बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनार्च, पार्टीचा मेनू किंवा जेवण यांपैकी कोणती तरी किंवा दोन्ही ऑर्डरी सोयीनुसार बाहेर देता आल्या तर बघ ना!

जेवणासाठी पण उपासाचाच मेनू हवाय का?

पार्टीसाठी साबुदाणा खिचडी / वडे, फराळी मिसळ, काकडी कोशिंबीर/ दही, तळलेले बटाटा पापड, फ्रूट चाट / फ्रूट सॅलड आणि स्वीट, जसे खोबरा बर्फी / आंबा बर्फी असे काही ठेवू शकशील.

जो मस्त मिसळ पाव कर.. मिसळ केली की अजुन एका कढइत फोडणी द्ययची आणि खुप सारे तिखट, थोडा मसाला टाकुन एक कप सँपल टाकायचे. वाढताना ज्याला हवे त्याने एखादा चमचा हे तिखट सँपल घ्यायचे. मी चिकन , मटकी , पाभा सगळ्याला असेच करते. घरात कमी तिखट आणि खुप तिखट खाणारे असे दोन ग्रूप आहेत.

शेजारच्या बंगाली मैत्रीणीला चकोल्या (वरण फळं) खायला बोलावलं आहे.. सोबत काय करु?
जर तो प्रकार अवडला नाही तर.. असं ही आणि त्या सोबत खायला चांगलं वाटेल असं काही सुचवा प्लीज!

इन्द्रधनु, नॉर्मली चकोल्या म्हणजे वनडिश मील होतं त्यामुळे त्याबरोबर काय असा विचारच कधी केला नव्हता! पण भाताचा एखादा प्रकार जसे दहीभुत्ती करता येईल. सॅलड ठेवता येईल.

माझ्या कडे रविवारी संध्याकाळी गणपतीच्या आरती साठी ६ लोक येणार आहे ४ उ.प्र १ तेलगू १ मल्लू आहे. काय बेत कराबा?

पावभाजी, पुलाव, मसाले भात, मिसळ करुन झाल आहे? जरा हटके काय करता येइल?
उकडीचे मोदक करयाचा विचार आहे त्यासोबत काय करु?

पुरी , बटाट्याची भाजी, फ्लावरचा रस्सा, काकडीची को , साधं वरण, कोथिंबिरीची चटणी, दही भात असा मेनू ठेवता येईल

ज्वारी/ बाजरी/ नाचणी / तांदूळ यापैकी भाकरी किंवा थालिपीठ असे करता येईल. वांग्याचे भरीत, सीमाने लिहिलेले वांग्याची भाजी, मिनोतीच्या पद्धतीने खानदेशी भरीत/ खानदेशी मेथीचे वरण , फुग्या मिरच्यांची पीठ पेरुन भाजी हे सुद्धा विचार करा

थालीपीठ मस्त वाटतय... करुन ठेवता येतील का? त्याच्या जोडीला काय करु? भाकरी बद्दल जरा आनंद आहे Happy नीट करता येत नाही

३८ लोकांसाठी फदफदं (आळू+पालक, आळू नाही मिळालं तर फक्त पालक वापरून) करायला कॉस्टकोतली १ पालकाची बॅग + ३ आळूच्या इंग्रोतल्या पिशव्या पुरतील का? अजून २ भाज्या आणि १ कोशिंबीर पण असणार आहेत.

अजून दोन भाज्या असतील तर पुरायला हरकत नाही. कारण लोकं हा प्रकार ओरपून खातातच असं नाही.दुसर्^या दोन भाज्या सुक्या असतील नं कदाचीत त्याच जास्त संपतील...माझी एक मैत्रीण यात खूप शेंगदाणे घालायची तिच्याकडची ही अळू/पालकची पातळ भाजी पण संपायची .....हाय यादें...;)

३८ लोकांना बोलावतेस... __________/\______ आणि शुभेच्छा

30 lahan mothyaa lokaa.nsaathI ganapaticha prasad suchva..shanivaarI visarjanasaaathI karaayacha aahe.
shakyato aadhi karun thevata yeil asa ...
rava-khobar ladu aani vaatali daal he kas vaatatay?
kiti vatyaa dal/rava lagel?

(marathi type karatanaa kahitari gondahal hovun sagal agadi vichitra disatay..kay ghol te kalat nahiye..pls english typing samajun ghya...)

मला दोन दिवस टूर ला जायाचे आहे. पहिल्या दिवसासाठी मी टिफिन, ब्रेफा आणि लंच बनवून जावू शकेन डिनर आणि दुसर्‍या दिवसासाठी सोपा ब्रेफा जे मुलगी बनवून घेऊ शकेल व लंच/ डिनर जे आई बनवू शकेल असे. काय बरे करता येइल.
डे वन ब्रेफा सँडवीच, टिफिन मध्ये पास्ता आणि लंच चिकन ६५ बनवणार आहे. रात्री आई बटाटा काचर्‍या भाजी बनवू शकेल. रेडीमेड दोसा पीठ व चटणी आणून ठेवते म्हणजे डोसा ब्रेफा ला देता येइल. शाळेत ती टिफीन खाऊ शकेल. लंच? डिनर? वरण भाताचा कुकर आई लावू शकेल.
उसळ बनवून ठेवेन रविवारी फ्रिज मध्ये अजून काही सूचना?

