बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे रविवारी चार मोठे जेवायला यायचे आहेत. सुरळी वडी, डीजेचा आम्ब्याचा शिरा, सायोच्या कृतीने मसालेभात, टोमॅटोचे नारळाचे दूध घालून सार हे पदार्थ ठरवलेत. पोळ्या आहेत. याला साजेशी भाजी सुचवाल का? सगळे त्या दिवशीच करणार आहे, आधी करून ठेवायचे नाहीये. त्यामुळे भाजी लवकर होईल अशी हवीये. धन्यवाद!
जोडीला अजूनही काही पदार्थ सुचले तर सांगा.

ज्ञाती, सगळा मेनू पारंपारिक दिसतो आहे, तेव्हा बटाट्याची भाजी आणि/किंवा मटकीची उसळ चांगली वाटेल.

फ्लॉअर, थोडा बटाटा, मटार, गाजर असं सगळं घातलेली परतलेली भाजी पण चालेल... सध्या सगळ्याच भाज्या मस्त मिळतायत...

व्हेज बिर्याणी, पुदीना रायता, बासुंदी या मेनूच्या जोडीला पोळीबरोबर खायला चांगली भाजी सुचवा. बाकी टाईमपास पदार्थ चीज चेरी पायनापल आणि व्हेज शेजवान असणार आहेत. मुख्य पदार्थ बिर्याणी आहे, पण पोळी हवीच्च आहे. पोळीशी खायचं काय ह्या प्रश्नाला पर्याय सुचवा. योग्य पर्यायाला १०० गुण देण्यात येतील. Wink

मंजुडे Happy माझा पहिला नंबर, मला दे शंभर Wink
भरलेल्या वांग्याची भाजी,
काजु बटाता करी/ ओलसर असते.
अगदीच झणझणीत खाणारे असतील तर छोले मसाला

प्रिन्सेस, किती दिवसांनी दर्शन देते आहेस???? Happy

भरली वांगी, छोले नकोत कारण, बिर्याणी मसालेदार आहे. शिवाय व्हेज शेजवानही बर्‍यापैकी तिखट असेल.
काजू बटाटा करीची रेसिपी माझ्या विपूत दे बरं.

ओके, मेथी मलई मटर, सायोची पनीर माखनी, डाळिंब्यांची उसळ, बटाट्याची सुकी भाजी हे प्रस्ताव पुढे पाठवते.
बहुतेक ब.ची भाजी अप्रूव्ह होईल असे वाटते, झटपट आणि फारसे कष्ट नसलेली Wink

तमिळ स्टाईलने कुर्मा. अजिबात मसालेदार होत नाही. नारळाचे दूध घालून केलेला असल्याने गोडसरच असतो चवीला. बिर्याणीसोबतपण खाऊ शकता येइल. पण व्हेज बिर्याणी आनी कुर्मामधे भाज्या सेम सेम होतील.

पालक मनीर, मटर पनीर वगैरे पण करता येऊ शकेल.

गंगाकिनारेवाले डुबकीवाले आलू, पहाडी आलू, बनारसी आलू किंवा मागे बहुतेक मृण्मयीने दिलेली बासुंदीसोबतची बटाट्याची रसभाजी.

पनीर भुर्जी / स्वीट कॉर्न भुर्जी. किंवा ढोबळीमिरची-कांदा-टोमॅटो परतून भाजी (पावभाजीच्या भाजीची आद्य आवृत्ती).

.

आलू प्रकार छान आहेत. पनीरची भाजीही आवडीची म्हणून चालू शकेल. बाकी, कांदा, सिमला इरची इत्यादी सर्व भाज्या बिर्याणीमध्येही असणार त्यामुळे त्या नकोच.

सगळ्यांना धन्यवाद तत्परतेने सुचवल्याबद्दल. मातोश्रींपुढे पर्याय मांडलेले आहेत, काय मान्य होते ते कळवेनच.

सायो, स्वाती धन्यवाद !

पोळया, मटकीची भाजी,टोमॅटोचे सार, मसालेभात, आम्ब्याचा शिरा असा मेनू केला. सगळ्याना आवड्ला.

ऑफीसात पॉट्लकसाठी काहीतरी करून पाठ्वायचंय.
अर्धा-एक तास आहे पुढचा ़ करायला,तेवढ्यात होइल असा पदार्थ सुचवा प्लीज.
खाणारे सगळे अभारतीय आहेत.

>>अर्धा-एक तास आहे पुढचा ़ करायला,तेवढ्यात होइल असा पदार्थ सुचवा प्लीज.
>>प्रेझेन्टेशन उत्तम हवं असा ़ नियम आहे !!!

पोहे! Proud (सिरियसली. चांगले नटवता येतात.)
किन्वा असेल तर मायबोली रेसिपी वापरून साबुदाणा खिचडीसारखं.
तळण करता येणार असेल तर भजी.
किंवा मसाला पापड.

Hershey perfectly chocolaty cupcake करायला ठेवलेत. कोको पावडरच्या डब्यावर आहे कॄती.

पोह्याची कल्पना चांगली होती, उशिरा वाचले

. धन्यवाद Happy

.

आणि गुलाबजाम मी आदल्या दिवशी सकाळी तळुन घेइन आणि त्याच उरलेल्या तेलात दहीवडे आणि पापड तळीन >>>>>>>>>>>>. गुलाबजाम तेलात न तळता तुपात किवा डालडा मधे तळा......टेस्ट सुन्दर येते......आपण गोड पदार्थ नेहेमी तुपात किवा डालडा मधे तळतो....आणी तिखट पदार्थ तेलात.....

@नीता, स्प्राऊट चाट (मोड आलेले हिरवे मूग, काकडी, डाळिंबाचे दाणे, उकडलेला बटाटा / दुधी, घेवडा - वर शेंदेलोण / चाट मसाला, कोथिंबीर) किंवा फ्रूट चाट किंवा स्वीट कॉर्न चाट ठेवू शकता.
सुरळीची वडी / कोथिंबीर वडी / अळू वडी देखील छान वाटेल. भाताचा ऑप्शन ठेवणार असाल तर लेमन राईस किंवा दही-भात/भुत्ती.

नीता - ईडली + सांबार + चटणी, गाजर हलवा याबरोबर हैदराबादी मिरची वडा पण चालू शकेल... (मोठया मिरच्यांत उकडलेल्या बटाट्याचं सारण भरून तळतात) (?)

Pages