बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४ मराठी ,१ पंजाबी, १ गुज्जु, २ साउथ चे, १ बंगाली आणि एक बिहारी फॅमिलिज येत आहेत जेवायला ( सर्वांना मुले आहेत (२ ते ७ वय)
मेन्यु सुचवा. ( एक महिना आहे अजुन आत्ताच विचारुन ठेवते Happy )

ढोकळा अथवा सुरळीच्या वड्या
तळलेले पापड
रायता
भरली वांगी (आयत्या वेळी नाही मिळाली वांगी तर एखादी चमचमीत भाजी सुचवा)
बटाटा फ्लॉवर रस्सा / मटकीची उसळ / पनीर ची एखादी भाजी....यापैकी १
नान ( हे विकतचे) अथवा पोळ्या
मिक्स व्हेज पुलाव
काला जामुन

असा बेत मी विचार करते आहे.
लहान मुलांसाठी पास्ता अथवा अजुन एखादी भाजी ठेवावी कि त्यांचा मेन्यु वेगळाच करावा?

रिमा आणि आशु आभार्स Happy

अगं ते मांदेली इ. मिळायच्या जागी नाहीञॅ मी सो Sad
इथे मी बरेचदा स्टार्‍टरला कोंबडी अन मेन कोर्स मासे असं पाहते पण तुझे नुस्ते चिकन आणि मासे काँबो छान आहेत फक्त त्यांच्या मुलाला प्रॉन्सची अलर्जी आहे सो मी दोन्ही पर्याय पाहात होते म्हण्जे तो बिर्यानी खाऊ शकेल. आलु टिक्की ऐवजी काय करता येईल? मागच्या वेळेसचं हे झालंय ..तलापिया फिलेची एखादी ट्र्स्टेड तंदुर रेसिपी आहे का? डेझर्‍ट उशीराने दिलं तर दुधाचं चालेल असा एक विचार होता....

वेका, तुला पोळ्या नकोत तर भाजी कशाबरोबर खाणार? पोळी नाही तर भाताच्या प्रकाराबरोबर काहीतरी solid डिश हवी. चिकन बिर्याणी ऐवजी कोलंबी भात/बिर्याणी, खिमा पॅटीस, मटार उसळ, सॅलेड मँगो /पायनापल शिरा..... मुले अगदी लहान असतील तर त्याच्या साठी खिमा न घालता नुसते पॅटीसही देता येतील.
मी कधी कधी तिलापीयाला शान चा फिश मसाला लावुन तळते. थोडा स्पायसी असतो मसाला.

पायनापल शिरा मी कधीपासून रेस्पि मागून झालेय Uhoh

मटार उसळ आणि खिमा पाटिस मी केलं नाहीये.:)ट्राइड ट्र्स्टेड रेस्पि आहे का?

मग पोळी को पर्याय नैच का Wink आता फ्रीजरमध्ये भर्ती करते. ़।खरं म्हणजे कुणाच्या पालकांना हे असं फ्रोजन द्यायचं टाळत होते म्या...पण Uhoh

आभार विद्याक Happy

वेका रिमझीम इथे खाली पण बघा गोडामध्ये काही वेगळे हवे आहे का जे आधी करुन पण ठेवता येईल.

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/230.html?1224912451

रिमझीम फ्लॉवर ऐवजी मटारपनीर रस्सा किंवा व्हेज कुर्मा कर. पनीर जालफ्रेझी पण करता येईल.

रस्सा भाजी असेल तर जीरा राईस आणी टॉमेटो सार कर.

हाबार्स टुनटुन ...

रिमझिम अगं तशा पोळ्या नसतात इथं सो एकदा खिमा पाटिस ट्राय करावे लागतील आणि ठरवावं लागेल पोटभरीचं ...शिवाय या प्लानमध्ये जेव्हा "बेटर"चे सजेश्न्स येतील तेव्हा काय प्रचंड बदल होतील ते एक वेगळंच .....;)

अगं तुझा प्रश्न आहेच की वर...सगळीजण विचार करताहेत (असं समज Wink )
नाहीच आलं उत्तर तर एकदा रिमांईडर दे हाकानाका Happy

अगं, वेका पायनापल शिरा काही कठिण नाही. तु केळे घालुन शिरा करतेस तसाच हा पण केळ्याऐवजी अननसाचे काप घालायचे. यात दुधाच्याऐवजी पाणी वापर . पण नेहमीच्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा पाणी जरा कमी वापर. कारण अननसाला मुळात पाणी जास्त सुटते. त्यात थोडा केशरी रंग टाकला तर मस्त रंग येतो.
खिमा पॅटीस , मटार पॅटीस खरंच पोट्भरीचा प्रकार होतो. त्याबरोबर भाताचा एक प्रकार केला की झाले.
फक्त खिमा पॅटीस म्हणजे २ आलु टिक्की मधे खिमा भरायचा आणि फेटलेल्या अंड्यामधे बुडवुन मग ब्रेडच्या चुर्‍यात/रव्यात घोळवुन शॅलो फ्राय करावेत.
मटार पॅटीस मधे २ आलु टिक्कीत मटार उसळ भरुन ते रव्यात घोळवुन शॅलो फ्राय करावेत.

