बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाव भाजायची अजून एक शॉर्ट्कट मेथडः
ईथे नऊ किंवा बारा एकमेकांना जोडलेल्या पावाचे पाकीट मिळते. तर पाव सुटे करून, मधून चिरून लोणी लावून भाजायचे म्हणजे फार खेळत बसावे लागते. तर अक्खी लादीच मधून चिरायची आणि दोन तव्यावर एकदमच भाजायचे. २-३ मिनीटात ९-१२ पाव भाजून होतात. डॅफो च्या केस मध्ये ३-४ पाकीटं बास झाली ( जर ती पाव भाजी करणार असेल तर). १० मिनीटांचं काम.

chole/chaNe varun laXat aale. tu amrutsari chole karu shakashil bagh jar paav-bhaji, usal /misal paav nako asel tar. tyaachyaabarobar redimade kulche /paav /naan/ bread kaahihi chan lagel.

हळदीकुंकु आणि बोरनहाणसाठी १८ बायका आणि तेवढीच लहान मुलं आहे वयोगट १ वर्ष ते ६ वर्ष
संध्याकाळी आहे तर मेनू असा ठरवलाय

मोठ्यांसाठी:
उपमा गाजर, मटार, फ्लॉवर घालून
नारळाची वडी
बाकरवडी
वेफर्स
मसाला दूध

मी माबो फेमस मावे सुरळीची वडी पण करून ठेवणार होते पण वडी प्रकरण जरा जास्तच होईल मग Happy

लहानांसाठी:

मिनी इडली किंवा जॅम सँडविच (कुकी कटर ने शेप करून) (इथे सल्ला हवाय दोन्ही पैकी काय बरे दिसेल? )
ज्यूस पॅक्स / ओरिओ/ अ‍ॅनिमल क्रॅकर्स
द्राक्षे किंवा असे कोणते फळ ठेवू जे कापून ठेवलं तरी खराब होणार नाही?

अजून काही चांगले काँबो असेल तर सुचवा. आधीच करून ठेवणार आहे सगळे.

छान आहे मेनू.
मुलं वेफर्स तर खातीलच, मग इडली आणि वेफर्स हे ऑड कॉम्बिनेशन होईल त्यांना. त्यापेक्षा सँडविचेस बरी वाटतील. त्यातही काही गोड, काही चटणी आणि काही नुसतं चीज अशी करू शकता.
द्राक्षांबरोबर (किंवा ऐवजी) मेलन वर्गातलं कुठलंही फळ (टरबूज/खरबूज/कलिंगड) कापून ठेवू शकता.

मोठ्यांना उपम्यावर कॉफी जास्त छान वाटेल. Happy

थॅक्यू स्वातीताई,
हो कलिंगड ठेवीन बहुतेक कारण द्राक्षं आंबट वगैरे असली तर कोणी खाणार नाही.

सँडवीच आधी करून ठेवले तर मऊ नाही पडत ना? की फ्रीज मधे ठेवू?

हो Happy Happy

मुलांसाठी cuties किंवा oranges चे segements करून ठेवता येतील. सध्या बरेच बाजारात उपलब्ध आहेत.

cuties म्हणजे लहान, पिट्टु संत्री - tangerine म्हणतात काही ठिकाणी त्यांना. पातळ सालीची असतात. पण सध्या आंबट असू शकतात ती.
मेलन प्रकार बरा पडतो. लहान मुलांना आवडतोच पण फोडी उरल्या तरी फ्रीज मधे काही दिवस टिकतात.

