिनदुधाचे आईसक्रीम, (शोर्बे) किंवा रवा / अंडे / ब्रेड पुडींग यामधे वापरता येतील.
तिखट पदार्थ, नाही सूचत.
फ्लेवर्डमिल्क करायला आणलेल्या
फ्लेवर्डमिल्क करायला आणलेल्या पावडरी वापरून मलईबर्फी करता येईल. जितकी ही पावडर घ्याल तितकी मिल्क पावडर प्रमाणातून कमी करायची. (दूध नाही, पण दूध भुकटी वापरावी लागेल.)
झंपी, अनारश्यांची लिन्क
झंपी, अनारश्यांची लिन्क जुन्या मायबोलीवर गोडवा..फराळ मधे आहे. अनारसा असा कीवर्ड दिला की सापडेल.
आलं लसुण किंवा फक्त लसणाची
आलं लसुण किंवा फक्त लसणाची पेस्ट करुन फ्रिज मधे ठेवलि तर हिरवी पडतेय. हिरवि पडलेलि वापरावि कि फेकुन देवु? काहि करता येईल का हिरवी न पडण्यासाठि?
पाणी वापरून पेस्ट केली असेल
पाणी वापरून पेस्ट केली असेल तर ती जास्त दिवस टिकत नाही. पाण्याऐवजी तेल वापरले तर टिकते.
अंड्याचा पिवळा बलक
अंड्याचा पिवळा बलक पांढर्यातून बाजूला करायचाय? घ्या अंडी, दोन पसरट भांडी आणि पाण्याची एक रिकामी बाटली (प्लस्टिक).......
http://www.youtube.com/watch?v=_AirVOuTN_M >>>> त्यापेक्षा हि पद्धत सोपी आहे.....
http://www.youtube.com/watch?v=yAGX-54iR30&feature=fvwrel
माझ्याकडे रोटिसरी चिकन आणलंय
माझ्याकडे रोटिसरी चिकन आणलंय पण ते फारच जास्त आहे त्याचं भारतीय पध्दतीचं काही बनू शकेल कां?
त्यात स्पायसेस काहीच नाहीयेत, नुसतं मीठ आहे आणि रोस्टेड आहे.
रोटेसरी चिकनाचं चिकन मखनी,
रोटेसरी चिकनाचं चिकन मखनी, चिकन + कुठलाही देशी पध्दतीचा रस्सा चांगलं होतं. पालक पनीरमधे करतो तशी पालकाची ग्रेव्ही करून त्यात चिकनतुकडे घालायचे.
Pages