सरते शेवटी फोन करून होम डिलिवरी मागवणे आहेच. Happy

अमा, पोळ्या लाटून पोळीच्या डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेव. आई आयत्यावेळेस भाजून घेऊ शकेल का? १ दिवसाचाच प्रश्न आहे तर पोळ्यांचा प्रश्न सुटावा. काकडीची दह्यातली कोशिंबीर बनवून फ्रिजमध्ये टाकून ठेव. दालफ्राय पण बनवून ठेवू शकतेस. भेंडीची परतलेली भाजी करुन ठेवलीस तर आयत्यावेळेस कढईत थोडी परतून गरम करुन घेता येईल. बाकी जोडीला डावीकडे लोणचं वगैरे असेल तर एवढं अडणार नाही.

पावभाजीची भाजी बनवून ठेवता येते. छोलेही बनवून ठेवता येतात. दोन्ही पदार्थ फ्रीजमध्ये २-३ दिवस आरामात व्यवस्थित राहू शकतात, मुलांना आवडतात, त्यांचा मसाला जसा मुरतो तसे अधिक छान लागतात व गरम करून ब्रेड/पाव इ. बरोबर गट्टम् करता येतात. तसेच सांबार व चटणी करून फ्रीजमध्ये ठेवता येते. आयत्या वेळी इडल्या लावून गरमागरम इडली सांबार खाता येईल.
सोप्या भाज्यांमध्ये स्वीट कॉर्न भुर्जी, पनीर भुर्जी, ढोबळी मिरची-कांदा-टोमॅटो परतून भाजी (गरम मसाला/मॅगी मसाला घालून) या भाज्या आहेतच. मुरांबे, साखरांबे, गूळ-तूप, कोरड्या चटण्या, लोणची ही देखील सोबतीला बरी पडतात. सॅलड आयत्या वेळी किंवा चिरून फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवले तर तेही चालू शकेल.

आपण स्वयंपाक "बनवत" नाही तर "करतो: ...बनवते, बनवेन हि कोणती भाषा आहे ? (हिंग्लिश)
हि भाजी करेन, स्वयंपाक करेन..असा म्हणा नं

चमचे,
जेवण करणे याचे २ अर्थ आहेत. मी पाटावर बसून जेवतो, या ऐवजी, किमान ६)-७०% महाराष्ट्र मी जेवण 'करतो', असे म्हणतो. तसेच, स्वयंपाक करणे, किंवा जेवण करणे, म्हणजे, टु कुक, असा अर्थ कित्येक ठिकाणी होतो.
मुगाला मोड काढणे म्हणजे मोड आणणे. मुगाचे मोड काढून घ्या, असे दिनेशदांनी म्हटल्यावर इथेच कुणाला तरी एकेक दाणा हातात घेऊन तो कोंब उपटून कसा काढायचा हा प्रश्न पडलेला मला ठाऊक आहे.

तेव्हा, बेत काय 'करावा' या धाग्यावर, व्याकरणाच्या शिक्रणा किंवा नुसत्या रणापेक्षा, बेत कसा 'बसवावा' याचा विचार करणे अधिक प्रशस्त Wink आलू पराठे घ्या पाहू बनवायला. जाम भूक लागलिये. Lol

(आपल्याच पोरांना इंग्रजीतून मराठी शब्दांचे अर्थ सांगून फ्रस्ट्रेटेड) इब्लिस.

अमा, उपमा/ पुलाव/ जीरा राईस/ मसालेभात इत्यादी अर्धेकच्चे बनवून ठेवता येईल. फोडणीला घालून व्यवस्थित भाजून ठेवायचे. थंड करून डब्यात घालून फ्रिजमधे ठेवायचे. खायला घेतेवेळी पाणी उकळेपर्यंत परतून घ्यायचं आणि मग त्यात उकळतं पाणी घालून शिजवून खायला घ्यायचं. ब्रेफा/ डिनरसाठी उत्तम होईल.

चमची, मला दोन्ही क्रियापदांची सवय करुन घ्यावी लागली, प्रांतोप्रांतीच्या मायबोलीकरांमूळेच..
त्यांच्या त्यांच्या प्रांतानूसार, ते बरोबरच बोलत असतात. आपण समजून घ्यायचे.

माझ्याकडे चार जण जेवायला येणार आहेत. मला वाटते टिपीकल महाराष्ट्रीयन जेवण करावे पनीर, दाल फ्राय इत्यादि नको.
तांदळाची भाकरी, भरली वांगी, थेचा, लसणीची चटणी,भजी,
अजून भाताचा काय प्रकार करावा आणि गोड काय करावे. अजून काही अ‍ॅड करावे का?मुख्य म्हणजे तांदळाची भाकरी प्रथमच करणार आहे.कोणि त्याची रेसीपी सांगेल का? म्हणजे मी आधी एकदा करुन बघेन.

मराठमोळ्या भातासाठी मसालेभात करता येईल सायोच्या कृतीने. मराठमोळ्या गोडासाठी डीजेने दिलेला 'आंब्याचा शिरा.' किंवा गोडात अजून सोपे हवे असल्यास भरली केळी करु शकता. नारळाचे सारण सारण आधी करुन ठेवता येते. किंवा मराठी नारळीभात / साखरभात केल्यास गोड आणि भात एकातच होईल.
तांदळाच्या भाकरीची सोपी कृती. दिनेशदांनी भाकरीचे प्रकार लिहिले आहेत.

अमा, अंड्याचं कालवण करून ठेव. अंडी उकडून ठेव. आयत्यावेळी कालवण गरम करून त्यात अंडी घातली की ब्रेड बरोबर खाता येईल. चपात्यांचा प्रश्न सुटेल.

Pages