आमची काल झाली पार्टी. इतके इंटरनॅशनल पदार्थ मला करणे शक्यच नसल्याने केटरर बूक केला होता. सुरूवातीला फक्त कलीग्जनाच बोलवायचे असे ठरले होते. पण ६०+ लोक झाले.

मेनू:

मेक्सिकन सॅलड्/फ्रूट चाट्/ग्रीन सॅलड/पापड इत्यादि. .
स्टार्टर: व्हेज डिमसम्/चिली पनीर्/हराभरा कबाब
मेन कोर्स: राईस-सांभार्-तवा व्हेज.
स्टर फ्राईड व्हेज्-थाई रेड करी-थाई फ्राईड राईस.
पास्ता इन मरिनारा /अल्फ्रेडो सॉस.
स्वीट डिश म्हणून गरम गरम जिलेबी आणि थंडगार फालुदा.

रिमझीम सुरळी वड्यांच्या ऐवजी खमण ढोकळा बरा पडेल. सुरळी वड्यांचा सराव असेल तर चांगलेच.
पापड तळण्या ऐवजी त्याला दोन्ही बाजूने हलकेसे तेलाचा हात लावुन मावे मध्ये भाजुन घे, म्हणजे तेलकट होणार नाही.

मटार पनीर मध्ये पनीर तळु नकोस, तसेच छान लागते.
सफरचंदाचा रायता करुन त्यात डाळिंब दाणे टाकुन बघ, मुले पण खातील.

वेका अननसाचा शिरा गुगलवर बघ. संजीव कपूरचा.

http://www.sanjeevkapoor.com/pineapple-sheera.aspx

नंदिनी, मेन्यु एकदमच विंटरन्याशनल आणि तोंपासु दिसतोय Happy पब्लिक खुष झाले असणार आणि जेवण एंजॉय केले असणार नक्कीच Happy

मला ऑफिसच्या इंटरनॅशनल लंच साठी एक डिश करुन न्यायची आहे. २-३ सेक्शन्स मिळुन लंच आहे. त्यात ४ भारतिय, ६ बांगलादेशी आणि २ श्रीलंकन्स आहेत... बाकी २५-३० गोरे, टोरे ...

बांगलादेशी मुली जनरली नॉनव्हेज आणतात आणि मग रसगुल्ला, खीर असे काहितरी, श्रीलंकन असेच काहितरी करी टरी आणतात ... एक देशी महिला छोले आणणार आहे दुसरी चिकन करी, तिसरिशी बोलणे झालेले नाही आणि चौथी मी....

मागच्या वर्षी मी व्हेज बिर्याणी आणि बुंदी रायता केले होते आणि त्याच्या आधीच्या वर्षी मटर पनीर. पहिल्या वर्षी आलु पापडी चाट केले होते ते पब्लिक ला इतके आवडले की परत मागच्या वर्षी पण करायला लावले.

आता या वर्षी काय करु???? ७ सप्टेंबर ला आहे लंच... काहितरी तिखट पदार्थ सुचवा कारण केक करणारच आहे Happy

मला कच्छि दाबेली सुचलिये.. छोट्या ब्रेड रोल्स मधे भरुन आयत्यावेळेस त्यावर शेव चटणी घालता येइल किंवा ज्याला हवी तशी घालुन घेतिल... अजुन काहि सुचतय का कुणाला? प्लिज सज्जेस्ट Happy

लेकीचा वाढदिवस या वर्षी नेमका हरितालिके दिवशी येतोय...साधारण ४०-४५ लोकं येतील...त्यापैकी १५ उपास वाल्या बायका असतील...तर मला प्लीज असा मेनु सुचवा की तो लहान मोठे सगळ्याना खाता
येइल आणि पोटभर होइल...
उपास आणि बिनउपास वाल्याना काही कॉमन पदार्थ करता आले तर उत्तम....
जस्तीत जास्त कॉमन पदार्थ सुचवा....बिना उपास वाल्याना (सगळ्या नवरे लोकाना) भाताचा एखादा अ‍ॅडीशनल प्रकार करेन...म्हणजे माझं काम जरा सोपं होइल...:-)

स्मिता, फराळी मिसळ.... हा पोटभरीचा पदार्थ नक्कीच आहे. पण पाहुणे फक्त मराठीच असतील तरच. कारण सगळ्यांनाच हा प्रकार आवडेल असे नाही. त्यामुळे जसे पाहुणे असतील तसे ठरव.
दुसरा पोटभरीचा प्रकार म्हणजे उपवासाचे बटाट्याचे पॅटीस... आलु टिक्की मधे शेंगदाण्याची चटणी घालुन. असे पॅटीस गिरगावात पणशीकरांकडे मिळायचे. हा प्रकार सगळ्यांनाच आवडणारा आहे. आणि पोटभरु पण.
पोटॅटो चिप्स, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, फराळी मिसळ, बटाट्याचे पॅटीस, काकडीची कोशिंबीर्, मठ्ठा, नारळाचे सारण घालुन पॅटीस, रताळ्याची उपवासाची भाजी, बटाट्याची भाजी.......यातले जे आवडतील ते.