मसाला दूध हिट्ट प्रकार आहे. थंडीच्या दिवसात मस्त. आणि हकु कार्यक्रमाला ग्रेस आणतो. Happy

कॉस्कोमध्ये क्युटीची ब्~अग मिळते ती पहा....लहान मुलांना क्युटीज खूप आवडतात्...त्यांच्या जाहिरातीत पण तसंच काहीतरी वाक्य आहे ..:)

खूप आंबट आहेत संत्री सध्या, नको घेउ. त्यापेक्शा मेलन ठेव.
खरे तर इतक्या थंडीत फळांपेक्षा पॉप कॉर्न वगैरे ठेवले तर मुलांना जास्त आवडेल. मिनी मफीन पण हिट असतात मुलांमध्ये. मफीन वर विकतचे चॉकलेट सिरप देउ शकतेस, जरा काहीतरी वेगळे, नाही तर चॉकलेट चिप वितळवून तो सॉस पन ठेवू शकतेस. पण सॉस असलाच पहिजे असे काही नाही, किती वेळ आहे त्यावर ठरव. ह्या सॉस मध्ये मुलं फळं पण डिप करून खाऊ शकतात, फाँड्यु सारखे. जर मिनी इडली केलीस तर पालक, टोमॅटो, बीट, गाजर वगैरे प्युरी घालून वेगळ्या वेगळ्या रंगाच्या इडल्या करू शकशील, मुलांना आवडतील आणि कष्ट विशेष नाहीत.

तुला ट्रेडर ज्योज किंवा इतर दुकानं असतात नं म्हणजे जुवेल ~ओस्को किंवा जायन्ट इ. तिथेही मिळेल की. फळांच्या सेक्शनला पहा...आमच्याकडच्या क्युटीज तरी आंबट नाहीयेत... Wink

पॉपकॉर्न पण बच्चू कंपनींचे ऑल टाइम फेवरीत्स असतातच म्हणा.

बिट्टू आणि वेका पॉपकॉर्न अल्मोस्ट बिल्डींगमधल्या सगळ्या हकुंना होते Happy
आता माझ्याकडे लास्ट आहे रथसप्तमीला सो काहीतरी वेगळे ठेवू म्हटलं

संत्र्याचा ऑप्शन चांगला आहे. मिक्स फ्रूटस ठेवू का नाहीतर?

इन शॉर्ट - जॅम मध्ये थोडं पाणी घालून गरम करायचं... थंड झाला की तयार. मी ट्राय केलंय; पण एकदाच केलंय. अगोड फळं पण मग खाल्ल्या जातात...

लेकीच्या वाढदिवसासाठी बेत ठरवती आहे. मोठी २० आणि लहान ७ मुले ( २-५ वयोगट) आहेत.
Rainbow theme प्रमाणे काय करु ? मदतीला कोणी नाहीय ( हक्काचा नवरा सोडून), विकतच्या items चा फार option नाहीय.

१. २-३ प्रकाराच्या पुर्या (पालक, टोमटो), बटाटा भाजी, कोशिबीर, मटार भात
२. पराठे, पंजाबी गोडसर भाजी, कढी, खिचडी

पावभाजी, मिसळ झाल आहे आधि. अजून option सुचलाल का?

Fruit salad साठी आधी फळ चिरुन ठेवता येतील का? आदल्या दिवशी जास्ती तयारी होईल असे काय करता येईल?

सोप्पा मेनू : इडली-चटणी (चटणी - सांबार आधी करून ठेवता येते) - इडल्यांमध्ये खायचे रंग किंवा वेगवेगळ्या भाज्या (जसे गाजर, बीट, स्वीट कॉर्नचे दाणे, मटार इ.) घालून वेगवेगळ्या चवीच्या व रंगाच्या इडल्या करता येतील .
किंवा रेनबो सँडविचेस - वेगवेगळी स्प्रेड्स, भाज्या, सॅलड्स, फ्रूट प्रिझर्व इत्यादी वापरून बहुरंगी - बहुचवींचे सँडविचेस - सोबत रेनबो केक, चिप्स, फ्रूटडिश असे ठेवता येईल. सँडविच कटर ने वेगवेगळ्या आकारांचे सँडविचेस कापता येतील. तसेच पिनव्हील सँडविचची आयडिया वापरून वेगवेगळ्या रंगाच्या स्प्रेड्स, जॅम्स इत्यादीच्या लेयर्स बनवता येतील.

वेगवेगळ्या रंगीत भाज्या घालून उपमा, त्यावर हिरव्या रंगाची पालक शेव - पिवळ्या रंगाची नेहमीची शेव - लालसर रंगाची टोमॅटो शेव - ओलं खोबरं - कोथिंबीर, वेगवेगळ्या रंगाच्या व चवींच्या चिप्स, खमण ढोकळा / खमणी, गुलाबजाम, फ्रूट टॉपिंगचा केक असेही ठेवता येऊ शकेल.