साबुदाण्याची खिचडी,वेफर्स,आईस्क्रिम सगळ्यांना आवडेल.बिन उपासाच्या लोकांना वडापाव किंवा दाबेली बाहेरुन मागवता येईल.

झंपी >>> you got it wrong! Lol
खाऊन पीयून उपास केला तर खाते-पिते घर का नवरा मिळतो. कडक उपास केला तर कडक नवरा मिळतो आणि गोड (दुध्-फळ) खाऊन उपास केला तर गोड. Proud
jokes apart, रताळ्याचा कीस, रताळ्याचे oven-baked fries, गाजर हलवा, शिन्गाड्याची खान्डवी, वरिच्या तान्ड्ळाची खान्डवी, खरवस हे अजुन काही पर्य्याय आहेत.

लाजो, तुझ्याकडे किती कल्पना असतात पदार्थांच्या .... तुला काही सुचवायचं म्हणजे कसचं कसचं...

पण मिक्स व्हेज कटलेट / पॅटीस / कबाब - सोबत आंबटगोड - तिखट चटण्या, किंवा ड्राय व्हेज मांचुरियन असेही नेता येईल. शेवदहीबटाटापुरी / रगडा पॅटीस / पाणीपुरी इ. चाट आयटेम्स तर आहेतच!

लाजो लेमन राइस, टॅमरिंड राइस, वांगी भात असले काही नेता येईल का ?
दही भात, किंवा दही बुत्ती शक्यतो नको नेऊस पण - इथल्या तरी बर्‍याच नॉन देशी लोकांना दही/ ताक भाताबरोबर खाण्याची कल्पनाच करवत नाही

BS | 28 August, 2012 - 19:04 नवीन

झंपी >>> you got it wrong! Lol
खाऊन पीयून उपास केला तर खाते-पिते घर का नवरा मिळतो. कडक उपास केला तर कडक नवरा मिळतो आणि गोड (दुध्-फळ) खाऊन उपास केला तर गोड. :फिदीफिदी:
<<<

आमच्या 'हि'ने कारल्याचा रस पिऊन उपास केला होता बहुतेक :खडूस बाहुला:

स्मिता उपवासवाल्यांसाठी सरळ साबुदाणा खिचडी कर आणि फळं कट करुन ठेव, बरोबर ताक आणि बटाटा - केळा वेफर्स ठेउ शकता.
मुलांना वेफर्स आवडतातच.
बाकी मोठ्यांच्या साठी पावभाजी, ईडली सांबार चटणी (ईडली करणार तर चटणी लसणी शिवाय करुन साबुदाणा वडे करु शकतेस)
गोडा मध्ये केक असेलच शिवाय गोड शिरा, उपवासवाल्यांसाठी साबुदाणाखीर बनवु शकतेस.

गणपतीला दर्शनाला येणार्‍यांना काय खायला देता येइल
गणपती ५ दिवसांचा आहे.. पोह्यांचा चिवडा दरवर्षी देतो...तो शेवटचा पर्याय..

सासूबाईंचा वाढदिवस २० तारखेला आहे त्यांच्यासाठी सरप्राइज बर्थडे पार्टी द्यायचा प्लान करते आहे. नेमकी त्यादिवशी ॠषीपंचमी आहे त्यामुळे काय मेन्यु ठरवावा हे समजतच नाही आहे. नॉरमली ६०-७० वर्षांच्या बायकांचा यादिवशी उपवास असतो ना? त्यांच्या ७-८ मैत्रिणी आणि घरचे ७-८ लोक इतकी माणसे असतील. रात्री जेवणाचा मेन्यु सजेस्ट करा आणि मला एकटीलाच सगळ करायचं आहे त्यामुळे आधी पुर्वतयारी करुन ठेवता येतील असे थोडे पदार्थ सजेस्ट करा.

धन्स अरुंधती आणि मेधा Happy

आता लंच तेरवावर येऊन ठेपलय आणि माझा पदार्थ अजुन फायनल नाही Sad त्यातुन गुरुवारी घरी पोचायला ५.३० - ६.०० होतिल त्यामुळे जे काहि करायच त्याची तयारी आधीच करुन ठेवायला हविये..... आज फायनल केलच पाहिजे काहितरी.....

Pages