Thank you अरुंधती !
हा बेत छान वाटतो आहे. फक्त येणारे पाहुणे १-१.५ तास प्रवास करुन येणार असल्याने शक्यतो जेवणाचा विचार करत होते. उपमा / इडली-चटणी पोटभरीचा होईल का? party संध्याकाळी आहे. परत पोहोचायला रात्र होईल.

मी आता rainbow fruit cake प्लान केला आहे. पण party informal असल्याने (सगळ मराठी मित्रमंडळ) theme खूप hard n fast नाहीय.

जेवणाचा प्लॅन असेल तर मग इडली/उपमाचा पर्याय नको. मुलंही खाऊ शकतील असा मेनू हवा ना?

हो अरुंधती. मुलंही खाऊ शकतील असा मेनू हवा. त्यात ही तिखट न खाणारी मुले आहेत (पहिला नंबर माझ्याच मुलीचा ! )

जर सरळसोट जेवणाचाच प्लॅन केलात तर बरंच राहील. कारण तशी लहान मुलं फक्त ६/८ म्हणताय!
साधा मेन्यू जेवणात + लहान मुलांकरता काहीतरी वेगळं- १ वा २च पदार्थ + केक सगळ्यांकरता हे जास्त सोईचं + पोटभरीचं होईल असं वाटतय...

चिकन चा रस्सा वा फ्लॉवर चा रस्सा (कमी तिखट) + एखादी दहीवाली कोशिंबीर/ रायतं + थोडे फुलके + राईस/ पुलाव / कमी तिखट बिर्यानी + तळलेले, भाजलेले पापड / पकोडे, मूगभजी सोबत एखादी पातळ चटणी/ सॉस.

गोडात केक आहेच + कुठलाही गोड पदार्थ / आईसक्रीम + गुलाबजाम/गाजर हलवा ई...

लहान लोकांकरता - क्रीम क्रॅकर्स + जॅम. वेगवेगळी छोटी सँड्विचेस... ई

.

@चारुता : मग वेगवेगळ्या रंगाचे - स्टफिंगचे पराठे, मिक्स भाज्यांचे लोणचे किंवा अचारी पनीर, चटणी, टोमॅटो सूप, सॅलड / रायते, तयार नमकीन / फरसाण किंवा एखादा चाटचा प्रकार, पुलाव / बिर्याणी / मसालेभात आणि आईस्क्रीम हा मेनू छान वाटेल. मुलांना केक-आईसक्रीम आणि सँडविचेस / पास्ता - चिप्स देता येईल.

लोणचे, चटणी, सूप, भाताचा प्रकार अगोदर करून ठेवता येईल. पराठेही अगोदर कोरडे भाजून आयत्या वेळी तेल/ लोणी/तूप यांवर भाजता येतील. पास्ता सॉस अगोदर बनवून ठेवता येईल. आयत्या वेळी रायते / सॅलड करावे लागेल.

स्टार्टर म्हणून पाणी-पुरीही ठेवू शकता! Proud त्याची तयारी अगोदर करून ठेवता येते.

Rainbow theme >>> चारूता, रगडापॅटिस! चटण्यांसकट सगळी तयारी खूप आधीपासून करता येऊ शकते. पोटभरीचा पदार्थ आहे. तिखट गोड चटण्या, पांढरा कांदा, हिरवी कोथिंबीर, किसलेले बीट वगैरे घालून रंगीबेरंगी करता येऊ शकेल. जोडीला दहीबुत्ती करता येऊ शकेल. त्यात हिंग जिर्‍याची कढिपत्ता सुक्या मिरच्यांची फोडणी आणि किसलेले गाजर वगैरे घालून रंगीत करता येऊ शकेल. गोड म्हणून केक आहेच, फ्रूट सलाड आहेच.
लहान मुलंही नुसतं पॅटिस गोड चटणीबरोबर खाऊ शकतात.

Pages